बागकाम अमेरिका २०२४

Submitted by मेधा on 18 March, 2024 - 12:53

जगप्रसिद्ध फ्लावर शो संपला, वाटाणे आणि बटाटे यांची पेरणी करण्याचा मुहूर्त देखील टळला ( सेंट पॅट्रिक्स डे ) , तरी भाजीपाला लावण्याची काहीच तयारी नाहीये यंदा.

एका परिचितांकडून २० - २२ व्हाइट पाइनची रोपटी आणि काही हॉलीची रोपटी आणून लावली आहेत. मागच्या फॉलमधे लावलेले हिरवे जॅपनीझ मेपल चे झाड तगले आहे आणि त्यावर आता बारकी पाने दिसू लागली आहेत.

या वीकेंडला भाजीचा वाफा तयार करून वाटाणे तरी पेरावे असा विचार आहे. मग कार्ली ,दोडकी, भेंडी यांच्या बिया घरातच रुजत घालायला हव्यात .

यंदा झुकिनी लावणार नाही असा दरवर्षीप्रमाणे पण केला आहे .... पण ...

तुमचे काय प्लान्स मंडळी ? नवीन काही ट्राय करणार का कोणी ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केशर लावणार होतो पण नंतर राहून गेलं. आमचा ५a आहे. बघतो परत कंद कुठे मिळताहेत.
चार दिवस बाहेर होतो तर जॅपनीज बीटल्सनी पार वाट लावली सगळी. मटार, फरसबी, रासबेरी काही काही सोडलं नाहीये. काल पासून एकेको चुन चुन के डिश सोप बकेट मध्ये टाकतोय. बाहेर जाण्यापूर्वी एक दोन दिसलेले पण त्या जरा रंगीबेरंगी माशा असतील कशाला मारा करून सोडून दिलेलं. तेव्हाच गूगल लेन्स मधुन बघायला हवं होतं.
यंदा मुळा भरपूर आला आहे. काकड्यांचा वेल वाढतोय. आता फुलं दिसू लागतील. कलिंगड आणि चिबुड रुजलय चांगलं... भरभर वाढलं तर ठीक. तसे आता अजून जेमतेम दोनच महिने आहेत.
एकीकडल्या मटाराला आता बऱ्याच शेंगा लागल्या आहेत. स्ट्रॉबेरी खाल्या कोणीतरी.. ससा असावा.
यंदा अचानक उंदीर झाले.. पाच सहा तरी मारले. आता नाही दिसत आहेत. पण शेजाऱ्यांनी पण मारले पाहिजेत. सश्याला गोळ्या घालून अंधाधून केलं पाहिजे.

दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये बॅकयार्डमध्ये कडेला लावायला चांगली फळझाडे, फुलझाडे सुचवता येतील का ? बागेसाठी खूप वेळ/श्रम देता येणार नाहीत. ऑटोमॅटिक स्प्रिंकलर्स आहेत. उंदरांचा त्रास अजिबात नको. मागे झाले होते उंदीर. म्हणून जमिनीलगत येणारी फळे/भाज्या कटाप करून टाकल्या आहेत. एक फिग लावलं आहे. बघूया. संत्री, टांगेरीने , लिंबू हे ऑप्शन्स आधीच डोक्यात आहेत. अवोकाडो बद्दल काय मत आहे. ५-६ वर्षात फळ धरलं तर उत्तम. फुलांमध्ये गुलाब, जास्वंद आधीच आहेत. मोगरा, अनंत वगैरे होतो का इथे? किंवा कुठलीही रंगीबेरंगी छान दिसणारी फुलं चालतील. थोडक्यात असेल माझा हरी तर ... अशी परिस्थिती आहे. तरीही कबीराचे शेले विणून देणाऱ्या रामाने आमच्यासारख्यांसाठी सुद्धा काहीतरी झाडे निर्मिली असतील अशी आशा आहे.

अजबराव - कण्हेरी पाहिली आहे सॅन डिएगो / एल ए भागात. बोगनवेल, क्रेप मर्टल पण पाहिलेत . यात वेगवेगळे रंग सापडतील.
फळझाडांबद्दल. तिथले मायबोलीकर सांगू शकतील नाहीतर तुमच्या काउंटीच्या मास्टर गार्डनर एक्स्टेंशन ला फोन/ इमेल करुन विचारु शकता.

https://homeorchard.ucanr.edu/ इथे अधिक माहिती मिळेल .

मायाळू ला इंग्रजीत मलाबार स्पिनॅच, कन्नड मधे बसले सोप्पू, बंगालीत पोई / पूई शाक आणि तेलुगु मधे बच्चली कोरा/कूरा म्हणतात

मी केशराचे २५ कंद लावले होते एका वर्षी. बरीच फुले आली आणि केशराच्या काड्या गोळा केल्या होत्या>>>

वॉव्व्व्व्व!!!!

कॅली मध्ये लोकांच्या फ्रंट यार्डात संत्री, लिंबं, डाळिंबांची झाडं नखशिखांत लगडून गेलेली बघितले आहेत. आणि चेरी पण. त्यावरुन निगा सोपी असावी.
रातराणी भरपूर आणि सहज येते आणि वाढते, आणि वेलीवर येणारी जॅस्मिन सारखी पांढरी बारीक फुलं ही छान दिसतात. पाणी घातलं की झालं. कण्हेर, बॉगनवेल, आणि अगदी पाणी घालायला पण विसरायला होणार असेल तर कॅलिफोर्निआ पॉपी बघा. कुठेही उगवते आणि फुलली की मस्त दिसतात.

आमच्याकडे जुन पासून आजपर्यंतचे सरासरी तापमान ११० आहे. आणि पुढे सुमारे ३ महिने थोड्याफार फरकाने हीच कथा चालू असणार आहे. त्यामुळे या हवेला तग धरणारी झाडेच लावावी लागतात.
फुलांपैकी मोगरा, झेंडु, शंकासुर, कॄष्णकमळ बर्‍यापैकी फुलताहेत. जून मधे जास्वंदही छान फुलत होती, पण आठवड्यापूर्वी ११८ पर्यंत टेम्प. गेल्यानंतर , त्यानेही जरा माघार घेतली आहे.
अंजीर खूप येताहेत. छान गोड आहेत. ते वाटून टाकणे हाही एक उपद्व्याप आहे. विशेषतः या गर्मीमधे!
शेवगा पण खूप शेंगा देतो. डिसेंबरमधल्या आमच्या भारतवारीच्या काळात ड्रीपचा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे झाडाला झालेला ट्रॉमा भरुन यायला बराच वेळ गेला. त्यामुळे यंदा फारशी फुले धरलीच नाहीत. त्याच्या शेंगा आणि पाने नेहमीच डिंमांडमधे असतात.
डाळिंब या हवेला छान येतात. यंदाही आले आहेत. ते तयार होईपर्यंत नोव्हेंबर उजाडतो.
व्हेजगार्डनमधे यंदा झुकीनी लावली. खूप आल्या. अजूनही येताहेत. वांगी पण खूप आली. आता वांग्यानेही थोडी हाय खाल्ली आहे. सप्टेंबरनंतर परत त्याला सूर सापडेल.
मी घरी कंपोस्ट करते. त्यातूनही कधी कधी झाडे येतात. यावळी tomato , मिरचीची झाडं आली. १०-१२ tomatoes आणि ७-८ मिरच्या आल्या.
एकंदर या सीझनमधे इथलं बागकाम फारच चॅलेंजींग आहे.

मायाळू ला इंग्रजीत मलाबार स्पिनॅच >> ओह धन्यवाद ! मला का कोण जाणे हे उगाचच मुंबई मधे पावसळ्यातच मिळणारी एक भाजी असे वाटत होते. मला नाव आठवत नाही (हेच ते मायाळू असे वाटायचे) पण ती फक्त पावसाळा सुरू झाला कि मिळत असे नि पाणथळ भागांमधेच लावली जात असे. थोडीफार purslane सारखी दिसत असे.

त्यामुळे या हवेला तग धरणारी झाडेच लावावी लागतात. >> बोगनवेल, व्हर्बीना नि लँटाना पण घाला यादीमधे. शंभर झाल्या झाल्या बहरले लेकाचे.

येस... Northern California मध्ये भयानक उन्हाळा पडलाय. फळे, फुले, पाने करपत आहेत Sad आजच स्टार jasmine ला canopy लावली. Persimmon मलूल होतात संध्याकाळ पर्यंत. Literally रात्री 9 नंतर बॅक यार्ड मध्ये जाता येतेय तेव्हा परत हाताने सगळ्या झाडांना पाणी देतेय.

बोगनवेल, व्हर्बीना नि लँटाना पण घाला यादीमधे. शंभर झाल्या झाल्या बहरले लेकाचे. >>> असामी, व्हर्बीना आहे. लँटाना, बोगनवेल आधीच्या घरामधे होते. लँटाना मला आवडत नाही. बोगनवेल छान फुलते इथे. पण फार कचरा होतो, म्हणून नाही लावली.

लँटाना मला आवडत नाही. >>. मला पण ! मराठीत घाणेरी आणि कोकणीत मांजराच्या **ची फुले म्हणतात. त्यातून परत आमच्या झोनमधे अ‍ॅन्युअल - त्याच्यावर पैसे खर्च करायला मन धजावत नाही. लाँगवूड गार्डन मधे अगदी कौतुकाने लावलेली पाहून आश्चर्य वाटलं होतं पहिल्यांदा .

इकडे काही मंडळी बोगनबेल हिवाळ्यात घरात आणि उन्हाळ्यात बागेत असं करुन जपतात. आता मी पण कटिंग शोधते आहे

केशराचे कंद> भारीच!

आमच्याकडे या वर्षी भरपूर ब्लॅकबेरीज. त्या मानाने स्ट्रॉबेरीज कमी आल्या, शिवाय त्यात ससोबा वाटेकरी. रोमेन लेट्यूस सलग तिसर्‍या वर्षी फेल. लीफ लेटुस छान वाढतो मग याचेच काय बिनसते कोण जाणे. असेच मायाळूचे होवून मी नादच सोडला. चार्ड, आर्गुला, बीट, केल, शेपू, कांदे हे कायम साथ देतात. यावर्षी बी रुजवून केलेला सेज आणि ओरॅगानो छान वाढला. सध्या कुंड्यात आहेत , कायमसाठी वाफ्यात जागा करेन. गार्लिक चाईव, चाईव, थाईम आता छान एस्टॅब्लिश झालेत. पोल बिन्स छान वाढत आहेत पण बुश बिन्स खुरटल्यासारखे. दोन्ही एकाच वाफ्यात आहेत. बाकी बेसील, पार्सले, तोमातियो, टोमॅटो, मिरच्या वगैरे नेहमीचेच. यावर्षी त्यात नवे म्हणजे लेकाच्या आग्रहास्तव सान मारझानो आणि पेपरोन्सिनी. त्याला काँडोत शक्य नाही म्हणून मला भरीला घातले. त्याला देण्याइतपत पीक येवो म्हणजे मिळवले.
पुढील आठवडाभर कम्युनिटी गार्डन पाणी देणे, तण काढणे माझी ड्युटी आहे. त्या नेबरहुडात एक गॅरी नावाचे भटके मांजर आहे. ते स्वतःला गार्डनचे मालक समजते, सगळ्यांकडून लाड करुन घेते.

इकडे काही मंडळी बोगनबेल हिवाळ्यात घरात आणि उन्हाळ्यात बागेत असं करुन जपतात. >> आम्ही करतो तसे. फारशी मेहनत करावी लागली नाही. पाने गळून जातात स्प्रिंग येईतो सगळी.

जमिनीच्या खाली वाढणारे बरेचसे कंद थंड प्रदेशात सहज वाढतात. समुद्र किनाऱ्याजवळची ऊष्ण दमट हवा मानवत नाही. केशरासाठी विशेष थंड हवा लागते. इथल्या चर्चेत समजले की अमेरिकेत काही भाग अशा हवामानाचा आहे. तर विचारलं की केशर लावून पाहणे. भले मोठे पीक जरी घेतले नाही तरी येणारी फुले सुंदरच असतात. काहींनी हा प्रयोग करून व्यवस्थीत नोंदी केल्या तर पुढच्यांचे काम सोपे होईल. थंड हवामानाचा उपयोग केला जाईल.
https://youtu.be/ky8l85mBV6Q?si=T-PUVoFWGMLNcoyu

https://youtu.be/0pMsCyTN7mI?si=7mPShuULazeAfr-6

Channel mountain fairy https://youtube.com/@mountainfairy?si=pIG4IsXrki53ZUBf

Pages