Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो.
हो.
ट्रम्प आता सर्वात म्हातारा
ट्रम्प आता सर्वात म्हातारा नॉमिनी आहे.
पेनसिल्व्हॅनिया गव्हर्नर जॉश
पेनसिल्व्हॅनिया गव्हर्नर जॉश शपिरो. या माणसात पोटेन्शिअल आहे. याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. या माणसात बराक ओबामाची झाक व चमक दिसते. त्याचा पेनसिल्व्हॅनियातला अॅटर्नी जनरल व गव्हर्नर म्हणुन रेकॉर्डही वाखाणण्यासारखा आहे. फिली एरियामधले यावर जास्त प्रकाश टाकु शकतील.
कमला हॅरीसचे नाव खुद्द डेमॉक्रॅटिक पार्टीत सुद्धा एकमुखाने व विश्वासाने पुढे येत नाही आहे यातच तिचे भविष्य दिसतय.
गॅव्हिन न्युसम- ( यंदाच्या पॉलीटिकल सायकल व वार्यात तरी) राष्ट्रिय स्तरावर खुपच डाव्या विचारसरणीचा वाटतो.
मिशेल ओबामा- ( अजुनतरी) तिला अध्यक्षिय निवडणुकीत इंटरेस्ट नाही.
कमला हॅरिस शिवाय पर्याय नाही.
कमला हॅरिस शिवाय पर्याय नाही. अन्यथा सर्व डोनेशन्स परत द्यावी लागतील !
पेनसिल्व्हॅनिया गव्हर्नर जॉश
शिवाय सध्य परिस्थितीत बायडनचे अँडॉर्समेंट मिळणे( ) व गेल्या २ वर्षात कमला हॅरीसला ( न सुटणारा व किचकट ) सुटवायला दिलेला सदर्न बॉर्डर इल्लिगल इमिग्रेशन चा तिढा या दोन गोष्टी तिच्यासाठी मोठी धोंड( लायबीलीटी) ठरु शकते.
आता देशी (दोन्ही कडील)
आता काही देशी पब्लिकची पंचाईत की काय?
कम
ळालावर शिक्क्याला सपोर्ट करायचा की राईटविंगला?मानव
मानव
बायडन डोमेस्टिक पॉलिसी बाबत
बायडन डोमेस्टिक पॉलिसी बाबत सगळ्यात चांगला आधुनिक राष्ट्रध्यक्ष आहे (ओबामा, ट्रम्प ह्यांच्या तुलनेत)
लेजिसलेटिव्ह कामगिरी उत्तम आहे. Democrat पक्ष मागे पाहताना बायडन बद्दल आपुलकीने बोलेल ह्याबद्दल खात्री वाटते.
त्या तुलनेने ट्रम्प - त्याचा स्वतःचा ex vp सुद्धा त्याला हिटलर सारखा आहे असे म्हणतो. त्याच्या चालू व्हीपी ने सुद्धा मागे असेच विधान केले आहे. ट्रम्पचा जवळपास सर्व फॉरमर कॅबिनेट त्याच्या विरोधात आहे.
कॉमी, सद्य स्थितीत
कॉमी, सद्य स्थितीत हिटलरसारख्या राज्यकर्त्याची गरज आहे, असं म्हणणार्या लोकांची संख्या जगात सगळीकडेच लक्षणीय आहे.
बायडन विरुद्ध निवडणूकीत पराभव
बायडन विरुद्ध निवडणूकीत पराभव झाल्यावर ट्रम्पने तो निकाल स्विकारला नव्हता. पुढे ६ जानेवारीचा हिंसाचार घडविला. हजारो लोक कॅपिटॉल हिल वर चालून गेले होते.
कमला हॅरिस नाव पुढे आले आहे, अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. डोनेशनचा ओघ पुन्हा सुरु झाला आहे. ट्रम्पचा निवडणूकीत पराभव अशी एक शक्यता आहेच. २०२४ मधे पराभवाला पुन्हा सामोरे जावे लागले तर ट्रम्पचे पाठिराखे तो निर्णय शांततेने स्विकारतील का ?
२०२४ मधे पराभवाला पुन्हा
२०२४ मधे पराभवाला पुन्हा सामोरे जावे लागले तर ट्रम्पचे पाठिराखे तो निर्णय शांततेने स्विकारतील का ? >> आधीचाच स्वीकारत नाही आहेत अजून त्याचे बोला.
बाकी इतके दिवस म्हातारा बायडन वगैरे हिणवणार्याच्या जिव्हा सरस्वतीला आता सर्वात म्हातार्या नॉमिनीच्या वयाबद्दल बोलताना लुप्त व्हावे लागेल असे धरून चालायचे का ? कमला हॅरिसच्या कॅलिफोर्नियामधल्या न्यायालयीन रेकॉर्डबद्दल तुणतुणे सुरू होईलच.
बहुतेक डेमोक्रॅट्सना अंदाज
बहुतेक डेमोक्रॅट्सना अंदाज आलाय का हरण्याचा? जिंकण्याची शक्यता असती तर जरा बरा कॅन्डीडेट पुढे आला असता का? कि मदुरान्तकला पुढे करून पोन्नीयिन सेल्वन राज्य करणार आहे?
<<सद्य स्थितीत हिटलरसारख्या
<<सद्य स्थितीत हिटलरसारख्या राज्यकर्त्याची गरज आहे, असं म्हणणार्या लोकांची संख्या जगात सगळीकडेच लक्षणीय आहे.>>
विशेषतः अमेरिकनेतल्या काही रिपब्लिकन्सना.
मला नाही वाटत कमला हॅरिसला लोक मते देतील.
तेंव्हा आता व्हाईट हाउस विसरून काँग्रेसच्या निवडणुकांवर लक्ष द्यावे डेमोक्रॅटिक पार्टीने. पण जाता जाता, डेमोक्रॅटिक पार्टीने त्रंप्याचे कवेफेफे सारखे क्लिप्स काढून तो म्हातारा आहे, आता त्याने पण निवडणुकीतून माघार घ्यावी असा प्रचार केला पाहिजे.
<<आता काही देशी पब्लिकची पंचाईत की काय?>>
असले काही होत नाही. तिने आपले देशीपण अगदी झाकून ठेवले आहे. शेवटी देशी लोक एकदा राजकारणात पडले की भारताला विसरतात - हेली, रामास्वामी, जिंदाल असे सगळे लोक बघा. चार वर्षांपूर्वी मारे बोंबाबोंब केली होती, कमला व्हीपी, आता भारताचे भले करील, तसले काही झाले नाही!!
>>>>>>मला नाही वाटत कमला
>>>>>>मला नाही वाटत कमला हॅरिसला लोक मते देतील.
माय व्होट फॉर हर. एक तर स्त्री आहे म्हणुन व दुसरे म्हणजे भयंकर नो-विन मुद्दा तिच्या गळ्यात बांधला होता बायडनने. मुद्दाम!!
तेव्हा ती जर कर्तुत्ववान असेल तर आता काहीतरी करुन दाखवेल.
तीसरे व महत्वाचे रिप्रॉडक्टिव्ह (की रिप्रॉडक्शन?) राईटसबद्दल ची तिची मते.
तरी अजून रनिंग मेट सिलेक्ट
>>> या दोन गोष्टी तिच्यासाठी मोठी धोंड( लायबीलीटी) ठरु शकते.
तरी अजून रनिंग मेट सिलेक्ट करायचा आहे.
तिच्या स्वतःच्या बळावर काही हे तिकीट प्रभाव पाडेल अशी मला अजिबातच आशा नाही.
कमला व्हीपी, आता भारताचे भले
कमला व्हीपी, आता भारताचे भले करील, तसले काही झाले नाही!!>> भले करो न करो. भारतीय वंशाची व्यक्ती आहे ना, मग ऊर अभिमानाने भरून आला पाहिजे. प्रचार भाषणात तिने एखादा भारत महान दाखवणारा संस्कृत श्लोक म्हटला, नवीन भारताचे कौतुक केले की ती परत मने जिंकुन घेईल त्यांचे.
>>>>>>>कमला व्हीपी, आता
>>>>>>>कमला व्हीपी, आता भारताचे भले करील, तसले काही झाले नाही!!
भले न का होइना, न्युट्रल तर आहे.
ट्रंपच्या कारकिर्दीत, व्हाईट सुप्रिमिस्ट लोकांना फार जोर चढला होता.
-----------
बायडन गेला हे फार बरे झाले. अनेक कुंपणावरचे लोक आता आशेने डेम्स्ना व्होट देतील.
अमेरिकेच्या अध्यक्षाने
अमेरिकेच्या अध्यक्षाने भारताचे भले करायचे? का? भारताचा पंतप्रधान आहे ना? का त्याला आता जमेनासं झालं आहे?
बाकी भारतात न जन्मलेल्या व्यक्तीने अधिकाराची पदे घेण्याबाबतचा भारतीयांचा दृष्टीकोन इतका बुरसटलेला आहे की भारतीयांनी गप्पच राहिलेले बरे.
>>कमला हॅरिस शिवाय पर्याय
>>कमला हॅरिस शिवाय पर्याय नाही.<<
व्हॉट अबौट अंकल बर्नी? अरे, त्याला तुम्हि विसरलांत काय? जोडिला एओसी..
बाय्दवे मुकुंद, मस्क आणि खोस्ला यांच्यातलं बँटर वाच एक्सवर. काहि जिव्हाळ्याचे मुद्दे क्लियर होतील...
गम्मत बघा कि तात्याने कमलाला
गम्मत बघा कि तात्याने कमलाला डोनेशन दिले होते २०११ मधे. आता त्याला साक्षात्कार होईल कि कमला बिनडोक आहे वगैरे. वान्स पाच वर्षांपूर्वी तात्या च्या नावाने शिमगा करत होता. नि ह्यांना सपोर्ट करणारे इतरांची थट्टा करतात ?
एक तर स्त्री आहे म्हणुन >>
एक तर स्त्री आहे म्हणुन >> सामो हा मुद्दा नि तिचा वंश ह्यामूळे तिची पांढरी मते जाण्याची शक्यताच अधिक आहे. बाकी आत्तापर्यंतच्या पोल्स मधे ती नि तात्या विरुद्ध बायडन नि तात्या ह्या दोनन्ही गॅप्स बर्यापैकी सारखप्च आहे हे कोडे आहे खरे.
तात्या रिकर्सिव्हली स्वतःचाच
तात्या रिकर्सिव्हली स्वतःचाच लेट ब्लूमर आहे रे.
>>>>>>>>>>.सामो हा मुद्दा नि
>>>>>>>>>>.सामो हा मुद्दा नि तिचा वंश ह्यामूळे तिची पांढरी मते जाण्याची शक्यताच अधिक आहे.
येस तशी शक्यताही आहे. उत्तम मुद्दा.
कमला अजून फॉर्मली उमेदवार
कमला अजून फॉर्मली उमेदवार नाही. फक्त बायडेन ने एन्डोर्स केले आहे. त्याचीच व्हीपी आहे - त्याला पर्यायच नाही. पण डीएनसी मधे तिला तितका पाठिंबा मिळाला पाहिजे. मी तर म्हणतो होउन जाउन द्या एक झटपट प्रायमरी.
बाय द वे तिकडे सगळे आलबेल नाही. जे डी व्हान्सविरूद्ध बरेच मागा पब्लिक उठले आहे.
डेम्सकरता - कॅलिफोर्नियातले वोक लोक तुम्हाला निवडून देणार आहेत, की स्विंग स्टेस मधले कुंपणावरचे हे आधी ठरवा. कॅलिफोर्नियात १०% मत कमी झाले तरी काही फरक पडत नाही. पण विस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया, ओहयो ई ठिकाणी झाले तर पूर्ण निवडणुकीचा निकाल त्यावर लागतो.
आणि पुन्हा एकदा अॅबॉर्शन मुद्दा फ्रंट अॅण्ड सेण्टरला आणावा. त्याकरता भरपूर मटेरियल आहे.
हॅरिस ला हटवणे डेम्स ना
हॅरिस ला हटवणे डेम्स ना परवडणार नाहणेअसे मला वाटते - तिच्या वंशामूळे त्या वंषाचे नि कट्टर डावे नाराज होतील जो घाव वर्मी घातल्यासारखे होईल. त्यापेक्षा तिच्याबरोबर स्विंग स्टेटमधले कोणी तरी - विशेषत" स्त्रीच घेऊन व्हीपी उमेदवार म्हणून घेऊन अॅबॉर्शन एके अॅबॉर्शन ह्या मुद्द्यावर धुमाकूळ घालता येईल. तात्याला त्यावर अजिबात धड स्टान्स घेता येत नाही हे उघड आहे. तात्याचे वय ह्याबद्दल्पण भरपूर हॅमरिंग करता येऊ शकते.
जे डी व्हान्सविरूद्ध बरेच मागा पब्लिक उठले आहे. >> तो शुद्ध मूर्खपणा आहे पण त्यातले इंवॉल्व्ह्ड लोक बघता त्यात नवल काहीच नाही.
जेब्बात!
जेब्बात!
मी सकाळी लिहिणार होतो की निकी हेलीला बरोबर घ्यावे. तिकिटावर दोन स्त्रिया! तात्या सारखं डबल डाऊन करून टाकावं.
असामी बहुतेक ग्रेचेन व्हिटमर
असामी बहुतेक ग्रेचेन व्हिटमर बद्दल बोलत होता, पण हे ही चालेल
शेवटी थेरड्याची हकालपट्टी
शेवटी थेरड्याची हकालपट्टी झाली. पिडा गेली!
आता सगळे त्याच्या महान महान त्यागाच्या बाता मारत आहेत. कसे देशाला आपल्यापेक्षा मोठे ठरवले वगैरे ट्यांण ट्यांण ट्यांण. पण सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आता निघा आता निघा चा धोशा लावला होता. विविध माध्यमात होणार्या मुलाखतीत एकच कळीचा प्रश्न काय झाल्यावर तुम्ही माघार घेणार? ह्याला त्याग म्हणणे म्हणजे अंगाला चिकटलेली रक्तपिपासू जळू मिठाचे पाणी ओतून ओतुन गळून पाडल्यानंतर तिने केलेल्या "त्यागाला" गौरवण्यासारखे आहे! असो.
ट्रंप म्हातारा म्हणून हुरळून जाणार्यांसाठी: बायडनचे शारिरिक वय हा मुद्दा गौण होता. त्याचे मतिभ्रष्ट होणे, साध्या गोष्टी विसरणे, वाक्य पुरी न करता येणे, अवघडलेल्या हालचाली, वाक्य सुरु करून एनिवे ह्या शब्दाने ८०% वाक्यांचा समारोप करुन ऐकणार्यांना बुचकळ्यात पाडणे, अनेकदा पडणे हे सगळे जास्त जबाबदार होते. त्याचे शारिरिक आणि मानसिक अधःपतन गेले चार वर्षे दिसत होते. फक्त मुख्य प्रवाहातील माध्यमांनी इतके दिवस डोळ्यावर कातडे ओढून त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले होते आणि त्यांच्या अर्ध्या वचनात असणार्या मेंढरांनाही तेच करणे भाग होते!
एक उदाहरणः बर्नी सँडर्स हा माणूस अत्यंत घातक समाजवादी विचार बाळगतो. तो ट्रंप आणि बायडन दोघांपेक्षा मोठा आहे. परंतु त्याचे बोलणे, चालणे, वावरणे हे सगळे व्यवस्थित आहे. चेहर्यावर तेज आहे. आपले विचार अगदी व्यवस्थित इतरांपर्यंत पोचवू शकतो. हा जर उमेदवार असला तर त्याला वयाची सबब लावून कुणीही नालायक ठरवू शकणार नाही. त्याच्या विचारांना विरोध केला जाईल.
वय होणे ह्याला अमुक एक आकडा गाठण्याचे बंधन नाही. काही लोक साठीतच तिथे पोचतात. काही नशिबवान लोक नव्वदीतही त्यापासून दूर असतात. असो.
आता कमलाबाई प्रतिस्पर्धी बनणार की काय? तिची लोकप्रियता आणि तिच्या शब्दांच्या निरर्थक पण चविष्ट कोशिंबिरीचे देशभर प्रचंड चाहते आहेत त्यामुळे बाई भरघोस मतांनी निवडून येणार बहुतेक! आपले तरसासारखे भयंकर विकट हास्य नियंत्रित करता आले तर कदाचित शक्य आहे. डिबेटमधे काय होते ते बघावे लागेल.
अर्थात इतक्या सहजासहजी कमलाबाईला निर्विवाद उमेदवार म्हणून डेमोक्रॅट मान्यता देतील का काही धुसफुस सुरु होते आहे तेही पहावे लागेल.
सम्राज्ञी मिशेलजी कृपावंत झाल्या तर चित्र बदलू शकेल. म्हातार्याला जाण्यासाठी दबाव आणला तसा कदाचित सम्राज्ञींवर येण्यासाठी दबाव टाकला जाईल आणि मग त्या आपला जमिनीवरून दशांगुळे वर चालणारा रथ खाली उतरवून सामान्यांच्या उद्धारासाठी आणि ट्रंपासुराच्या निर्दालनासाठी येतील कदाचित!
आज काँग्रेससमोर त्या सिक्रेट सर्विसच्या डिरेक्टरची सुनावणी होती. भयानक निर्लज्ज बाई आहे. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाही. माझ्या नेतृत्वात हत्येचा इतका भयंकर प्रकार झाला आहे हे मान्य करत असताना मी राजीनामा देणार नाही हे ठासून सांगण्याइतका बेशरमपणा आहे.
कायम म्हातार्या बायडनची तळी उचलणारे अनेक डेमोक्रॅटही ह्या बाईची उत्तरे ऐकून हतबुद्ध झालेले दिसले.
एकंदरीत बरेच पाणी मुरत असावे. कदाचित म्हातार्याला शेवटचा उपाय म्हणून ट्रंपचा निकाल लावायची मुभा दिली असावी. (तो प्रयोग ट्रंपच्या नशिबाने फसला त्यामुळे आता तुम्ही कटा असा "वरून" हुकुम आला असावा). त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात ठरवून ढिसाळपणा करून त्या पिसाट २० वर्षीय मारेकर्याला निदान एक शॉट तरी बिना तक्रार मारू दिला गेला असावा.
उत्तम प्रशिक्षण दिलेले जागतिक दर्जाचे संरक्षक दल इतक्या ढोबळ चुका करते ज्या पूर्णतः त्या मारेकर्याच्या पथ्यावर पडतात हे निव्वळ ढिसाळपणा म्हणून स्वीकारता येणार नाही. ट्रंपला "कायमचे" हरवायचा तो एक शेवटचा आणि निकराचा प्रयत्न होता असेच वाटते.
जर ट्रंप निवडून आला तर ह्याचा तपास होईल. पण कदाचित हत्येचे अजून प्रयत्न होणे अगदी शक्य आहे.
बायडेन जिवन्त आहेत का ?
बायडेन जिवन्त आहेत का ?
कमला हॅरिस यांना मिळणारा
कमला हॅरिस यांना मिळणारा पाठिंबा तासागणित वाढतच आहे. बहुतेक सगळ्याच डेमॉक्रॅटिक गवरर्नरसनी तिच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे आणि हवे असलेले पाठबळ ( १९७६ डेलिगेटस) तिच्याकडे आहे. अजून तरी तिच्या नावाला आव्हान दिले गेले नाही , ७ ऑगस्टला तिच्या उमेदवारीच्या नावाला अधिकृत शिक्का मिळेल.
२४ तासांत, ८० मिलीयन डॉलर्स पेक्षा जास्त फंड मिळाला आहे. VP साठी - पिट बुडाजज छान काम करेल.
अमेरिकन लोकशाहीचे भविष्य कमला हॅरिस (- पिट बुडाजज, जॉश शॅपिरो... ?) यांच्यावर अवलंबून आहे. बायडन यांनी पर्याय दिलेला आहे आणि जातांना निवडणूकीत मस्त पैकी जान ओतली आहे.
Pages