Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
श्र भयंकर हसलेय तुझी पोस्ट
श्र
भयंकर हसलेय तुझी पोस्ट वाचून. छतपर! 
लप्रि
आचार्य अजून सुजितकुमार सीन
आचार्य
अजून सुजितकुमार सीन पर्यंत पोहोचला नाहीत का? त्याची इटालियन ॲक्सेंट amazing आहे - आलू? रोमेस!! तुमको क्या मांगता?
छतपर >>>
छतपर >>>
आलू? रोमेस!! तुमको क्या मांगता? >>
र.आ म्हणावे की तुसते "ह्म". असला अफलातून आयडी आहे की शॉर्ट करणे सोपे नाही
एव्हढी बटणं लावून करण्ट ऑन ऑफ करून ते कसलं रेकॉर्डिंग करत असतील ? >>>
डबल गुप्तही भारी. पूर्वीच्या गोदरेजच्या कपाटांच्या लॉकर्स मधे आणखी एक चोरकप्पा असे तसे.
लडकी नाच रही है वाला संवाद
आता हा सीन लक्षात नाही. पण सलीम जावेदच्या स्क्रिप्ट्स मधे अमिताभला ७-८ शब्दांचे तुटक डेडपॅन संवाद असत तसा वाटतो ("जब दारू उतरेगी तब ये भी उतर आयेगा", किंवा "मैने तो आँख पहले ही बंद कर ली है")
द ग्रेट गॅम्बलर फार पूवी पाहिला आहे. काहीतरी स्पाय वगैरे आहे इतकेच लक्षात आहे. आणि गेल्या काही वर्षात ते व्हेनिस मधले गाणे. आणि या गाण्यात "तेरा क्या नाम है" म्हणताना पूर्वी कारागीर लोक ठेवत तशी "कानावर ठेवलेली पेन्सिल काढण्याचा" आविर्भाव करणारा अमिताभ
आणि किशोरचा आवाज!
लोल्स बद्दल आभार लोकहो
लोल्स बद्दल आभार लोकहो
काल मधुर भांडारकरचा 'ट्रॅफिक
काल मधुर भांडारकरचा 'ट्रॅफिक सिग्नल' बघितला. खास मधुर भांडारकर टच असलेला आहे. कुणाल खेमू, कोंकणा सेन, संदीप कुलकर्णी, रणवीर शौरी, उपेंद्र लिमये वगैरे सगळ्यांचीच कामं चांगली झाली आहेत. विशेषतः रणवीर शौरीला मी याआधी खोसला का घोसला आणि प्यार के साईड इफेक्ट्समधे लाईट भूमिकांमध्ये बघितलं होतं पण इथे गंभीर काम खूप चांगलं केलंय. इतकी वर्षं का नाही बघितला, असा प्रश्न पडला.

वरचे सगळे प्रतिसाद नीट वाचले नाहीत. पण ते 'कल चौहदवी की रात थी' गाणं माहिती आहे. मला ते 'जग भर रहा चर्चा तेरा' असं वाटायचं
ग्रेट गँबलर शक्ती सामंता चा
ग्रेट गँबलर शक्ती सामंता चा पिक्चर.
याचाच 'चायना टाऊन' हा डॉन चा पूर्वज आहे...
चायना टाउन सुद्धा? मला
चायना टाउन सुद्धा? मला वाटायचे "कालिचरण" आहे.
'जग भर रहा चर्चा तेरा' >>>
ती चर्चा कोठे कोठे झाली याची एक लिस्ट बनवायला पाहिजे. त्या वरच्या गाण्यातील अमिताभसारखी कानावरून पेन्सिल काढण्याची अॅक्शन करा कोणीतरी
(शब, छत, जग) भर. आत्तपर्यंत. तसे जगभर मधे सगळे आलेच पण तरीही अजून असेल.
वावे - रणवीर शौरी आणि विनय
वावे - रणवीर शौरी आणि विनय पाठक चे "भेजा फ्राय" मधले बँटर भारी आहे. पाहिला नसाल तो पिक्चर तर बघाच. मध्यंतरी यांच्यापैकी एक जण पिक्चर मधे असला तर दुसराही असे.
याचाच 'चायना टाऊन' हा डॉन चा
याचाच 'चायना टाऊन' हा डॉन चा पूर्वज आहे >>> ओके.
रणवीर शौरी आणि विनय पाठक चे "भेजा फ्राय" मधले बँटर भारी आहे >> खूप वेळा समोर येतो. पण धाडस केले नव्हते. आता पाहीन.
अफलातून आयडी आहे की शॉर्ट करणे सोपे नाही >>>
अजून सुजितकुमार सीन पर्यंत पोहोचला नाहीत का? त्याची इटालियन ॲक्सेंट amazing आहे - आलू? रोमेस!! >>> हा थोडा थोडा करून बघणार आहे. आज थोडा वेळ पाहीन.
सुजीतकुमारचं इटालियन हिंदी
सुजीतकुमारचं इटालियन हिंदी किंवा हिंदवी इटालियन अॅक्सेण्ट ऐकलं>
मा म्म मि यां म्हटलं कि सुजीतकुमार एकदम युरोपियन वाटणार.
चला हवा येऊ द्या मधे जसं एखाद्या चित्रपटाचं स्पूफ असतं तसा हा गाजलेल्या बॉण्डपटांचा मसाला एकत्रित करून त्यात मनमोहन देसाई फॉर्म्युला टाकून बनवलेला स्पूफ आहे. पण पठाण पेक्षा सुसह्य आहे. एक तर पठाण प्रमाणे हा सिनेमा कुठेच सिरीयस स्पाय पटाचा आव आणत नाही. गोविंदाच्या सिनेमांप्रमाणे मनोरंजन आहे.
त्या वेळी आय बी, रॉ लोकांना माहिती असतील का ( दिग्दर्शकालाही) म्हणून त्या वेळचे सर्वोच्च गुप्त पोलीस म्हणून अमिताभ सीआयडी ऑफीसर असतो. सीआयडी ऑफीसर वर आंतरराष्ट्रीय जबाबदार्या सोपवल्या जातात. दोन्ही अमिताभ मधे एव्हढे साम्य असतं कि दोघांना आवाजही किशोरकुमारचाच आहे.
झीनत अमान च्या चेहर्यात काय प्रॉब्लेम आहे हा खूप वर्षांचा पडलेला प्रश्न आहे. यात नीट बघताना समजलं कि तिला भुवयाच नाहीत. आहेत त्या एकदम पातळ आहेत किंवा पेन्सीलने रेघ ओढल्यासारख्या आहेत. बाकी ती चेहर्यासाठी प्रसिद्ध नसावी.
विमान लेट झाल्यानंतर ते इजिप्त मधले पिरॅमिडस पहायला जातात. तेव्हां हिरव्या रंगाचा टॉप आणि ग्रे ट्राऊजर असलं डेडली कॉम्बिनेशन तिने परिधन केलेलं असतं. त्यातला टॉप म्हणजे आताही कुणी त्या वाटेला जाणार नाही. पुढच्याच शॉट मधे बिकिनीही हिरवीच.
बहुतेक याच हिरवळीकडे चेटकी किटाळे ने लक्ष वेधलेले असावे. आजच्या हिशेबाने तेअंगभर कपडे असले तरी एकेकाची कानफाट्या म्हणून इमेज झालेली असते, त्या न्यायाने झिन्तामान म्हटल्यावर फारच बोल्ड वाटू लागतं.
हॉटेलमधे एका फ्लोअरवर मटणाचं दुकान असतं. त्यात मटणासोबतच भोपळे, केळी, पडवळ आणि घोसावळी अशी लोंबती फळं अडकवलेली असतात. तिथे शेट्टी अंगाला डांबर फासून उघड्या अंगाने कोयता घेऊन फिरत असतो. शेट्टी तसाही धडकी भरवायचाच. त्याला आणखी काळा डांबर फासायची गरज नव्हती .अमिताभ आणि त्याची दुश्मनी खूप जुनी. कोयत्याचे वार अमिताभ चुकवत असतो तेव्हां कापले जाण्यासाठी या फळांचे नियोजन मटणाच्या दुकानात केलेले आहे. कदाचित दालचा बनवताना वेगवेगळ्या दुकानात ग्राहकाला फिरायला लागू नये यासाठी ऐतिहासिक शहरांमधल्या महागड्या हॉटेल्समधे अशी दुकाने असण्याची शक्यता आहे.
बोटीतला पाठलाग रॉजर मूरच्या द स्पाय हू लव्ह्ड मी किंवा मूनरेकर मधून जसाच्या तसा उचलला आहे.
बच्चनच्या जागी विनोद खन्ना सुद्धा शोभला असता. पण सिगारेट पेटवण्याची स्टाईल, हातात ब्रीफकेस घेऊन ताडताड चालणं आणि आजूबाजूला बंदूकधारी असताना कमीत कमी रेषा हलवून मिस्कील पणे थंड डायलॉग डिलीव्हरी हे मिसलं असतं.
शक्ती सामंतांना मानलं. अनुराग, अमर प्रेम, आराधना आणि एकदम ग्रेट गॅम्ब्लर ! अफाट रेंज आहे या माणसाची. फक्त हॉरर हा जॉनर राहिला.
तुफान परीक्षण
तुफान परीक्षण
बाकी ती चेहर्यासाठी प्रसिद्ध
बाकी ती चेहर्यासाठी प्रसिद्ध नसावी. <<<
मस्तच पोस्टी आचार्य.
मस्तच पोस्टी आचार्य.
झिनत अमान इतकं सुंदर, कमनीय आणि मादक शरीर कुणाचेच नाही. पर्फेक्ट बॉडी आहे. ती बिकिनीत जशी दिसते आणि ते कॅरी करते त्यास तोड नाही. आता तेव्हाच्या चेहऱ्याच्या ब्युटी स्टँडर्ड मधे तिचा चेहेरा बसायचा नाही आणि उगाच तुलना करता परवीन बाबी सुंदर वाटायची मलाही.
रणवीर शौरी आणि विनय पाठक चे "भेजा फ्राय" मधले बँटर भारी आहे >>>> मी बघितल्याचे आठवत नाही. बॅन्टरसाठी नोटेड. ते दोघेही वेगवेगळ्या कामांसाठी आवडले आहेत पण एकत्र आठवत नाही.
महाराजा @नेटफ्लिक्स - सेतुपती
महाराजा @नेटफ्लिक्स - सेतुपती, अनुराग कश्यप आणि इतर कलाकार.
सेतुपती एक सलूनवाला असतो, त्याला एक शाळकरी मुलगी असते. नेहमीप्रमाणे इथेही त्याची बायको मरते. (याच्या नशिबात बायकोच नाही. इथे तर दुसऱ्याची पण नाही.
)
तर सेतुपती हा नेहमीप्रमाणे एककल्ली, मितभाषी, eccentric वाटावा असा पण अतिशय प्रेमळ बाबा आहे. लहानपणी घरात भरधाव ट्रक वेगाने घुसून अपघातात त्याची बायको जाते. मुलीवर मात्र माळ्यावरचा पिंप पडून ती वाचते. त्यामुळे लेक व तो पिंपाची पूजा करत असतात. एकेदिवशी रात्री अचानक पिंप चोरीला जातो. दुसऱ्या दिवशी पासून विचित्र नाट्य सुरू होते. महाभयंकर हिंसाचार आणि रक्तपात आहे. एकही हत्यार सोडलं नाही. कोयता म्हणू नका, चाकू म्हणू नका, स्क्रुड्रायव्हर म्हणू नका, बंदूक, काठी, गज, विटकर, एकही गोष्ट नाही जिने मुडदा पाडला नाही.
कामं अतिशय उत्तम झाली आहेत, चित्रपट वेगवान, विचित्र, चमत्कारिक, unpredictable आणि कुठं कुठं किळसवाणा आहे. सेक्शुअल व्हायोलेंसही भरपूर आहे. तरीही सिनेमा प्रभावी आणि एन्गेजिंग आहे. अनुराग कश्यप खलनायक आहे. वजन वाढलं आहे त्याचं. काम नेहमीप्रमाणे नीच, हलकट वगैरे. एवढा सगळा हिंसाचार सहन होत असेल तर सेतुपतीसाठी बघू शकता.
@संप्रती,
तुमचा सेतुपती आला आहे हो....
अस्मिताच्या वरच्या पोस्ट वरून
अस्मिताच्या वरच्या पोस्ट वरून आठ्वले, गेल्या आठवड्यात "किल" नावाचा सिनेमा पाहिला. धर्मा प्रॉडक्शन चा आहे, पण कोणी नावाजलेले कलाकार नाहीत. राघव जुयाल हा रिएलिटि डान्स शो मधला कलाकार फक्त माहित होता. तो यात व्हिलन आहे, आणि आशुतोष विद्यार्थी, बाकी हिरो वगैरे कोणी माहित नव्हते.
हॉलिवुड चे स्पीड, डाय हार्ड वगैरे सिनेमे असायचे तशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणाजे एक कमांडो/ आर्मीमॅन विरुद्ध अनेक ( ४०-५० वगैरे ) गुंड/ दरवडेखोर एका चालत्या ट्रेन मधे. नावाप्रमाणे किलिंग हीच एकथीम. माणसाला किती वेगवेगळ्या प्रकारे मारता येईल याची प्रात्यक्षिके.
शेवट काय होणार आपल्याला माहित असते तरी सुरु केला की बघितला जातो अशा प्रकारचा सिनेमा. अर्थात प्रचंड रक्तपात, हिंसा बघायची सवय नसेल तर वाटेला जाऊ नये.
अस्मिता, मस्त प्रतिसाद...
अस्मिता, मस्त प्रतिसाद...
अस्मिता, फारएण्ड, र्मड,
अस्मिता, फारएण्ड, र्मड, अनिरुद्ध, माझे मन सर्वांचे आभार.
झीनत मानला मोठी माणसं का नमस्कार करतात हे कळण्याएव्हढे मोठे नव्हतो. ती मिस इंडिया होती असं ऐकून होतो. त्यावेळी केसरीत त्याचं भाषांतर भारत सुंद्री असं यायचं. सुंदर म्हणजे हेमामालिनी. अमिताभला झिन्तामान, परवीन बॉबी अशा हिरविनी आणि धर्मेंद्र ला हेमामालिनी का असं वाटायचं.
विनोद खन्नाला शबाना आझमी
विनोद खन्नाला शबाना आझमी असायची, तेव्हा मला असाच मनस्ताप व्हायचा
राजबिंडा तरूण आणि डिप्रेस्ड समाजसुधारक?
हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे बोलो तो जिये बोलो तो मर जाये..... तो झोक्यावर झुलतोय आणि ही दोरीवरचे सुकलेले कपडे गोळा करतेय. तिच्यामुळे की काय विनोद खन्नाला मुकेशचा आवाज दिला आहे. एनर्जीची माती केली आहे. तेच ऋषी- नीतू, अमिताभ - परवीन भन्नाट वाटतात.
भारत सुंद्री>>>

चिं. वि. जोशींचे 'सन्ड्री एक्स्पेन्सेस' आठवले. गुंड्याभाऊ किरकोळ खर्चासाठी हिशेबात sundry expenses लिहितो, तो डायरीत वाचून कुणातरी सुंद्रीच्या आकडे , पिनांवर खर्च केला आहे म्हणजे नक्की आपला ब्रह्मचारी मुलगा प्रेमात पडला आहे असे तीर्थरूपांना वाटते.
मैत्रेयी, मृ
>>>>>>चिं. वि. जोशींचे
>>>>>>चिं. वि. जोशींचे सन्ड्री एक्स्पेन्सेस आठवले. गुंड्याभाऊ किरकोळ खर्चासाठी हिशेबात sundry expenses लिहितो, तो डायरीत वाचून कुणा सुंद्रीच्या आकडे , पिनांवर खर्च केला आहे म्हणजे नक्की आपला ब्रह्मचारी मुलगा प्रेमात पडला आहे असे तीर्थरूपांना वाटते. Lol
आई ग्ग!! कसं आठवतं तुम्हाला हे? लहानपणी वाचलेले मी पार विसरते.
sundry expenses >>
sundry expenses >>
विख हा शआ चा क्रश होता. तिचा अभिनय आईला आवडायचा.
अमिताभ शशी कपूर जोडी असायची. ऋषीचा तो काका आहे हे माहिती असल्याने अमिताभ नीतू सिंग जोडी काय आवडली नाही.
मित्राच्या सूनेबरोबर ?
पण मित्राचाच दीवार पाहिल्यावर आवाजच बंद झाला.
भारत सुंद्री >>>
भारत सुंद्री >>>
झीनत नंतर सेक्सी म्हणून जास्त फेमस झाली पण आधी तिच्या चेहर्यात तारूण्यसुलभ का काय म्हणतात तो गोडवा होता. देव आनंद बरोबर ऐसे ना मुझे तुम देखो किंवा पन्ना की तमन्ना है गाण्यात, डॉन मधे जिसका मुझे था इंतजार मधे किंवा यादों की बारात मधे चुरा लिया है तुमने गाण्यात ती सुंदर दिसते. गिटार वाजवणे "पुल ऑफ" करू शकणार्या फार कमी हिरॉइन्स होत्या तेव्हा
तो झोक्यावर झुलतोय आणि ही दोरीवरचे सुकलेले कपडे गोळा करतेय. तिच्यामुळे की काय विनोद खन्नाला मुकेशचा आवाज दिला आहे. एनर्जीची माती केली आहे >>>
स्वतंत्रपणे बघितले तर खरे आहे. पण त्याला रोल तसाच दिलेला असल्याने त्यानुसार ते सूट आहे. मनमोहन देसाई ने हे जाणूनबुजून केले का माहीत नाही पण अमिताभ व ऋषीच्या कॉमेडीला काउंटरपॉइण्ट सारखा विनोद खन्ना चा मोठ्या भावाचा सिरीयस आणि भारदस्त रोल आहे. मात्र बाकी दोन्ही जोड्या मात्र त्या गाण्यांत खरेच एकमेकांच्या प्रेमात आहेत असे वाटते.
महाराजाबद्दल बरेच वाचल्याने काल थोडा लावला होता. पण सुरूवातीची ५-१० मिनिटे कमालीची संथ होती. आणि पूर्ण पिक्चर पाहण्याइतका वेळ नव्हता. आज उद्या पाहू म्हणून बदलला.
एकही गोष्ट नाही जिने मुडदा पाडला नाही. >>>
भेजा फ्राय इथे किमान एक दोघानी पाहिलेला नाही? शोधा कोठेतरी आणि बघाच पब्लिकहो. ऑटाफे आहे. विनय पाठकने काय धमाल उडवली आहे. त्याचा मूळ इंग्रजी पिक्चरही चांगला आहे. Dinner for Schmucks. स्टीव्ह कॅरेल आहे. पण आपल्या टेस्टला भेजा फ्राय जास्त धमाल आहे. देशीकरण भन्नाट आहे.
पण त्याला रोल तसाच दिलेला
पण त्याला रोल तसाच दिलेला असल्याने त्यानुसार ते सूट आहे.

>>>>Nahh
एरवी निरूपा रॉयला दोन सीजीआय ज्योती येऊन अचानक दृष्टी येते. तिघा जणांचं रक्त एकदाच एकाला चालतं. इथं मात्र हे विचारपूर्वक केलेलं आहे असं मानू का ? त्या जोड्या हनिमूनला आणि ही जोडी वनवासाला निघाल्यासारखी दिसतेय.
नेमके यावेळीच कुठे होते राधासुता तुझे अभिव्यक्तीस्वातंत्र्य...
सामो
ग्रेट गॅम्बलर बघायला हवा परत.
ग्रेट गॅम्बलर बघायला हवा परत. त्यातील बच्चन मस्त होता असे आठवते. तो वरचा हॉटेल मधला भोपळे पडवळ वाला पॅरा सुपरलोल आहे.
क्रिकेट मॅचेसच्या वेळेस देशी खेळांचा अभिमान दाखवावा या पुलंच्या वाक्याच्या उलट्या लॉजिकने मी इथे सगळी चर्चा बॉलीवूड बद्दल असताना नेफिवर "हॅरिएट" पाहिला अर्धा. हॅरिएट टबमन - इथे शालेय इतिहासात तिच्याबद्दल शिकवले जातेच. पण इतरांकरता - एकदम भारी स्टोरी आहे. अमेरिकन गुलामीच्या काळातील कथा - गुलामीतून एकटी पळून जाउन सुट्का करून घेतलेली स्त्री. मेरीलॅण्ड ते फिलाडेल्फिया इतका प्रवास तिने रात्री अपरात्री एकटीनेच केला जंगलातून. नंतर तिने अनेक गुलामांची सुटका केली. अंडरग्राउण्ड रेलरोड ही टर्म त्याबद्दल वापरलेली वाचली आहे. काल थांबलो तेव्हा तो भाग जस्ट सुरू होत होता. पण एकदम ग्रिपिंग पिक्चर आहे.
द वायर सिरीज मधे एक तो जुना जाणता पोलिस दाखवला आहे. गपचूप "वुडवर्क" करत बसणारा. नंतर तो बराच इन्व्हॉल्व्ह होताना दाखवला आहे. इथे तोच अॅक्टर हॅरिएटच्या बापाच्या रोल मधे आहे. आणि इथेही वुडवर्क करताना दाखवला आहे. आणि ती सिरीजही मेरीलॅण्ड मधलीच कथा दाखवते.
खूप वेळ बघायला वेळ नाही म्हणून महाराजा बदलला, पण हा लावून मग तासभर हा बघत बसलो
इथले रेकोज नोट करून ठेवत
इथले रेकोज नोट करून ठेवत असतो. पण काही काळाने लक्षात राहत नाहीत.
पूर्वी चित्रपट पहायचे जे आकर्षण असायचे ते राहिलेले नाही असे आणखी कुणाच्या बाबतीत झाले आहे का??
कि डॉक्टर गाठावा ?
तिघा जणांचं रक्त एकदाच एकाला
तिघा जणांचं रक्त एकदाच एकाला चालतं >>> हे बघा, तिचे नाव भारती आहे. तिला हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन युवक रक्त देत आहेत. ते वेगळ्या धर्माचे असले तरी प्रत्यक्षात तिचीच हरवलेली मुले आहेत. असे जर श्याम बेनेगल किंवा इतर आर्ट फिल्म वाल्यांनी दाखवले असते (विशेषतः अस्सल रोती सूरत कलाकार घेऊन) तर क्रिटिक्स नी काय प्रतिके आहेत म्हणून डोक्यावर घेतले असते. युरोपात कोठे कोठे अॅवॉर्ड मिळाल्यावर पोस्टरवर फुलाफुलांच्या रांगोळीसारखे ते छापतात तसे काहीतरी केले असते. मराठी जड नावाचा पिक्चर असता, तर १९७७ सालचा पिक्चर म्हणून "आणीबाणी उठल्यावर जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब" वगैरे काहीतरी समीक्षकांना दिसले असते.
पण मनमोहनजींनी असे काही करण्यापेक्षा तो लोकप्रिय होईल हे बघितले तर तुम्ही त्यांना नावे ठेवता

विचार करा. तोपर्यंत मी स्वतःच्या ड्रायव्हरला त्याच्या कपड्याने आपले जोडे पुसायला लावून "हम सोचा विस्की मे टेस्ट क्यूं नही आ रहा है, हम इसमे आईस डालना भूल गया" म्हणणार्याला मालकाचा डाव नंतर त्याच्यावर उलटवून हा सीन उलटा सादर करणार्या लेखकाची आयडिया तेव्हाच्या कम्युनिस्ट/सोशालिस्ट कल्पना, क्रांती वगैरेशी जोडता येईल का ते पाहतो.
मला विनोद खन्ना हँडसम वगैरे
मला विनोद खन्ना हँडसम वगैरे नाही वाटत. अमर अकबर अँथनीमधे तर नाहीच नाही. शबाना आझमीचे जुने सिनेमे खूप नाही बघितलेले, पण 'नीरजा'मध्ये खूप आवडली ती.
फारएण्ड, वरचा प्रतिसाद आत्ता वाचला. अमर अकबर अँथनीमधे प्रतीकं, उपदेशाचे डोसेस वगैरेची रेलचेल आहे. भौतिकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र वगैरे किती तरी ठिकाणी धाब्यावर बसवलं आहे. पण ते सगळं एक प्रकारच्या निरागस पातळीवर आहे. उगाच तरलतेचा आव आणून बटबटीतपणा नाही. पहिल्या काही मिनिटांत आपली 'लेव्हल सेट' होते आणि मग जी काय मजा येते अमर अकबर अँथनी बघायला, त्याला तोड नाही.
त्या जोड्या हनिमूनला आणि ही
त्या जोड्या हनिमूनला आणि ही जोडी वनवासाला निघाल्यासारखी >> शबाना शी जोडी जमवल्याने त्याला वैराग्य आलेलं असतं.
क्रिटिक्स नी काय प्रतिके आहेत म्हणून डोक्यावर घेतले असते. >> रंगीन हवा नावाचा चित्रपट आला असता. त्यात तिघांचे रक्त वेगवेगळ्या रंगाचे दाखवले असते. अब बता हिंदू का खून कौनसा है और मुसलमान का कौनसा,याच्या उलट तीन रंगांचं मिश्रण होऊन ( आर जी बी) भगवे रक्त आईच्या हातात जाते, एकाच वेळी साईबाबा, येशू, अल्लाह आणि गुरूनानक आशिर्वाद देतात, खोलीत वेगवेगळे झोत प्रकाशमान होतात..... हे नक्कीच पहायला मिळालं असतं.
असे जर श्याम बेनेगल किंवा इतर आर्ट फिल्म वाल्यांनी दाखवले असते >>> असंच एक लिखाण अर्धवट ठेवलं होतं. एक सुप्रहीट चित्रपट भलत्या दिग्दर्शकाने केला तर ? नंतर कंटाळा आला आणि राहिलं>
कठपुतली पहिला अक्षय कुमार चा
कठपुतली पहिला अक्षय कुमार चा.पिक्चर आणि अभिनय चांगला होता पण शेवट बघून अगदीच येड्यात जमा झाल्या सारखं वाटलं.खुनी हा अगदी मुख्य संशयित नसला तरी किमान प्रेक्षकांना पात्र म्हणून 5 मिनिटं तरी ओळखीचा असावा.शेवट झेपलाच नाही.
हो, विनोद खन्ना व शबाना
अस्मिता, फा, रआ >>>
उगाच तरलतेचा आव आणून बटबटीतपणा नाही.>>>१००+
हो, विनोद खन्ना व शबाना आझमीची जोडी खटकली होती. त्याला दळणाची पिशवी घेऊन गिरणीवर किंवा अनाथ बच्चों के आश्रम के लिए चंदा मांगने पाठवते का काय असं वाटलं होतं. ( नो ऑफेन्स टू हे काम करणारे लोक, नो डाऊट, ही कामं जास्त महत्वाची आहेत पण हनुवटीला खळी असणाऱ्या माणसाने घोड्यावर बसून सिथॉंलची जाहिरात करावी. दळणाची पिशवी/पावतीपुस्तक वगैरे त्याच्या हातात शोभत नाही एवढंच) बाकीच्या दोघी ग्लॅमरस, नटखट वगैरे, त्याने बिचाऱ्याने काय पाप केलं होतं? असो.
“ बाकीच्या दोघी ग्लॅमरस, नटखट
“ बाकीच्या दोघी ग्लॅमरस, नटखट वगैरे, त्याने बिचाऱ्याने काय पाप केलं होतं?” - मूळ प्लॉटमधे विनोद खन्नाच्या कॅरेक्टरला हिरॉईनच नव्हती. पण त्याच्याच हट्टावरून, त्याची लव्ह स्टोरी अॅड केली गेली आणि 'परवरीश' मधे (मनमोहन देसाईचा च) त्याच्या प्रेयसीच्या रोलमधे असलेल्या शबाना आझमीला अ अ अॅ मधे एक छोटा रोल मिळाला.
Pages