रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कुकरच्या मॅनुअलमध्ये आत डब्बे ठेऊ नका असे सपष्ट लिहिलेले आहे. पण असे मॅनुअलचे ऐकायला लागलो तर झालेच मग…

सेफ्टी वोल्व्ह वितळुन तिथुन वाफ निघणे अपेक्षित आहे. माझ्या शेजार्‍याच्या घरात असा वॉल्व्ह वितळुन तिथुन कारंजासारखा भात वर सिलिंगपर्यंत उडुन चिकटलेला आहे. हे तेच शेजारी ज्यांच्याकडे सिलिंगचे प्लास्टर पडले होते.

त्यांच्याकडे ११ दिवस गणपती असायचा आणि घरात जे शिजेल ते नैवेद्य म्हणुन ठेवायचे. आम्ही गणपतीला नैवेद्य म्हणुन स्पेशल पदार्थ घरात करतात हे पाहिले होते, त्यामुळे यांचे जरा वेगळेच वाटायचे. एका वर्षी त्यांचे मखर आग लागुन जळाले. त्यांनी लगेच नवे मखर बनवले.

माझी आई म्हणाली असे आपल्याकडे झाले असते तर मी भिती व काळजीने मेले असते, कसला अपशकुन म्हणुन… मी म्हटलेही तिला, शेजार्‍यांकडुन शिक काहीतरी, शकुन अपशकुन काही नसते.

साधना, अगदी.प्रेशर पॅन च्या मोठ्या हंडीत कधीच डाळ सांडली नाही, पण विनोदशी(छोटा विनोद कुकर, पूर्ण मेटल ची शिट्टी वाला) नातं जुळवल्यापासून माझा स्वतःवरचा डाळ शिजवण्याचा विश्वास नाहीसा झालाय.जरा डाळीचं प्रमाण जास्त झालं की लगेच सांडतं.हल्ली त्यातल्यात्यात उपाय काढलाय की किकर बिन शिट्टी न लावता थोडी वाफ जमू देते आणि नंतर शिट्टी लावते.त्याने शक्यता कमी होते.मला प्रेस्टिज चा छोटा कुकर जास्त आवडायचा.
विनोद आणि प्रेस्टिज दोघानीही छोटे डबे दिले होते.आम्ही एक चिमुकला इडली साचा पण आणला छोट्या कुकरमध्ये बसणारा.अगदी 1 माणूस किंवा लहान मूल असेल तर मिनी इडली करायला बरा पडतो.

कुकर च्या शिटी मधून डाळ भाताचं पाणी बाहेर येऊ नये म्हणून गॅस एकदम फुलवर न ठेवता थोडा कमी ठेवून. ह्याचा उपयोग होतो. तसेच कूकरच्या झाकणाला आतून तेलाचा पुसट हात फिरवणे हा ही एक उपाय आहे पाणी बाहेर n येण्यासाठी.
मला ही कुकरची भीती वाटते. मी फार कुठे बागडत नाही कुकर लावून. जो पर्यंत वाफ बाहेर पडते आहे तो पर्यंत काही धिका नाही. फार फार तर काय होईल, पाणी संपून कुकर जळेल, धोका आहे वाफ कोंडली गेली तर ...

बाप रे काय एकेक गोष्टी आहेत..
सिलिंग, घोरपड, कुकर.. वाचून च धस्स झालं..

काही घटना भीतीदायक घडून गेल्यात.

मी इकडे लिहलेला एक लेख ती थरारक पाच मिनिट

पण या एका घटनेने मला बदलवल. आयुष्यातील अनिश्चितता, अगतिकता जाणवून गेली.
त्यामुळे छोट्या गोष्टींचं दडपण येणं किंवा मी ते घेणं या सगळ्यात फरक पडला.

बापरे छन्दिफन्दि तुमचा अनुभव तर थरारक अनुभवांचा बाप आहे. एकदम वेस्टर्न फिल्मी स्टाईल पण तेंव्हा काय तंतरली असेल कल्पनाही करू शकत नाही. परदेशात एकटे दुकटे गुंडानी गाठून पिस्तूल डोक्यावर रोखणे इज माय वर्स्ट नाईटमेर!! मला वाटतंय याच धाग्यावर सोमालियन गुंडानी धमकावलेला अनुभव कुठेतरी लिहिला आहे. पण तुमच्या अनुभवाने कळस केला. खूपच धीराच्या आहात. नंतरच्या जर तरच्या मनातल्या चक्रांनी तर ठार वेड लागले असते एखाद्याला.

हो खर आहे. त्यातून बाहेर पडायला वेळ लागला.
धाकटा मुलावर थोडा जास्त ताण आलेला त्याच्या साठी मी आधी स्वतः त्यातून बाहेर पडले.. घटना घडून गेली पण तुम्ही म्हणता तस जर तर च्या प्रश्नांनी डोकं पोखरून निघायची पली आली होती. त्याचा विचार प्रयत्नपूर्वक थांबवला तेव्हा हळू हळू त्यातून बाहेर पडता आलं.

कुकर शिट्टी उडून वर जाणे आमच्याही घरात घडलंय.
नशीब तेव्हा अगदी जवळ कोणी नव्हतं.
Hawkins चा कुकर होता.
घेउन एक महिनाच झालेला. त्यामुळे gasket, valve, शिट्टी सर्व नीट function होत असणार हे गृहीत होते.
दुकानातून घेतला होता. त्याला जाउन भांडलो तर दुकानदार आम्हालाच वेड्यात काढत होता.
पाणीच कमी टाकलं असेल किंवा अजून काही
त्याला झापलं होतं. 12 ते 13 वर्षे झालेत आम्ही कुकर वापरतो , कधीच असे नव्हते मग सारवासारव भाषा वापरली त्याने आणि कुकर सर्व्हिसिंग ला दिला.
त्या warrenty service माणसाचा नंबर घेतलेला.
त्यालाही झापलं होतं सेफटी वरून. त्यांनी तोच कुकर रिपेअर करून दिलेला आठवतंय.

शिट्टीत अन्नकण अडकून राहू नयेत म्हणून प्रत्येक वेळी ती धुवून, नक्की आरपार हवा जाते ना, हे बघून बसवायची. कुकरच्या वर जिथे शिटी लावतो तिथून वाफ बाहेर यायला लागली की मगच त्यावर शिटी बसवायची. कुकरला झाकण लावताना गास्केट ओली करायची. या आणि अजून काही टिप्स मागे एकदा फॉरवर्ड म्हणून आल्या होत्या. सापडल्या तर चिकटवते.
मुळात शिटी होऊ न देता, प्रेशर आल्यावर आच बारीक करून अन्न शिजवावं असंही सांगतात. पण एखादी तरी शिटी होतेच.

शिट्टी दर आठवड्याला मी उघडुन धुते. प्रेशर जमले की गॅस झिरोवर ठेवला तरी कुकर लहान असल्यामुळे शिट्टी होतेच. गॅस झिरोवर ठेवायची सवय असल्यास कुकरच्या बाजुचीच कामे करत राहायचे नाहीतर पाणी आटुन गेले तरी गॅस चालुच राहिल Happy

कधी मला वाटले की वाफ जमुन झुक झुक आवाज यायला वेळ लागतोय तर शिट्टी हलवुन बघते , पाणी घातलेय व त्याची वाफ होतेय हे चेक करायला. Happy

एकुण कुकर हे नीट वापरले तर खुप उपयोगी पण चुक झाली तर खतरनाक हत्यार आहे.

प्रेशर कुकर लावण्याची आणि अन्न शिजवण्याची पद्धत (सुरक्षा आणि योग्य प्रकारे शिजवणे)हॉकिन्सवाले देतात पण तसे कुणी करत नाही. भराभर भांडी भरून झाकण लावून कुकर गॅसवर आदळणे असा प्रकार चालतो. ( कसा लावायचा हे शिकवायला जाणे म्हणजे त्या दिवशी बिनाकुकरच्या शिट्ट्या वाजणे.)

बापरे.. कुकर प्रसंग भयंकर... मला बाहेरच्या झाकणाच्या कुकरची भितीच वाटते....आतल्या झाकणाचे कुकर त्यामानाने सेफ वाटतात..झाकणं उडालं तरी उडुन आतच पडेल असं वाटतं... पण आजकाल आतल्या झाकणाचे कुकर फारसे बनवत नाहीत का ? स्टील चा कुकर आणायला म्हणुन मधे गेले होते पण सगळे बाहेरच्या झाकणाचेच होते.

आज एक वेगळा प्रेस्टिज चा भेट मिळालेला मिनी कुकर आहे तो लावला.तो आम्ही कुकर म्हणून कमी आणि दाल माखणी किंवा खिचडी करायला भांडं म्हणून जास्त वापरतो.बरोबर एक नॉर्मल काचझाकण पण दिलंय त्यांनी(कुकर म्हणून वापरताना झाकण वरचं बटन फिरवून त्याच्या स्टील प्लेट बंद होतात असं लावावं लागतं.)
तर हा मिनी कुकर नीट प्रमाणात पाणी, आतली बेस ताटली, भांड्यात बटाटे आणि झाकणावर लाल भोपळा फोडी ठेवून लावला.पण शिट्टी झालीच नाही 20 मिनिटं. मग इथली चर्चा आठवून गॅस बंद केला.गार झाल्यावर उघडलं तर बटाटे नीट शिजले होते.

शिट्टी करू नये म्हणतात.पण बालपणीपासूनचे संस्कार 3 शिट्ट्या वाले असल्याने शिट्टी झाल्याशिवाय शिजल्याचा फील येत नाही Happy
शक्यतो शिट्टी होईल , स्वतः हाताने करावी लागणार नाही असेच कुकर घेते.

माझ्याकडेही तसाच हंडी कुकर आहे. मी त्यात दलिया खिचडी, कडधान्यांच्या उसळी इ. शिजवितो.
दलिया खिचडी करताना शिटीमधून डाळीचं भरपूर पाणी बाहेर येतं. विस्तव लो असला तरी. आणि मग शिटी होतच नाही.
शेवटी पकडीने शिटी उचलली की वाफ शिटी मारत बाहेर येते.

शिट्टीमधून पाणी बाहेर येण्याचं एक कारण पाणी लिमीटपेक्षा जास्त असणं. पण काही चिवट कडधान्य किंवा खिचडीसाठी घालावच लागतं. मी खिचडी करणार असले तर कमी पाणी घालून चांगली उकळी फुटून तांदूळ किंचीत शिजला की मग झाकण लावते. मग बाहेर येण्याइतपत पाणी उरत नाही.

करेक्ट माझेमन. मीपण खिचडी करताना असंच करते.
थेट कुकरला काहीही शिजवताना पाणी जास्त घातलं तर ते बाहेर येतं. मॅन्युअलमधे दिलेलं असतं कुकर जास्तीत जास्त किती भरू शकतो ते.

माझ्या न मागितलेल्या प्रश्नाचे उत्तर वरच्या चर्चेत मिळाले...
भात, डाळ शिजवताना पाणी बाहेर येऊन भात कोरडा होने आणि डाळ कच्ची राहणे सारखे होतच होते..कुकर नवे घ्यावेत का या निर्णयापर्यंत आले होते...
वरच्या सगळ्यांना धन्यवाद...

भरत, आधी शिटी न लावता/झाकणच न लावता थोडा वेळ शिजवत ठेवा. मग थोडं पाणी आटल्यावर झाकण/शिटी लावा. कदाचित मग पाणी बाहेर येणार नाही.

हो, ही ट्रिक बरेचदा वर्क करते. शिवाय एकंदर ऐवज भांड्यात ठेवल्यावर पाणी घालून शिवाय 2-3 इंच मार्जिन असेल तर अगदी कितीही उकळून पण बाहेर यायला जागा राहत नाही.

गॅस्केट ओले करायचे आईने शिकविलेले होते. मी पार विसरुन गेले होते. ते आता सुरु केले आहे.
आज कुकरची वाफ थोडी जाऊ दिली आणि मग शिटी लावली.

अमेरिकेत असं होऊ शकते का. बहुतेक सर्वजण नियम व्यवस्थित पाळतात ना. क्वचित होत असेल आणि तो नेमका आपल्या नशिबात असं झालं असेल.>>>>>>>>>>> हो होतात गं इथे पण डेडली अपघात. थोडी चूक महागात पडते कारण हायवेवरचे प्रचंड स्पीड आणि हल्ली फोन डीस्ट्रॅक्शन्स पण Sad
धागा थरारक अनुभवांकडून माकाचू कडे चाललाय.>>>>>>>>> हाहा मलाही तोच फिल आला सगळे प्रतिसाद वाचताना.

वाफेत फार ताकद असते +++१११११ वाफेचा चटकाही जबरदस्त बसतो.

Pages