चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Srikanth पाहिला....उद्योजक श्रीकांत बोला यांच्याविषयी काहीच कल्पना न्हवती. थक्क करणारा प्रवास आहे त्यांचा...राजकुमार राव अक्षरशः जगलाय ती भूमिका...एक सेकंद अस वाटत नाही की तो आंधळा असण्याची ॲक्टिंग करतोय...बाकी ज्योतिका ,शरद केळकर यांचा प्रश्नच नाही...कुठलीही भूमिका असू देत ..उत्तमच करणार..
मूव्ही फास्ट आहे... फारसा रेंगाळत नाही...पण खूपशा गोष्टी नीट क्लिअर होत नाही..पण आवर्जून बघावा असा नक्की आहे....छोट्या छोट्या व्यंगांच भांडवल करून sahanbhuti मिळवणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे....

कलकी 2898 AD बघितला. पश्चात्ताप झाला. (सिनेमा बघण्याचा आणि आधीचा धागा न वाचल्याचा).

Noctornal animal इंग्रजी नेटफ्लिक्सवर..
नायिका, एक आर्ट गैलरी ओनर असते, तीचा एक्स हजबंड ज्याला ती वीस वर्षापूर्वी सोडून आली आहे, तीला एक स्वतः लिहिलेली कादंबरी पाठवतो..नायिका रोज रात्री कादंबरी वाचत असते..सिनेमा हा वर्तमान काळ, कादंबरी तील काळ आणि नायिकेचा भुतकाळ असा पैरलली चालत...चांगला आहे सिनेमा.. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो..
क्राईम, वायोलंस,न्युडिटी, इमोशनल सिनेमा...

Target कोरीयन प्राईमवर हिंदीत.
सु ह्युन नावाची तरूणी, ऑनलाइन एक सेकंड हैन्ड खराब वॉशिंग खरेदी करते..जाब विचारायला सेलरला कॉन्टॅक्ट करते आणि सुरू होतो स्टॉकिंगचा सिलसिला.. तीच्या स्वतः च्या घरात ती असुरक्षित होते...
थ्रीलर, सस्पेन्स खिळवून ठेवणारा सिनेमा..चांगला आहे..

कल्की बघितला काल तेलुगू वीथ सबटायटल्स..ठिक आहे सिनेमा बोअर तरी नाही झाला...थिएटर हाऊसफुल्ल होतं आमच्या कडं...

जय संतोषी मां !
किती सुंदर चित्रपट बनायचे पूर्वी !

फायनली लापता लेडीज बघायचा चान्स मिळाला. खूप आवडला. शेवटाला रडू आले अनेक दिवसांनी हल्का फुल्का नदिया के पार टाईप चित्रपट बघून फ्रेश वाटले.
मंजू ताई & जया विशेष आवडल्या, आणि रविकिशन पण.
अस्मिता & अंजली चे रीप्लाय +१००

मला दिपक ची पण ओव्हर अ‍ॅक्टींग नाही वाटली, त्याची ती तडफड, निराशा, हतबल झाल्याचे भाव खरे वाटले. पोलिस जेंव्हा फूल चे नाव घेतो तेंव्हा भाव बदलतात, जया बद्दल माणुसकी वाटायला लागते. हे सर्व किती छान केलेय त्याने.
भुषण ला पाहून मजा वाटली Happy

स्टेशन मास्तर धावत फूल ला कितव्या स्टेशना वर उतरायचे ते सांगतो, ते जास्त वाटले पण अशी गोड माणसं पण पॅरलल जगात असत असतिल ही भाबडी आशा पण छान वाटते.

नेटफ्लिक्स वर मी महाराज पहिला. सत्य घटनेवर आधारित आहे हे सिनेमा बघताना समजलं. १८०० च्या शतकात मुंबईत एक कम्युनिटी एका महाराज सदृश व्यक्तीला खूप मानत असे आणि त्या व्यक्तीला लोक जदुनाथ(यदुनाथ) महाराज किंवा J J म्हणून ओळखत होते. पण कम्युनिटीवरचा आपला होल्ड आहे या गोष्टीचा गैरफायदा घेत हि व्यक्ती चरणसेवेच्या नावाखाली गावातील विविध मुलींचे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करत असते. त्याच्याविरुद्धचा लढा म्हणजे हा सिनेमा. वन टाईम वॉच नक्कीच आहे. अमीर खानचा मुलगा जुनैद खान याची प्रमुख भूमिका आहे.
पदार्पणातच एकूण ग्लॅमरस भूमिका न निवडता अशी भूमिका निवडलेली बघून हा बाबाच्या मार्गावर जाईल की काय असं वाटायला लागलं. संवाद फेक आणि जिवणी या दोन गोष्टी सो सो वाटल्या. पण मुळात मला सिनेमाचे संवाद इतके आवडले. की मी आवर्जून शोधून पाहिले तर स्नेहल शाह म्हणून कोणीतरी आहे.

जो प्रश्न विचारत नाही तो भक्त अर्धवट आणि ज्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही असा धर्म आणि गुरु हे हि अर्धवट. देव आणि आपण यात कोणतेच माध्यम असण्याची गरज नाही. चांगले वर्तन म्हणजेच उत्तम धर्म अशा आशयाचे संवाद मला तर खूप आवडले.

लास्ट बट नॉट द लिस्ट. जयदीप एहलावत हा माणूस.... बाप रे, दिल हार गयी मैं. काय ट्रान्सफॉरमेशन केलं आहे त्याने. एकदम लिन झाला आहे. आणि त्याचे ते लांब केस, हाय व्हिलन वाटतच नाही, हिरोच.
त्याच्या वाट्याला संवाद तसे कमीच आहेत पण त्याने देहबोलीतून जो अभिनय वठवला आहे त्याला तोड नाही. मी ठार प्रेमातच.... त्याच्या चेहऱ्यावरचे व्रण त्याच्या सौंदर्यात भर घालतात असं माझं स्पष्ट मत आहे.

त्याच्या चेहऱ्यावरचे व्रण त्याच्या सौंदर्यात भर घालतात असं माझं स्पष्ट मत आहे. >>>
हो. शो बिझमध्ये चिकणेचुपडे रूप जास्त भाव खाते पण त्याने ते व्रण बलस्थान करून घेतले आहे. राजीमध्येही कसला पोकर फेस ठेवून वावरतो तो.

मर्डर मुबारक बघायचा केविलवाणा प्रयत्न केला. किती भारंभार कलाकार ते ही भारी भारी. पण सगळं बेगडी बेगडीच वाटलं.. २ च एपि. पाहिले बोर झाले. तिस्का चोप्रा किती चांगली अभिनेत्री..काय रोल दिलाय तिला Sad
कुणी पुर्ण पाहीला का?

आशु Happy
बंडल आहे मर्डर मुबारक. कुठल्यातरी पानावर दणाणून नावं ठेवलीत. सारा अली खान पासून 'चार सिनेमे' दूर रहाणार आहे.

जयदीप अहलावत बद्दल माझेमनला+1.

-------------
मीही बघितला महाराज. जयदीप अहलावतच्या नजरेत 'सेक्स अपील' आहे. या सिनेमात तर 'look at me, no one's more charming than me' अशी देहबोली आहे. जी मॅन्युपुलेटिव्ह- स्त्री लंपट म्हणून एकदम चपखलपणे वाहवून नेली आहे. जुनैद खान मला माहीतच नव्हता, मला वाटलं बी ग्रेड गुजराती नट आहे. कारण हिंदी उच्चार व बोलताना होणारी ओठांची हालचाल असह्य होते. एकुण वावर बघून जयदीप जरासंध वाटतो मात्र जुनैद भीम न वाटता 'छोटा भीम' वाटतो. Lol

एवढ्या अल्पवयीन मुली व स्त्रियांचे शोषण करून गुप्तरोग झाला तरी मुंगीच तर चावल्याइतका आविर्भाव. पटकथा फारच linear आहे, मधले मधले विनोदही तसे सपाटच पण पाणी शिंपडल्यासारखे. कपडे पट, घरं, सेट वगैरे दिडशे वर्षांपूर्वीचा वाटला नाही. आधुनिक वाटला. रंगपंचमीच्या गाण्यातला नाचही झेपला नाही. डेटिंग साठी इतकं मोकळं वातावरण बघून टडोपाच. जवळजवळ सर्वांचेच पदर 'धक धक करने लगा' साठी तयार वाटले तरी कोर्टात 'घुंघटमे बंद' वगैरे ऐकावं लागलं. शर्वरी वाघचे काम बरे आहे पण असं काही आव्हानात्मक नाही अजिबात. चित्रपटात जयदीप अहलावत काढून टाकला, शर्वरी ऐवजी गोरीघारी नसलेली नायिका आणि खांद्यावरून पदर घेणाऱ्या स्त्रिया असत्या तर हा माहितीपट झाला असता.

तरीही हा चित्रपट आवर्जून बघा. कारण यामुळे व्यक्तिपूजेचे स्तोम एकदा माजले की त्याविरोधात पावलं उचलणं भयंकर कठीण होते व समाजाचा कसा अधःपात होतो ह्याची पुनः पुनः जाणिव होते. जी अत्यावश्यक आहे. सर्वात आधी स्त्रियांचा बळी जातो, त्या कायम 'व्हल्नरेबल' असतात. शोषणाच्या सोयीसाठी आवर्जून 'व्हल्नरेबलच' ठेवल्या जातात.

कर्सनदास मुळजी व डॉ लाड यांच्या कार्याबद्दल या सिनेमामुळे कळले. जवळजवळ अशीच कथा मी 'अज्ञात विवेकानंद' या मूळ बंगाली पुस्तकात वाचली होती. जिथे एकेकाळी पश्चिम बंगाल मधील एका गावात महंताला नवपरिणीतेचा प्रथम 'भोग' द्यायची जाचक प्रथा होती. मग तो 'प्रसाद' समजून नंतर नवऱ्याने आयुष्यभर उपकृत व्हायचे म्हणे. ती विवेकानंदांनी मोडून काढली. या गोष्टी पुन्हा पुन्हा होत रहातात आणि याच्या मुळाशी फक्त व्यक्तिपूजा असते हे अधोरेखित होते.

जयदीप अहलावत चा मास्टरपीस म्हणजे ब्लडी ब्रदर हि झी वर आलेली सिरीयल नि अ‍ॅक्शन हिरो मधला त्याच्या प्रोटगॉनिस्ट व्हिलन. फॅन असाल तर शोधून बघाच. महान माणूस आहे !

अस्मिता गुड टू सी यु. तुझी आठवण येत होती पण दिसत नव्हतीस कुठे. विपु करणार होते.

जयदीप अभिनयात बापमाणूस आहे.

दक्षि पाताललोक बघ, प्राईम वर आहे.

दक्स प्राईम वर आहे.
अस्मिता, महाराज & आश्रम सिमिलर आहेत का? आश्रम मधे बॉबी ने सर्वांनाच खाऊन टाकलेय अभिनयात..त्या सीरीज ला अजून संपवले नाहिये..

असाच कंटाळा म्हणुन नेफ्लि उघडले आणि दिसेल तो चित्रपट पाहायला घेतला.

१. गुमराह - सिद्धार्थ रॉय कपुर, रोनित रॉय, मृणाल. ठिकठाक आहे. सि. पाहुन बंद करणार होते पण जौद्या म्हणत पाहिला. एन्गेजिंग आहे. गुमराह नाव बघुन जुन्यातली गाणी आठवत राहिली.

२. खुफिया - हाही एन्गेजिंग आहे पण फोकस कशावर तेच कळले नाही. तब्बु आणि मण्डळी.

ओटिटीवर चित्रपट पाहण्यातला सर्वात मोठा फायदा म्हणजे गाणी पळवुन लावता येतात Happy

महाराज मध्ये सर्व व्यवहार उघड उघड कुटुंबाच्या संमतीने चालू आहे.आश्रम मध्ये हे असं होतं हे कुटुंबाला माहीत नाही.शिवाय आश्रम चा इतर उद्योग, कारभार खूप मोठा आहे.

जयदीप अहलावत चा मास्टरपीस म्हणजे ब्लडी ब्रदर हि झी वर आलेली सिरीयल नि अ‍ॅक्शन हिरो मधला त्याच्या प्रोटगॉनिस्ट व्हिलन >>> नोटेड!

सांड की आँख पाहिला
स्टोरी जीव तसा कमी पण फुलवला आहे.
अत्यंत कर्मठ घरात आणि गावात राहणाऱ्या 2 वयस्कर महिला लपून नेमबाजी शिकतात आणि पुढे स्पर्धामध्ये भाग घेतात अशी स्टोरी.
चांगला आहे. खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित.

त्या घरातील पुरुष खूपच आयते दाखवलेत. शेतात काम अजिबात करत नाहीत असेही. असेल बाबा म्हणून सोडून दिला खटकलेला मुद्दा.

असामी, नोटेड.

अंजूताई Happy
आशु, अनु +१ Happy

बॉबी देओल अत्यंत सुमार दर्जाचा अभिनेता वाटतो मला. मख्ख एकदम. त्याच्या जुन्या 'आयाळ' रूपाचे सुद्धा काय करायचे कळत नसायचे. तो दुसऱ्यांना नाही खाऊ शकत, इतर सपोर्टिंग कास्टने उचलून धरलं होतं आश्रमला. तो तर फक्त 'ट्रिपल एक्स' कामं करायचा.

त्याच्या जुन्या 'आयाळ' रूपाचे सुद्धा काय करायचे >> एकदम आयाळ नको. Lol
जे त्यातून गेलेत त्यांना कसंसंच होईल.

त्याच्या जुन्या 'आयाळ' रूपाचे सुद्धा काय करायचे >> Lol एकदम चपखल शब्द उचलला आहेस. बॉबी सुद्धा मी एक अभिनेता आहे असे स्वतः म्हणत असेल असे वाटत नाही.

आयाळ शेमिंगोद्भव >>> कार्टवेलिअन भाषेत आहे कि काय म्हणून दचकलो. पण ळ दणदणीत आहे.

बॉबी देओल चा मख्ख डिझायनर पगडीधारी ठरकीपणा आश्रम ला अत्यंत लकी ठरला आहे.अश्या शोषण करणाऱ्या बाबाच्या चेहऱ्यावर जनरली असू शकतील असे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराचे भाव पण आहेत कधीकधी.
त्यातल्या त्यात अभिनय त्याने गुप्त आणि अनिमल मध्ये केलाय असं माझं अति वैयक्तिक मत आहे.

पूर्वी रहस्यकथा असायच्या.
त्याचा चेहरा कठोर झाला होता. आत्ता त्याच्या चेहर्‍यावर कसलेही भाव दिसत नसले तरी त्याच्या मनात खळबळ उडालेली आहे हे कॅप्टन दीपला ठाऊक होते.
गुरूनाथ नाईक हे द्रष्टे लेखक म्हणायला हवेत.

त्याच्या जुन्या 'आयाळ' रूपाचे सुद्धा काय करायचे >> एकदम आयाळ नको. Lol
जे त्यातून गेलेत त्यांना कसंसंच होईल.
>>
सद्य आयाळधारी लोकांनी काय करावं
Uhoh

Pages