Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भीमाचं एक नाव 'वृकोदर' आहे.
भीमाचं एक नाव 'वृकोदर' आहे.
वारण = हत्ती
वारण = हत्ती
वारणावत = मुबलक हत्ती असलेली जागा/ जंगल ?
'वृकोदर' ? हा सिंहकटी सारखा Body Fitness बद्दल compliments देण्यासाठी असेल का ?
वारणावत महाभारत के अनुसार वह
वारणावत महाभारत के अनुसार वह स्थान था, जहाँ पाण्डवों को जलाकर भस्म कर देने के लिये दुर्योधन ने लाक्षागृह का निर्माण करवाया था।
https://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3...
'वृकोदर' =
'वृकोदर' =
1. S (Having the belly of a wolf.) Voracious, ravenous; that has a wolf in his belly.
मोल्सवर्थ शब्दकोश
2. कहते हैं, भीमसेन के पेट में वृक नाम की विकट अग्नि थी
https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A...
खादाड होता भीम पण डायरेक्ट
खादाड होता भीम पण डायरेक्ट कसं म्हणायचं म्हणून 'वृकोदर' वगैरे. अग्नि म्हणजे तो पचनाचा अग्नि असणार. लांडग्यासारखा अधाशी, अमानवी भूक असलेला आणि ते पचवूही शकणारा.
वृकोदर = अत्त्याहारी ? ओके.
वृकोदर = अत्त्याहारी ? ओके.
पण वृकच का ? कोल्हा/ लांडगा खूप जास्त खातो का ? काही टोटल लागली नाही
आपण काकोदर.
आपण काकोदर.
तो पोटात लांडगे ओरडताहेत म्हणत असावा.
पोटात लांडगे >>> भारीच
पोटात लांडगे >>> भारीच
पेट मे चुहे दौड रहे हैं ला मग
पेट मे चुहे दौड रहे हैं ला मग "मूषक इधर उदर हो रहे हैं" म्हणावं का?
उदर में मूषकों का गदर !
उदर में मूषकों का गदर !
हेडलाइन होईल
गोची
गोची
= पंचाईत.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
असा एक(च) अर्थ मराठी कोशात सापडला. परंतु या शब्दाच्या मराठीतील वापराबाबत काही रोचक घटना घडलीय.
सन 1973 मध्ये सदानंद रेगे यांनी गोची या नावाचे नाटक लिहिले तेव्हा भाषाअभ्यासकांना या शब्दाचा योग्य अर्थ माहित नव्हता. त्यामुळे एकंदरीत साहित्य वर्तुळात या शब्दाबाबत बरीच चर्चा झाली. मग कोणीतरी शोधून सांगितलं, की हा शब्द नवा नसून तो संत एकनाथांच्या भारुडामध्ये सुद्धा वापरलेला आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन अमोल पालेकर यांनी केले होते आणि त्यात चित्रा पालेकर यांची एक भूमिका होती. त्या अनुषंगाने त्यांनी इथे काही लिहिले आहे :
https://www.loksatta.com/chaturang/lagori/gochi-marathi-theatre-dramamar...
त्यात दिलेला गोचीचा व्यापक आशय असा आहे :
कुटुंब, नातीगोती, चाकोरीबद्ध दिनक्रम, त्यांचे क्षुल्लक तपशील यांच्या, ‘‘स्वत:च विणलेल्या जाळ्यातून आता सुटका नाही’’ हे कळून चुकलेल्या, तरीही त्यात अडकलेल्या अर्थहीन अस्तित्वातून मुक्त होण्यासाठी धडपडणाऱ्या मानवाची व्यथा!
“सोहरा = संत्री”
“सोहरा = संत्री”
असे या लेखात आहे : https://www.loksatta.com/sampadkiya/columns/a-history-of-geography-a-rai...
. . . मेघालयातील खासी टेकड्यांच्या कुशीतील ‘सोहरा’ ही पूर्वीच्या खासी राज्याची राजधानी होती. सोहरा म्हणजे संत्री. पुढे ब्रिटिशांनी सोहराचे ‘चेरा’ केले व त्याचेच पुढे चेरापुंजी (संत्र्याची भूमी) झाले. . .
‘सोहरा’ कोणत्या भाषेतला शब्द असावा ? सापडला नाही मला तरी
( संत्र्यासाठी संस्कृत आणि फारसी या दोन्ही भाषांतला नारंग हा मूळ शब्द माहित आहे).
<सोहरा’ कोणत्या भाषेतला शब्द
<सोहरा’ कोणत्या भाषेतला शब्द असावा ?> मेघालयाच्या स्थानिक भाषेतला?
शक्य आहे - म्हणजे खासी /
शक्य आहे - म्हणजे खासी / Garo ?
छान आहेत शब्द. गोची चा अर्थ
छान आहेत शब्द. गोची चा अर्थ आवडला
संस्कृत आणि फारसी या दोन्ही
संस्कृत आणि फारसी या दोन्ही भाषांतला नारंग >> (श्रीलंकन) सिंहली भाषेतही त्याला नारंगच म्हणतात अजूनही.
अच्छा ! छान.
अच्छा ! छान.
..
अवांतर :
सिंहली या भाषेतला अजून एक (आरोग्य संबंधित) परिचित शब्द म्हणजे 'बेरीबेरी’ .
त्याचा शब्दशः अर्थ “मी काहीही करू शकत नाही”, असा आहे. ब-१ जीवनसत्वाच्या अभावाने रुग्णाची अशी अवस्था होते कारण त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवतो.
अच्छा तो सिंहली शब्द आहे तर.
अच्छा तो सिंहली शब्द आहे तर.
अ जीवनसत्वा अभावी रातआंधळेपणा व ब जीवनसत्वा अभावी बेरिबेरी हा रोग होतो असे पाचव्या की सहाव्या वर्गात होते.
अच्छा, त्या रोगाचं नाव सिंहल
अच्छा, त्या रोगाचं नाव सिंहल भाषेतून आलं आहे होय!
‘सध्याच्या’ मराठीतल्या ‘माझी
‘सध्याच्या’ मराठीतल्या
‘माझी मदत कर’ या वाक्यप्रयोगाला अनेकांनी अनेक वेळा आक्षेप घेतलेला आहे.
या संदर्भात एक वेगळे मत नागपूर तरुण भारतचे माजी संपादक मा गो वैद्य यांनी पूर्वी एकदा व्यक्त केलेले आहे. ते त्यांच्याच शब्दात लिहितो :
“वरील वाक्यप्रयोगाला आक्षेप घ्यावा असे वाटत नाही. माझी ही षष्ठी विभक्ती आहे आणि षष्ठीला पाणिनीच्या परिभाषेत अनेक विभक्त्यांचा अर्थ लाभू शकतो. शेषे षष्ठी असे पाणिनीचे सूत्र आहे आणि जेथे विशिष्ट विभक्तीचा अर्थ लेखकाला अनिवार्यतः अभिप्रेत नसेल तिथे षष्ठी विभक्तीचा उपयोग करायला हरकत नसावी”.
नमस्कार. कसे आहात सर्वजण?.
नमस्कार. कसे आहात सर्वजण?. बर्याच दिवसांनी मायबोलीवर आलोय.
आजकाल सर्रास "केल्या गेले" वगैरे पद्धतीची वाक्यरचना वापरली जाते. ती योग्य आहे का?. माझ्या तर डोक्यात जाते.
अरे वा ! स्वागत आहे विक्रम
अरे वा ! स्वागत आहे विक्रम
आम्ही मजेत आहोत
विक्रमसिंह,
विक्रमसिंह,
केल्या गेले...काही ठिकाणी योग्य वाटत नाही का ? उदा
आजोबांच्या मृत्यूनंतर जी काय शेतीची कामं केली गेली, तेव्हढीच...
आई कडून सुनेला जे काय दागिने केले गेले, तेच फक्त आम्ही पुढे जपून ठेवले.
*लिहिल्या जाते,वाचल्या जाते
*लिहिल्या जाते,वाचल्या जाते इत्यादि
>>>>>
ते वैदर्भी मराठी आहे...तिथे तसे बोलले जाते आणि बहुदा लिहिलेही जात असावे
https://www.maayboli.com/node/7295?page=8
(Submitted by प्रमोद देव on 23 May, 2012 - 10:45)
छल्ला, केल्या गेले आणि केले
छल्ला, केल्या गेले आणि केले गेले यात फरक आहे.
केला गेला, केली गेली, केले गेले, केल्या गेल्या ही रूपे योग्य वाटतात.
दोन्ही क्रियापदांचे लिंग आणि वचन एकच आहे. हे कर्माच्या लिंग वचनानुसार हवे.
केल्या - स्त्रीलिंगी अनेकवचन.
गेले - पु. अनेकवचन किंवा नपु. एकवचन.
आंतर्जालपूर्वकालीन वैदर्भीय
आंतर्जालपूर्वकालीन वैदर्भीय मराठीत किंवा तिकडच्या लेखकांच्या लेखनात तशी रूपे आढळतात का ?
शेषे षष्ठी असे पाणिनीचे सूत्र
शेषे षष्ठी असे पाणिनीचे सूत्र आहे आणि जेथे विशिष्ट विभक्तीचा अर्थ लेखकाला अनिवार्यतः अभिप्रेत नसेल तिथे षष्ठी विभक्तीचा उपयोग करायला हरकत नसावी. >> हे माझी मदत ला कसं लागू होतं ते कळलं नाही. मराठीत मदत घेणारा चतुर्थीत जातो आणि करणारा कर्तरी किंवा कर्मणिनुसार अनुक्रमे तृतीयेत किंवा षष्ठीत.
त्याने मला मदत केली
त्याची मला मदत झाली
माझी मदत म्हणायचं तर
माझी त्याला मदत झाली.
पण इथे मदत घेणारा तो आहे. मदत ही जो करतो "त्याची" असते. "माझी मदत कर" हे म्हणताना त्यांना मदत घेणारा "मी" आहे असं अपेक्षित असतं - ते बरोबर नाही.
भरत, तो केले - केल्या भेद हा
भरत, तो केले - केल्या भेद हा माझे - माझ्या यासारखा असेल का?
जुनी रचना - माझा भाव तुझे चरणी
नवीन व्याकरण - माझा भाव तुझ्या चरणी
"वैदर्भी बोलीचे व्याकरण
"वैदर्भी बोलीचे व्याकरण प्राचीन मराठीला अधिक जवळ आहे असे दिसते. या बोलीचे महत्त्व, शुद्धता व व्याकरण पाहिले असता ही शुद्ध भाषा आहे असे म्हणावे लागेल".
https://www.loksatta.com/lokrang/maiboli-vaidarbhi-language-253189/#:~:t....
याच वैदर्भीय बोलीच्या जुन्या
याच वैदर्भीय बोलीच्या जुन्या लिखित नमुन्यांत "केल्या गेले" आहे का?
Pages