२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< umlimited immunity to president. >>

----- ६ जानेवारीलचा हल्ला बघितल्यावर याचा गैरवापर होणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तो आदेश देणार्‍या अध्यक्षाला - immunity.
विरोधी नेत्याला इजा पोहोचविण्याचे आदेश दिले तरी त्यापासून पण immunity असेल का?

स्कोटस - युएस प्रेसिडेंट्स हॅव अ‍ॅब्सोलुट इम्युनिटि फ्रॉम क्रिमिनल प्रोसिक्युशन..
बाय्डन - होल्ड माय बीयर...

कॉमी, गेल्या २-३ दिवसांत काही नवीन ट्विस्ट आला आहे का? तसे नसेल तर मी इथे या निकालाबद्दल लिहीले आहे त्याबद्दल तुमचे मत आवडेल वाचायला. २ जुलै ची पोस्ट आहे.
https://www.maayboli.com/node/78504?page=46

https://youtu.be/S9LZXheHddI?feature=shared

परत एकदा जॉन स्ट्युअर्टचे परफेक्ट( अँड फनी) अ‍ॅनॅलिसीस! बायडनने जो घोळ घातला आहे तो त्याने यात हॉनेस्टली सादर केला आहे( तो स्वतः लिबरल असुनही!). ट्रंपला पण सणसणीत चपराक दिली आहे त्याने या मोनोलॉगमधे. मी त्याच्या या अ‍ॅनॅलिसिसशी १००% सहमत आहे. १५ मिनिट्स ची ही क्लिप वर्थ वॉचिंग! जरुर बघा.

गेल्या आठवड्यात जॉर्ज स्टेफनापलसने घेतलेली बायडनची हि मुलाखत बघा. काय एकेक तारे तोडलेत, बाय्डनने. बाय्डन कँपेनच्या डिनायलची हि दुसरी किंवा तिसरी स्टेज असावी. म्हणे पुतिनला कंट्रोल केलं; अरे नेटोच्या नाकावर टिच्चुन त्याने युक्रेनवर हल्ला केला, अ‍ॅन इलॅबरट मिडल फिंगर टु अमेरिका. बाय्डने काय केलं, घंटा. इराणने मिसल्स डागली इझ्रेल वर; बाय्डनने काय केलं, घंटा..

तुम्हाला आठवत असेल ट्रंपच्या रेजिममधे पुटिन लीशवर होता; सुलेमानीची हत्या होउनहि इराण हात चोळत बसला होता; असो.

जॉर्जने सुचवलेल्या काग्निटिव टेस्टच्या प्रश्नाला बाय्डनने दिलेली बगल हा रेड फ्लॅग आहे. क्लुनी सारखे सपोर्टर्स आता जागे होत आहेत, पलोसीची हि चुळबुळ सुरु झालेली आहे. लेट्स सी हौ इट प्लेज आउट...

रथिडेमोक्रॅटिक पक्षाच्या रथी, महारथी आणि अतिरथी लोकांनी म्हातारबाच्या शवपेटिकेची मोजमापे घेणे सुरू केले होते. दफनविधीची आमंत्रणे छापायला टाकली होती. हिलरीबाईंनी त्याकरता फर्मास मजकूरही ठरवला होता. शवपेटीला कुठल्या फुलांनी सजवायचे हे तपशीलही तयार होते!
पण म्हातारबाआचा नेटो भाषणात किंवा नंतरच्या पत्रकार परिषदेत पूर्ण मुडदा बनेल हा समज साफ खोटा ठरला. (ह्या खेपेस दिवट्या हंट्याने उत्तम औषध योग्य वेळी पाठवून म्हातार्याला काही तासापुरती तरतरी दिली असावी! ) शिवाय हा सगळा पराक्रम झाल्यावर पाताळयंत्री कारस्थानी राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या जिल बायडनने "कित्ती कित्ती छान वागलास तू!" "सग्गळ्या सग्ग्ग्ळ्या प्रश्नांची उत्तरे दिली ना?" "शाणं गुणी बाळ आमचं!" वगैरे डायलॉग निदान सार्वजनिकरित्या तरी मारले नाहीत. त्यामुळे म्हातारबाची प्रतिमा काहीशी उजळून गेली.
मरणासन्न माणसाच्या मानाने त्याने जोरदार भाषण करून फड मारला. (अर्थात झेलेन्स्कीला पुतिन म्हणणे. हॅरिसला ट्रंप म्हणणे ह्या भ्रमिष्टसुलभ गंमती केल्याच!) पण तरी म्हातारबाच्या शवपेटिकेवर शेवटचा खिळा मारता येईल इतकेही जोरदार फ्लॉप नव्हते.
त्यामुळे डेमोक्रॅट लोकांना तळ्यात की मळ्यात हा खेळ पुन्हा चालू ठेवावा लागणार आहे. म्हातारबाचा मेंदू अर्धा शाबूत आहे ह्याचा आनंदोत्सव साजरा करावा की अर्धा मेंदू काम करत नाही म्हणून शोक करावा हे कळत नाही.
एकंदरीत ट्रंप हिटलर आहे, लोकशाही नष्ट करणार, पहिल्याच दिवसापासून हुकुमशाही सुरू होणार आहे वगैरे बिनडोक मुद्दे हेडलाईनवर न झळकता बायडनचा मेंदू आणि शरीर आणखी चार वर्षे टिकण्याच्या स्थितीत का? कमलाबाई बायडनची जागा भरून काढेल का? वगैरे उद्बोधक मुद्द्यांवर चर्चा होत आहेत. इतके दिवस गप्प असणारे डॉक्टर संजय गुप्ता सारखे पुरोगामी डावे डॉक्टरही आता म्हातारबा आणि पार्किन्सन, अल्सहायमर, डिमेन्शिया वगैरे पोपटपंची करताना दिसत आहेत.
ही करमणूक आणखी काही दिवस चालेल असेच लक्षण दिसते आहे.

म्हातारा आणि त्याच्या पक्षाने रडीचा डाव खेळायचे ठरवले आहे असे दिसते. ट्रंपला गोळ्या मारून जखमी केले आहे. तो पेन्सिल्वेनिया इथे सभेत भाषण करत असताना "कुणीतरी" गोळीबार केला आणि त्यात तो जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला अंगरक्षकांनी सभेतून हलवले.
लोकशाही वाचवायला विरोधकांना संपवणे हा उपाय म्हातार्‍याच्या पक्षाने केला की काय?

ट्रंपने इतके रक्त सांडल्यावर तरी पेन्सिल्वेनिया यंदा लाल बनू दे!
अर्थात भूमिगत डेमोक्रॅट मशिनरी पुढचा मारेकरी कधी सोडते आणि वर ट्रंपचा सरकारी अंगरक्षकांना पुढच्या वेळी "योग्य" सूचना दिल्या तर वेगळे काहीतरी बघावे लागेल! आणि आता तर काय बाबा, म्हातार्याला इम्युनिटीची कवचकुंडलेही मिळाली आहेत.
जो थेरडा झेलेन्स्कीला पुतिन म्हणू शकतो तो असाच काही ध चा मा करून ट्रंपला ठार करणे अशक्य नाही.
बघू अजून बरेच महिने बाकी आहेत.

शेंडेनक्षत्र, कुणी कुठल्याही पक्षाचा समर्थक असला तरी झालेल्या प्रकाराचा निषेधच व्हायला हवा. माझं कुठलंही पॉलिटिकल इन्क्लिनेशन नाही. पण कुठलाही पुरावा नसताना कुणावरही असला आरोप करणं चुकीचं आहे.

आज झालेल्या ट्रंप असॅसिशन अटेम्प्टचा तिव्र निषेध!

अहो शेंडेनक्षत्र तुमचे हे असले पॉलिटिकली चार्ज्ड, बिनबुडाचे व मुर्खासारखे र्हेटॉरिक आवरा जरा! विट आला आहे तुमच्या अश्या मुर्ख व बिनबुडांच्या विधानांचा. काही पुरावा सापडला आहे का तुम्हाला स्वतःला? असेल तर जाउन देउन या एफ बी आय ला.

म्हातारबाने लाजेकाजेस्तव तोंडदेखला निषेध केला आहे. तो ट्रंपला गोळी लागली म्हणून आहे की काही इंचाने चुकवली म्हणून मारेकर्याचा निषेध केला आहे देवास ठाऊक. तो बरळला की यु एस हस नो प्लेस फॉर धिस काइंड ओफ व्हायलन्स. म्हणजे व्हायोलन्स करायचा तर पूर्ण जीव गेला पाहिजे. नुसते जखमी वगैरे करणे असल्या हिंसेला थारा नाही!

हिलरी वगैरे डेमोक्रॅट प्रभृती विरोधक, आपल्याला अडचणीत टाकणारे लोक ह्यांच्या "आत्महत्या" घडवून आणून पुरावा पूर्ण नष्ट करण्यात वाकबगार आहेतच. आता मारेकरी सोडून आपले उद्दिष्ट साध्य करणार असतील. काय करणार, लोकशाही टिकवायला अप्रिय गोष्टी कराव्याच लागतात ना!
तसे ड्रोन वगैरे आधुनिक मार्गही आपल्या लाडक्या राष्ट्राध्यक्षापुढे आहेतच.

>>
अहो शेंडेनक्षत्र तुमचे हे असले पॉलिटिकली चार्ज्ड, बिनबुडाचे व मुर्खासारखे र्हेटॉरिक आवरा जरा! विट आला आहे तुमच्या अश्या मुर्ख व बिनबुडांच्या विधानांचा. काही पुरावा सापडला आहे का तुम्हाला स्वतःला? असेल तर जाउन देउन या एफ बी आय ला.
<<
तुमच्या सारखे लोक नीट निषेधही करायला तयार नाहीत. लोकशाहीला कलंक आहात. ट्रंप द्वेष इतका ओसंडून वहात आहे की विरोधकांना गोळ्या घालून मारले गेले तरी शिव्या ट्रंपलाच. धन्य आहात!

असले बिनबुडाचे पॉलिटिकली चार्ज्ड र्हेटॉरिक त्या आजच्या माथेफिरु गनमॅन इतकेच लोकशाहीला घातक असते याचे भान असु द्या!

>>
असले बिनबुडाचे पॉलिटिकली चार्ज्ड र्हेटॉरिक त्या आजच्या माथेफिरु गनमॅन इतकेच लोकशाहीला घातक असते याचे भान असु द्या!
<<
निर्लज्ज बनून व्हिक्टिम ब्लेमिंग करून आपण जीवघेण्या गोळीबाराचे समर्थन करुन पुढील गोळीबार जास्त मारक असेल ह्याची तरतूद आपण करत आहात. ह्याचे भान असू द्या.
म्हातार्‍याने जाणून बुजून पुरेशी सुरक्षा पुरवली नाही. जवळ्च्या इमारतीवर स्नायपर दिसला होता पण कुणी काही कारवाई केली नाही.
कारण उघड आहे. थेरड्याला हाच एक उपाय दिसतो आहे आपल्या विरोधकाला हरवायचा. आणि तुमच्यासारखे विद्वान म्हातार्याच्या कुठल्याही कृत्याला सत्कृत्य म्हणायला एका पायावर तत्पर!

अहो काय जरा पेग मारुन लिहीत सुटला आहात का? कोणी समर्थन केले आहे आजच्या गोळीबाराचे? शुद्धीवर आल्यावर व घेतलेली उतरल्यावर येउन लिहा जरा!

आपण हंट्यासारखे कोकेन वगैरे सेवन केलेत का? आपल्या नावडत्या विरोधकाचा जवळपास निकाल लागल्याचे सेलेब्रेशन म्हणून?
एक भोज्याला शिवल्यासारखा तोंडादेखला विरोध करुन ट्रंप आणि ट्रंपसमर्थकांना शिव्या घालणे ह्याला निषेध म्हणत नाहीत. तोंडाला पाने पुसणे म्हणतात.

तुमचे क्विक्झॉटिक निष्कर्ष बघुन फारच चढलेली दिसतेय तुम्हाला! जाउन पडा जरा आता( गटार जवळ असेल तर!) तोंडाचे गटार तर करुन टाकलेच आहे म्हणा तुम्ही!

मी वेमा किंवा ऍडमिन नाही तरीही सांगू इच्छितो की कृपया व्यक्तिगत अटॅक टाळा. (जनरल विनंती आहे, कुणाही एकाला उद्देशून नाही.)

उपाशी बोका, मान्य.

मी इथे जाहीर रित्या सांगतो! जर आजच्या घटनेत असे आढळुन आले की बायडननेचे हे हिन कृत्य घडवुन आणले तर शेंडेनक्षत्रांच्या आजच्या आरोपांबद्दलच्या त्यांच्या अंतर्ज्ञानाबद्दल मी इथे येउन त्यांचे अभिनंदन करायला मी तयार आहे!

मुकुंदराव ट्रंपची जवळपास हत्या झाल्याचे सेलिब्रेशन हाताबाहेर गेलेले दिसते. काय काय नशा केली आहे देवास ठाऊक . अहो पुढचा प्रयत्न यशस्वी होईल कदाचित तेव्हासाठी काही बाकी ठेवा राव. अजून तरी ट्रंप जिवंत आहे.
म्हातार्याने जाणून बुजून ढिसाळ सुरक्षा व्यवस्था पुरवली. सुरक्षा यंत्रणेने ट्रंपचे रक्षण करण्यात जाणून बुजून हेळसांड, गलथानपणा केला आहे.
ट्रंपने ऐन वेळी डोके वळवले नसते तर ट्रंप निश्चितच ठार झाला असता. काही इंचाने नेम चुकला (इथे मुकुंदरावांनी दु:ख आवरावे. ट्रंपसारखी आपल्या आशेची धुगधुगीही जिवंत ठेवावी!)

जवळ एक कारखाना आहे तिच्या छतावरून मारेकर्‍याने स्नायपर पद्धतीचा गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणांना जिथे माजी अध्यक्ष सभा घेतो तिथली सुरक्षा पुरेशी आहे का हे बघणे अपेक्षित असते. त्यांनी ह्या उंच इमारतीकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आणि त्यातून हा हत्येचा प्रयत्न जवळपास यशस्वी झाला.
कोण बरे अशा प्रकारे हल्ला करायला उद्युक्त करेल? आर एफ के ज्युनियर? की चीन? की रशिया? की बायडन? कुणाला जास्तीत जास्त आणि लगेच फायदा होणार आहे?
मारेकर्याला क्षणार्धात खल्लास करून त्याच्याबद्दल कुठलीही माहिती उघडकीस येणार नाही ह्याची मात्र पुरेपुर खबरदारी सुरक्षा यंत्रणांनी घेतली आहे. तिथे ढिसाळपणा नाही!
डीप स्टेट नामक यंत्रणेने डेमोक्रॅटिक सरकारच्या नेतृत्वाखाली हे घडवून आणले आहे. पुढील सहा महिने कुठलाही तपास, निष्कर्ष काढला जाणार नाही.
आणि हा शेवटचा प्रयत्न नसेल.

एका पॉप्युलर प्रेसिडंटची हत्या झाली असतानाही उंच इमारतींची छतं सेक्युअर न करणे, हे स्नायपरसाठी आमंत्रणच आहे. Considering there are only 2 major contenders and probability of each candidate becoming next president is equal, why US of A cannot provide equal level of security to both? भारतासारखे १७६० पक्ष आणि त्यांचे सो कॉल्ड राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे जो काय खर्च असेल तो दोघांवरच..

बाकी जागतिक प्रेक्षक म्हणून वाटतं की Biden is officially senile now and as a leader to any nation, he is an embarrassment. (Ref: D-day celebrations video, मेक्सिकोची हद्द इझ्राएलला जोडलेली असणे इ.) ट्रंप अध्यक्ष म्हणून दिवे लावेल असेही नाही. हे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर आहे. बायडनचा गेल्या २ वर्षांतील शारिरीक/मानसिक घटता आलेख बघता डेमोक्रॅटीक पक्षाने वेळीच दुसरा कॅंडीडेट शोधणे गरजेचे होते.
बाकी अध्यक्षच सर्व निर्णय घेत नाही, सिस्टीम पॉलिसी डिसीजन घेते, त्यामुळे ऑप्टिक्स महत्वाचे नाहीत हे ऐकायला ठीक आहे. प्रत्यक्षात American president is a great power centre and it is made out as such. नाहीतर स्विट्झरलॅंडसारखं असावं. त्यांचा पीएम किंवा प्रेसिडेंट कोण असतो कुणाला फारसं माहित नसतं व त्यामुळे त्यांच्या धोरणात एक्स्ट्रीम फरकही पडत नाही.

“बाकी जागतिक प्रेक्षक म्हणून वाटतं की Biden is officially senile now and as a leader to any nation, he is an embarrassment. (Ref: D-day celebrations video, मेक्सिकोची हद्द इझ्राएलला जोडलेली असणे इ.) ट्रंप अध्यक्ष म्हणून दिवे लावेल असेही नाही. हे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर आहे. बायडनचा गेल्या २ वर्षांतील शारिरीक/मानसिक घटता आलेख बघता डेमोक्रॅटीक पक्षाने वेळीच दुसरा कॅंडीडेट शोधणे गरजेचे होते”

माझेमन, उचित बोललात! सहमत आहे.

मी हाच विचार माझ्या ३१ जानेवारीच्या पोस्टीत या खालील शब्दात मांडला होता.

“ तिसरी म्हणजे हे मान्यच केले पाहीजे की बायडन खरच या १-२ वर्षात् फारच म्हातारा वाटु लागला आहे. त्याचे काही काही व्हिडिओ बघीतलेत व त्यात कधी कधी तो कसा वागतो/चालतो व तो काय बोलतो व त्याचा चेहरा कसा दिसतो हे पाहीले तर खरच डेमोक्रॅट्सना त्याच्या कॉग्निटिव्ह अ‍ॅबिलीटी बद्दल व तो निवडुन आला तर अजुन ४ वर्षे तो प्रेसिडेंट म्हणुन काम करु शकेल का याबद्दल हॉनेस्टली काळजी वाटली पाहीजे. त्याचे काही बरे वाइट झाले तर कमला हॅरीस हा पर्याय खरच भितीदायक आहे! ( अर्थात बायडन हरला व ट्रंप जर निवडुन आला तर तो पर्याय त्याहुनही महा भयंकर आहे ती गोष्ट वेगळी!) थोडक्यात काय तर यंदा मतदारांची परिस्थिती इकडे आड व तिकडे विहीर अशीच होणार आहे Sad

कालच्या हल्ल्याचा निषेध! व्यक्तीचा, विचारांचा कितीही तिरस्कार असला तरी ते संपवण्यासाठी हिंसा, हत्येचा मार्ग स्विकारण्याच्या वृत्तीला कधीही समर्थन नाही.
पण इकडे शेंडेंनी तडकाफडकी निकालच लावलेला दिसतो! त्यांच्या पोस्ट्स नेहमीच भडक असतात पण यावेळी बिनडोक पण आहेत.
शेंडे, तुम्ही एक काय ते ठरवा बरं - बायडन भ्रमिष्ट, प्रेत वगैरे आहे की आता वर तुम्ही इतके क्रेडीट दिले आहे तसा पाताळयंत्री कारस्थान करण्याइतका हुषार आहे? आणि डेमॉक्रेटिक पार्टी एवढे सर्व लेवल्स वर मॅनिप्युलेशन करून अटॅक घडवून आणण्याइतकी संघटित/ केपेबल आहे? अगदी खंदे डेमोक्रेट्स पण पार्टीला इतके क्रेडीट देणार नाहीत.
कोण बरे अशा प्रकारे हल्ला करायला उद्युक्त करेल? कुणाला जास्तीत जास्त आणि लगेच फायदा होणार आहे? >>> प्रश्न लॉजिकल आहे पण लिहिण्यात आलेली आलेली उत्तरे कॉमिकल आहेत. Proud
आणि प्रॅक्टिकली, ताबडतोब आणि सर्वात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर ट्रंप लाचहे उघड आहे. तेव्हा चिल !

२० वर्षांचा आहे तो टॉम क्रुक्स. त्याला अक्कल तेवढीच असणार जितकी त्या वयात असते. भडक डोक्याने, आपण होउन केल्यासारखे वाटते.
---------------
कालत्न्यू यॉर्कच्या, कोल्ड स्प्रिंग नावाच्या सुंदर निसर्गरम्य गावात फेरफटका मारुन येताना प्रचंड सेक्युरिटी व ट्राफिक लागला. कित्येक पोलिस कार्स व ट्रुप्स गाड्या तपासत होते. मग घरी आल्यावरती उलगडा झाला की हे सर्व त्या हल्ल्यानंतरची झडती होती.
---------------------------------------------------
अलेअँड्रो मायोर्कास हे होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी. यांना आता जाब द्यावा लागणार आहे. की परत परत मागणी करुनही, सुरक्षा का वाढवली नाही.

>>इकडे शेंडेंनी तडकाफडकी निकालच लावलेला दिसतो! त्यांच्या पोस्ट्स नेहमीच भडक असतात पण यावेळी बिनडोक पण आहेत.
<<
ही सुवर्णसंधी काही सेंटीमीटरने हुकली ह्याचे अमाप दु:ख झाल्यामुळे विरोधकांना बिनडोक वगैरे म्हणू लागल्या का? अहो पुढच्या संधीची वाट पहा. म्हातारा आणि त्याची पक्ष यंत्रणा एक प्रयत्न फसला म्हणून नाद सोडणार नाही हो. धीर धरा थोडा.

>>शेंडे, तुम्ही एक काय ते ठरवा बरं - बायडन भ्रमिष्ट, प्रेत वगैरे आहे की आता वर तुम्ही इतके क्रेडीट दिले आहे तसा पाताळयंत्री कारस्थान करण्याइतका हुषार आहे? आणि डेमॉक्रेटिक पार्टी एवढे सर्व लेवल्स वर मॅनिप्युलेशन करून अटॅक घडवून आणण्याइतकी संघटित/ केपेबल आहे? अगदी खंदे डेमोक्रेट्स पण पार्टीला इतके क्रेडीट देणार नाहीत.
<<
अहो, म्हातारा भ्रमिष्ट असला तरी त्याच्या आडून अनेक महत्त्वाकांक्षी आणि खुनशी लोक कारभार करत आहेत. म्हातार्याने स्वतःच ट्रंपला बुल्स आय बनवा असे आदेश दिले आहेत (बहुधा १० ते ४ ह्या काळात जेव्हा तो काहीसा जिवंत असतो).
म्हातारा काही मारेकर्याशी बोलणी करणे, त्याला पैसे देणे, हल्ला झाल्यवर सुरक्षा यंत्रणांकरवी त्याची ओळख पटणार नाही इतपत त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवणे वगैरे नियोजन करत नाही. तो फक्त बुल्स आय वगैरे उद्दिष्ट सांगतो. उरलेले काम त्याच्या हाताखालच्या यंत्रणा चोख करणार.
न्याय व्यवस्था, एफ बी आय, सी आय ए, पेंंटॅगॉन, आरोग्य व्यवस्था हे सगळे हवे तसे राबवून विरोधकाचा काटा काढायची योजना ठरलेली आहे.
धीर धरा.
https://www.wsj.com/livecoverage/trump-rally-incident/card/biden-s-rhetoric-grew-heated-in-recent-days-6TJnS6JhvZnJ6uYwK6bH

>>कोण बरे अशा प्रकारे हल्ला करायला उद्युक्त करेल? कुणाला जास्तीत जास्त आणि लगेच फायदा होणार आहे? >>> प्रश्न लॉजिकल आहे पण लिहिण्यात आलेली आलेली उत्तरे कॉमिकल आहेत.
<<
हो का? अहो तो हल्ला फसला म्हणून ट्रंपला कदाचित फायदा होईल (पुढील हल्ला होईपर्यंत तरी) पण काही सेंटीमीटर आणि काही मिलिसेकंदाचा फरक असता तर एक मोठा राजकीय प्रतिस्पर्धी नष्ट झाला ह्याचा फायदा कोणाला झाला असता ते उघड आहे. रिपब्लिकन पक्षाला घाईघाईने कुठला तरी उमेदवार निवडावा लागला असता आणि त्याला/तिला जोरदार पराभव बघायला लागला असता हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
आपण अजून दु:खात बुडालेल्या आहात त्यामुळे तुम्हाला हे कळणार नाही कदाचित. दोन दिवसानी वाचा.

>>
मी इथे जाहीर रित्या सांगतो! जर आजच्या घटनेत असे आढळुन आले की बायडननेचे हे हिन कृत्य घडवुन आणले तर शेंडेनक्षत्रांच्या आजच्या आरोपांबद्दलच्या त्यांच्या अंतर्ज्ञानाबद्दल मी इथे येउन त्यांचे अभिनंदन करायला मी तयार आहे!
<<
परंतु असे झाले तरी आपण आपले मत त्या पिसाट म्हातार्याच्या पदरातच टाकाल कारण शेवटी लोकशाही वाचवायची आहे नाही का?

>>> म्हातार्याने स्वतःच ट्रंपला बुल्स आय बनवा असे आदेश दिले आहेत
मला वाटतं तुम्ही ही माहिती ताबडतोब एफबीआयला द्यायला हवी. राष्ट्रीय कर्तव्य आहे ते!

डेमोक्रॅटिक यंत्रणेने ‘चोख’ काम म्हणून ट्रेन्ड स्नायपर्सऐवजी विशीतलं अननुभवी पोरगं कसं काय अपॉइंट केलं असेल नै? हे असे लोक म्हाताऱ्याच्या आडून देश चालवणार?!

ट्रम्पवरील हल्ल्याचा अर्थातच निषेध. जे व्हायचं ते कायदेशीर आणि लोकशाहीच्या मर्यादांतच व्हायला हवं.

>>मला वाटतं तुम्ही ही माहिती ताबडतोब एफबीआयला द्यायला हवी. राष्ट्रीय कर्तव्य आहे ते!
कुंपण जिथे शेत खाते तिथे कुणाला रिपोर्ट करणार आणि त्याचा काय उपयोग होणार आहे?
बायडनसाहेबांचे बुल्सआयवाले वाक्य सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. ते वाक्य आदेश म्हणून निवडणूक होईपर्यंत आदेश समजून पुढील पावले उचलायची आहेत.

>>डेमोक्रॅटिक यंत्रणेने ‘चोख’ काम म्हणून ट्रेन्ड स्नायपर्सऐवजी विशीतलं अननुभवी पोरगं कसं काय अपॉइंट केलं असेल नै? हे असे
अहो, काही सेंटीमीटर आणि काही मिलीसेकंद आणि दैव हे नसते तर नेम अचूक होता पोराचा! केवळ आयुष्याची दोरी बळकट म्हणून ट्रंप वाचला नाहीतर ज्यानी कोणी हा हिरा पारखून ह्या कामासाठी नेमला होता त्याने काम चोख केले होते. असो. अजून संधी येतील. धीर धरा.

>>ट्रम्पवरील हल्ल्याचा अर्थातच निषेध. जे व्हायचं ते कायदेशीर आणि लोकशाहीच्या मर्यादांतच व्हायला हवं.
हो ही घिसीपिटी वाक्ये असायलाच हवीत.

Pages