एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.
आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.
तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.
खरंच थरारक अनुभव आहेत सगळे!!
खरंच थरारक अनुभव आहेत सगळे!!
मी दहा अकरा वर्षाचा असताना
मी दहा अकरा वर्षाचा असताना शेतात विहीर खोदायचं काम चालू होते. पंधरा फूट खोलीवर पाणी लागले. पाणी उपसण्यासाठी मामाच्या गावावरुन डिझेल इंजिन पंप आणला. दर दोन-तीन तासांनी पाणी उपसावे लागे. मोठा भाऊ इंजिन सुरू करायचा. मला देखील इंजिन चालू करून बघण्याची जाम इच्छा होत होती. पण इंजिन हॅण्डल मारुन सुरू करण्याचं एक टेक्नीक असते. इंजिन सुरू झाले की हॅण्डल हाताने पक्का धरुन बाजूला करायचा. नाहीतर हॅण्डल इंजिनाच्या गतीने फिरुन हवेत उंच जाऊन कुठेही पडतो. पण मी फार उतावीळ झालो होतो. एकदा विहिरीतील कामगारांनी आवाज दिला, भाऊ दूर होता मी पळतच गेलो आणि डाव्या हाताने व्हाल्वचा खटका पकडून उजव्या हाताने हॅण्डल मारला. गती येताच खटका आडवा केला नि ठो.. ठो.. करीत इंजिन सुरू झाले. आनंदाच्या भरात हॅण्डल तसाच सोडून लांब झालो. हॅण्डल गरगर फिरू लागला, ते पाहून भाऊ ओरडायला लागला. वर असणारी माणसं दूर झाली पण सगळ्यांना विहिरीतील लोकांची काळजी वाटून राहीली. सगळे श्वास रोखून माझ्याकडे रागाने व इंजिन कडे बघत होते. थोडावेळ फिरुन हॅण्डल आपोआप पाच सहा फूट उंच उडून विहिरीबाहेर पडला. त्या दिवशी मला खूप बोलणी खावी लागली.
नंतर काम चालू नसताना एक दोन वेळा इंजिन सुरू करुन हॅण्डल बाजूला करण्याची कला शिकून घेतली.
>> अतुल पाटील तुमचे अनुभव
>> अतुल पाटील तुमचे अनुभव खतरनाक आहेतच पण तुमची अनुभवकथनाची शैली पण आवडली.
>> Submitted by जिन्क्स on 15 March, 2020 - 11:58
धन्यवाद _/\_
>> माझ्या मित्राच्या छोट्या मुलाच्या वाढदिवसाला पु ष्पगुच्छातल्या थर्मॉकॉलचा छोटा गोळा त्याच्या नाकात गेला आणि अडकून बसला !सगळ्यांची अशी काही टरकली ना ! त्याला तोंडाने श्वास घ्यायला सांगून दवाखान्यात नेले. डॉक्टरानी फोर्सेप वापरून अलगद तो गोळा बाहेर काढल्या वर हुश्श झाले सगळ्याना.
>> Submitted by पशुपत on 16 March, 2020 - 10:34
अग्गदी असाच किस्सा माझ्या मुलाच्या बाबत घडला होता. थर्मॉकॉलचा छोटा गोळा ऐवजी इथे चणा होता. बाकी सगळा किस्सा सेम. रात्री उशिरा त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. तेंव्हा त्या निवासी डॉक्टरांचे कसे आभार मानावे तेच कळत नव्हते इतक्या लीलया त्यांनी फोरसेप नी तो काढला. डॉक्टर म्हणाले, वेळेत घेऊन आलात अन्यथा थोड्या वेळाने चणा फुगला असता तर खूप समस्या झाली असती. वेळ चांगलीच म्हणायची. कारण दुसऱ्याच दिवशी पहाटे माझी फ्लाईट होती.
>> ते थरारक ५-६ तास मी कधीही
>> ते थरारक ५-६ तास मी कधीही विसरणार नाही!! आजही कोणतीही चैनीची नवीन वस्तू घेताना मला ती रात्र आठवते. कधीतरी सगळं निरर्थक वाटायला लागतं.
>> Submitted by ललिता-प्रीति on 16 March, 2020 - 10:54
वाह! दोनच ओळीत खूप काही. खरं आहे !! वाईट प्रसंग आयुष्याचा अर्थ सांगतात
रोखलेला श्वास सगळे किस्से
रोखलेला श्वास सगळे किस्से वाचून आत्ता सोडला...हुश्श....काय भयंकर प्रसंग आहेत. बापरे...
परिचित - खतरनाक किस्सा...
परिचित - खतरनाक किस्सा...
इमर्जन्सी ड्युटी करताना नाकात
इमर्जन्सी ड्युटी करताना नाकात घातलेले दाणे आणि वाटाणे काढण्याचे तीन किस्से
1) एक बालक खेळत असताना शेंगदाणा नाकात घालून आले. मी तो forecps(चिमटा) घालून काढणार होतो पण एक युक्ती सुचली त्याच्या नाकात आमच्याकडे असलेल्या सर्जिकल कापसाची सुरली कारण नाकात घातली त्या बरोबर त्या पोराने फटाफट दोन शिंका दिल्या आणि दाणा बाहेर आला
2) एका पोराने वाटाणा नाकात घातला होता त्याचा वाटाणा नाकात फुगला होता. त्यामुळे तो बाहेर येत नव्हता आणि नाकात बधिर करायचे ड्रॉप्स टाकले तरी ते पुढे पर्यंत जात नव्हते त्यामुळे ते मूल चिमटा किंवा सक्शन प्रोब टाकू देत नव्हते. शेवटी त्याला झोपवून बापाला डोके जोराने दाबुन ठेवायला सांगितले आणि प्रोबने हळू हळू वाटाणा आतमध्ये ढकलत गेलो शेवटी वाटाणा त्याच्या घशात ढकलण्यात यश आले आणि त्या पोराने शिंक आणि खोकला एकत्र करून तो वाटाणा तोंडातील बाहेर काढला. हे प्रकरण थोडे धोकादायक असते. कारण वाटाणा घशात ढकलला आणि मुलाने जोरात श्वास घेतला तर वाटाणा श्वासनलिकेत जाऊ शकतो. याला काळजी घ्यावी लागते आणि केवळ रुग्णालयातच हे शक्य असते
3) तिसऱ्या पोराने मणी नाकात घातला होता. त्याला नाकात बधिर करण्याचे ड्रॉप टाकून सक्शन ने मणी बाहेर काढला. ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे कारण यात मणी घशात किंवा श्वासनलिकेत जाण्याची शक्यता नसते
एकांपेक्षा एक अनुभव आहेत
एकांपेक्षा एक अनुभव आहेत
अभया रात्री बेरात्री ऑफीस मधे
अभया रात्री बेरात्री ऑफीस मधे काम करत थांबते. बातमी छापली गेली पाहिजे, त्या आधी निघता येत नाही.
त्या इमारतीत भुताटकी असल्याच्या अफवांना ती घाबरली नाही.
मात्र एकदा.
पायाखालून काहीतरी वेगात गेल्याचा भास झाला.
तिने टॉर्च मारला. शंकाच नाही.
दोन डोळे लुकलुकले आणि ती किंचाळून बेंच वर चढली.
त्याबरोबर तो उंदीर बिळात नाहीसा झाला.
खूप च खतरनाक अनुभव अतुल,
खूप च खतरनाक अनुभव अतुल, परशूराम, पशुपत ह्यांचे. सिंहगड किस्से पण थरारक..
आज वाचला हा धागा... एकसे एक
आज वाचला हा धागा... एकसे एक अनुभव आहेत...माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट..
२ का ३ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका रविवारी मी आणि नवरा दोघच घरात होतो.. मुल माझ्या भावाबरोबर खेड शिवापूर ल गेली होती.. जेवण झाल्यावर मी ओटा वगैरे धुऊन तिथे दोन उदबत्त्या लावते ..( स्पेशली जेव्हा नॉनव्हेज चा बेत असतो तेव्हा) .त्यादिवशी पण तेच केलं...नवरा टीव्ही बघत बसला आणि मी पुस्तक वाचत..माझ्या किचन मध्ये MNGL च मीटर जिथे इंस्टॉल केले आहे ( त्याला जोडूनच गॅसचा पाइप खाली आला आहे) तिथेच खाली त्या भिंतीवर मी एका हुक ला कॅलेंडर लावलं आहे... उंचावर आहे..तिथेच खाली मी उदबत्त्या लावल्या...बऱ्यापैकी अंतर होत...वाचता वाचता मला कधी झोप लागली कळलंच नाही..५.३० ला जाग आली ..चहा टाकावा म्हणून किचन मध्ये गेले तर पूर्ण कॅलेंडर जळून ओट्यावर कागदाची राख पडलेली...सुरवातीला कळेनाच काय आहे हे .... नंतर लक्षात आल्यावर अक्षरशः हादरले.. उदबत्तीच्या ठिणगी ने पूर्ण कॅलेंडर जळल होत..तीच धग जर वर मीटर पर्यंत गेली असती तर. किंवा जळत कॅलेंडर किंवा त्याचा कागद खाली रबरी पाइप वर पडला असता तर... कल्पनेनीच घाम फुटला... मला अजूनही हे कळलं नाहीये की उदबत्ती ची ठिणगी एवढी वर गेली कशी? आणि एवढं कॅलेंडर जळल तरी वासानी जाग कशी आली नाही...माझ्या नवऱ्याच नाक तर फार तीक्ष्ण आहे.
कॅलेंडर खाली पडले असावे
कॅलेंडर खाली पडले असावे उदबत्तीवर. मग जळले असावे.
नाही हो..कॅलेंडर नीट हुक ला
नाही हो..कॅलेंडर नीट हुक ला फिक्स आहे...बर त्यातूनही कॅलेंडर खाली पडलं असत तर कॅलेंडर च्या वजनानी उदबत्ती आणि उदबत्ती स्टँड दोन्ही खाली पडल असतं...
कधी कधी जोराचा वारा किंवा
कधी कधी जोराचा वारा किंवा पंखा असेल तर उदबत्तीची देखिल ठिणगी उडते.
जळत कॅलेंडर किंवा त्याचा कागद
जळत कॅलेंडर किंवा त्याचा कागद खाली रबरी पाइप वर पडला असता तर....
म्हणून PNG system मध्ये जिथे तांब्याचा पाईप संपून रबरी पाईप सुरु होतो तेथे एक valve दिलेला असतो तो रात्री बंद करण्याची सवय लावून घ्या. (जसे पूर्वी आपण सिलेंडरच्या रेग्युलेटरचा valve बंद करत होतो तसे) अर्थात असा जळता कागद त्या पाईप वर पडला असता तरी काही झाले नसते कारण आताचे Suraksha hose तीन पदरी असतात. बाहेरचे नारिंगी रंगाचे रबरी आवरण, त्यात स्टीलच्या तारांच्या मजबूत जाळीचे आवरण (जे hacksaw blade ने सुद्धा पटकन कापले जात नाही, कापताना ठिणग्या येतात!) आणि आत पुन्हा काळ्या रंगाचे रबरी आवरण असा तो पाईप असतो. त्यापैकी बाहेरील नारिंगी आवरण तर विशेष रबराचे असते, ज्याला तेलानेही काही फरक पडत नाही, (एरवी रबर आणि तेल म्हणजे ३६ चा आकडा!) बाकी तांब्याचा पाईप आणि meter तर धातूचे बनलेले असतात, त्यांना तर अशा जळत्या कागदाने काहीच होणार नाही!!!
त्यांना तर अशा जळत्या कागदाने
त्यांना तर अशा जळत्या कागदाने काहीच होणार नाही!!!
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 11 July, 2024 - 02:35
तुम्ही त्यांच्या प्रसंगातील थराराकपणा पार बाहेर काढलात . >>> हा हा हा हा हा
@ विक्षिप्त_मुलगा ....तुम्ही
@ विक्षिप्त_मुलगा ....तुम्ही लिहिलेलं सगळं बरोबर आहे..पण त्यावेळेस खूप घाबरले होते हे मात्र खर.. By the way. .valve बंदच होता
चहात साखर नाही हे सांगितले तो
चहात साखर नाही हे सांगितले तो प्रसंग
भयंकर आहेत सगळे अनुभव. मी हा
भयंकर आहेत सगळे अनुभव. मी हा धागा सुरुवातीला वाचला आणि नंतर बहुतेक वाचलाच गेला नाही! केरोसीनच्या डब्यामुळे आग लागण्याचा सगळाच घटनाक्रम भयानक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग. तेव्हा माझा धाकटा मुलगा सहासात महिन्यांचा, म्हणजे बाळच होता. मोठा मुलगा आजूबाजूला गडबड असेल तर लवकर झोपायचा नाही म्हणून तो झोपेपर्यंत मी बाळाला घेऊन हॉलमध्ये बसायचे. नवरा मोठ्या मुलाबरोबर आत बेडरूममध्ये थांबायचा. त्या रात्री मोठा झोपल्यावर नवरा बाहेर आला आणि आम्ही हॉलमध्येच गप्पा मारत बसलो. बाळाला हॉलमध्येच खाली दुपटं घालून झोपवलं होतं. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे आम्ही निवांत होतो. अचानक पंख्याचा आवाज वाढला आणि तो घासल्यासारखा सावकाश फिरायला लागला. हॉलची लांबी जास्त असल्यामुळे दोन पंखे होते. ज्या पंख्याचा आवाज बदलला तिथेच खाली बाळाला झोपवलं होतं. पंख्याचं बटन मुख्य दाराशेजारी होतं. नवरा उठून पंखा बंद करायला गेला. मी बाळाला उचलून विरुद्ध बाजूला गेले. आवाज वाढत वाढत गेला आणि एका क्षणी हॉलच्या अर्ध्या बाजूच्या सिलिंगचं पूर्ण प्लास्टर काडकन आवाज करत मोठ्या तुकड्यांमध्ये खाली कोसळलं. पंख्याचं एक पातं वाकलं. एक मोठा तुकडा टीव्हीच्या युनिटवर पडला आणि तिथली मोठी काच फुटली. नवरा घाबरून मागे सरकून कोपऱ्यात उभा होता. त्याच्या अंगावर काही पडलं नाही कारण तो अगदी कोपऱ्यात होता, तिथलं प्लास्टर निघालं नाही. मी बाळाला घेऊन हॉलच्या दुसऱ्या बाजूला होते. अक्षरशः मिनिटभरात हे सगळं झालं. सगळीकडे धूळ उडाली आणि प्लास्टरच्या तुकड्यांचा खच पडला. आवाज एवढा मोठा होता की आमच्या समोर राहणारे उठून काय झालं ते बघायला आले. खालच्या मजल्यावरच्यांनाही आवाज ऐकू गेला असं दुसऱ्या दिवशी कळलं. आश्चर्य म्हणजे मोठा मुलगा मात्र या आवाजाने उठला नाही.
पुढे दोन तीन महिने गेले सगळं निस्तरायला. सगळ्याच घरातलं सिलिंगचं प्लास्टर फोडून काढलं आणि नव्याने केलं वगैरे वगैरे.
बापरे वावे! देवाची कृपा
बापरे वावे! देवाची कृपा म्हणून वेळेत बाळाला उचलायची बुद्धी झाली. खरंच थरारक आहे हा किस्सा. असं कसं पडलं प्लास्टर? अवघड आहे!
बापरे.सिलिंग कोसळणं म्हणजे
बापरे.सिलिंग कोसळणं म्हणजे फारच भयंकर.
वरचा गॅस चा अनुभव वाचला.अगदी सुरक्षा पाईप असेल तरी पाईप जोडला जातो तिथे ठिणगी पडली तर भीतीदायक.
सिलिंग नाही अनु, प्लास्टर.
सिलिंग नाही अनु, प्लास्टर.
छताला प्लास्टर करण्यापूर्वी स्लॅबला खालच्या बाजूने ओरखडे काढल्यासारखं रफ करतात, जेणेकरून प्लास्टर नीट चिकटून बसेल. ते पुरेसं केलेलं नव्हतं असं नंतर ज्यांना आम्ही हे सगळं काम करायला दिलं त्यांचं मत पडलं. त्यामुळे प्लास्टर सुटून आलं. ते एकसंध सुटलं. खाली पडण्याच्या वेळी एकूण वजनामुळे त्याचे तुकडे झाले. हॉलच्या मध्यभागी झुंबर वगैरे लावण्यासाठी हूक होता. आम्ही झुंबर लावलं नव्हतं. त्या हूकमधून जाणाऱ्या बरोबर एका रेषेपर्यंतचं पडलं. दुसऱ्या बाजूचं नाही पडलं.
नंतर दहापंधरा दिवसांनी आम्ही दुसऱ्या घरात भाड्याने रहायला गेलो दोन महिन्यांसाठी आणि या घराचं काम करून घेतलं. तितके दिवस घरात झोपताना भीती वाटायची. इतर कुठेही गेलं तरी पंख्याचा वेग वाढवायची भीती वाटायची. पंख्याचा थोडा जरी आवाज येत असला तरी सतत तिकडे लक्ष जायचं.
रमड, अगदीच. मुलं लहान असताना आपले instincts जास्त तीव्र असतात. काहीही बारीक जरी शंका आली तरी आपण मुलांच्या सुरक्षिततेचा विचार आधी करतो. Overreact ही करतो कधी. धोका होण्यापेक्षा ते कधीही चांगलं.
बाप रे वावे. मुलाचं नशिब थोर.
बाप रे वावे. मुलाचं नशिब थोर.
वावे भयंकर अनुभव. देवाची कृपा
वावे भयंकर अनुभव. देवाची कृपा तुम्ही सर्व सुखरूप राहिलात.
तुमचा टॉप फ्लोर होता का? आमच्या ओळखीतल्या १ मावशींकडे ४थ टॉप फ्लोर ला असेच घडले होते, पावसाचे पाणी गच्चीत जमत असल्याने सिलिंग ला तडा/चिरा गेल्या होत्या. ते कुटुंब जीव मुठीत घेऊन जगत होते.. नशीब अघटित घडले नाही.
डेंजर आहेत सगळेच किस्से
डेंजर आहेत सगळेच किस्से
भयंकर अनुभव वावे.
भयंकर अनुभव वावे.
बापरे… वावे खरेच नशिब चाण्गले
बापरे… वावे खरेच नशिब चाण्गले..
आमच्या शेजारी असेच झाले होते. सुन बाळाला बाहेरच्या खोलीत झोपवत होती पण सासु करवादली, बाळाला एकट्याला ठेवायचे नाही. बाळाला किचनमध्ये झोपवुन सगळ्या बाया तिथेच जेवत होत्या तेव्हा बाहेरच्या खोलीच्या सिलिंगचे प्लास्टर पडले. नशिबाने कोणीही बाहेर नव्हते.
आशू, हो, टॉप फ्लोअरच आमचापण.
आशू, हो, टॉप फ्लोअरच आमचापण. गच्चीवर आमच्या घराच्या वरच्या जागेवर एक छोटा हॉल आहे. त्याच्या दाराबाहेर पाणी साठायचं खरं. तेही कारण असू शकेल. खरं म्हणजे मी आत्तापर्यंत दुसऱ्या कुणाचा असा अनुभव ऐकलाच नव्हता. तुमच्या मावशीला आलेला आणि खाली साधनाताईंनी शेजाऱ्यांचा लिहिलेला अनुभव आमच्यासारखाच आहे.
नंतर मनात काय काय विचार येऊन गेले. मी कधीकधी बाळाला तिथे हॉलमध्ये झोपवून स्वैपाघरातली शेवटची आवराआवर करत असे. सुदैवाने तेव्हा हे झालं नाही. असो.
ए मी पण सुरवातीचे वाचलेत
ए मी पण सुरवातीचे वाचलेत प्रसंग असं आठवतंय. नंतर धागा व मी दोघे मागे पडलो बहुतेक! डेंजर अनुभव एकेक..!
वावे नशीबच योग्य वेळी योग्य बुद्धी झाली!
>>>>>>>>> पण सासु करवादली,
>>>>>>>>> पण सासु करवादली, बाळाला एकट्याला ठेवायचे नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण सासूबाईंची कॉलर कसली ताठ झाली असेल
Pages