मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अलीकडच्या दुर्लक्षित, उपेक्षित वृद्ध आणि कृतघ्न मुलं या विषयावरच्या पिक्चरचा कंटाळा येतो. म्हणजे इतक्या नाटक-सिनेमामध्ये मुलं-सुना-जावयांनी उपेक्षा/फसवणूक केली आहे तर ते बघून तरी माणसाने धडा घ्यावा की नाही?

ऊनपाऊस वगैरे ओव्हर द टॉप कॅटेगरीतले नव्हते आणि त्यावेळचे जग भाबडे होते. त्यावेळी चालून गेले. आत्ताही काय तेच?

निदान दाखवायचे तर काहीतरी आजच्या काळातले ताणेबाणे दाखवा ना. उदा व्हेंटिलेटर

म्हणजे इतक्या नाटक-सिनेमामध्ये मुलं-सुना-जावयांनी उपेक्षा/फसवणूक केली आहे तर ते बघून तरी माणसाने धडा घ्यावा की नाही? >>> Lol

हे म्हणजे एखाद्याने पिक्चरमधे निरूपा रॉयशी लग्न केले तर मुलांना सरळ जीपीएस ट्रॅकर लावून ठेवावेत, अशा अर्थाने ना? Happy

पण मूळ मुद्द्याशी सहमत. त्या ढोबळ व्यक्तिरेखांऐवजी जरा काही वेगळे दाखवायचा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही. म्हणजे मुले व सुना कृतघ्न नाहीत पण जागेच्या समस्येमुळे एकत्र राहू शकत नाहीत. किंवा दोन पिढ्यांमधल्या फरकामुळे पटत नाही आणि ते दाखवताना टोटल ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट पद्धतीने दाखवायचे नाही. असे काहीतरी. किंवा आणखी पुढे जाऊन सिनीयर लोकांनाही त्यांचे लाइफ आहे. त्यांनाही स्वातंत्र्य हवे आहे. घरात सतत आजी-आजोबा मोड मधे राहावे लागल्याने त्यांची कुचंबणा होते असे काहीतरी. पण हे दाखवायचे आणि मनोरंजकही करायचे, याला मेहनत घ्यावी लागते. त्यापेक्षा पन्नास वर्षे जुनी कथा घ्यायची आणि आणखी बटबटीत करायची हे सोपे. त्या अमिताभ-हेमाच्या पिक्चरचा फॉर्म्युला असाच होता. जुनं फर्निचर मधे कसे आहे माहीत नाही.

निरूपा रॉयशी लग्न केले तर मुलांना सरळ जीपीएस ट्रॅकर >>> खास फारेण्ड टच! Lol

मला अलीकडच्या दुर्लक्षित, उपेक्षित वृद्ध आणि कृतघ्न मुलं या विषयावरच्या पिक्चरचा कंटाळा येतो >>> +१ आता झिम्मा टाईपच्या गोष्टींचा पण कंटाळा आला आहे.

एकदा काय झालं नावाचा सुमित राघवनचा मुव्ही आहे, पण कुठे ओटीटी वर बघण्यात नाही आलाय. आवडेल बघायला. रिव्ह्युज चांगले आहेत.

मला अलीकडच्या दुर्लक्षित, उपेक्षित वृद्ध आणि कृतघ्न मुलं या विषयावरच्या पिक्चरचा कंटाळा येतो >>> +१ आता झिम्मा टाईपच्या गोष्टींचा पण कंटाळा आला आहे.>>> +++++!११११११११११

ज्येना ना कितीही चांगलं वागवलं तरी असले पिक्चर बघून त्यांचे कान आणि डोळे भरले जातात. उगा नाही त्या गोष्टीत ड्रामा शोधतात मग. त्यांनाही दाखवू नये आपणही बघू नये Wink

माफ करा, एकदा काय झालं ने खूप भारावून गेलेले रिव्ह्यू आणि प्रेक्षक सगळीकडे आहेत.पण पिक्चरच्या कथेचा जीव फारच चिमुकला आहे.डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखं वाटलं.शिवाय फक्त गोष्ट सांगण्यासाठी स्टेडियम वगैरे अजिबात लॉजिकल वाटलं नाही.सर्व कलाकार उत्तम, सर्वांनी जीव ओतलाय.बऱ्याच जणांना आवडेल.

निरुपा रॉय स्पॉटेड…जीपीएस ट्रॅकर अलर्ट Lol Lol

काहीतरी वेगळे दाखवायचे आणि मनोरंजकही करायचे, याला मेहनत घ्यावी लागते.
>>>>>
एक्झॅक्टली फारेण्ड.
रन ऑफ द मिल दाखवलं तरी चालेल. पण निदान कथा व पात्रं खरी वाटतील अशी तरी ट्रीटमेंट द्या. उदा. डबलसीट - कथा काही जगावेगळी नाही. पण वाटतं असं होऊ शकतं.

म्हणजे इतक्या नाटक-सिनेमामध्ये मुलं-सुना-जावयांनी उपेक्षा/फसवणूक केली आहे तर ते बघून तरी माणसाने धडा घ्यावा की नाही? >> Lol
निरूपा रॉयशी लग्न केले तर मुलांना सरळ जीपीएस ट्रॅकर >>> Rofl

स्वरगंधर्व बघितला. खूपच कमकुवत वाटला.

तो काळ तर जराही उभा करता आलेला नाही. भिंती, दरवाजे यांना ऑइल पेंट बघून अगदीच कसेतरी झाले. ट्रेनचा डबा पण आज असतो तसाच आहे. शरद पोंक्षे वगळता सगळ्यांचाच अभिनय बेतास बात आहे. इतक्या दिग्गज संगीतकार / गायकावर सिनेमा आहे तर निदान वाद्यवादन खरं वाटेल इतकी तरी दक्षता घेता आली असती. बाजाच्या पेटीवर फिरणारी बोटेही खरी वाटत नाहीत. एका गाण्याच्या सीनमध्ये एकजण ते त्रिकोणी काहीतरी (ओ हसीना जुल्फोंवाली मध्ये जे आरडीने वापरलय ते) वाजवत असतो. तो इतका मरगळलेला आहे की त्या वाद्यातून आवाजही निघाला नसता.
खूप काही दाखवण्याच्या नादात सगळेच प्रसंग खूप त्रोटक झाले आहेत. एकाही प्रसंगाची छाप उमटत नाही. गाणी खूप सुंदर आहेत. मूळ गाणीच चकचकीत करून वापरली आहेत त्यामुळे मजा आली. पण चकचकीत करण्याकरता केलेल्या एडीटींगमुळे टोनल क्वालिटी बदलली आहे काही गाण्यांची. पण ते चालतय.

बाबुजींचे खडतर आयुष्य आणि त्यातले अनेक मला माहीत नसलेले प्रेसंग आणि गाणी या जमेच्या बाजू होत्या माझ्याकरता. बाबुजींवरचा सिनेमा - त्यामुळे बघायचाच होता. थोडा कंटाळवाणा होता पण वेळ फुकट गेला असे काही वाटले नाही.

राम राम गंगाराम पहायला सुरूवात केली. चांगली प्रिंट आहे, आवाजही स्पष्ट आहे.
यातली दोन तीन दृश्ये लक्षात होती. त्यातलं नेमकं दादा कोंडकेच्या एण्ट्रीचं दृश्य कापलं आहे. तो म्हशीवर उलटा बसलेला असतो, त्याला आवाज देत आई येते, तर हा शेपटी उचलून कुठून आवाज आला ते बघतो. " मायला हिकडं मुंडकं हाय व्हय, पयल नाय का सांगायचं ?" हेच कापलं.

अशोक सराफने काय जबरदस्त बेअरिंग पकडलंय. दादांपेक्षा भावखाऊ काम आहे. बाई माझ्या बकरीचा गाण्यापर्यंत येऊन थांबलोय.
लहान असताना ही गाणी लग्नात वाजायची ते आठवलं. त्यानंतरच आजच ऐकली गाणी.
अशी ठेक्यावरची गाणी मराठी सिनेमातून गायब आहेत.

स्वरगंधर्व पाहिला पण इथे शोधून लिहायचा कंटाळा करत होते. अगदीच दयनीय दर्जाचा सिनेमा बनवलेला आहे! जसा बाबूजींनी एक सिनेमा सावरकरांवर बनवला होता तसाच.
कथा सांगण्याची पद्धत, संवाद सर्व अगदीच बालिश. कसेही मागे पुढे टाइमलाइन फिरते. बाबूजींची गाण्याची साधना, त्यात यश मिळण्याचा प्रवास काहीच दिसत नाही. खाण्याचे हाल तेवढे लक्षात राहतात. एखाद्या सुमार नाटकातल्यासारखे सेट्स किंवा नेपथ्य वाटते. पुस्तकाचे दुकान दाखवायचे आहे तर एक भिंत, दार आणि बाहेर "पुस्तकाचे दुकान" असा लिटरल मोठा बोर्ड !! कधी तरी त्यांनी बँडेज बनवण्याच्या फॅक्टरीत काम केले ते दाखवायचे तर एक भिंत, दार आणि त्यावर "बॅंडेज फॅ़क्टरी" असा बोर्ड !! नाशिक मधे एक भोजनालय दाखवायचे तर "भोजनालय , नाशिक" अशी पाटी! सिरियसली, अजिबात अ तिशयोक्ती नाही!! गोष्टित ठिकाणे वेगवेगळी असली तरी सगळे एकाच गल्लीत शूट झाल्यासारखे वाटते.
गाण्यासाठी बघायचे तर ओरिजिनल गाणी घेतलीत पण कुठेही कशीही घातलीयत! बाबूजींना ५-६ बाप्ये माणसांसोबत शेअर्ड रूम पण निदान पाठ टेकायला जागा तरी जागा मिळाली म्हणून जरा दिलासा मिळाला असा सीन आणि एकदम गाणे येते ते कोणते तर "तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी " !! ट्रेन ने नाशिक ला निघालेत असा रँडम सीन आणि अचानक कॅमेरा ट्रेन च्या फिरणार्‍या चाकांवर आणि गाणे "फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार" असा एकूण कारभार. मराठी सिनेमाची अवस्था भयाण आहे एकूण.

मी जेमतेम अर्धा तास पाहून बंद केला!
शाळकरीसुद्धा म्हणवत नाही इतका सुमार स्क्रीनप्ले, संवाद, आणि अभिनय! गाणी आवडतात ती एरवीही ऐकता येतात - त्यासाठी हा अत्याचार कोण सहन करणार!
बायोपिक्सवर बंदी घालायला हवी असं वाटयला लागलंय!

मी सुद्धा अर्धा तास बघून सोडून दिला..अगदीच काहीतरी...भूतकाळात भूतकाळ मग मध्येच चालू काळ ...कधीही कुठलाही सीन चालू होतो...सुनील बर्वे फारच अवघडलेला वाटतो. एकदम कृत्रिम हालचाली...

हिंदीतली बायोपिक वेगवेगळ्या कथांवर काढतात, आणि मराठी बायोपिक व्यक्तीबद्दल भावना आणि श्रद्धेवर काढतात(म्हणजे दिघे अनुयायांसाठी धर्मवीर, फडके फॅन्स साठी तो फडकेंवर चित्रपट इत्यादी.)पण असं करताना चित्रपटासाठी योग्य बजेट, कथेवर काम करायला वेळ हे सर्व असतंच असं नाही.हिंदी चित्रपटसृष्टीने चांगल्या वाईटाचं वावडं ठेवलं नाही.ज्या बायोपिक मध्ये मसाला आहे ती घेतली(दाऊद,संजू)

बायोपिक्सवर बंदी घालायला हवी असं वाटयला लागलंय! >> अनुमोदन स्वाती..
पहिला हरिश्चंद्राची फॅक्टरी आला होता तो आवडलं होता .. नंतर दर्जा इतका घसरत गेलाय की हल्ली घरी फुकट मध्ये सुद्धा बघणं अशक्य आहे.

माफ करा, एकदा काय झालं ने खूप भारावून गेलेले रिव्ह्यू आणि प्रेक्षक सगळीकडे आहेत.पण पिक्चरच्या कथेचा जीव फारच चिमुकला आहे.डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखं वाटलं.शिवाय फक्त गोष्ट सांगण्यासाठी स्टेडियम वगैरे अजिबात लॉजिकल वाटलं नाही.सर्व कलाकार उत्तम, सर्वांनी जीव ओतलाय.>> +१ पण एकदा बघायला ठीक आहे कलाकार चांगले आहेत म्हणून. त्यात ओटिटीचा फायदा सिनेमा अधूनमधून पुढे ढकलत बघता येतो Lol (एकदा काय झाले - प्राईमवर आहे)

राम राम गंगाराम थोडा पुढे सरकला आहे. दादांचा एकही सिनेमा लक्षात नाही. पण बहुतेक आंधळा मारतोय डोळा मधे स्टेजवर स्लॅप्स्टिक् कॉमेडी आहे. दादा खांद्यावर फळी घेऊन येतात त्यातून जी तारांबळ उडते ती चार्ली चॅप्लीनची आठवण करून देणारी आहे. असाच प्रसंग दादांची "आये" रत्नमाला गावातल्या बायांन घेऊन शेवया बनवत बसलेली असते तेव्हां तिथे अशोक सराफ येतो. त्याच्या लुंगीत उंदीर शिरतो. अशोक सराफच्या चेहर्‍यावरचे भाव अफलातून आहेत. यातला अशोक सराफ बेर्डे बरोबरच्या अवघडलेल्या अशोक सराफपेक्षा जबरदस्त आहे. हे सिनेमे आता चालणे अशक्यच आहे. स्लॅप्स्टिक् कॉमेडी हा अवघड प्रकार वाटतो. फसण्याची शक्यता जास्तच.

लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या असंख्य सिनेमात निव्वळ बडबड कॉमेडी होती. नाहीतर दादांसारखे हिट देण्याची क्षमता दोघातही होती.

बाबूजींची गाण्याची साधना, त्यात यश मिळण्याचा प्रवास काहीच दिसत नाही. >>> अगदी, अगदी! निदान गावातला त्यांचा कार्यक्रम दाखवायचा ना, ते गावोगावी फिरून कार्यक्रम करतो आहे असं सारखं म्हणतात फक्त. आणि तरूणपणीचे सुधीर फडके कधीच गाताना दाखवले नाहीत Sad

बाबूजींना ५-६ बाप्ये माणसांसोबत शेअर्ड रूम पण निदान पाठ टेकायला जागा तरी जागा मिळाली म्हणून जरा दिलासा मिळाला असा सीन आणि एकदम गाणे येते ते कोणते तर "तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी " >> हो हे इतकं विचित्र वाटतं, खिडकीतून दिसला चंद्र की लगेच 'तोच चंद्रमा नभात'??? काहीही! तसंच ते पंजाबमधे जात असताना एक कुठलीशी नदी येते तर 'संथ वाहते कृष्णामाई!'

तसंच ते फुटपाथवर झोपतात पण एकदम clean shaven लूक आणि शुभ्र परीटघडीचे कपडे! कुठेही ते खंगलेले दिसत नाहीत, एकदम खात्यापित्या घरातले वाटतात Happy

टाईमलाईन कशीही मागेपुढे सरकते, त्यापेक्षा एक बालपणापासून सलग टाईमलाईन असती तर जरा लिंक लागली असती.

फेसबुकवर एक क्लिप दिसली आणि समजलं कि ती 'लग्न पहावे करून' ची होती . मग प्राईमवर शोधला मिळाला ..
मुक्ता बर्वे , स्वाती चिटणीस , उमेश कामत .. जयंत सावरकर ... पण सिनेमा abruptly संपला ... कधी संपला कसा संपला ते कळलंच नाही मला . अत्यंत बालिश आणि भरकटला .... मध्येच .

अत्यंत बालिश आणि भरकटला .... मध्येच .>>>> +११ लग्न पहावे करून..कैच्या कै उगीच आहे सिनेमा...

एकदा येऊन तर बघा प्राईमवर बघितला..गिरीश कुलकर्णी आवडतो म्हणून.... तर हा पण तसलाच कैच्या कै सिनेमा निघाला..ओढून ताणून मारलेले जोक्स.. गुलाबी बाबा गरम च्या रोलमध्ये भाऊ कदम..स्टोरी नाही काही..आणि शेवट पण नाही...

जुना फर्निचर बघितला....तसा बोरच आहे पण बघितला...

Pages