एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.
आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.
तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.
अही-नकुल म्हणजे साप-मुंगुस
अही-नकुल म्हणजे साप-मुंगुस बरोबर?
अही-नकुल म्हणजे साप-मुंगुस
अही-नकुल म्हणजे साप-मुंगुस बरोबर? >>> हो
अहीरावण आणि महीरावण पण होते
अहीरावण आणि महीरावण पण होते ना?.
मग अही रावण म्हणजे ? आणि मही रावण म्हणजे?
जौद्या... घोरपडीहून मुंगसावर, मुंगासावरून सापावर
सापावरून आणखी कुठे जाईल
धागा लैच भरकटेल
अही म्हणजे साप ?
अही म्हणजे साप ?
मग नवर्याला अहो म्हणून इतकी वर्षे बायका राजरोस गंडवत आल्यात काय ?
मी सध्या WFH आहे. मला एक मोठा
मी सध्या WFH आहे. मला एक मोठा मुलगा आणि ७ महिन्याच बाळ आहे.
काल kitchen madhe वरण भाताचा कुकर लावून मी ऑफिस च काम करायला घेतलं. १५ -२० मिनिट मध्ये एक meeting संपवून बाळ काय करतय ते पाहायला माझ्या खोलीत आले. बाळाला सांभाळणाऱ्या मावशी बाळाला माझ्या कडे देऊन गप्पा मारत उभ्या राहिल्या होत्या तितक्यात खूप मोठा आवाज झाला जणू काही एखादा स्फोट झालाय.
कुकर शिट्टी न झाल्याने वाफेच्या दाबाने वर उडून छताला लागून परत गॅस stove वर दाणकन आपटला होता आणि वाफेने झाकण निघून जोरात फेकले गेले होते. glass टॉप गॅस stove कुकर आदळल्याने पार चकणाचुर झाला होता. घरभर काचा विखुरल्या. माझ्या बेडरूम पर्यंत काचा आल्या होत्या.
कुकर चे झाकण एकीकडे , आतले डाळ - भाताचे डब्बे किचन गॅलरी मध्ये आणि शिट्टी हॉल मध्ये उडाली होती. भिंती , फ्रिज अर्धवट शिजलेल्या डाळ तांदुळणे माखले होते.
जर कोणीही kitchen मध्ये असते तर काय प्रसंग ओढवला असता ह्या विचारानेच अंग अक्षरशः थरथरत होते.
मी कितीतरी वेळा कुकर लावून बाळाला कडेवर घेऊन kitchen मध्ये बाळाचे सेरेलॅक कालवणे , bottle मध्ये पाणी भरणे, किचन ओट्यावर ताटली ठेऊन breakfast खाणे असे काहीतरी काम करत असते. बाळाला जर मी घेतले असेल तर त्याला सांभाळणाऱ्या मावशी भांडी लावणे , भाज्या निवडणे आशी कामे kitchen मध्ये करत असतात. नशिबाने बाळ , मी आणि बाळाला सांभाळणाऱ्या मावशी आम्ही तिघेही माझ्या बेडरूम मध्ये होतो म्हणून वाचलो. नवरा ऑफिस मध्ये आणि मोठा मुलगा शाळेत होते म्हणून वाचले.
कालच्या प्रसंगा नंतर कुकर विषयी खूप भीती बसली. कुकर मुळे भाजल्याचे , कुकरची वाफ बाहेर न पडल्याने कुकर उडून लागल्याने जखमी झाल्याच्या कितीतरी बातम्या आठवल्या.
कुकर लावताना पाणी नीट टाकले होते . गॅस काढून द्यायला जो माणूस बोलावलं त्याने कुकर चेक केला शिट्टी स्वच्छ होती , valve madhe देखील काही अडकले नव्हते. नेमके काय चुकले माझे ते नाही कळले.
भयंकर प्रसंग.
भयंकर प्रसंग.
@@मृदगंधा >>>>> हॉरिबल. काळजी
@@मृदगंधा >>>>> हॉरिबल. काळजी घे. गास्केट जुनी झालीय का, लवचिक उरली नाहीये का बघ. कुकर/गास्केट एकदम नवीन असेल तर झाकण कधी कधी तिरके लागते त्यामुळे असे होऊ शकते.
माझ्या कुकरचे झाकण पण एकदा असेच उडाले होते. उसळ गरम करण्यासाठी मी घाईत झाकण लावले नि काहीतरी करत होते. झाकण छतावर आपटले आणि खाली पडले. नशीब आई व अडीच वर्षाची मुलगी जी नेहमी किचनमध्ये लुडबुडत असायची त्यावेळी तिथे नव्हती. माझ्या केसमध्ये झाकण लूज बसले होते.
बापरे.कुकर चे अपघात भयंकर
बापरे.कुकर चे अपघात भयंकर.कुकर ची शिट्टी जास्त वेळ वाजली तरी घाबरून बंद करते.
मृदगंधा, वाचून काटा आला
मृदगंधा, वाचून काटा आला अंगावर. अति मोठ्या प्रमाणात झालं, नशीब कोणी नव्हतं किचन मध्ये.
माझेमन नशीब थोडक्यात निभावले.
आमच्याकडे वॉल्व उडून, शिटी उडून छतावर वरणाची नक्षी झालेली थोडी पण झाकण शाबूत होतं. खूप वर्ष झाली या गोष्टीला.
बापरे! तुम्ही सगळे सेफ
बापरे! तुम्ही सगळे सेफ राहिलात हे महत्त्वाचं.
कुकर ची शिट्टी जास्त वेळ वाजली तरी घाबरून बंद करते. >>> मी पण!
@rmd आणि @अन्जु हो ना. सगळे
@rmd आणि @अन्जु हो ना. सगळे सुरक्षित राहिलो हिच देवाची कृपा
@ मीअनु - हो ना. जर या नंतर हिम्मत करून जर परत नवीन कुकर घेतले तर मी पण तसेच करेन कदाचित.
@ माझेमन - हो चेक करेन मी गास्केट
@rmd आणि @अन्जु हो ना. सगळे
@rmd आणि @अन्जु हो ना. सगळे सुरक्षित राहिलो हिच देवाची कृपा
@ मीअनु - हो ना. जर या नंतर हिम्मत करून परत नवीन कुकर घेतले तर मी पण तसेच करेन कदाचित.
@ माझेमन - हो चेक करेन मी गास्केट
बापरे किती मोठ्या भयंकर
बापरे किती मोठ्या भयंकर प्रसंगातून वाचलात. खरंच देवाची कृपा!
परवा एका कार्यक्रमाहून येत होते. मोठा ४-६ पदरी लेनच्या हायवेवर माझी गाडी ६५-७० च्या वेगात होती. पलीकडून एक फाटा फुटत होता तिकडे जाण्यासाठी एका गाडीने भराभर २-३ लेन ओव्हरटेक करत माझ्या पुढच्या कार ला येऊन आदळली आणि घसटत दोन्ही कार्स रस्त्याच्या कडेला जाऊन थांबल्या. हे सगळं इतकं कमी सेकंदात घडलं की मी प्रतिक्षिप्त क्रियेने माझी कार धडकणार्या गाडीच्या मागच्या भागाला घासू नये म्हणून फक्त थोडी वळ्सा घेऊन काढली. वेळच लागला जरा काय झालं कळायला. हे बघून जर मी जागीच थांबले असते तर नक्कीच मागून येऊन धडक्लं असतं कोणीतरी. काय ईंट्युशन्स होतात एकेक देव जाणे.
बापरे मृदगंधा आणि माझेमन!
बापरे मृदगंधा आणि माझेमन! कुणाला इजा झाली नाही हे महत्वाचे!
अंजली_१२, केवढी कठीण परीस्थिती! तुझे इंन्टिंक्ट फार चांगले म्हणूनच सुखरुप बाहेर पडलीस.
थोडक्यात निभावला प्रसंग अंजली
थोडक्यात निभावला प्रसंग अंजली १२ , तुझी समयसूचकता.
अमेरिकेत असं होऊ शकते का. बहुतेक सर्वजण नियम व्यवस्थित पाळतात ना. क्वचित होत असेल आणि तो नेमका आपल्या नशिबात असं झालं असेल.
बापरे अंजली.
बापरे अंजली.
मृदगंधा-- बापरे! भयंकर प्रसंग
मृदगंधा-- बापरे! भयंकर प्रसंग. सुदैवाने तुम्ही कुणीच तिथे नव्हतात!
कुकरचा व्हॉल्व्ह उडायला हवा होता खरं तर फक्त. तो त्यासाठीच असतो. पण माझ्याही बाबतीत एकदा असं झालं होतं. म्हणजे इतक्या प्रमाणात नाही, पण व्हॉल्व्ह उडण्याऐवजी झाकण निघालं. पुरणासाठी चण्याची डाळ थेट कुकरमध्ये शिजत लावली होती. बहुतेक पाणी कमी पडलं असणार. शिटीतून येणारा आवाज मोठा मोठा झाला आणि झाकण तिरकं होऊन एक धक्का बसून अख्खाच्या अख्खा कुकर बर्नरवरून निसटून शेगडीच्या काचेवर आला. आजूबाजूला पाणी, डाळ असं थोडंफार उडालं. आम्ही घाबरलो होतोच, पण फार काही नाही झालं.
अंजली, बाप रे!
अंजली_१२, केवढी कठीण
अंजली_१२, केवढी कठीण परीस्थिती! तुझे इंन्टिंक्ट फार चांगले म्हणूनच सुखरुप बाहेर पडलीस.>>>> १००००+++
कुकरचा प्रसंग भयंकर…. मी
कुकरचा प्रसंग भयंकर…. मी कुकर लावला की लक्ष ठेऊन राहते. उगीच रिस्क नको.. वाफेत जबरदस्त ताकद आहे.
मागच्या महिन्यात आमच्या कुकर
मागच्या महिन्यात आमच्या कुकर मधुन वाफ प्रेशर ने बाहेर आली झाकणाच्या सर्व बाजूने पण झाकण वर उडल नाही. मोठा वाफ निघताना आवाज झाला त्यानंतर कुकर लावायची भीतीच वाटत होती. आता कुकर लावला का शिटी साठी जास्त वेळ लागला तर चेक करत राहते.
@अंजली - खरंच समयसूचकता
@अंजली - खरंच समयसूचकता म्हणून निभावलं.
@साधना - हो खरंच वाफेत खूप
@साधना - हो वाफेत खूप ताकद आहे आणि कुकर , गॅस या बाबतीत जपून राहायला हवा. वेळ प्रसंग काही सांगून येत नाही. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा हे पाळायला हवे सगळ्यांनीच.
या नंतर गॅस सुरू असताना बाळाला किचन मध्ये आणायचे नाही. कुकर लावताना शिट्टी स्वच्छ करूनच लावायची .गॅस सुरू असताना वाऱ्याने विझू नये म्हणून किचन ची गॅलरी बंद ठेवायची. गॅस वापरून झाला की main knob बंद करायचा हे नियम मी नक्की पाळायचे ठरवले आहे.
@shubhadap - कुकर ची गस्केत,
@shubhadap - कुकर ची गस्केत, valve, शिट्टी चेक करून घ्या कुकर दुरुस्त करणाऱ्यांकडून. उगाच रिस्क नको.
दोन्हीही प्रसंग भयंकर!! केवळ
दोन्हीही प्रसंग भयंकर!! केवळ नशीब बलवत्तर म्हणावे लागेल.
थेट कुकरमध्ये डाळ तांदूळ वगैरे टाकून शिजवण्याचे शॉर्टकट्स फार धोकादायक असतात. सेफ्टी व्हॉल्वसोबत तडजोड सुद्धा तितकीच धोकादायक. तसेच कुकरमध्ये पुरेसे पाणी न टाकणे हे सुद्धा. या तिन्ही गोष्टींबाबत कटाक्षाने काळजी घ्यावी लागते.
कुकरमध्ये थेट डाळ किंवा
कुकरमध्ये थेट डाळ किंवा तांदूळ शिजवणं हे माझ्या मते चूक नाही. ते अपेक्षित आहे. पाणी पुरेसं असलं पाहिजे.
नाही वावे, ते चुकीचे आहे.
नाही वावे, ते चुकीचे आहे. अन्नकण शिट्टीमध्ये अडकल्याने कूकर ज्या प्रकारे काम करणे अपेक्षित आहे त्यात अडथळे येतात. अर्थात याबाबत माझ्याच घरी माझं कोण ऐकत नाही हा भाग वेगळा. कितीवेळा सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी नाका तोंडातून शिजलेल्या डाळीचा फेस बाहेर काढत कशाबशा शिट्ट्या मारणारा कुकर दिसतोच. पण ते चुकीचे आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
https://www.hawkinscookers
https://www.hawkinscookers.com/Cookbooks/Ventura%20IM.pdf
इथे बघ अतुल.
>> Pressure Cooker can be
>> Pressure Cooker can be purchased with a separator set and grid or without a separator set
ओह! आमच्या गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार छोट्या कुकर मध्ये डब्बे नसल्याने थेट कुकरमध्येच शिजवावे लागते. हम्मम... मला तर कधीच कम्फर्टेबल नाही वाटत तो पर्याय.
प्रेशर कुकरच्या गॅस्केट
प्रेशर कुकरच्या गॅस्केट बरोबरच सेफ्टी व्हॉल्वही वेळोवेळी बदलला पाहिजे.
वरील सर्व प्रकरणांमध्ये सेफ्टी व्हॉल्व्हने काम केलेले नाही हे लक्षात घ्या ( तो निश्चित पणे सदोष होता)!
हल्लीच्या छोट्या कुकरमध्ये
हल्लीच्या छोट्या कुकरमध्ये थेट डाळ लावली तर ती कुकरच्या नाकातोंडातुन फेस काढते. खिचडी नाही काढत.
डाळ शिजताना खुप फेस निघतो. भात शिजतानाही निघतो. एकदा हा फेस काढुन टाकला की ही मंडळी शाण्तपणे उकळतात. आता माझ्याकडे वेळ असल्यानुळे मी भात कुकरमध्ये करत नाही. नुसती डाळ उकडायची असल्यास तिला उघड्या कुकरमध्ये उकळी आणते, फेस काढुन टाकते आणि आधी शिट्टी काढुन मग कुकरचे झाकण दाबुन बसवते. माझ्याकडे विनोदचा स्टीलचा कुकर आहे. त्याला शिट्टी लाऊन झाकण लावताच येत नाही, अशी मुस्काटदाबी त्याला आवडतच नाही. आधी झाकण लावायचे मग शिट्टी लावायची.
Pages