लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
गुढघ्यातल वन्गण म्हणजे जवस
गुढघ्यातल वन्गण म्हणजे जवस वाटी वाटी खा >>> बापरे! हे अजूनच बेकार फॉर्वर्ड्स.
पुर्ण ग्रुप सतत या एकाच कुटूबाने व्यापुन टाकलेला असतो >>> अवघड आहे!
बरं झालं आपलं शिक्षण पूर्वीच
बरं झालं आपलं शिक्षण पूर्वीच झालं... असं वाटून जातं हल्लीचं बघून>> शप्पथ !!
जसे की अमृतांजनचा वास वगैरे येणारी कशी ती शेवटची पिढी आहे>> का ? आता बंद झाले का अमृतांजन ?
अमृतांजनचा वास वगैरे येणारी
अमृतांजनचा वास वगैरे येणारी कशी ती शेवटची पिढी आहे >>> याबद्दल का उमाळे यावेत? म्हणजे आपले डोकं दुखत नसेल तर अमृतांजनचा वास का आवडतो? आणि मिळतंच की अमृतांजन. आम्ही पण लावतो. What exactly they are missing?
ज्यांच्या कडे ती aluminium ची
ज्यांच्या कडे ती aluminium ची पेटी असायची ते देखिल मिरवत असत >> हि कोणती बॉ पेटी? खूप प्रयत्न करूनही आठवत नाहीये.
आणि मिळतंच की अमृतांजन. आम्ही पण लावतो. What exactly they are missing? >> हल्ली सगळे अमृतांजन रोलॉन लावतात. तो टिपिकल पिवळ्या क्रिमचा चिकटपणा आणि तो विशिष्ठ वास is what they are missing.
अमृतांजन कंपनीनेच ते पिवळे क्रीम बंद पडू नये म्हणून असले मेसेज प्रसवले असतील.
@पियू तुम्ही aluminium
@पियू तुम्ही aluminium school box असे google केल्यावर लगेच समजेल बघा.
बघितले. Thanks. मला माझ्या
बघितले. Thanks. मला माझ्या उभ्या हयातीत ३०+ वर्षाच्या हे अल्युमिनियमचे दप्तर प्रत्यक्ष पाहिल्याचे आठवत नाहीये कुठेच. असो.
माझा पेट पीव्ह:
माझा पेट पीव्ह:
माबो ॲपवर हल्ली ' मुंबई/ नवी मुंबई एक्सप्लोर करा ' असा मेसेज सारखा येतोय. आणि तो मेसेज बंद केला तरी एक भिंग उगीचच ॲप मध्ये राहतंय. त्याच्यावर क्लिक करायचा मोह होतो पण नक्की कुकी किंवा काहीतरी ऍड होईल मोबाईल मध्ये अशी भीती वाटते.
अजून एक पेपी :
अजून एक पेपी :
गूगल कीबोर्ड वापरून मोबाईलवर लिहिताना कोणत्याही शब्दाला सिलेक्ट करून मायबोलीने दिलेला formatting चा ऑप्शन वापरायचा असेल (बोल्ड, इटालिक, स्त्राईक थ्रू वगैरे) तर फार दमछाक होते. तो शब्द सिलेक्ट केल्यावर गुगल कीबोर्ड स्वत:चे कट, कॉपी, सिलेक्ट, वेब सर्च वगैरे ऑप्शन दाखवतो ज्याच्या मागे formatting चे ऑप्शन लपले जातात.
ट्रेन/बस मध्ये लोकं इअरफोन
ट्रेन/बस मध्ये लोकं इअरफोन/हेडफोन न वापरता सिरियल्स बघतात / व्हिडियोज बघतात त्याने खूप चिडचिड होते माझी. तरीही मी नम्रपणे विचारते कि हेडफोन नाहीय का ? कारण तुमच्यामुळे इच्छा नसताना मला पण ऐकायला लागतंय . ९०% वेळा बंद होतो व्हिडियो बाकि वोल्युम लहान केला जातो.
दुसरी गोष्ट म्हणजे ते व्हिडियोतील exclamation sounds. घरी जरी कोणीही ऐकत असेल तरीही ते विचित्र आवाज मला नाही ऐकवत
' मुंबई/ नवी मुंबई एक्सप्लोर
' मुंबई/ नवी मुंबई एक्सप्लोर करा '... हे मलाही येतं आहे, मायबोली क्रोममधून वापरताना! त्यादिवशी कोणत्यातरी धाग्यावर चवळी बाबत लिखाण होते तर सगळे चवळी शब्द अधोरेखित झाले होते आणि खाली त्या निळ्या पट्टीत 'चवळी खरेदी करा' असे दिसत होते!!!
ट्रेन/बस मध्ये लोकं इअरफोन/हेडफोन न वापरता सिरियल्स बघतात / व्हिडियोज बघतात त्याने खूप चिडचिड होते....
मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता स्पष्ट सूचना लिहिलेल्या आहेत... इयरफोनशिवाय गाणी ऐकण्यास / व्हिडिओ पाहण्यास सक्त मनाई आहे. आधी ती सूचना दाखवायची, तरीही नाही ऐकला तर सरळ ड्रायव्हर/कंडक्टरकडे तक्रार करायची.
(संपादन - आता हा प्रतिसाद लिहिला तर त्यातील 'मुंबईच्या' हा शब्द अधोरेखित झाला आहे आणि खाली मुंबई explore करा!)
व्हिडियोतील exclamation
व्हिडियोतील exclamation sounds. >>> +१. माझ्या तर ते fwd केलेल्या क्लिप्स मधले भयंकर हसण्याचे आवाज पण डोक्यात जातात
fwd केलेल्या क्लिप्स मधले
fwd केलेल्या क्लिप्स मधले भयंकर हसण्याचे आवाज....
हसण्याचा आवाज??? तो हसण्याचा कमी आणि घोड्याच्या खिंकळण्याचा आवाज जास्त वाटतो! आणि असे काहीतरी फालतू pranks वाले किंवा एखादया गाण्याच्या ओळी / प्रसिध्द डायलॉगवर वगैरे लीपसिंक केलेले व्हिडिओ कोणी पाहत असेल तर वाटतं... आधी इंटरनेट महाग होतं तेच बरं होतं!!!
काय लोक आहात यार तुम्ही!!!
काय लोक आहात यार तुम्ही!!!
हॅहॅहॅ चायनिज आवाजात ऐकणे. नो नो नो नो असं ऐकणे. नो बडी इज गोईंग टू टू, नोबडी इज गोईंग टू नो ऐकणे .... हे कानाला आणि मनाला किती सुदिंग असतं!
घोड्याच्या खिंकळण्याचा आवाज
घोड्याच्या खिंकळण्याचा आवाज
आधी इंटरनेट महाग होतं तेच बरं होतं!!! >>> अगदी अगदी
>>>नो नो नो नो असं ऐकणे
>>>नो नो नो नो असं ऐकणे
आणि ते हँअँ
ते लिहीता पण येत नाहीये.
ऊऊऊऊऊऊऊ >>>>> असाही एक
ऊऊऊऊऊऊऊ >>>>> असाही एक हसण्याआधी हालाप असतो
व्हिडियोतील exclamation
व्हिडियोतील exclamation sounds.>>> फारच डोक्यात जातो हा.
माबो ॲपवर हल्ली ' मुंबई/ नवी
माबो ॲपवर हल्ली ' मुंबई/ नवी मुंबई एक्सप्लोर करा ' असा मेसेज सारखा येतोय...
हे अगदी बरोबर आहे आणि प्रचंड इरीटेतींग आहे
माबोवरच्या मोठ्या मोठ्या
माबोवरच्या मोठ्या मोठ्या येणार्या जाहिराती खरंच डोक्यात जातायत. ब्लॉकच करून टाकतात सगळं पेज.
ऊऊऊऊऊऊऊ >>>>> असाही एक हसण्याआधी हालाप असतो>>>>>>>> +११ आणि ते हीहुडे /हीहोरे सारखं काहीतरी ऐकू येतं ते पण काय सगळ्या रिल्स मधे. वैताग
हीहुडे >> येस्स! ह्या पण
हीहुडे >> येस्स! ह्या पण माझ्या फेवरेट क्लिप्स. हे ऐकुनच हसू फुटतं. बाकी काही लागतंच नाही.
हीहोरे करेक्ट आणि किगोडे लोल!
हीहोरे करेक्ट आणि किगोडे लोल!!!
सध्या ते इयु (Eew) - ईयु
सध्या ते इयु (Eew) - ईयु ब्रदर इयु
काहीतरी सुरु आहे.
चवळी खरेदी करा' असे दिसत होते
चवळी खरेदी करा' असे दिसत होते>>>>
मी विद्या बालन चे रील बघितले तर त्यात न चुकता शेवटाला ते घाण खिकांळलेलं हसू असतंच असतं. त्यामुळे तिचे रील बघणे बंद केले
नो नो नो नो खरंच... वैताग १ नम्बर
गेल्या चार पाच दिवसांपासून
गेल्या चार पाच दिवसांपासून फोन वर बोलत असताना अचानक कॉल ड्रॉप होऊन मोबाईल नेटवर्क नॉट अव्हेलेबल असा मेसेज येतोय!
फार इरीटेटिंग आहे!
गेले कित्येक दिवस मी मोबाईल
गेले कित्येक दिवस मी मोबाईल वरून जॉइन केलेल्या झूम मीटिंग मधून आपोआप ड्रॉप होतेय. वैताग !!
प्लस, प्रत्येक वेळी मीटिंग जॉइन करताना मला नाव इंसर्ट करायला लावतो आहे ते वेगळेच !!
मला यूट्यूबवर व्हिडीओ
मला यूट्यूबवर व्हिडीओ संपायच्याही आधी ज्या इन-व्हिडीओ लिंक्स येतात त्या आवडत नाहीत. चिडचिडच होते. जे काही बघत असू त्याचा शेवट हुकल्याचं फीलिंग येतं.
मला यूट्यूबवर व्हिडीओ
मला यूट्यूबवर व्हिडीओ संपायच्याही आधी ज्या इन-व्हिडीओ लिंक्स येतात त्या आवडत नाहीत>>>>
मलाही. ४-४ मिनी स्क्रीन्स असतात.
एका घरगुती कार्यक्रमास गेलो
एका घरगुती कार्यक्रमास गेलो होतो. तिथे यजमानांचा पुतण्या त्यांना कार्यक्रमात जमेल तशी मदत करत होता. तो ग्रॅज्युएट झाला होता. आता नोकरी करायच्या वयात होता. अनेक वर्षांनी भेटला. मी त्याची आस्थेने विचारपूस केली. "किती लहान होती ही मुलं अगदी काही वर्षांपूर्वी, बघता बघता किती मोठी झाली" असा विचार करतोय तोच तिकडून एकजण आला. माझ्या जवळ येऊन त्या मुलाकडे बोट दाखवून त्याने मला विचारले, "कोण आहे हा? हा लहान असताना पाहिलंय बहुतेक याला मी".
मी सांगितले, "पुतण्या आहे तो तुमच्या मित्राचा"
"ओह्ह! संत्याचा मुलगा होय हा?" आणि इतक्यावर तो थांबला नाही त्याने त्या मुलाला मोठयाने हाक देऊन थेट प्रश्न केला, "अरे, इकडे ये. संत्याचा मुलगा होय तू? संत्या कुठे आहे?"
वीस बावीस वर्षाच्या मुलाला त्याच्या वडीलांविषयी एकेरी उल्लेख करून बोलणे थेट डोक्यात गेले.
एकेरी बोलावणे मलाही आवडते, एकेरी म्हणजे अनादर नव्हे व अहोजाहो केले म्हणजे आदर असेलच असे नव्हे हे सगळे मान्य. पण जिथे एखादी व्यक्ती कोणाला जर आदराने अहोजाहो करत असेल तर त्यांचा उल्लेख त्या व्यक्तीसमोर एकेरी करणे योग्य नव्हे. खूपच खटकले हे.
अगदीच रीलेट करू शकले अतुल.
अगदीच रीलेट करू शकले अतुल.
मी लहान असताना आईच्या एका परिचितांचा land line वर फोन आलेला. फोन उचलल्यावर ते म्हणाले "तुझी म्हातारी कुठे आहे? तिला फोन दे". मी खूप चिडले होते पण आईला फोन दिला.
नंतर मला कोणीतरी सांगायचा प्रयत्न केला की कोकणात असे बोलणे नॉर्मल आहे. पण मला अजूनही.. अगदी अजूनही त्यांचे तसे बोलणे लक्षात आहे आणि आवडलेले नाही.
डोक्यात जाणार्या लहान सहान
डोक्यात जाणार्या लहान सहान गोष्टी म्हणजे उवा,लिखा.
धोनीकट असेल तर रबर बँड, गाडीवरून जाताना धुराचे कण इ.
Pages