सहज सर्फिंगमध्ये टीव्हीवर 'मिनीमलिझम' ही नेटफ्लीक्समध्ये तयार झालेली डॉक्युमेंटरी दिसली.
त्यांच्या देशात ज्याप्रकारे चंगळवाद आणि ग्राहकतावाद वाढून आज पुन्हा मिनिमलीझम अर्थात 'तेवढ्यापुरते' ही लाट आली आहे त्या लाटेमध्ये मला भारत हा त्यांच्या पोळलेल्या तोंडाच्या उंबरठ्यावर दिसतो.
म्हणून ही डॉक्युमेंटरी पाहण्यास मी चालू केली आणि मध्ये मध्ये जेव्हा वाटेल तेव्हा त्याविषयीचे माझे विचार व्यक्त नोंदवत गेलो.
डॉक्युमेंटरी पाहत असताना मनात व्यक्त केलेल्या विचारांची मालिका म्हणजे हा लेख.
याच्या सुरुवातीच्याच टप्प्यात दोन मुलांची कथा येते ज्यामध्ये ती मुले सांगतात की, 'आमचे बालपण किती छान होते. आम्ही साध्या फोटोंमध्ये गावातल्या घरांमध्ये किती सुखी होतो आणि आता ते नाही आहोत .'असे विचार करत असताना मला सरळ सरळ दिसते की, हीच आणि हीच परिस्थिती 1991 च्या आधीच्या काळामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये होती, जी जागतिकीकरणाने पूर्ण पुसून टाकली आणि आपण अलगद या विळख्यात सापडलो.
पुढे मिनीमलीझमबद्दल बोलत असताना एक मेंदूची अभ्यासिका म्हणते की, 'अमेरिकन ड्रीम' ही 1940 च्या दशकातील संकल्पना हळूहळू जोर धरू लागली आणि 'लाखो/ करोडो रुपयांचा पगार असणे आणि भरपूर वस्तू खरेदी करणे' हा एक प्रकारचा जगण्याचा शिरस्ता ठरला. याची भारतीय आवृत्ती 1991 नंतर मूळ धरू लागली आणि 2001 नंतर तिला धुमारे फुटले असे मला दिसते आणि आज 2024 मध्ये ती 'अमेरिकन भारतीय ड्रीम' अशी बनत त्याच्या ज्वालामुखीच्या उंबरठ्याच्या ठिकाणी येऊन पोहोचली आहे.
भारतात ऑनलाइन शॉपिंगची सुरुवात इंटरनेट सोबतच झाली. सुरुवातीला डेस्कटॉप किंवा कम्प्युटर वरून ब्रॉडबँड कनेक्शनसकट ऍक्सेस केलेल्या ई-कमर्स वेबसाईट आता गेल्या वीस वर्षांमध्ये तळहातावरच्या मोबाईलवर आणि 4जी सोबत वेगाने आपल्याकडे आपल्या इच्छा असलेल्या सगळ्या वस्तू हजर करू लागल्या आणि यातूनच 'साध्या आयुष्यात खुश असणारी भारतीय जनता' आता अजून अजून अजूनच्या 'अमेरिकन ड्रीम'च्या चंगळवादी खोऱ्यात उतरू लागली आणि फसू लागली, असे या डॉक्युमेंटरीतील मोठ्या घराचा आग्रह, भरपूर गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या लोकांच्या वक्तव्यावरून दिसून येते. अजूनही वेळ गेलेली नाही, असे भारतीयांना म्हणावेसे वाटते आणि आपल्या आजी-आजोबांच्या छोट्याशा संसारामध्ये किती शांतपणा होता, हे आठवण्यासाठी उपलब्ध आहे, याची जाणीव होऊन त्याची आठवण आजच्या पिढीला(मिलेनियल) करून द्यावीशी वाटते.
minimalism.jpg (324.42 KB)
एखाद्या साधारण मोठ्या घरात आपला वावर हा ४०% किचन व मुख्य कक्षात असतो, असे अभ्यासांती समोर आले आहे.
माणसाची गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यामध्ये इंटरनेटची सुविधा हा एक मुद्दा ऍड जरी झाला असला, तरी त्यामधील वस्त्राबाबत बोलताना अमेरिकन असणाऱ्या फॅशन डिझाईन अभ्यासिकेने जे मत नोंदवले ते मला अगदी भारतीय विचारपद्धतीत फिट बसण्यासारखे वाटते. ती म्हणते की 'आत्ताच्या पिढीच्या आईने कदाचित गरम आणि थंड अशा दोन हवामानांसाठी कपड्यांची खरेदी केली असेल, मात्र सध्या 52 आठवड्यांमध्ये 52 प्रकारच्या ऋतूंसाठी खरेदी होते की काय, असे दिसते'. तिने एक नोंदवलेले धक्कादायक मत म्हणजे अमेरिकन ग्राहक (किंवा आजचा देशी ग्राहक) याने लवकरात लवकर, भरपूर आणि सतत शॉपिंग करावी, असा कपडे विकणाऱ्यांचा आग्रह असतो.
मेंदूचा अभ्यासक पुढे म्हणतो की, नोकिया या मोबाईल कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार सतत 'नव्या'च्या मागे धावणारा मोबाईलधारी मनुष्य दिवसात दीडशे वेळा आपला फोन चेक करतो आणि सतत नवीन गोष्टीच्या आकर्षणामुळे दिवसभरात एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यांकडे आपल्या मनाची आणि मेंदूची झेप सतत होत असते, ज्याची किंमत आपल्याला चुकवावी लागते.
अशा व इतर बऱ्याच मुद्द्यांवर ही डॉक्युमेंटरी चर्चा करते. अमेरिकन ड्रीम, त्याचा अतिरेक, पुढे त्याच देशातील OTT वाहिनीने तेथीलच प्रसारण वाहिनीवर तिथल्याच मुलांच्या लक्षात आलेला हा सगळा विचारांच्या भरकटण्याच्या गोंधळाचा केलेला कार्यक्रम मी लांबून पाहत राहतो. आणि लक्षात येते की, 'या 'जरुरीस जितके हवे तितके' या उक्तीच्या गोष्टी आपल्या देशात कधीपासून आहेतच, त्या थोड्या ढळल्या आहेत खऱ्या, पण ड्रीमचा फुगा आपल्याकडे काहीजणांना अलीकडे दिसू लागला आहे खरे, आणि त्याला उपाय याच देशात विद्यमान आहे, बाहेरील लोकही त्याकडे त्यांच्या अनुभवातून पाहत आहेत!
ट्रेलर - https://youtu.be/jn-xbOCZOiQ
तासाभराची डॉक्युमेंटरी - https://youtu.be/J8DGjUv-Vjc
मिनीमलीझम ही कल्पना मला 'डेथ
मिनीमलीझम ही कल्पना मला 'डेथ क्लिनिंग'(आपण गेल्यावर मागे राहिलेल्याना कमी पसाऱ्याचे ढिगारे उपसावे लागावे) या दृष्टीने पटते.
बाकी तरुण, धडधाकट व्यक्तींचे रुटीन किंवा जिथे कुटुंबात जास्त लोक, वापर जास्त लागतो, जास्त बाहेर जाणे होते तेथे 'गावातल्या घरात, वर्षाला 4 कपड्यात सुखी राहणे' या कल्पना व्यक्तिसापेक्ष आहेत.खेडेगावात राहणे, अगदी लहानश्या वस्तू साठी 5 किलोमीटर बाजारात जावे लागणे, शहरात सहज मिळणाऱ्या वस्तू उशिरा आणि ताज्या न मिळणे, एका जवळच्या कपडा दुकानात दुकानदार जे चक्रम कपडे विकेल ते घ्यावे लागणे, आपल्या विशेष सोयीचे नसलेले अंडरवेअर्स त्या दुकानात तितकीच व्हरायटी आहे म्हणून घ्यावे लागणे या सर्वांत अजिबात ग्लॅमर वाटत नाही.ऑनलाईन शॉपिंग आले, बायका मुलींना योग्य दरात, आपल्याला हवे तसे, हव्या त्या फॅशन चे कपडे कोण्या लोकल दुकानदाराच्या स्टॉकखरेदीआवडी आणि दयेवर अवलंबून न राहता कॉलेज, नोकरीत वापरता येणे, ग्लोबल मार्केट मधले दागिने, परफ्युम उपलब्ध होणे ही मोठी गोष्ट वाटते.
कपडे जाऊदे, चैनीची वस्तू झाली. पण ऑनलाईन मार्केट,मेडिसिन डिलिव्हरी मधून आपल्यापाशी योग्य मॉनिटर डिव्हाईस, फिटनेस गॅजेट पोहचतात.
जर योग्य दरात जास्त टिकणारे कपडे, वस्तू, चपला, गॅजेट बाजारात मिळायला लागली तर मिनीमलीझम आपोआप आचरणात येईल.
लँडफील, प्लॅस्टिक चे योग्य डिसपोझल, डिझाईन मध्ये कमीत कमी वेस्ट(यासाठी plm वापरा) आणि रियुज रिसायकल यावर संशोधन जास्त वेगाने होणे आवश्यक आहे.
<रियुज रिसायकल यावर संशोधन
<रियुज रिसायकल यावर संशोधन जास्त वेगाने होणे आवश्यक आहे.> +१
मी_अनू पोस्ट पटली व आवडली.
मी_अनू पोस्ट पटली व आवडली.
एके काळी मी स्पेशल ओकेझन, अमका गोल वगैरेंची वाट पहायचे. पण कोविडने माझे फंडे क्लिअर केले. अमुक गोल/माईलस्टोन येईपर्यंत आपण असूच याची खात्री नाही. तेव्हा शुभस्य शीघ्रम्. अर्थात फास्ट फॅशन वगैरे नाही फॉलो करत. पण आवडत्या गोष्टी जरूर करते. गरज/वापरात नसलेल्या वस्तू गरजूंना देऊनही टाकते.
याबाबतीत मागची पिढी जास्त ॲडमंट आहे. १८५७च्या बंडात घेतलेल्या/मिळालेल्या, एकदाही न वापरलेल्या गोष्टीही द्यायची तयारी नसते त्यांची. पण त्यांची मालकी, त्यांची चॉईस म्हणून सोडून देते.
अनुची पोस्ट आवडली.
अनुची पोस्ट आवडली.
एकदम मिनीमलीझमचे टोक गाठायची गरज नाही. लोकांनी आपल्या गरजा आणि इच्छा/आकांक्षा यातला फरक ओळखायची सवय लावून घेतली आणि जोडीला आपल्याला खरोखर काय परवडते याचे परखड परीक्षण केले तरी खूप फरक पडेल. अमेरीकन काय इंडियन काय 'ड्रीम' पाठी धावताना स्वतःचे वास्तव विसरून कसे चालेल?
मी देशात लहान गावात वाढले आणि अमेरीकेतही लहान गावात वास्तव्य. देशात वर अनु ने लिहिले आहे तशी परीस्थिती. माझे बाबा मुंबईतून नोकरी निमित्त लहान गावात. त्यांचे महिन्यातून दोनदा तरी मुंबईला माहेरी जाणे होई. त्यामुळे बरेचदा शेजारी, ओळखीचे गरजेच्या पण गावात न मिळणार्या वस्तू आणायला सांगत. लहान गावात दुकानदार बरेचदा किमतीही चढ्या लावत.
इथे इंटरनेटपूर्व काळात लहान गावांतून कॅटलॉग मधून खरेदी ही पद्धत होती. आमच्याकडे कॅटलॉग येत त्यातून खरेदी होई. त्या शिवाय शहरातल्या मॉलमधे खरेदीला चर्च, सिनीयर सिटिझन सर्विस, इतर धर्मादाय संस्था वगैरे चक्क बस बुक करायचे. नोंदणी करुन आपली सिट बुक करायची नी ठरल्या दिवशी खरेदीला जायचे. अशीच आउटलेट मॉलची डे ट्रीप असे.
मात्र तेव्हा क्रेडीट/ उधारी एवढी सहज उपलब्ध नव्हती. गरजेचे बिग टिकेट आयटेम हप्त्यावर घेणे होई पण बाकी गोष्टींसाठी लेअवे प्लॅन्स असत. फुल पेमेंट झाल्याशिवाय वस्तू तुमच्या ताब्यात येत नसे. साहाजिकच खरेदीवर बंधन असे.
आता तसे नाही. क्रेडिट कार्ड कंपन्या, स्टोअरचे क्रेडिट, झालेच तर घराच्या सो कॉल्ड इक्वीटीवर क्रेडिट. सोशल मेडीआवर रोज 'मस्ट हॅव' सांगणारे असतात. गरज असलेल्या/ नसलेल्या गोष्टी आकर्षकरित्या स्क्रीनवर येत रहातात. 'यू डिझर्व' , 'यू आर वर्थ इट' असे वारंवार सांगितले जाते. सध्या तर बाय नाऊ पे लॅटरचा (BNPL) चा जमाना आहे. म्हणजे आधीच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असताना खरेदीसाठी अजून एक मार्ग उपलब्ध!
आर्थिक साक्षरता, ग्राहक म्हणून जागरुक असणे आणि जोडीला मनाचे आरोग्य संभाळणे केले तर बॅलन्स राखणे सोपे होते.
पण ऑनलाईन मार्केट,मेडिसिन
पण ऑनलाईन मार्केट,मेडिसिन डिलिव्हरी मधून आपल्यापाशी योग्य मॉनिटर डिव्हाईस, फिटनेस गॅजेट पोहचतात.>> हा हा हा. नक्की ना. दिवे घ्या
मिनिमलिस्म ही भारतातील १%
मिनिमलिस्म ही भारतातील १% लोकांना चघळा यला दिलेली फ्यांटसी आहे. नोकर्या नाहीत त्यामुळे गरजेच्या वस्तु पन घेणे फार अवघड आहे मेजॉरि टी साठी. तुमच्या आधीच्या बाफ वर पण मी लिहिले होते.
मला पोहचत नाहीत
मला पोहचत नाहीत
पण बाकी 99% ना पोहचत असतीलच ना
मला काय वाटतं की जी वस्तू आपण
मला काय वाटतं की जी वस्तू आपण घेतोय त्याची पर्यावरणीय किंमत किती आहे, ह्याचा विचार करावा. म्हणजे अर्धा लिटर बाटली बंद पाणी तयार करण्यासाठी जवळपास चार लिटर पाणी खर्च झालेलं असतं. महात्मा गांधीं सारखी राहणी आपल्या सारख्या शहरी, सुखवस्तू हाडांच्या माणसांना आचरणात आणणं कठीण आहे. पण वस्तू घेता नाही गरज आहे की चैन हा विचार करु शकतो का? समजा मला माझ्या नोकरी / व्यवसायामुळे पन्नास निरनिराळे कपडे असण्याची गरज आहे. ठीक आहे. मग पुढचा एक्कावन्नावा कपडा घेताना थांबता येईल का?
प्लॅस्टिक डिस्पोझलचे उपाय किंवा रियूज, रिसायकल हे सगळे रोगाच्या लक्षणांवरचे उपाय आहेत. मूळ रोग आहे तो संसाधनांचा अनिर्बंध वापर. कितीही चांगल्या पद्धतीने प्लॅस्टिक डिस्पोझ केलं, तरी ते तयार करण्यासाठी जे रिसोर्सेस वापरले गेले, ते कधीच परत येणार नाहीत. त्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी जे इंधन जळलं, ते गेलं. संपलं. ती वस्तू गरज नसेल तर न वापरणे, हा उपाय जास्त पर्यावरणपूरक आहे, असं मला तरी वाटतं.
कुठला आणि कोणाचा वापर
कुठला आणि कोणाचा वापर अनिर्बंध आहे हे कोण ठरवणार हा मुख्य प्रश्न आहे.
(मला ढीग अपसायकल्ड जीन्स ची पिशवी वापरावी वाटेल.पण ती सुंदर प्रकारे शिवून घेण्याची किंमत 2200 रुपये आहे आणि तिथे जाताना जळलेलं पेट्रोल 20 रु चं आहे हेही लक्षात घ्यावं लागतं. सेम विथ स्वीगी इंस्टामार्ट.sometimes we need to think if we are throwing babies with bathwater.I wanted to use this phrase since long.)
थोर्थोर अमेरिकन कंपन्यांचे
थोर्थोर अमेरिकन कंपन्यांचे मिडिआ व पी आर विभाग कंपनी जो नैसर्गिक रिसोर्सेस चा गैरवापर करते कोक कॅन साठी खाणी तून अॅलुमिनिअम ओअर काढणे व प्रोसेस करणे, नेस्लेचे चॉकोलेट आर एम संपादन इत्यादी ते झाकून ठेवते व जे वोक पब्लिक स्वतः ला जबाब दार समजते त्यांना ह्या रिसायकल रियु ज मध्ये गुंडाळून ठेवते. तुम्ही घरुन कितीपण रिसा यकल रियुज केलेत तरी बिग कंपनीज जे प्रदुष न कर तात त्याला तोडच नाही. उगीच समाधान.
आजच मी घरा तील दोन गाद्या व एक शू रॅक काढले.
<<कुठला आणि कोणाचा वापर
<<कुठला आणि कोणाचा वापर अनिर्बंध आहे हे कोण ठरवणार हा मुख्य प्रश्न आहे.>>
आपलं आपणच ठरवायचं. एकाचा अनिर्बंध वापर दुसर्याच्या केसमधे योग्य असेल. ते निर्णय ज्याचे त्याने घ्यावे.
अश्विनीमामी, तुमच्या इतका जगाचा अनुभव मला नाही. पण आपण आपल्या परीने तरी करावे, असं वाटतं. तुम्ही सगळे समजदार आहात. योग्य ते करत असाल.
कुठला आणि कोणाचा वापर
कुठला आणि कोणाचा वापर अनिर्बंध आहे हे कोण ठरवणार हा मुख्य प्रश्न आहे.
>>>> अगदी अगदी..
वेगवेगळे फॅशन हाऊस त्यांचे गेल्या सीझनचे न खपलेले कपडे टनांनी लँडफिल करत असताना मी ५१वा ड्रेस घेऊन निदान एखाद वर्ष वापरून नंतर लादी/गाडी पुसायला वापरणार असेन तर जास्त पर्यावरणपूरक काय आहे?
महात्मा गांधीं सारखी राहणी
>>>
सॉरी टू से पण सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या की गांधीजींना गरीब ठेवण्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागते.
ग्रेटाच्या नावेचे खलाशी भूमध्य सागरात आणण्यासाठी प्रायव्हेट जेट करावे लागले होते तसाच प्रकार आहे हा.
@अनया >> तुमची तळमळ समजते. पण इतरांकडून पर्यावरणाचा अनिर्बंध वापर/शोषण होत असताना सामान्य माणसाने दर वेळी गरज की चैन यात का अडकून पडावे?
निर्णय तुमचा आहे.
निर्णय तुमचा आहे.
ही माझी शेवटची पोस्ट.
आपल्या आजी-आजोबांच्या
आपल्या आजी-आजोबांच्या छोट्याशा संसारामध्ये किती शांतपणा होता >>> हे चुलीवरच्या जेवणासारखे किंवा सणासुदीच्या भरल्या पंगतींसारखें स्मरणरंजन आहे. आपण लहान असताना ज्या गोष्टी 'व्वा छान!' वगैरे वाटत असतात त्यापाठची सत्यासत्यता/कष्ट माहिती असेलच असे नाही. त्या संसारात किती लोक मन मारून राहिले हे फारसे डॉक्युमेंटेड नसते. कुचंबणा काय असते यासाठी 'पिया का घर'/'मुंबईचा जावई' बघा.
मिनिमलिस्म ही भारतातील १%
मिनिमलिस्म ही भारतातील १% लोकांना चघळा यला दिलेली फ्यांटसी आहे. नोकर्या नाहीत त्यामुळे गरजेच्या वस्तु पन घेणे फार अवघड आहे मेजॉरि टी साठी. >>>>>
गैरसमज. रोजंदारीवर काम करणारेही जमेल तेवढी चैन करताहेत. स्वतःच्या पैशाने करतात आणि इतर चैनीत जगणारे दर महिन्यात भंगार काढत असतातच बाहेर…. आजचा गरीब पण ‘कमी घेईन पण चांगलेच घेईन‘ म्हणतो आणि त्याची चांगल्याची व्याख्या फेबु व इन्स्टा ठरवतेय. इन्स्टावर सतत कमेंटी करत असलेल्यांचा आर्थिक स्तर पाहा.
पण आपण आपल्या परीने तरी करावे
पण आपण आपल्या परीने तरी करावे, असं वाटतं. >>>>
सहमत. जमेल व पटेल तितके करावे.
होर्डिंग ही डिसॉर्ड नाही
होर्डिंग ही डिसॉर्डर नाही म्हणता येणार पण साधारण त्याच स्पेक्ट्रमवरती डिसॉर्डरच्या जवळपास आहे.
'बालपण किती छान होते आणि आता
'बालपण किती छान होते आणि आता किती वाईट' ह्याने सुरुवात होत असेल तर तोच मोठा रेड फ्लॅग समजला नाही का?
बाकी रिसायकल हे फ्रॉड आहे. रिड्युस रिपेअर रिपर्पज!
अनया, तुला कॉन्ट्रॅडिक्ट
अनया, तुला कॉन्ट्रॅडिक्ट करण्याचा हेतू नव्हता.तुझे मुद्दे अर्थात बरोबरच आहेत.पण विचारपूर्वक वापर आपल्या लेव्हल ला आपण पाळतच असतो.साधे बनियान पण बनियान-ओटा पुसायचा कपडा-पोछा-शेकोटीत जाळायला पलिता या सायकल मधून जातच असतात.माझा आक्षेप फक्त 'पूर्वी किती मस्त होतं नै' वर होता.
एकीकडे मी टी बॅग मधली स्टेपलर पिन, सुकलेल्या हारातला दोरा वेगळीकडे फुलं कुस्करून वेगळीकडे या थराचं कचरा वर्गीकरण पाळायला बघते.दुसरीकडे माझ्या समोर चहाचा गाडीवाला रात्री गाडी बंद करून जाताना त्याचा कचराडबा, प्लास्टिक चमचे मागे लॉनवर रिकामे करून हातगाडीवर वजन कमी करून जातो.राजकारण्याचं मोठं हॉटेल समोर लॉन वर बाजूला त्यांचं खरकटं फेकत असतं.जो काही मिनीमलीझम आहे,मी माझ्या परीने पाळेन.पण बाकीच्यांनी किमान थोडातरी पाळावा.यावर नियम असावे.ज्या दुर्गम जागी दरीतला कचरा साफ करता येत नाही तिकडे दारूच्या बाटल्या, चिप्स ची पाकिटं, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या घेऊन जायला मनाई असावी.
करण्यायोग्य खूप आहे.अमेरिकेला आता शोध लागतोय.पण सर्वात जास्त पाणी, वीज, पेट्रोल यांची नासाडी तर तेच करतात.त्यांनी चालू करावं, 100 पावलं पुढे यावं.आम्ही आमची 20 चालतो.
अनु च्या वरच्या पोस्टला पूर्ण
अनु च्या वरच्या पोस्टला पूर्ण सहमत.
भारतात मम सामान्य लोकांना मिनिमलिझम शिकवणे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र.
अनु, तुझे मुद्दे पटले. तुझा
अनु, तुझे मुद्दे पटले. तुझा कॉन्ट्रॅडिक्ट करण्याचा हेतू आहे, असं आजिबात वाटलं नाही.
अनु पोस्ट पटली.
अनु पोस्ट पटली.
अनुच्या सगळ्याच पोस्टी पटल्या
अनुच्या सगळ्याच पोस्टी पटल्या.
जो काही मिनीमलीझम आहे,मी माझ्या परीने पाळेन.पण बाकीच्यांनी किमान थोडातरी पाळावा.यावर नियम असावे >>> याला +१००