एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.
आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.
तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.
आमच्या घरीही कुकर उडाला होता
आमच्या घरीही कुकर उडाला होता लहान असताना.
किचन एका कोपर्यात होतं आणि सगळे बाहेर होते त्यामुळे काही झालं नाही.
आईने निष्कर्ष काढला होता कि हॉकिन्स कुकर नव्हता म्हणून झालं. म वरून चार अक्षरी कुठला तरी ब्रॅण्ड होता...
पण हॉकिन्सचे पण असे अपघात झाल्याचे ऐकले होते.
खोपोलीच्या शेवटाला शेवटचा
खोपोलीच्या शेवटाला शेवटचा ढाबा होता तो , इथून पुढे जुना मुंबई पुण्याचा फेमस खंडाळा घाट सुरु होतो. सगळे शनवरी सकाळी राजगड करायला निघणार होते, बाकीचे सगळे संध्याकाळी पुण्यात पोचले होते. फक्त मला रात्री घरी यायला उशीर झाला. ठाण्याहून निघायलाच रात्रीचे आठ वाजले. खोपोलीत पोहोचेपर्यंत साधारण 11 झालेले होते. इथून पुढे पुण्यापर्यंत काही मिळण्याची शक्यता नव्हती. एक्सप्रेस हायवे झाल्यामुळे जुन्या रोडवर आता जास्त ट्राफिक नसते.
खोपोलीच्या शेवटला शेवटचा ढाबा होता तो.
प्रचंड थंडीत काकडत कशीतरी बाईक साईडला लावून त्या धाब्यात मी जेवून घेतले.
जेवण संपून बाहेर आलो. धुक्यात घाट लपेटलेला होता, काहीच दिसत नव्हते, तुरळक गाड्या येत जात होत्या.
मित्रांना फोन करून सांगितले की मला यायला उशीर होईल
सिगरेट प्यायची हुक्की आली, धब्यासमोरची टपरी बंदच होत होती त्याच्याकडून एक सिगरेट मागितली आणि बाईक ला टिकून घाटात बघत बसलो, खंडाळा वरून येणाऱ्या गाड्यांचे दिवे अधून मधून धुक्यातून लुकलुकत होते
थंडी वाढायला लागली , तसे माझे अजून एक पांढरे जॅकेट बॅगेतून काढून घातले.बाईक सुरू केली, वळवून मेन रोड ला आणणारच होतो तेवढ्यात मध्ये काहीतरी ठेवलेले होते नेमके त्यावरूनच माझी बाईक गेली, काहीतरी फुटल्याचा आवाज आला म्हणून मी थांबलो.
उतरून मागे आलो, तर एक मडके माझी बाईक गेल्याने फुटले होते, त्यातला लाल रंगाचा भात आसपास पसरला होता, एक विचित्र रंगवलेला भोपळा गडगडत बाजूला गेला. अजून काही काही विचित्र वस्तू आसपास पडलेल्या होत्या. घण वास सुटलेला होता. त्या वासानेच मला एकदम मळमळायला झाले. त्या सगळ्या भयानक प्रकाराकडे दुर्लक्ष करून बाईक सुरू केली आणि सुसाट घाटात शिरलो.
थंडी हेल्मेटच्या आतही फिरत होती आणि दात वाजत होते. हात ईतके थंड पडले होते की क्लचही दाबता येत नव्हता. अचानक मगाशी आलेला वास परत यायला लागला. मला आधी वाटले की टायरला लागलेल्या त्या घाणीमुळे तो वास येतोय की काय म्हणून मी दुर्लक्ष करून तसेच बाईक चालवायला लागलो. पण हळूहळू जी मगाशी मला थंडी लागत होती आता मला काहीच्या काही गरम व्हायला लागलं. आतून घाम यायला सुरुवात झाली. अनामिक भीती दाटून आली. जणू काही कोणीतरी मागे बसले आहे, असे वाटायला लागले, त्याचे वजन जाणवत होते. त्या निर्मनुष्य घाटात बाईक थांबवून मागे बघण्याची हिम्मत होत नव्हती. हळु हळु कानाशी कसली तरी हिडीस गुणगुण ऐकायला यायला लागली. कोणीतरी आचके देतय, मानेवरून नखं फिरवताय , असे वाटायला लागले. एकीकडे मला माहित होते की मी एकटाच आहे, माझ्या मागे कोणी नाही. पण दुसरीकडे होणारे हे भास भयानक होते. आणि नक्की भासच होते? की खरच कोणीतरी माझ्या मागे होते? यावर एकच उपाय मला दिसत होतं, शक्य तितक्या लवकर बाईक पळवून खंडाळा किंवा लोणावळ्यात पोहोचणे. समोरून एक बाईक सुसाट वेगात मला पास झाली, तितक्या वेळात पण ते माझ्याकडे बघताहेत असे मला वाटले. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे हे नक्की झाले.हळू हळु माझी मान जड होते आहे असे मला वाटायला लागले. कोणीतरी पाठीवर बसले आहे की काय मणा मणाचे ओझे अंगावर आल्यासारखे वाटायला लागले, ते जे कोणी मागे बसले होते ते आता सरकून पाठीवर आले होते. I was trap. आता तो खदखद हसणारा आवाज अजून जवळून यायला लागला.
भयानक दुर्गंधी सुटली. या भानगडीत मला maganlal चिक्की असा बोर्ड दिसला.
म्हणजे खंडाळा कधी मागे गेले मला समजलेच नाही, मी लोणावळ्यात पोहोचलो होतो, सगळी दुकानं बंद होती, सगळे रस्ते ओस पडलेले होते, मला थांबायचे होते पण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. मी पुढे पुढे जातच होतो. तो खरखरीत आवाज आता मेंदू kurtdayla लागला होता. "किट किट, कच कच , " कसलीतरी अगम्य रचना अभद्र आवाज!!!
तितक्यात बाजूला एक छोटे देऊळ दिसले, आत असलेल्या कुठल्यातरी आदिम शक्तीने प्रेरणा दिली. त्या परिस्थितीत विचार न करता मी बाईक वरून उडी मारली आणि सरळ त्या देवळाच्या समोर धडपडत, आपटत पडलो, ते माझ्या नशिबाने मारुतीचे देऊळ होते. बाईक पुढे जाऊन जोरात एका भिंतीला आपटली. मागे एक आकार बसलेला होता, त्याने वीच्कुन माझ्याकडे पाहीले आणि कुठेतरी झाडीत तो अदृश्य झाला. देवाच्या दयेने मी वाचलो होतो
थरथर कापत होतो, अंगात भयानक ताप भरलेला होता, काय झाले हे कळायच्या आधीच डोळे मिटले आणि मी पायरी वर आडवा झालो
बापरे सगळ्यांचे अनुभव भयानक
बापरे सगळ्यांचे अनुभव भयानक आहेत. मी एकदा डाळीचा कुकर झाल्यावर, गरम असतांनाच घाई घाईत अगदी जोर लाउन झाकण उघडलेलं तेव्हा घर भर डाळ पसरली होती. अंगावर दोन तीन दाण्यांवर निभावलं..नाही तर हॉस्पिटल ला जायची वेळ आली असती..
रघू आचार्य, तो मार्लेक्स कुकर
रघू आचार्य, तो मार्लेक्स कुकर असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडेही होता.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
किती वेळ आठवत बसलो होतो हे नाव. Thank you..
माझ्या आयु श्यात थरारक
माझ्या आयु श्यात थरारक प्रसंग बरेच आलेले आहेत. धाग्याच्या निमित्ताने आठवत आहे,
मी ओडेसी फिल्म प्रॉड क्षन कंपनीत काम करत होते तेव्हाच्या ओळखी खूपच होत्या. मग माझा सेंट बिझनेस सुरु झाला कंपनी एकटीने फॉर्म केलेली नवरा मुम्बईत काम करत होता तो नंतर आला. मुलगीला मावशी कडे ठेवुन हपीस करत असे. पुढे नवरा वारला. मुलगी पहिली दुसरीत होती तेव्हाची गोश्ट. मावशी तीन वाजता तिला बस ने पिक अप करायच्या त्यांचा घाबरा घुबरा फोन आला. मग मी लगेच हपिसातुन घरला यायल निघाले.
आता ह्याला ओ डेसीचा पदर जोडू. ओडेसी मध्ये फिल्म असिस्टंट/ रायटर म्हणून एक आंध्राचा मुलगा सुर्या नावाचा घेतला होता. फारच बिचार्याची गरिबी. मावशींचे दोन अडीच खोल्यांचे घर मागे बस्तीत होते तिथे त्याला पीजी राहायला दिले दोघांची ओळख करुन दिली होती.
पण मावशींचा ते दिवशी फोन का आला? तर त्या व त्यांची दहा बारा वर्शाची मुलगी व माझी मुलगी बस मधुन पिक अप केलेली त्यांच्या घरात होत्या.
सुर्या पाच फुट दहा तरुण मुलगा देशी दारुच्या नशेत अगदीच टुन्न होउन त्यांच्या घरात चट ई वर झोपलेला होता व हलायला ढिम्म नाही. वस्तीतल्या लोकांनी प्रयत्न केलेले. घरासमोर ही गर्दी. मग मी आले. परिस्थितीचा अंदाज घेतला. पहिले दोन छोट्या मुलींना घराबाहेर काढले दूर उभे केले. मग तो झोपला होता ती चटईच मागुन उचलली. घरात देशी दारुचा वास भरुन राहिला होता. छोटीशी तर खोली.
चटई उचलली तशी तो पण उठायला लागला तसेच चालू ठेवल तो उभा राहिला मग मागुन त्याला धक्के मारुन दाराबाहेर हाकलले. बाहेर बापे उभे होते डायवर पण होता आमचा . त्यांनी त्याला झेलला व थोडा दूर ढकलून दिला. मग मी ओर डुन मावशींना घर बंदकरा कुलुप लावा म्हणून सांगितले. सर्व आमच्या बिल्डिंग मध्ये घरी आलो. पाणी प्यायले . मुलींना दिलासा दिला त्या घाबरलेल्या बिचार्या.
सिंगल पेरेंट म्हणून अक्षरशः काही ही करावे लागते. बाकी किस्से फिर कभी. प्रत्येकाचे लाइफ किल्ला मधल्या सारखे काव्यात्मक नसते. म्हणून मला ते लेख वाचून छान वाटते पण स्वप्नवतच आहे ते फिक्षन!! यु हॅव नो फिल्टर जीवनाची अग्ली बाजु पण फेस करावी लागते.
अमांचा किस्सा ऐकुन माझा एक
अमांचा किस्सा ऐकुन माझा एक जुना प्रसंग आठवला….
माझ्या मुलीला पाचवीपासुन पुण्याच्या सैनिकी शाळेत घातले होते. तिला सोडुन आल्यावर माधारण १५ दिवसांनी मी ट्रेनमध्ये असताना माझा फोन वाजला.. मी फोन उचलला तर एक लहान मुलीचा आवाज बोलला,
‘आई तु घरी कधी येणार??‘.
मी एकदम चमकले आणि विचारले कोण बोलतेय?
अगं आई, मी ऐशु. माझ्या मुलीचे नावही ऐशु. त्या एका क्षणात माझ्या डोक्यात काय काय विचार येऊन गेले सांगता येणार नाही. पडणारच होते तरी कशीबशी सावरुन तिला विचारले, बाळा तुझ्या आईचे नाव काय?? पलिकडुन फोन कट झाला. काय गडबड झाली हे लक्षात आले पण क्षणभर तोंडचे पाणी पळाले होते.
बापरे कुकरचा प्रसंग खरंच
बापरे कुकरचा प्रसंग खरंच थरारक, थोडक्यात निभावले. पुण्य तुमचे! _/\_
पण हे खूप घडते, माझ्या बहिण & माझ्या ही कडे घडले आहे.
वरची पाणी बाहेर न यायची चर्चा पण उपयुक्त.
प्रसंग १:-
प्रसंग १:-
मी कामावरून घरी परतले आणि कुलूप उघडून दार ढकललं तर काय.. सगळीकडे माती आणि आणि पाणी पसरलं होते. मला वाटलं, छतच कोसळलं. (तेव्हा आमच्या वरचा फ्लॅट बऱ्याच वर्षांपासून रिकामा होता). मी घाबरून खालच्या फ्लॅट मधल्या दादांना आवाज दिला. तेव्हा आमच्या पूर्ण बिल्डिंग मध्ये आम्ही दोघंच रहात होतो.
दादांनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वी प्रचंड मोठा आवाज झाला होता म्हणून, कुठेतरी गॅस सिलेंडर चा स्फोट झाला असं वाटून, त्यांनी बिल्डिंगमधे सगळीकडे फिरून कानोसा घेतला.. कुठे वास येतोय का ते बघितलं.. पण काय झालं होतं ते कळलंच नाही.
आम्ही दोघं आत गेलो. छत शाबूत होतं.
हॉल च्या जवळच पॅसेज मध्ये दीड फूट रुंदीचा उघडाच माळा आहे. त्यावर इनवर्टर होतं. त्यातल्या बॅटरी चा स्फोट झाला होता. त्यातलंच सगळं अॅसिडीक पाणी आणि जे काय मटेरियल असेल ते घरभर आणि छतावरही पसरलं होतं.
नशिबाने त्या दिवशी मला यायला जरा वेळ झाला होता.
इनवर्टर च्या खालीच एक कपाटासाठी जागा होती. तिथे बंद कपाट नं करता तिचा वापर आम्ही जास्तीच्या गॅसच्या टाक्या ठेवण्याकरता करत होतो. तिथे दोन भरलेल्या गॅस टाक्या होत्या. नशिबाने ते सगळं सुखरूप होतं.
ज्याच्याकडून इनवर्टर घेतला त्याला कॉल केला. तो तर आल्यावर सगळं दृश्य बघून सुन्न पणे बसूनच राहिला. कारण आठ दहा दिवसांपूर्वीच येऊन त्याने बॅटरीचा कपॅसिटर बदलला होता आणि बॅटरीत पाणीही टाकलं होतं.
सगळ्या इलेक्ट्रिक बटणांमधे शॉक लागत होता. ताबडतोब इलेक्ट्रिशियन बोलावून सगळं काम करून घ्यायला लागलं.
प्रसंग २:-
दूसरा प्रसंग पुढच्या २/३ महिन्यातच घडला.
सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं. पूजेला गुरुजी (ज्ञानप्रबोधिनी) पुण्याहून त्याच दिवशी बारा वाजेपर्यंत यायचे होते. जेवायला पाच सहा माणसंच असणार होती आणि सकाळी वेळही होता म्हणून स्वयंपाक मीच करायचा ठरवला. सगळा स्वयंपाक पटापट आटपून मी शेवटचा कुकर (!!!!) लावला आणि काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेले. जरा वेळातच मोठ्ठा आवाज होऊन दाणकन आतल्या आळूच्या भाजी सकट कुकरचं झाकण पार छता पर्यंत उडालं.
तेव्हाही नशिबाने मी जवळपास नव्हते आणि नवरा हॉल मधे एका कोपऱ्यात पेपर वाचत बसला होता. स्वयंपाकघर आणि हॉल ह्या मधे भिंत नाहीय पण तो जरा दूरच्या कोपऱ्यात असल्यामुळे तोही वाचला.
त्यादिवशी तर घाबरून बसायला पण वेळ नव्हता. पूजेला गुरुजी आणि जेवायला लोकं यायची होती. स्वयंपाकघर आणी अर्ध्या हॉल मधे अळूची भाजी, वरण भात पसरले होते. ओट्यावर तयार केलेले काही पदार्थ पण वाया गेले होते.
आम्ही दोघांनी कसबसा पसारा आवरला आणि मी परत स्वयंपाकात जे जमेल ते करायला लागले. नंतर घराला परत रंग लावेपर्यंत कित्येक महीने छतावरची अळूची भाजी दिसत होती.
बापरे, सगळेच अनुभव भयंकर आहेत
बापरे, सगळेच अनुभव भयंकर आहेत.
आता सगळ वाचून मला कुकर बद्दल अनामिक भीती वाटायला लागली आहे कारण कुकर लावणे ही आपल्यासाठी एक रोजची शुल्लक बाब आहे पण ती किती काळजीपूर्वक केली पाहिजे हे कळले.
कुकर वापरावा की नाही असे वाटू लागले आहे.
कुकर कसा वापरावा, कुकरची काळजी कशी घ्यावी असा काही काही धागा आहे का?
छल्ला
छल्ला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मारलेक्स गुगल करून सुद्धा सापडत नव्हते.
ऋतुराज +१११
ऋतुराज +१११
जानकरांनी वेगळा धागा काढावा. कुकर शाप की वरदान?
आचार्य,
आचार्य,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्ली तो ब्रँड बंदच झाला आहे बहुतेक....!!!
अमा: डेंजर किस्सा आहे! मला
अमा: डेंजर किस्सा आहे! मला काय रिअॅक्ट करावं ते समजत नाहीये.
साधना : बापरे! कोणीतरी फ्रॉड करत होतं की काय म्हणजे? आणि कशाला?
SharmilaR : इनवर्टरचा किस्सा भयंकर आहे.
कुकरची आता मलाही भीती वाटायला लागली आहे इथले किस्से वाचून. आता कुकर लावला की नीट लक्ष देत तिथेच थांबतेय.
मार्लेक्सच्या इतक्या आठवणी निघाल्यामुळे त्याची जिंगल डोक्यात वाजायला लागली आहे - मार्लेक्स प्रेशर कुकर! खाना जल्दी पकाए , ऐसी सीटी बजाये. मार्लेक्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी rmd. मला ते कैसी शिट्टी
अगदी rmd. मला ते कैसी शिट्टी बजाय आठवलं.
वरचे किस्से डेंजर आहेत.अमा, कठीणच असणारे त्या वेळी असं अल्कोहॉलिक माणसाला हाताळणं.
इन्व्हर्टर चा किस्सा पण भयंकर आहे.
साधना, कळलं नाही.हा काही फ्रॉड होता का, पैसे मागायचा?
कुकरच्या बाबतीत आपली
कुकरच्या बाबतीत आपली अतिपरिचयामुळे अवज्ञा होते कधीकधी असं मला वाटतं
आपल्या आयांसाठी कुकर नवीन वस्तू होती त्यामुळे त्या सांभाळून वापरायच्या. अर्थात पूर्ण काळजी घेऊनही तांत्रिक बिघाडामुळे अपघात होऊ शकतोच.
इन्व्हर्टरचा किस्सा भयंकर आहे.
Pressure cooker safety
Pressure cooker safety tips
https://www.youtube.com/watch?v=4UpDmf53PEI
साधना ह्यांना बहुतेक दुसर्याच
साधना ह्यांना बहुतेक दुसर्याच पण सेम त्यांच्या मुलीच्या नावाच्या मुलीचा राँग नंबर लागला होता. असे मला वाटते.
दोन भरलेल्या गॅस टाक्या होत्या>>> म्हणजे काय मला खरंच नाही कळाले. कूकींग गॅस का?
दोन भरलेल्या गॅस टाक्या
दोन भरलेल्या गॅस टाक्या होत्या>>> म्हणजे काय मला खरंच नाही कळाले. कूकींग गॅस का?>> भरलेली गॅस सिलेंडरस.
पूर्वी आमच्याकडे एकूण चार सिलेंडरस (कूकिंग गॅस ) असायची ( सासू सासऱ्याचं काँनेकशन पण होतं. आता दोन जास्तीची सिलेंडरस परत केलीय.)
इथले किस्से वाचुन घरातल्या
इथले किस्से वाचुन घरातल्या रोजच्या वस्तुंची भिती वाटायला लागली आहे...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कुकर, इन्व्हर्टर ची जास्त
SharmilaR
SharmilaR
मी पण नुकताच इन्व्हर्टर बसवला आहे.
तुमच्या इन्व्हर्टर चे डिटेल्स देऊ शकाल का? कशामुळे झाले समजले का?
घरातल्या वायरिंग मधे MCB/ELCB / RCCB यापैकी काय काय वापरले आहे?
घरगुती उपकरणे, त्यांची निगा
घरगुती उपकरणे, त्यांची निगा आणि सुरक्षितता
असा धागा काढावा.
LPG / PNG, Battery ( मोबाईल / ईस्कूटर / सायकल), कुकर, मायक्रोवेव्ह / इलेक्ट्रिक स्टोव्ह इ. साठी होईल.
तुमच्या इन्व्हर्टर चे डिटेल्स
तुमच्या इन्व्हर्टर चे डिटेल्स देऊ शकाल का?>> manufacturing नाशिकचे होते.
कशामुळे झाले समजले का?>> नाही.
घरातल्या वायरिंग मधे MCB आहे.
अपघात होण्यापुर्वी invertor ला प्रॉब्लेम आला म्हणून तो सोडवायला ज्याच्या कडून घेतला त्याचा माणूस आला होता. तेव्हाच त्याने capacitor बदलला होता.
Capacitor branded कंपनी चा हवा असा आग्रह धरून मी त्याची पावतीही घेतली होती.
कुकर ला तर पर्याय नाही पण अपघाता नंतर मी कधीच invertor घेतला नाही. आता सगळ्या खोल्यांमध्ये स्मार्ट बल्ब बसवले आहेत. पॉवर गेल्यानंतर दीड दोन तास तरी सोय होते.
ELCB असेल तर लीकेज करंट मुळे
ELCB असेल तर लीकेज करंट मुळे होणारे अपघात टाळता येतात.
घरगुती उपकरणे, त्यांची निगा
घरगुती उपकरणे, त्यांची निगा आणि सुरक्षितता
असा धागा काढावा.
LPG / PNG, Battery ( मोबाईल / ईस्कूटर / सायकल), कुकर, मायक्रोवेव्ह / इलेक्ट्रिक स्टोव्ह इ. साठी होईल. >> +१२३
सोडा आता ते कुकर चे झाड. आमच्या नात्यात एकिंचा अतिशय तरुण वयात मृत्यू झाला आहे कुकर फुटून. त्यांची बाळं इतकी लहान होती आणि इतर नातेवाईकांनी त्या कुकरच्या त्रॉमा मध्ये ती कशी वाढवली हे अगदी जवळून बघितलं आहे. हा विषय महत्वाचा आहे हे कळतं पण नको वाटतं बोलायला सुद्धा.
स्टीव्ह रॉजर्स देवळात
स्टीव्ह रॉजर्स देवळात गेल्यावर वाचलास रं वाचलास असं नाही बोलला का तो?
मला राँग नंबर लागलेला…
मला राँग नंबर लागलेला…
मुलीला नुकतेच निवासी शाळेत सोडुन आल्यामुळे मी मुलीच्याच विचारात होते.. त्यात फोनवर तिचे नाव ऐकुन ती घरी कशी आली, का आली, कधी आली, पाचवीतली मुलगी पुण्याहुन एकटी कशी येईल, काही वाईट तर झाले नाही ना असे हजार प्रश्न मनात एका क्षणात आले. मन चिंती ते वैरीही न चिंती…
सूचना : धाग्याशी विसंगत परंतु
सूचना : धाग्याशी विसंगत परंतु संबंधित माबोकरीचा या धाग्यावर वावर असल्याने दिलेला प्रतिसाद.
मायबोलीकर 'साधना' यांचा १५ ऑगस्टला वाढदिवस होता. परंतु नेमके त्याच दिवशी माझ्याकडे मायबोलीवर लॉगीनला प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे शुभेच्छा देता आल्या नाहीत.
Belated Happy Birthday!!!
वि मु
वि मु
मनापासुन आभार…माझ्याकडेही सेम प्रॉब्लेम येत होता,
अजुनही असावा.
कूकरबद्दल -
कूकरबद्दल -
मी गेले कित्येक वर्षे एकही शिट्टी होऊ न देता वरण , भात कुकरमध्ये शिजवते.
कूकरमध्ये खाली एक पेला पाणी घालून आधी उकळायला ठेवते. मग तांदूळ आणि डाळ धुवून हळद वगैरे घालून कुकरमध्ये ठेवेपर्यंत कुकरमधलं पाणी खळाखळा उकळलेले असतं.
मग झाकण धुवून / ओलं करून लावते. आणि गॅस एकदम मिनिमम वर ठेवते. तीन लोकांच्या वरण भाताला साधारणपणे २५-३० मिनिटे लागतात. एकही शिट्टी होत नाही. भातवरण छान शिजतो. तूरडाळ नीट शिजणारी नसेल तर त्यात गरम पाणी घालते.
मलाही कुकरची भीती बसली होती. आता बिना शिट्टीचा करते, मंद गॅसवर शिजत ठेवते, तेंव्हापासून भीती कमी झाली आहे.
Pages