चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जियाला हे मी सिनेमाचं नाव आहे हे न कळता जिया नावाच्या अ‍ॅक्ट्रेसला फर्स्ट डे बघायचं होतं असा समज करून घेतला.. म्हटलं असतील तिचेही फॅन (गेली ती बिचारी आता)

बॉबीला आत्ता नक्की काय करायचंय ते कळलंय. Lol
चौदहवी की रात फार गाजलं होतं गाणं तेव्हा. त्या हिरोची अ‍ॅक्शन हम चुप रहे कुछ ना कहा ला जाम हसू यायचं प्रत्येक वेळी तीच अ‍ॅक्शन.
ही हिरवीण ना कजरे की धार मधलीच आहे ना.

मी पद्मावतविषयी आधी लिहिलं होतं पण मागच्या आठवड्यात काही तुकडे बघितले त्यावरून अजून आठवलं.

- त्यात पद्मावती दिल्लीला येते तेव्हा ती मेण्यातून उतरते ती बिना घुंघटाचीच. तिला आपल्या स्वागताला मेहरुन्निसा येणारे, मलिक काफुर येणारे की खुद्द खिलजी येणार आहे हे माहीत नाही. त्यामुळे जिचा चेहरा दाखवायला चित्तोडमधे इतका बाऊ केला गेला ती राणी अशी चेहर्‍यावर घुंघट न घेता गनिमाला सामोरी जाईल हे पटत नाही.
- रावल जेव्हा युद्धासाठी तयार होतो तेव्हा शिरस्त्राण, चिलखत असा त्याचा भक्कम जामानिमा असतो. दुरून मलिक काफुरने सोडलेले बाण त्याच्या चिलखताचा भेद करून पाठीतून छातीत घुसतील हे अशक्य कोटीतील वाटते.

मग विचार केला, भन्सालीचा सिनेमा आहे त्यात कुठे लॉजिक शोधा Happy

चिलखत लोखंडी नसेल म्हणजे जाड चामड्याचं वगैरे असेल तर दुरून सोडलेले बाण घुसू शकतात ना? शिवाय शत्रूने पाठीमागून वार केला हे रजपूतोंके असुलों के खिलाफ असल्याचेही दाखवता येते.
पण भन्सालीचा सिनेमा आहे त्यात कुठे लॉजिक शोधा हे पटलं.

जियाला गाणे...लहान असताना त्याला बघत हसत लोळलो होतो ते आठवले Lol
ही हिरवीण ना कजरे की धार मधलीच आहे ना.>>> मी तेच म्हणणार होते. बरी आहे दिसायला

मिथून च्या मुलाचा ही १ महान चित्रपट आहे बघाचः Wink
https://youtu.be/lAxyG431198?si=VwKEQpuizmM7ivKE

किशन कुमारचे भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्व >>>
बाजरीवरील कीड किंवा दुसर्‍या बाजीरावाचे शुद्धलेखन याच्या तोडीस तोड विषय Rofl

मी आश्रम बघितली नाहीये पण एकंदरीत कधी कधी यंग असताना अभिनयशुन्य, बुळचट वाटणारे बरेच जण चाळीशीनंतर बरा अभिनय करुन चमकताना दिसतात. त्यात व्हिलन भुमिकेत तर जास्त चांगले वाटतात. उदा. मला स्वप्निल जोशी फार आवडत नाही पण जिवलगामधे तो व्हिलन म्हणून आवडला. तसेच एका वेबसिरीजमधे चांगलं केलं त्याने, मी पहीला सीझन बघितला, काही गोष्टींमुळे दुसरा सिझन बघायचं डेरींग नाही.

दुनियादारीमधे अजिबात आवडला नव्हता. मन शुद्ध तुझं मधे पॉझिटीव्ह होता, चांगलं केलं त्याने, ही खूप नाही बघितली, हिचाही दुसरा सिझन येतोय. अशी अनेक लोकं आहे, हे एक उदाहरण म्हणून लिहीलं.

डेस्पिकेबल मी - ४ : ट्रेलर पेक्षा चांगला आहे, मिनियन सगळे जोक करतात, स्टोरी पुढे जाते म्हणजे ग्रू ज्यु. येतो. फॅमिली डायनॅमिक्स बदलतात... ब्ला ब्ला.. ब्ला .. पण एकुण लेट डाऊन आहे. अर्थात मुलं आणि पालकांनी नक्की बघाच. मुलं नसतील तर नाही बघितला तरी चालेल.
इथे ग्रूच्या युनि. मधला मित्र - शत्रू येतो. आणि एव्हीएल त्याला पकडायचं/ ग्रू ला वाचवायचं ठरवते. आणि मग नेहेमीची मजा चालू होते.

या सीरीज मधला डेस्पिकेबलमी - २ सगळ्यात आवडलेला. पहिल्यापेक्षाही. तो हजार वेळा बघितला असेल. तिकडे ग्रू व्हिलनचा अँटी व्हिलन होतो.

मी कालच बघितला डेस्पिकेबल -मी. अजिबात आवडला नाही. मुलांनाही आवडला नाही. पहिले दोन किती छान होते. Steve Carell असला की कॉमिक टायमिंगने/ सफाईने धकधक होते. पण हा जमला नाही.

आता Inside out 2 बघायला जाणार आहोत. सुट्टी असल्याने इमानेइतबारे जे येईल ते बघू. आम्ही प्रिव्ह्यू सुद्धा सोडत नाही. कधीकधी पॉपकॉर्न तेव्हाच संपून जातात. Lol

आता Inside out 2 बघायला जाणार आहोत. सुट्टी असल्याने इमानेइतबारे जे येईल ते बघू. आम्ही प्रिव्ह्यू सुद्धा सोडत नाही. कधीकधी पॉपकॉर्न तेव्हाच संपून जातात. Lol>>>>>>>>>>> लोल सेम हिअर.. थांबवून ठेवायला लागतं हात आणि तोंड (मुलांचं)
बघ Inside out 2 .. .आम्ही पाहिला.. मस्त आहे. नवीन इमोशन्स अ‍ॅड झालेत Happy

किशन कुमारचे भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्व >>>
बाजरीवरील कीड किंवा दुसर्‍या बाजीरावाचे शुद्धलेखन याच्या तोडीस तोड विषय >>> Lol

डॉलर शॉपच्या अक्षय कुमार >>> Lol
आम्ही प्रिव्ह्यू सुद्धा सोडत नाही. कधीकधी पॉपकॉर्न तेव्हाच संपून जातात >>> हे "नमनालाच घडाभर तेल" सारखेच झाले. प्रिव्यूमधेच पॉपकॉर्न संपले Happy

मोठ्या भावाचा डबल ब्रेस्ट सूट घातलेला हिरो, त्याचे चमकते दात, त्याचा हेअरकट, या गाण्यांतलं भडक रिसेप्शन डेकोरेशन हे पाहिलं नाही >>
या हिरोला कोलगेट, क्लोज अप वगैरेच्या जाहिरातींसाठी खूप स्कोप होता. शाम्पूची पण चालली असती. स्टेप कट फारच शॉर्ट झाला की साधारण त्याच्यासारखे केस होतात. >>>
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या सुटाचा. >>> Lol

जियाला हे नाव व हे गाणे कधीतरी अर्धवट पाहिले होते. अर्धवट पाहिले कारण पुढे पाहण्यात काही इंटरेस्ट नव्हता.

हो ना! पहिले दोन फार मस्त होते.
यात मी पोराला मारे पोस्ट क्रेडिट सीन असेल करुन सगळी क्रेडिट्स बघायला लावली तर काय तरी पाव सेकंद लेम अ‍ॅनिमेशन. सीन नाहीच.
वर मला ज्ञानदान झालं .. 'तरी मी सांगत होतो की युनिवर्सल पोस्ट क्रेडिट ठेवत नाही...!' :आयरोलः Proud
इन साईड आउट २ पोट्ट्याला शाळेकडून अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून दाखवला. त्यामुळे माझे दोन तास वाचले.

एमा स्टोन आणि यर्गोस लॅटिमोसचा काईंड ऑफ काईंडनेस पाहिला का कोणी? तो बघायचाय मला.
'वाईल्ड रोबॉट' येतोय. त्याचं पुस्तक वाचलेलं. लहान मुलांना चांगलं आहे ते पुस्तक, विकत नका घेऊ पण लायब्ररीतून घेऊन वाचा. आता ते पुस्तक वाचलेलं आहे त्यामुळे मूव्ही बघणं आलं असं झालं आहे.

श्रीकांत सिनेमा फार छान आहे. राजकुमार रावला इतके का नावाजतात ते पुन्हा एकदा लख्ख कळते. सिनेमा अती भावनाप्रधान दाखवायचा मोह आवरलाय हे फार उत्तम केले आहे दिग्दर्शकाने. केळकरला त्याचा रोल एकदम शोभलाय.

जियालाच्या त्या गाण्यात मला आधी वाटले अंतराळयानाच्या खालच्या ज्वाळेतून कोणीतरी एण्ट्री मारत आहे. पण ती हिरॉइन आडवी येताना पाहून कळाले की कॅमेराच आडवा आहे. पहिल्या सीनला ती एकटी असते. मग एकदम चार इमेजेस होतात. मला वाटले गाण्याला चार चाँद लावायचे यांनी अगदीच लिटरली घेतले आहे. पण लगेच पाच दिसल्या. मॅट्रिक्स मधल्या एजंट स्मिथ सारखे काहीतरी असावे. मग तो डब्रे सूट वाला हीरो आला. त्याचे केस डोक्यामागे इतके आहेत की तो जरा मागे वाकला तर सेण्टर ऑफ ग्रॅव्हिटीची गडबड होउन मागच्या मागे पडेल असे वाटते. हिरॉइनचा चेहरा चंद्राचे प्रतीक असेल तर याचा सूटही आजूबाजूचा सगळा प्रकाश परावर्तित करत असल्याने तो ही चंद्राचे प्रतीक आहे. कसलीतरी पार्टी आहे असे वाटेपर्यंत पुढच्या सीन मधे ती एकदम गरबा खेळायला आल्यासारखे कपडे घालून आली.

अशी झाडावरून सोडलेली लायटिंग पाहिली की तेथेच बाजूला स्टीलच्या बंद ट्रेज मधे फूड आहे व लाइन लावून बटर चिकन, नान, काकड्यांच्या चकत्या घ्यायच्या आहेत हेच डोक्यात येते. चंद्र प्रत्येक फ्रेम मधे असावा म्हणून जवळच झाडावर चिकटवलेला आहे. तो चंद्रच असावा. नाहीतर एका रॅण्डम दिव्याला इतके फुटेज का देतील्? चाँद मिलता नही सबको संसार मे, है दियाही बहुत रोशनी के लिए वगैरे काही डीप असेल तर माहीत नाही.

कल चौदहवी की रात थी. शबभर रहा चर्चा तेरा. रात्रभर? म्हणजे साधारण ९ वाजता पूर्वेकडे बघून, मग ३-४ तासांनी डोक्यावर बघून आणि नंतर पहाटे पश्विमेकडे बघून हे लोक चर्चा करत होते का?

धमाल प्रतिसाद Happy
बुफे बद्दल सहमत.माझे डोळे ते स्टीलचे चौकोनी बुफे कंटेनर्स बराच वेळ शोधत होते.

आवेशम हिंदीत आलाय.हॉटस्टार वर गरजूंनी लाभ घ्यावा.(पण ओरिजिनल भाषेत बघण्यात जास्त मजा.)
सर्वाना आवडेल असा नाहीये.पण फाफा साठी बघा एकदा.

फा Rofl

अंतराळयानाच्या खालच्या ज्वाळेतून कोणीतरी एण्ट्री मारत आहे. पण ती हिरॉइन आडवी येताना पाहून कळाले की कॅमेराच आडवा आहे
Biggrin

जियाला गाण्यात त्या हिरोच्या डोळ्यांकडे लक्षपूर्वक बघा... दर ओळीला तो नजरेने दिग्दर्शकाकडून व्हॅलिडेशन मागतो.

कल चौदहवी की रात थी........ "बघ, मस्त केली ना अ‍ॅक्टिंग?",
शबभर रहा चर्चा तेरा......... "जमलं की नाही तू म्हणत होतास ते?"

अ‍ॅक्टिंगची मुळातच बोंब असल्यामुळे सर्व प्रकारच्या सवालांना नजरेत एकच भाव (किंवा कुठल्याही भावाचा अभावच) दिसतो.

, विकास भल्ला माहिती नाही , पीएसपीओ सिंड्रोम मुळे बघायला लागेल.
बाजरीवरील कीड किंवा दुसर्‍या बाजीरावाचे शुद्धलेखन याच्या तोडीस तोड विषय >>> Rofl

टोटल धमाल चालू आहे.
फारएण्डचा प्रतिसाद कहर आहे. कुठलेही एक वाक्य कोट करू शकत नाही.
आख्खा प्रतिसादच Rofl

लख्ख पडला प्रकाश साठी परत बघावे लागेल. काहीतरी धमाल मिसली.

कल चौदहवी की रात थी. शबभर रहा चर्चा तेरा. रात्रभर?
<<<<<<<
मला तर ते आधी 'छतपर' रहा चर्चा तेरा.. ऐकू यायचं. म्हणजे चंद्र बघायला लोक गच्चीवर जमले होते तिथे गप्पांमध्ये हिचाही विषय निघाला वगैरे.

गाण्याला चार चाँद लावायचे यांनी अगदीच लिटरली घेतले आहे.
सेण्टर ऑफ ग्रॅव्हिटीची गडबड
सूटही आजूबाजूचा सगळा प्रकाश परावर्तित करत असल्याने तो ही चंद्राचे प्रतीक आहे.
बटर चिकन, नान, काकड्यांच्या चकत्या घ्यायच्या आहेत हेच डोक्यात येते.
एका रॅण्डम दिव्याला इतके फुटेज का देतील्?
>>>>>> Lol
चाँद मिलता नही सबको संसार मे, है दियाही बहुत रोशनी के लिए >>>> व्वा..!

धमाल पोस्ट फारएण्ड. Happy

द ग्रेट गँबलर बघतोय.

भारत सरकार एक अशी इलेक्ट्रॉनिक मशीन बनवत असते जी समुद्र किनार्‍यावर बसवली तर ५० मीटर कि किमी परीसरात येणार्‍या दुश्मन के जहाज ला डिटेक्ट करू शकत असते. इतकेच नाही तर तिच्यावर लेझर रेज सोडून भस्मसात करू शकत असते. फक्त पानी का जहाज नाही तर हवाई जहाज पण. विशेष म्हणजे हे ठिकाण मुंबई जवळचं आहे. त्या वेळी ए आय विकसित असणार. त्यामुळे जहाजा जहाजात दुश्मन का जहाज मशीनला कळत असणार.

ही गुप्त माहिती म्हणजे प्रोजेक्ट के २ काहीतरी चालू आहे हे एका जुगारी अड्ड्याच्या मालकाला (मदनपुरी) माहिती असते. पोजेक्ट वर काम करणारा शास्त्रज्ञ जुगार खेळायला त्याच्याच क्लब मधे येत असतो. ते मित्र असतात. अशा महत्वाच्या प्रकल्पावरचा अधिकारी एका सिंडीकेटशी संबंधित क्लबवर जातो, गुप्तचर यंत्रणांना त्याची माहितीही नसते. या मित्राला अडकवण्यासाठी मदनपुरी एका जुगारकला निपुण व्यक्तीच्या शोधात असतो. तो अमिताभ बच्चन क्र. १ म्हणजे जय असतो.

अमिताभ बच्चन क्र. २ हा इन्स्पेक्टर विजय आहे . मदनपुरीचा बॉस उत्पल दत्त आहे. त्याचा उजवा कि डावा हात प्रेमचोप्रा आहे. त्यांच्या अड्ड्यात एक गुप्त जागा आहे. अड्डाच गुप्त असतो. डबल गुप्त म्हणूयात. इथे हेलन नाचत असते. प्रेम चोप्रा खूण करतो तशी ऑपरेटर बटणं दाबू लागते. चुकून कॅमेरा तिकडे जातो तर सगळे टू वे पुश बटन्स ! एव्हढी बटणं लावून करण्ट ऑन ऑफ करून ते कसलं रेकॉर्‍डिंग करत असतील ?

ही फिल्म पोलिसांच्या हाती लागते. वरीष्ठ पोलीस अधिकारी विजयला बोलावून ही फिल्म दाखवतात. त्यात हेलन नाचतेय.
वरीष्ठ विचारतात " क्या खयाल है इस फिल्म के बारे मे ?"
" लडकी नाच रही है"
"इतना सीधा नही है मामला. अगर सीधा होता तो जान कि जोखीम लेकर ये स्मगल नही करते"
यावर विजय जे उत्तर देतो ते त्याच्या तीव्र बुद्धीमत्तेची साक्ष देते.
" इस सवाल का जवाब तो ये लडकी ही दे सकती है "

महाराजा नेटफ्लिक्स विजय सेतुपती.. गेल्या आठ दहा वर्षात इतका झकास इतका जबरदस्त चित्रपट आलेला नाही.. सस्पेन्स, acting, संवाद, action सगळं सगळं जुळून आलंय. नक्की बघा!

>>>>म्हणजे साधारण ९ वाजता पूर्वेकडे बघून, मग ३-४ तासांनी डोक्यावर बघून आणि नंतर पहाटे पश्विमेकडे बघून हे लोक चर्चा करत होते का?
Lol Lol

>>>>>>चंद्र प्रत्येक फ्रेम मधे असावा म्हणून जवळच झाडावर चिकटवलेला आहे. तो चंद्रच असावा. नाहीतर एका रॅण्डम दिव्याला इतके फुटेज का देतील्?

>>>> चाँद मिलता नही सबको संसार मे, है दियाही बहुत रोशनी के लिए वगैरे काही डीप असेल तर माहीत नाही.
वाह वाह!!

Pages