Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह ओके.
ओह ओके. मला वाटतं कालच लक्ष्मी स्तोत्रात हे
सुरंग लावल्याची पाऊले- वाचले. अगदी कालच. सापडले तर देते.सॉरी - सुरक्तपद्मपत्राभकरपादतले
https://sanskritdocuments.org/doc_devii/mahAlakShmIchaturviMshatinAmasto...
सुरंग = रक्तचंदन
सुरंग = रक्तचंदन
नवीन माहिती.
यावरून आठवलं चंदनाला श्रीखंड असे नाव आहे.
द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरी कावडीने I
श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥
कृष्ण श्रीखंड्या नावाने एकनाथांच्या घरी चंदन उगाळत असे. त्यावरून चंदनाचे नाव श्रीखंड पडले.
चंदनाला श्रीखंड असे नाव आहे.
चंदनाला श्रीखंड असे नाव आहे. >>> अरे देवा! आता श्रीखंड खाताना चंदन खातोय असे वाटणार नाहीतर पूजा करताना देव श्रीखंडाने बरवटतोय असे वाटणार .
म्हैसूर श्रीखंड साबण आल्यास
म्हैसूर श्रीखंड साबण आल्यास नवल वाटणार नाही आता.
सुरंग, चंदन, श्रीखंड आणि
सुरंग, चंदन, श्रीखंड आणि श्रीखंड साबण !!! सुगंधी चर्चा रंगली आहे इथे.
बाकी श्रीखंडाचा “श्री” फार versatile आहे. श्रीहरी, श्रीमान, श्रीयुत, श्रीमती, श्रीप्राप्ती, श्रीमुख वगैरे आहेच पण सर्वात खास - जुन्या मराठीत काशीला जाऊन आले की श्रीयात्रा झाली, श्रीभेट झाली, श्रीहून परतलो असे म्हणत.
“श्री” फार versatile होणे ही
“श्री” फार versatile होणे ही तो श्रींची इच्छा
पाटव
पाटव
= कौशल्य; पटुता; चातुर्य.
लेखकाचे रचनापाटव . . .
मस्त चर्चा. माबोवरच कधीतरी
कृष्ण श्रीखंड्या नावाने एकनाथांच्या घरी चंदन उगाळत असे. त्यावरून चंदनाचे नाव श्रीखंड पडले.>>> आवडली माहिती.
बारा =
बारा =
१२ सोडून हे पण अर्थ :
( >>>>> बारगीर = घोडेस्वार).
दाते शब्दकोश
बारगीर
बारगीर
हो, बखरींमधे येतो हा शब्द.
आज एक नवीनच मराठी शब्द वाचनात
आज एक नवीनच मराठी शब्द वाचनात आला.
तिखुळा - तीन मुलींच्या पाठीवर झालेला भाऊ, मुलगा
याचे स्री रूप
तिखुळी - तीन मुलग्यांच्या पाठीवर झालेली बहीण, मुलगी
* तिखुळा >>> छान.
* तिखुळा >>> छान.
मग याच्यापुढे चौ **, पंच** असतात का?
चौ **, पंच** असतात का?
चौ **, पंच** असतात का?
नै माहित. गाडी पुढं गेलीच नै. संततीनियमनाचा विजय असो !
कागदी वाघ
कागदी वाघ
हा शब्दप्रयोग अन्य भाषेतून शब्दशः भाषांतर करून मराठीत आला आहे. परंतु त्याचा उगम इंग्लिश नसून चिनी भाषेत आहे. हा भाषाप्रवास पाहणे रंजक आहे.
मूळ चिनी भाषेतील शब्द आहेत zhi lao hu
( zhi = कागद + lao hu = वाघ).
त्याचे इंग्लिशने paper tiger असे शब्दशः भाषांतर केले. पुढे आपण ते मराठीत आणले.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्याचा वापरही रोचक आहे. सर्वप्रथम 1956मध्ये चीनच्या Mao Zedong यांनी अमेरिकेला उद्देशून हे शब्द वापरले. कालांतराने पाश्चात्य वृत्तमाध्यमांनी चीन (आणि त्याच्या आर्थिक स्थिती)ला उद्देशून ते शब्द वापरायला सुरुवात केली.
नाचनाचूनी अति मी दमले
नाचनाचूनी अति मी दमले
थकले रे नंदलाला
या गाण्यातील पहिल्या कडव्यात
निलाजरेपण कटिस नेसले
निसुगपणाचा शेला
अशा ओळी आहेत. यातल्या निसुगपणाचा अर्थ काय?
रच्याकने, या गाण्याचं काव्य अतिशय सुरेख आहे.
निसुग - निर्लज्ज
निसुग - निर्लज्ज
मराठीत कागदी घोडे नाचवलेले
मराठीत कागदी घोडे नाचवलेले वाचले आहेत - कागदी वाघ वाचल्याचं आठवत नाही.
कागदी वाघ ऐकले/वाचले नाहीत पण
कागदी वाघ ऐकले/वाचले नाहीत पण दिसतात मात्र भरपूर.
* कागदी वाघ >>
* कागदी वाघ >>
वृत्तपत्रीय बातम्यांमध्ये वाचले होते.
उदा. : https://www.navarashtra.com/maharashtra/dcm-devendra-fadnavis-target-tha...
रमेश मंत्री यांच्या पुस्तकाचे नाव आहे : http://opac.granthyan.com/cgi-bin/koha/opac-search.pl?q=(su%3A%7B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%7D)
… कागदी घोडे नाचवलेले …
… कागदी घोडे नाचवलेले …
हे तर National sports म्हणून मान्य व्हावे आपल्या देशात
कागदी वाघांचे चीन कनेक्शन बे स्ट !
झिंग
झिंग
= धुंदी; नशा
इंग्लिश बोलीभाषेत पण zing हा शब्द असून तो energy, zest या अर्थी आहे. त्यांनी त्याचा उगम ध्वनीजन्य दिला आहे.
https://www.etymonline.com/word/zing#etymonline_v_5023
'झिंगाट' गाण्याचा अर्थ समजला
'झिंगाट' गाण्याचा अर्थ समजला आता.
त्यांनी त्याचा उगम ध्वनीजन्य दिला आहे.>>> आधी फक्त असेच असेल वाटायचे.
Zest शब्दाचा वापर मी दुसऱ्या संकेतस्थळावर प्रत्येकाची जी काही नैसर्गिक एनर्जी असते त्याला मराठीत भाषांतर करताना 'आपापल्या अस्तित्वाचा कुरकुरीतपणा' या अर्थाने वाकवून वापरला होता.
* कुरकुरीतपणा >> झकास !
* कुरकुरीतपणा >> झकास !
अ ग दी च
अस्मिता, मी ते
अस्तित्वाचा कुरकुरीतपणा' या अर्थाने वाकवून वापरला होता... हे
वाफवून वापरला होता असे वाचले....
कुरकुरीत पणाला अजून एक जोड...!
Zest डोसा अँड इडली असा स्टॉल टाकायला काही हरकत नाही!
बऱ्याच अमेरिकन पाककृतींमधे
डपो.
बऱ्याच अमेरिकन पाककृतींमधे
बऱ्याच अमेरिकन पाककृतींमधे orange/lemon zest म्हणजे संत्र्याची/लिंबाची साल किंचित किसून पांढरा कडवट भाग न येऊ देता वापरतात. त्याने त्या पदार्थाला एक सुखद आंबट रूचकरपणा-करकरीतपणा येतो.
आंबट तितकेच गोड असतोच ना आपण सगळे म्हणून मला तुझा जुना आयडी आवडायचा, छल्ला.
अस्मिता, सो स्वीट ऑफ यू!
अस्मिता, सो स्वीट ऑफ यू!
अगं, मला असे वाटले, की जरा झगझगीत, व्हायब्रंट आयडी घ्यावा....!!
निसुग - निर्लज्ज. >> धन्यवाद
निसुग - निर्लज्ज. >> धन्यवाद ऋतुराज
खावटी
खावटी
= पोटगी; आहारभत्ता
आहारभत्ता अर्थाने शासन व्यवहारात वापर होता /असतो.
खावटी सारखाच एक.
खावटी सारखाच एक.
बालपरवेसी = पेंशन
युद्धात मृत झालेल्या सैनिकांच्या परिवाराला दिलेली मदत.
Pages