Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2024 - 03:10
मनात माझ्या येते अवखळ
मनात माझ्या येते अवखळ काही बाही
सदा कदा ते शोधत जाते, खुळेच पाही
मूल होऊनी बागडते ते अंगणदारी
फुलपाखरे शोधीत बसते सांज सकाळी
दुःख उराशी कधी काळचे कुरवाळुनिया
थोपटून ते जागे करते वेळी अवेळी
मधेच शोधे पुढील काही धसकुन जाई
उगाच खंती करता करता गाणे गाई
नित्य नवे हे चाळे निरखित दिवसा राती
किती गुणाचे बाळ म्हणोनि कौतुक पाही
समजाउनिया ऐकत नाही, चापट देई
लांब उभा मी, मनात येवो काही बाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर ....
सुंदर ....
सुंदर...
सुंदर...
लांब उभे राहून मन निरखत बसनं
लांब उभे राहून मन निरखत बसनं सुंदर आहे..
वाह! साक्षीभाव. फारच सुंदर.
वाह! साक्षीभाव. फारच सुंदर.
अचपळ मन माझे नावरे आवरीता !
अचपळ मन माझे नावरे आवरीता !
खूप छान..!
खूप छान..!
सुंदर
सुंदर
खुप सुण्दर!!!
खुप सुण्दर!!!