Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जर ट्रम्प फेक इलेक्टर
जर ट्रम्प फेक इलेक्टर नेमण्याबाबत convict झाला आहे - तर त्याला एकही कायदेशीर परिणामला समोर जावे लागणार नाही हे अत्यंत संतापजनक आहे. इन्सरेक्शन करणाऱ्याला निवडणुकीत उभा होता येणार नाही ही संविधानिक तरतूद सुप्रीम कोर्टाने फेकली. काही शिक्षा होणार नाही ही काळजी सुप्रीम कोर्टाने घेतली. >>> मला खरेच असे कोठे दिसले नाही निकालांत.
मुळात ट्रम्प त्याबद्दल कधी कन्विक्ट झाला आहे? मी कोणता निकाल मिस केला असेल तर माहीत नाही. समजा लोअर कोर्टाने जर फेक इलेक्टर्स बद्दल हे दोन मुद्दे निकालात दिले:
- असे इलेक्टर्स नेमणे हे त्याच्या घटनात्मक अधिकाराचा भाग नाही, आणि
- आणि त्याने असे इलेक्टर्स नेमणे हे बेकायदा आहे
तर त्याला या नवीन खुलाशानुसार इम्युनिटी लागू नाही. मग त्यानंतर सुप्रीम कोर्ट फार फार तर हे दोन्ही निर्णय फिरवू शकते. पण त्याला काहीतरी घटनात्मक बेस असल्याशिवाय किंवा प्रिसीडन्स असल्याशिवाय ते ही असे करत नाहीत. याच सुप्रीम कोर्टाने २०२०२ बिग लाय बद्दल अनेक केसेस स्वीकारलेल्याच नाहीत. ज्या एक दोन घेतल्या त्याही फेटाळल्या आहेत. त्यांना ट्रम्पला फ्री हॅण्ड द्यायचाच असता तर तेव्हाच दिला असता. २०२० ची निवडणूकच गोत्यात आली असती. तेव्हा ते ही हे सगळे रॅण्डम करत नाहीत.
पण अशा सर्व खटल्यांना ४ वर्षे जर पुरेशी नसतील तर यातून निवडणुकीआधी सत्य बाहेर येणे अवघड आहे. यात डेम्सचा ढिलेपणा किती व ट्रम्प आणि यात इन्व्हॉल्व असलेले लोक, त्यांचे वकील यांची हुशारी किती हे लक्षात नाही.
एकूण सध्याचे सुप्रीम कोर्ट इन्क्लिनेशन बघता कायद्याने त्याला काही कॉन्सिक्वेन्सेस मिळतील याची आशा सोडा. >>> ते आहेच. मी ही आधी लिहीले आहेच की ट्रम्पला हरवायचा मार्ग फक्त मतपेटीतूनच आहे. इतर कोणताही नाही.
बर्याच पोलिटिकल पंडितांनी
बर्याच पोलिटिकल पंडितांनी ट्रंपवर झालेल्या हल्ल्याची तुलना रेगनवर ('८१) झालेल्या हल्ल्याशी केली आहे. त्या हल्ल्यानंतर रेगन वाज पोलिटिकली अन्स्टॉपेबल, ट्रंपच्या बाबत देखील तसं घडेल? घोडामैदान जवळंच आहे..
ट्रंपच्या रनिंग मेटच्या निवडि बाबतहि त्याची प्रशंसा होतेय. रस्टबेल्टच्या तळागाळातुन आलेल्या जेडि वांस स्टोरी इज ए पर्फेक्ट एग्झांपल ऑफ अॅन अमेरिकन ड्रीम, शोकेसिंग व्हॉट अमेरिका इज ऑल अबौट. त्याचं मेम्वा (हिलबेली एलजी, नुयॉटा बेस्टसेलर) वाचलं नसेल तर वाचा. रॉन हॉवर्डने याच नावाचा अप्रतिम चित्रपट बनवला आहे, मॅक्सवर पहिलेला, अजुनहि तिथे असेल. आवर्जुन बघा..
बाय्दवे, जेडि वांस वाज ए स्टाँच क्रिटिक (नेवर ट्रंप) ऑफ ट्रंप. त्याचा ट्रंपच्या रनिंग मेट पर्यंतचा प्रवास रोचक आहे. होप अदर्स फॉलो सूट...
बाय्दवे, जेडि वांस वाज ए
बाय्दवे, जेडि वांस वाज ए स्टाँच क्रिटिक (नेवर ट्रंप) ऑफ ट्रंप. >> सत्ता तिथे मार्ग ! ह्या काठावरून त्या काठावर उड्या मारणार्यांमधे तो एकटाच नाहिये.
व्हॅन्स यांच्या पुस्तकावरचा
व्हॅन्स यांच्या पुस्तकावरचा तो सिनेमा पाहीला आहे. आवडला आहे.
बायडेनचे रेसमधून बाहेर पडणे
बायडेनचे रेसमधून बाहेर पडणे आता अटळ दिसते. सगळीकडे तोच पुकारा होतोय.
वोटर बेस पूर्णपणे पुन्हा जिवंत करणारा पण मध्यममार्गी कोणीतरी उभा केला तर डेम्सना एक फायदा होईल. बायडेन वर होणारी इमिग्रेशन ई वरची टीका सरळ त्याच्यावर ढकलून द्यायची. आणि आपण डेम्स एस्टॅब्लिशमेण्टच्याही विरोधात आहोत असा भास निर्माण करायचा. दोन्ही म्हातार्यांपेक्षा कोणीतरी फ्रेश पर्याय आपण देत आहोत वगैरे वगैरे. आत्तापर्यंत इमिग्रेशन पॉलिसी डेम्सनी कुंपणावरच्या लोकांना पटेल अशी नीट कधीही डिफेण्ड केलेली नाही. या नवीन कॅण्डिडेटने सरळ डेम्सना ब्लेम करावे. अगदी इन्फ्लेशनकरता सुद्धा.
ट्रम्पने हीच स्क्रिप्ट वापरली होती/आहे.
ट्रम्पने हीच स्क्रिप्ट वापरली
ट्रम्पने हीच स्क्रिप्ट वापरली होती/आहे. >> तात्याने संपूर्ण आयुष्यभर हीच स्क्रिप्ट वापरली आहे नि लोक अजूनही त्यात स्वतःहून उल्लू बनत आहेत. त्याला का दोष द्या !
तात्याचे स्पीच सुमारे तासभर
तात्याचे स्पीच सुमारे तासभर ऐकतोय. पहिला अर्धा तास एकदम वेगळा ट्रम्प होता. पण नंतर नंतर पुन्हा ओरिजिनल तात्या बाहेर आला आहे
एकूण पार्टीचा व ट्रम्पचा टोन युनिटी हा आहे. ते चांगले आहे. कन्व्हेन्शन मधे त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता डेम्सचा विजय अवघड दिसतोय यावेळेस.
फारएन्ड तुमचे बरोबर आहे.
फारएन्ड तुमचे बरोबर आहे. ट्रम्प फेक इलेक्टर विषयात अजून कॉन्व्हिक्ट नही झाला. ग्रँड जुरी indictment हे दोषी ठरवणे नाही. ती माझी समजण्यात चूक झाली.
पण ती केस चुटकीन बाईंच्या कोर्टात आहे. Conviction येणे अपेक्षित आहे. खुद्द ट्रम्पचे वकील त्याने फ्रॉड केला आणि तो राष्ट्रध्यक्षाच्या पॉवर खाली आहे असा दावा करत आहेत इम्युनिटी साठी. ह्या गुन्ह्यासाठी इम्युनिटी देणे हेच चुकीचे आहे.
आमच्या गावातले जे लोक्स
आमच्या गावातले जे लोक्स मुंबईत कामाला असतात ते दरवर्षी गावी येऊन सत्यनारायणाची पूजा घालतात. मुंबईत त्यांना कोण विचारत नाही पण गावाला मात्र कॉलर ताठ करुन मिरवतात का तर मुबंईत काम करतो. हा धागा वाचून मला त्या एकेक मजेशीर प्रसंगांची आठवण येते.
तुम्ही सगळ्यांनी पण भारतात
तुम्ही सगळ्यांनी पण भारतात येऊन एक मस्तपैकी पूजा घाला.
मला पण गावातल्या लोकांची मळमळ
मला पण गावातल्या लोकांची मळमळ आठवली..
निरू +१
निरू +१
<< मुंबईत त्यांना कोण विचारत
<< मुंबईत त्यांना कोण विचारत नाही >>
तसे इथेहि कुणि विचारत नाहीत की मायबोलीकर राजकारणा बद्दल काय बोलतात.
पण मायबोलीखेरीज इतर कोण विचारतो नि कोण नाही याचा विचार मायबोलीकर करत नाहीत. ते त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांना काय वाटते ते लिहिण्यासाठी मायबोलीवर येतात.
मानसिक शांततेसाठी महागड्या डॉक्टर कडे जाण्यापेक्षा मायबोली वाचणे मला जास्त सोयीचे वाटते.
इथल्या कुठल्याहि गोष्टीशी मला देणे ना घेणे, फक्त दोन्ही बाजू काय म्हणतात ते कळते.
जास्त करून मनोरंजन होते. दोन ५ वर्षाची मुले एकमेकात चर्चा करत असतील तर ते ऐकण्यात जी गंमत वाटते, तसे मला इथे होते.
राजकारणात खरे काय नि खोटे काय हे खुद्द राजकारण्यांना माहित नसते, तर आपल्याला काय समजणार?
आता पूजा करणे वगैरे म्हणाल तर इथे मी फक्त सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव पूजा, कार पूजा (काही लोक नविन कार विकत घेतल्यावर देवलात जाऊन पैसे देतात नि पूजा करवतात) असल्या पूजा ऐकल्या आहेत. बाकी कुणि काही पूजा केल्याचे ऐकीवात नाही.
कॉमी, त्या अॅरिझोनच्या मेंटल
कॉमी, ती अॅरिझोनाची मेंटल केरी बाई (जिला अमेरिकेतल्या सगळ्या कोर्टनी तिच्या इलेक्शन चोरलीच्या बोगस दाव्यांना कचर्याची टोपली दाखवुन सणसणीत चपराकी दिल्या आहेत) इज अ व्हेरी सॅड केस!त्या इंटरव्ह्यु मधे ब्रिटिश जर्नलिस्ट एमिली मेटलिस टुक हर टु द क्लिनर्स!
ती ब्रेनलेस केरीबाइ हायली इंटलिजंट एमिलीला शेवटी ( एमिलीने तिचे सगळे पितळ उघडे केल्यावर) म्हणते.. यु निड टु चेक युअर ब्रेन!( जे एमिलीने इन्डिरेक्टली तिच्या टु द पॉइंट प्रश्नांनी केरीला दाखवुन दिले होते की केरीच कशी बिनडोक आहे!)
फारएंड, डेमोक्रॅट्सनी ही निवडणुक ऑलरेडी गमावलेली आहे. बायडन असण्याने व नसण्याने काहीच फरक पडणार नाही. ( तुला आठतोय का “ सिलसिला” मुव्हीमधला सीन ज्यात देवेन वर्मा अमिताभला कास्टींग डिरेक्टर/ ड्रामा प्रोड्युसरकडे ( सुशमा शेठ) घेउन जातो व ती कास्टींग डिरेक्टर प्रोड्युसर ( सुशमा शेठ)व व अमिताभ एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांना विसरुन प्रेमाने बोलत असतात ( अमिताभ त्याच्या ड्रामासाठी ऑडिशन देत असतो) व सुशमा शेठ अमिताभने भारावुन जाते. तेव्हा ते बोलत असताना देवेन वर्मा तिथे हजर असतो. तो त्या दोघांना विचारतो की मी जाउ की इथेच बसुन राहु? तेव्हा सुषमा शेठ देवेन वर्माला म्हणते “ आप जानेसे या रहनेसे कुछ फर्क नही पडता! “ तस काहीस!
बायडनला आल्टरनेटिव्ह कोण? कमला हॅरीस? गॅव्हिन न्युसम? ग्रेचन व्हिटमर? ह्म्म! कठिण आहे! डेमॉक्रॅट फळी सगळी विस्कटलेली दिसतेय.
उलट रिपब्लिकन पार्टीचा " व्हाइट फर्स्ट, व्हाइट सुप्रिमसी ,अँटाय इमिग्रंट, अँटाय वुमन, अँटाय गे, अँटाय डिव्हर्सीटी " हा पॉप्युलिस्ट प्रॉजेक्ट २०२५ अजेंडा रिपब्लिकन पार्टीने एकजुटीने अंगीकारला व प्रॉपोगेट केला आहे. खासकरुन रस्ट बेल्टमधल्या अशिक्षित व्हाइट फॅक्टरी वर्कर्समधे हा अजेंडा खुपच पॉप्युलर आहे. व्हाइट् अमेरिकेला ट्रंप हा त्यांचा देवदुत व वालीच वाटतो. मिशिगन, ओहायो, मिनिसोटा, विस्कॉन्सिन व पेनसिल्व्हॅनिया आर गोइंग टु डिसाइड द इलेक्शन. इट्स हार्ड टु सी डेमॉक्रॅट्स विनिंग ३ ऑफ दिज ५ स्टेट्स!
बाय द वे! कोणतीही पार्टी
बाय द वे! कोणतीही पार्टी जिंकली तरी परत एकदा भारतिय इमिग्रंट फॅमीलीमधुन आलेलीच बाई व्हाइस प्रेसिडेंटसाठी असणार्या घरात असणार आहे!
राज, उषा व्हान्सची रेझ्युमे इंप्रेसिव्ह आहे! उलट जे डी व्हांस असामी म्हणतो तसा टिपिकल सत्तेसाठी हपापलेला फ्लिपफ्लॉपर आहे. हाच माणुस ट्रंप अमेरिकेचा हिटलर आहे असे परवा परवा पर्यंत बोकलत होता!
सिलसिलाचा संदर्भ भारी आहे
सिलसिलाचा संदर्भ भारी आहे
मुकुंद तू कालचे भाषण पाहिलेस का ट्रम्पचे? पहिली ३०-४० मिनिटे "हाच का तो ट्रम्प" वाटेल इतके चांगले भाषण होते. नंतर पुन्हा नेहमीसारखा बोलू लागला पण रिपब्लिकन पार्टीचे किमान जाहीर नॅरेटिव्ह टोन डाउन केलेले दिसते. यावेळचे ट्रम्पचे अॅडव्हायजर्स स्मार्ट दिसत आहेत. एरिक बोलताना ट्रम्पच्या मांडीवर त्याची नात बसलेली सतत दाखवणे, भाषणात आधी इतर बर्याच लोकांची दखल घेणे, "I will be the president of the entire America. Not half the country" वगैरे बरेच काही न्युआन्सेस आहेत.
२००८ च्या निवडणुकीबद्दल "गेम चेंज" पुस्तक आहे. त्यात पहिल्या भागात तेव्हाच्या प्रायमरीज बद्दल बरेच काही आहे. (त्यावरून आलेल्या याच नावाच्या पिक्चर मधे बहुधा फक्त प्रेसिडेन्शियल निवडणुकीचा भाग आहे). डेम्सच्या प्रायमरीज मधे हिलरी व ओबामा मधे बरीच चुरस होती पण सगळीकडे ओबामाला मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद बघून एका पॉइण्टला हिलरी मान्य करते की "It's hard to defeat a movement". सध्या बायडेन त्याच स्थितीत वाटतो.
पण ट्रम्प जर काही महिन्यांत चित्र पालटवू शकतो, तर डेम्स का नाही करू शकत. फक्त त्याला एक प्रचंड चार्म असलेली व सर्व वोटर बेसला मतदानाला बाहेर काढू शकणारी व्यक्ती हवी. मला तरी मिशेल ओबामाशिवाय दुसरी कोणी तशी व्यक्ती दिसत नाही.
एकदम बरोबर आहे तुझ फारएंड! पण
एकदम बरोबर आहे तुझ फारएंड! पण मला तर बराक ओबामाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही!
"यावेळचे ट्रम्पचे अॅडव्हायजर्स स्मार्ट दिसत आहेत"
हे पण तुझे एकदम बरोबर आहे!
त्याच्या उलट बायडनने काय नग त्याच्याभोवती गोळा केले आहेत कोण जाणे! एकजात सगळ्यांना होलसेलमधे फायर केले पाहीजे! भ्रमिष्ट बायडनला पब्लिक पासुन झाकुन ठेवुन जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन दे नॉट ओनली डिड अ डिससर्व्हिस टु द डेमॉक्रेटिक पार्टी बट दे डिड अ डिससर्व्हिस टु द कंट्री अँड टु द अमेरिकन पिपल!
अरे मराठीत लिही की मुकुंद.
अरे मराठीत लिही की मुकुंद. चांगल्या पोस्ट असतात तुझ्या पण पुढची स्टेप अॅक्सेंट मधल्या पोस्टी वाचाव्या लागतील काय विचार करुनच धडकी भरते.
पण ट्रम्प जर काही महिन्यांत
पण ट्रम्प जर काही महिन्यांत चित्र पालटवू शकतो, तर डेम्स का नाही करू शकत. फक्त त्याला एक प्रचंड चार्म असलेली व सर्व वोटर बेसला मतदानाला बाहेर काढू शकणारी व्यक्ती हवी. मला तरी मिशेल ओबामाशिवाय दुसरी कोणी तशी व्यक्ती दिसत नाही.>> पण तिला निवडणूक लढवायची नाहिये म्हणे.
पण तिला निवडणूक लढवायची
पण तिला निवडणूक लढवायची नाहिये म्हणे. >> ह्यावेळी तरी नक्की नाहिये . उगाच तात्याच्या विरुद्ध चिखलात उतरून कपडे कशाला खराब करा.
पहिली ३०-४० मिनिटे "हाच का तो ट्रम्प" वाटेल इतके चांगले भाषण होते. नंतर पुन्हा नेहमीसारखा बोलू लागला पण रिपब्लिकन पार्टीचे किमान जाहीर नॅरेटिव्ह टोन डाउन केलेले दिसते. >> हत्तीचे खायचे नि दाखवायचे दात वेगळे असतात ही म्हण आपली उगाच आठवली. किती चपखल आहे बघ
सध्याच्या न्यूज सायकल्स चा रेट बघता अजून दोन महिन्यांमधे काहीही होऊ शकते. गमतीची बाब म्हणजे अजून दोन वर्षांनी तात्या बायड्नच्या आजच्या वयाचा होणार आहे पण तो मात्र तेंव्हाही फिजिकली धडधाकटच असणार हे भविष्य कोणी नि कसे मांडलय नक्की ?
त्याच्या उलट बायडनने काय नग
त्याच्या उलट बायडनने काय नग त्याच्याभोवती गोळा केले आहेत कोण जाणे! >>> त्यांचे "सेल्फ-प्रिझर्वेशन" सुरू आहे. प्रेसिडेण्ट बदलला की बहुतेक स्टाफ - किमान लीड्स- बदलतात. बायडेनच्या दुसर्या टर्म मधे असण्यात त्यांचे हित आहे. पण जास्त दोष पार्टी च्या नेत्यांना जातो. त्यांना हे गेले अनेक महिने माहिती असणार नक्कीच.
डिससर्व्हिस टु द कंट्री अँड टु द अमेरिकन पिपल! >>> नक्कीच.
बाकी "इकॉनॉमी म्हणजे जीडीपी व इतर काय काय फक्त अर्थशास्त्रज्ञ (व एमएसएनबीसी ) यांनाच कळणारे मेट्रिक्स" व "इकॉनॉमी म्हणजे गॅस्/ग्रोसरी च्या किमती" यात नेहमी गॅस/ग्रोसरी जिंकते हे डेम्सना इतकी वर्षे झाली तरी झेपलेले नाही.
डेमोक्रॅट्स फक्त पॉलिसी,
डेमोक्रॅट्स फक्त पॉलिसी, इकॉनॉमी बद्दल बोलतात. बहुसंख्य अमेरिकनांना त्यातले काही कळत नाही किंवा त्याहि पेक्षा इमिग्रे शन, " व्हाइट फर्स्ट, व्हाइट सुप्रिमसी ,अँटाय इमिग्रंट, अँटाय वुमन, अँटाय गे, अँटाय डिव्हर्सीटी " या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात.
तसे रिपब्लिकन बर्यापैकी साधेसुधे, भोळे आहेत - कुणि म्हणाले सर्वांना ख्रिश्चन करा, सगळे प्रश्न सुटतील, किंवा टॅक्स ब्रेक द्या, ट्रिकल डाऊन इकोनॉमी होईल, इम्मिग्रेशन कमी करा म्हणजे सर्व काही ठीक होईल वगैरे एखादाच मुद्दा त्यांना एका वेळी समजतो, नि त्यावर ते मत देतात.
वास्तविक मूर्तिपूजा ख्रिश्चन धर्मात निषिद्ध मानली आहे, पण जागोजाग त्रम्प्याचे पुतळे उभारायला काहीच हरकत नाही.
असे म्हणतात की उत्तर कोरियात प्रत्येक घरात किम (जो कोण तिथला डिक्टेटर आहे) चा फोटो असला पाहिजे नि घराला जरी आग लागली तरी प्रथम तो फोटो वाचवला पाहिजे! ख.खो.दे.जा. पण त्रम्प्याला हि कल्पना फारच आवडेल.
शेंडॅनक्षत्रांचे त्याला पहिले अनुमोदन! :फिदीफिदी:
>>सत्ता तिथे मार्ग !<<
>>सत्ता तिथे मार्ग !<<
अरे बाबा, तो ऑलरेडि सेनेटर (जु) आहे. अशी काय डोंबल्याची सत्ता मिळते विपिजना. बाय्डन, हॅरिसला विचार..
>>हाच माणुस ट्रंप अमेरिकेचा हिटलर आहे असे परवा परवा पर्यंत बोकलत होता!<<
फ्लिप फ्लॉपर नाहि, लेट ब्लूमर आहे. बहुतेकांना ट्रंपच्या पॉलिसीज कळायला वेळ लागतो. तुमचा जो लिबरमन खरा फ्लिप फ्लॉपर होता, तुला आठवत असेल तर..
>>..दे नॉट ओनली डिड अ डिससर्व्हिस टु द डेमॉक्रेटिक पार्टी बट दे डिड अ डिससर्व्हिस टु द कंट्री अँड टु द अमेरिकन पिपल!<<
आय डिसग्री. फॉर्मर मेबी ट्रु फॉर डेम्स, बट द लॅटर इज अन्ट्रु. माझ्या मते, बाय्डनचं घोडं दामटंत रहाण्यात रेप्स आणि देशाचा उलट फायदाच आहे...
>>सत्ता तिथे मार्ग !<<
ड्पो.
हाच माणुस ट्रंप अमेरिकेचा
हाच माणुस ट्रंप अमेरिकेचा हिटलर आहे असे परवा परवा पर्यंत बोकलत होता>>>
<< व्हाइट् अमेरिकेला ट्रंप हा
<< व्हाइट् अमेरिकेला ट्रंप हा त्यांचा देवदुत व वालीच वाटतो. >>
------ देवानेच वाचविले, नव्हे देव आहे म्हणूनच वाचला.... अजून काय सज्जड पुरावा हवा ?
निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यासाठी बायडन जेव्हढा विलंब लावेल तेव्हढे पुढच्या उमेदवाराचे काम कठिण करुन ठेवणार आहे.... माघार घ्यावीच लागणार आहे. आजपासून - १९ ऑगस्ट पर्यंत कधी हाच प्रश्न शिल्लक आहे.
(No subject)
य्ये बात!
य्ये बात!
घटना, नियम सगळे रद्द करा.
त्रंप्या निवडून येणार. तो करेल नविन घटना -
त्रंप्या राजा, त्र्यंप्याचे वंशज त्याच्या मागोमाग राजे.
सिव्हिल सर्व्हिस, न्यायालय सगळे त्रंप्याच्या हाती. काँग्रेस तर बरखास्तच!
मज्जाच मज्जा!
इतकेच काय, सुरुवातीला शाळेत शिकवणारा जाणारा इतिहास बदलणार, मग सायंस, मग अकॉउंटिंग पण.
काही बिघडत नाही. मनुष्य नेहेमीच परिस्थितीनुसार स्वतःची काळजी घेत आला आहे.
अहो रशियात, उत्तर कोरियात नि चीन मधे पण लोक जगतातच की!! तसेच आपणहि जगू!
बायडन गेला! आता कोण?
बायडन गेला! आता कोण?
Kamala Harris?
Kamala Harris?
Pages