Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी ८१ वर्षाचा आहे नि आताचे
मी ८१ वर्षाचा आहे नि आताचे रिपब्लिकन बघता डेमोक्रॅट आहे, पण बायडेन?
वरचे चित्र अगदी अॅप्ट आहे
वरचे चित्र अगदी अॅप्ट आहे इतकी निराशाजनक निवडणूक कधी पाहिली नाही. अमेरिका हॅज नो होप
वरचे चित्र अगदी अॅप्ट आहे
डबल.
वरचे चित्र अगदी अॅप्ट आहे
हे ३ दा आपोआप पोस्ट झाले हे आयरॉनिक आहे
म्हातार्या बायडनने आपल्या
म्हातार्या बायडनने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाने अब्जावधी प्रेक्षकांची मने जिंकली.
आपण शरीराने, मनाने, बुद्धीने एखाद्या १८ वर्षाच्या नवतरूणापेक्षा जास्त तेजस्वी, शक्तीमान, निरोगी आणि एकंदरीतच ठणठणीत आहोत असे बायडनसाहेबांनी ह्या कार्यक्रमातून सप्रमाण सिद्ध केले.
म्हातारा, जराजर्जर, कवळीधारी भ्रमिष्ट म्हणणार्या सगळ्या टीकाकारांचे दात घशात घालण्याचा पराक्रम ह्या थोर राष्ट्राध्यक्षाने केला आहे.
नोव्हेंबर २०२४ च्या निवडणूकीत भरघोस मताने निवडून यायचा एक निव्वळ उपचार बाकी आहे खरा पण आपल्या नेत्रदीपक कामगिरीने म्हातार्याने ही मोहिम आत्ताच यशस्वीरित्या पूर्ण केली आहे असे म्हणायला हरकत नाही!
अरे काय हे ! शेंड्यांच्या
अरे काय हे ! शेंड्यांच्या अलंकारिक पोस्ट ची आज वाट पहात होते मी खरं तर पण बायडन च्या कालच्या परफॉर्मन्स नंतर बहुधा तेही फ्रस्ट्रेट झालेले असावेत असे वरचे पोस्ट आहे
बाकी मतभेद काही असोत, बायडेन
बाकी मतभेद काही असोत, बायडेन बद्दल शेंड्यांच्या पोस्ट वाचणे बेफाम करमणूक ! बहुदा अजून बोरूला टोक करत असावेत.
निराश, हताश (मायबोलीच्या
निराश, हताश (मायबोलीच्या मराठीत फ्रस्ट्रेट) वगैरे काही झालेलो नाही. एका टुणटुणीत म्हातार्याने माझ्या सगळ्या शंका दूर केल्या.
अजुन थोडी बेफाम करमणूक!
बिचार्या कॅलिफोर्नियाच्या निराश न्युसन्सने आपल्या गुडघ्याला ( आपले जगप्रसिद्ध केस विस्कटू नयेत म्हणून) बांधलेले राष्ट्रपतीपदाचे बाशिंग आता उतरवायला सुरवात केली आहे असे कळते!
आपल्या अमोघ वक्तृत्त्वाने म्हातार्याने त्याच्य चाहत्यांना आणि विरोधकांनाच नाही तर ट्रंपलाही अवाक केले. आपले काही चालणार नाही. निमूटपणे आपण तुरुंगवास, फाशी, काळे पाणी जी काही शिक्षा म्हातारा देऊ इच्छितो ती निमूट स्वीकारून उरलेले आयुष्य घालवावे अशी खूणगाठ बिचार्या ट्रंपने बांधली असावी!
आता डेमोक्रॅट पक्षात पाच महिने आनंदोत्सवाचा जल्लोष चालणार. हत्तीवरून (की गाढवावरून?) साखर वाटणार. सगळी मजा आहे!
असे ऐकले की ट्रंपवर एका वृद्ध
असे ऐकले की ट्रंपवर एका वृद्ध माणसाची निर्घृण हत्या केल्याच्या आरोप ठेवला गेला आहे. कालचे वाग्द्वंद्व संपताच ह्यासंबंधीची कागदपत्रे ट्रंपच्या हातात ठेवली गेली.
"पण मी काहीच केले नाही. तो सभेला आला तेव्हाही ह्याच स्थितीत होता" ट्रंपने आपला बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण व्यर्थ!
https://babylonbee.com/news/trump-indicted-for-murdering-elderly-man-on-cnn
असे म्हणतात की कालच्या
असे म्हणतात की कालच्या कार्यक्रमापूर्वी तरतरी यावी म्हणून कुलदीपक बायडन आपल्या म्हातार्या बापाला कोकेनची पुरचुंडी देण्याचे ठरले होते पण हंट्याला स्वतःलाच जरा जास्त झात्यामुळे त्याने चुकून झोपेचे औषध असलेली पुडी बापाला दिली आणि म्हातार्याने ती रीतसर रिचवली आणि पुढचा घात झाला.
एक त्यातल्या त्यात बरी गोष्ट
एक त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे जेक ट्यापर आणि डॅना बॅश यांनी सूत्रसंचालन चांगले केले. आदल्या दिवशी ट्रंपची प्रवक्ता येऊन टॅपरने ट्रंपला हिटलर म्हटले होते वगैरे वस्तुस्थिती समोर आणली होती त्यामुळे कदाचित हे दोघे जरा जास्त जपून वागले.
अर्थात अर्धमेल्या असणार्या बायडनला पक्षपात करून झुकते माप देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्याकडे कुठल्याही झुकत्या मापाचा फायदा करून घेता येईल इतके मानसिक संतुलन नव्हते.
बायडन ह्या वादविवाद स्पर्धेची
बायडन ह्या वादविवाद स्पर्धेची तयारी करण्यासाठी कँप डेव्हिड ह्या अध्यक्षासाठी खास बांधलेल्या मेरिलँड ह्या राज्यातील आलिशान पर्यटन (रिसॉर्ट) स्थळी आठवडाभरापूर्वी दाखल झाला होता. त्याच्या मदतीसाठी शेकडो तज्ञ लोकांची फौज तैनात होती. ते महान ज्ञानी जाणकार म्हणे त्याला चर्चेचा फड कसा मारावा ह्याचे मार्गदर्शन करत होते. प्रत्येक संभाव्य प्रश्नाची, प्रतिप्रश्नाची कसून तयारी करून घेत होते. आपली राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी देखील आठवडावर सुट्टीवर होती (तसेही ह्या मुडद्याचा आडोसा वापरून कुणीतरी कारस्थानी इसम राष्ट्राध्यक्षपदाचा कारभार चालवतो आहे असा संशय येतोच आहे!)
हुकुमशहा ट्रंप मात्र आपले नेहमीच्या प्रचारसभा घेण्यात व्यस्त होता.
ह्या वाग्द्वंद्वातून म्हातार्या बायडनने आपल्या आठवडाभराच्या अविरत मेहनतीला न्याय दिला आहे. एखाद्या विषयाचा कष्टपूर्वक सखोल अभ्यास केला तर त्यात दैदीप्यमान कामगिरी करता येते. मग ह्यात वय वगैरे आड येत नाही हे म्हातारबाने सप्रमाण सिद्ध केले!
म्हातार्याने हा कार्यक्रम पार पाडून टाकल्यानंतर ह्या समस्त शेकडो मार्गदर्शक तज्ञांना "होय आम्ही ह्या म्हातार्याची डिबेट तयारी करून घेतली" असे अभिमानाने आपल्या बायोडेट्यात लिहिता येईल!
कालची डिबेट म्हातारबासाठी
कालची डिबेट म्हातारबासाठी इतकी वाईट ठरली की हिलरीबाईंनी आपल्या विजयाचे भाषण आणि बायडन साहेबांची सुसाईड नोट एकाच बैठकीत लिहून काढल्या!
कालची डिबेट म्हातारबासाठी इतकी वाईट ठरली की आज पुटिनने बायडनला विष चारल्याच्या आरोपाचा साफ इन्कार केला!
कालची डिबेट म्हातारबासाठी इतकी वाईट ठरली की राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या दडपणामुळे कमलाबाईचे केस एका रात्रीत पांढरे झाले!
कालची डिबेट म्हातारबासाठी इतकी वाईट ठरली की डिबेटचे पोस्टमॉर्टेम करावे का म्हातारबाचे करावे असा गोड प्रश्न सी एन एन पडला होता!
कालची डिबेट म्हातारबासाठी इतकी वाईट ठरली की अनेक ट्रान्स मंडळी रिपब्लिकन म्हणून ट्रान्जिशन करती झाली!
Biden’s Inner Circle Deserves
Biden’s Inner Circle Deserves Some Blame Too
Even with perfect delivery, the substance of the performance was not built for victory in our terribly flawed modern political environment.
BY DAVID DAYEN JUNE 28, 2024
You can start with Biden’s first two answers, which sent Democrats to their phones to text each other in despair. Biden was clearly fed way too many figures and had way too many points to hit on his script for someone with his difficulties in communicating.
Asked about the economy, he started off saying that COVID put the country in a state of collapse. He had to check off 15 percent unemployment under Trump (in fairness, that was the peak for only one month at the outset of lockdowns), and then 15 million new jobs under him, and then 800,000 manufacturing jobs. He got two out of three, actually saying, “We created 15,000 jobs.” He then pivoted to feeling Americans’ pain over high prices. He then promised two million new housing units to lower prices, but he was also told to mention corporate greed as a cause of the inflation problem. Then there was a pivot back to his record, about lowering the cost of insulin and the out-of-pocket cap on all drugs for seniors. Both of these had figures attached, both of which he got wrong. He said he brought insulin down to $15 a shot; it’s $35 a month. He said the cap on out-of-pocket costs starting next year would be $200; it’s $2,000. (Biden corrected these numbers when he went back over most of these same points in his closing statement. This is how you know it was a deliberate, prepared sequence.)
The delivery was poor and the errors regrettable. But if Biden nailed every word of this, it would be bad, a meandering journey jumbling up Trump’s record, Biden’s record, and some plans for the future. Filling Biden’s head with all of these details and this precise sequencing created the slipups. It was clearly calibrated by committee, an attempt to thread the needle of boasting, empathy, and vision in a way that did none of it.
On the second full question, which was about the national debt, of all things—a throwback to the fiscal scolds who dominated the 2016 debates—Biden tried to fit in Trump’s contribution to the debt over his term, the $2 trillion Trump tax cut, the fact that a thousand billionaires in America (Biden said trillionaires first) pay 8.2 percent in taxes, how much money would be raised if they paid “24 percent or 25 percent, either one of those numbers,” and then what could be done with that money, which included deficit reduction, child care, elder care, and strengthening the health care system. This was the answer with the ghastly ending where Biden talked himself out and then landed on “we finally beat Medicare,” by which he meant that his administration beat Big Pharma by allowing negotiation of prescription drugs within Medicare.
You can almost see the mental scrolling through the briefing book in this answer, trying to fit in all of these policy concepts. On their own, each one is reasonable to bring up in a political debate: Running up debt is unpopular (if irrelevant), tax increases on the wealthy are popular, and using that money to lower cost burdens on families is popular, particularly in health care. But rehearsed passages with lots of figures don’t play to the strengths of this president, and more important, don’t play to the strengths of presidential debates.
By contrast, Donald Trump walked out there, called Biden the worst president in history, brought almost everything back to his depiction of a lawless border, said it over and over again with conviction, refused to answer any question and returned to his two points, and lied his ass off. It was terrible. But if “politics is television with the sound off,” as Karl Rove once said, it was no contest.
This was over in the first ten minutes. Biden actually improved a bit after that, but the narrative was set. He improved by throwing away the script and showing a little emotion. But who put that script into Biden’s head in the first place? His debate preppers. And let’s name names here: Ron Klain, Anita Dunn, Ben LaBolt, Jen O’Malley Dillon, Cedric Richmond, Julie Chavez Rodriguez, Quentin Fulks, Michael Tyler, and Rob Flaherty.
They were the ones who thought you could bring a white paper to a knife fight, to fight a con man with Tracy Flick. They were the ones who thought voters really wanted to hear about the 8.2 percent effective tax rate on the ultra-wealthy and the net revenue that will be earned over the ten-year budget window by reinstating an alternative minimum tax.
अमेरिकन प्रॉस्पेक्टमधे कालच्या डिबेटचे David Dayen ने केलेले एकदम पर्फेक्ट अॅनॅलिसिस! (The American Prospect is a daily online and bimonthly print American political and public policy magazine dedicated to American modern liberalism and progressivism.)
हे असले डिटेल्ड व भरपुर आकडेवारीने भरलेले ( ओव्हर) प्रिपरेशन बिल क्लिंटनला लिलया पेलले असते! पण वार्धक्य आलेल्या बायडनचा तो स्ट्राँग पॉइंट कधीच नव्हता. उतारवयाच्या माणसाला असले मेंटल जिमनॅस्टिक करायला भाग पाडणार्या त्याच्या सिनिअर अॅडव्हायर्सना हाकलुन दिले पाहीजे.
( बाय द वे इथे कोणाला १९९२ मधले बिल क्लिंटन-सिनिअर बुश व १९९६ मधले बिल क्लिंटन- बॉब डोल यांच्यातले प्रेसिडेंशिअल डिबेट्स आठ्वतात का? काय एक एक नंबर्स व आकडेवारी तो फेकुन मारत होता बुश- डोलच्या तोंडावर! बुश सिटिंग प्रेसिडेंट असुनही त्याच्या प्रेसिडेंसिमधली सगळी आकडेवारी बिल क्लिंटन सांगत होता! .. बुश एवढा बावचळुन व थक्क होउन गेला होता की असेल असेल असे काहीतरी म्हणुन तो वेळ मारुन नेत होता )
Biden’s Inner Circle Deserves
.
मुकंद, पोस्ट आवडली.
मुकंद, पोस्ट आवडली.
बिल क्लिंटन-बॉब डोल डिबेट आठवतायत. तेव्हाही थोड्या काळासाठी ट्रंपच्या प्रेसिडेंशिअल बिड बद्दल काहीतरी न्युज मधे होते ना?
आकडेवारी वगैरे सगळं ठीक आहे,
आकडेवारी वगैरे सगळं ठीक आहे, पण ॲबॉर्शन-इमिग्रेशन घोळ काही झेपला नाही. आणि आकडेवारीमध्येही डिबेट्स काय रिहर्स्ड उत्तरं पाठ करून जशीच्या तशी सांगण्यावर होत नसतात.
काय एक एक नंबर्स व आकडेवारी
काय एक एक नंबर्स व आकडेवारी तो फेकुन मारत होता बुश- डोलच्या तोंडावर! बुश सिटिंग प्रेसिडेंट असुनही त्याच्या प्रेसिडेंसिमधली सगळी आकडेवारी बिल क्लिंटन सांगत होता! .. >> दुब्या नि गोर मधली डीबेट्स आठवतात का तुला ? गोर आकड्यांमधे घुसला कि दुब्या थेट 'अरे हे आकडे वगैरे सगळे पंडीतांसाठी " असा सूर लावून एकदम ईमोशनल भाषणे सुरू करत असे.
डिबेट नंतर जिल बायडेन ज्या
डिबेट नंतर जिल बायडेन ज्या भाषेत जो शी बोलत होती ते पहाता potty training सुरू असलेल्या लहान मुलाशी आई कशी बोलेल ते आठवले !
हे लोक इतके टोन डीफ आहेत का ? आपण करतोय ते इतके हास्यास्पद व पॅथेटिक आहे हे कळत नाही ? की काही होवो, लोक झक मारत ट्रम्प विरुद्ध मतदान करतील हा आत्मविश्वास ?
पण ॲबॉर्शन-इमिग्रेशन घोळ काही
पण ॲबॉर्शन-इमिग्रेशन घोळ काही झेपला नाही >> टोटली!
वरचा मुकुंदने दिलेला अॅनॅलिसीस चपखल आहे. पण त्याच्या मुळाशी गेलो तर लक्षात येते की हे कोठून आले सगळे. ट्रम्पचा मागा वोटर त्याच्यामागे घट्ट आहे. "वस्तुस्थिती" काय आहे याची त्यांना काही फिकीर नाही. फॉक्स व इतर माध्यमांतून कळते ती माहिती म्हणजे वस्तुस्थिती आहे असा त्यांचा समज आहे. त्यांना काही ठराविक मुद्दे आळवले की बास आहे. ते ट्रम्पने परफेक्ट केले. ट्रम्प कॅम्पेनला "सबर्बन स्त्रिया" आपल्या बाजूला वळवणे गरजेचे आहे हे गेल्या काही दिवसांत त्यांच्या साइडकडून ऐकले आहे. त्याकरता त्याने काय केले कल्पना नाही. मी जे तुकडे पाहिलेत त्यात बॉर्डर व युद्धे हे दोन मुद्दे दिसले पण त्याव्यतिरिक्त काय होते कल्पना नाही. अर्थात बायडेनच्या अशा परफॉर्मन्स नंतर त्याला मुळात काही वेगळे करायची गरज पडली नसेल.
याउलट बायडेनला एका मोठ्या रेंजला चुचकारायचे आहे. एका बाजूला अनेक लोकाना त्याने बॉर्डर बद्दल स्ट्रिक्ट भूमिका घेणे आवश्यक वाटते, इस्रायलाला समर्थन देत राहणे आवश्यक वाटते, तर दुसर्या बाजूला पॅलेस्टाइन समर्थक व एकूण वोक पब्लिक त्याला धारेवर धरत आहेत. खूप मोठ्या रेंजला चुचकारायचे काम कठीण आहे. पण ते करताना इतक्या गोंधळात टाकणार्या आकडेवारीने व बायडेनला न झेपणार्या नॅरेटिव्हजनी ठासून भरून त्याला का करायला लावले ते अनाकलनीय आहे. त्याबाबतीत या लेखकाचे मत पटते. अॅबॉर्शनचा मुद्दा स्वतःच भरकटवणे व त्यात पॉलिटिकली करेक्ट नॅरेटिव्ह (इल्लिगल इमिग्रेशन बद्दल) घुसवून वोक गटाला त्या एकाच मुद्द्यात चुचकारायचा प्रयत्न करणे हा त्याचा डिबेटमधला सर्वात मोठा ब्लंडर होता.
डिबेटनंतर ट्रम्प सहजपणे विंगमधे निघून गेला. बायडेनला हाताला धरून दोन पायर्या उतरावे लागले. पब्लिक हे ही पाहात असते. हे सगळे ऑर्केस्ट्रेशन करायला लोक पैसे देऊन बसवलेले असतात. त्यांनाही हे ऑप्टिक्स समजले नाही असे दिसते.
बाय द वे, ते ट्रम्प "तो
बाय द वे, ते ट्रम्प "तो वाक्याच्या शेवटी काय बोलला ते मला समजले नाही" म्हंटला तेव्हा बायडेन नक्की काय म्हणत होता? मला ते थेट अँथनी गोन्साल्विस टाइप वाटले.
पायऱ्या उतरता येणे न येणे,
पायऱ्या उतरता येणे न येणे, मुद्दा मांडता आला नाही तर तो माणूस आता नक्की घरी जाऊन न्यूक बटण दाबेल असे वाटणे, असं का वाटतं पब्लिकला?
त्या पक्षाच्या पॉलिसीज आणि या पक्षाच्या पॉलिसीज कोणी बघत नाही का? का सगळं ऑप्टिक्स फक्त?
ऑप्टिक्स म्हणजेच आजचे
ऑप्टिक्स म्हणजेच आजचे पॉलिटिक्स.
पॉलिसी म्हणजे काय, कुठली पॉलिसी बरोबर असले हे कळणारे फार फार थोडे लोक या देशात आहेत. ते फक्त लेख लिहितात, किंवा टीव्ही वर बोलतात. बाकी काही नाही. त्यातून लाँग टर्म पोलिसी हे या देशात कुणालाहि माहित नाही. पुढची दोन ते चार वर्षे एव्हढेच त्यांचे ध्येय असते.
म्हणून ऑटिक्स महत्वाचे. तेव्हढीच अक्कल इथल्या जनतेची.
>>हे लोक इतके टोन डीफ आहेत का
>>हे लोक इतके टोन डीफ आहेत का ?<<
हो. केवळ टोन-डेफ नहि तर इग्नरंट फूल देखील आहेत..
वस्तुस्थिती अशी आहे कि - डेम्स बाय्डनला नॉमिनेशन देउन बसले आहेत, दुसरा पर्याय नजरेत नाहि. आरएफके जु. तर काहि डेम्स्नाच नकोय. धर्मसंकट का काय म्हणतात ते हेच असावं..
डिबेटनंतर दोन गटात अनुक्रमे आनंदाची अणि भितीची लाट आलेली आहे. पहिला गट टॉकशो/कमीडियन्स यांना कच्चा माल मिळाल्यामुळे पुढिल ३-४ महिन्यांची सोय झाली, तर दुसरा गट चँपियनशिप (सिनियर) टुर प्लेयर्स. बाय्डन त्याच्या सिक्स हॅडिकॅपवर सिनियर टुर क्वलिफाय करेल अशी कुज्बुज ऐकु येतेय...
त्या पक्षाच्या पॉलिसीज आणि या
त्या पक्षाच्या पॉलिसीज आणि या पक्षाच्या पॉलिसीज हा मुद्दा भारताइतका इथे लागू होत नाही. तिथे संसदीय लोकशाही आहे व इथे अध्यक्षीय. इथे निवडणुका डेम्स विरुद्ध रिपब्स नसून ट्ंप वि बायडेन अशी आहे. इथे प्रेसिडेंट च्या हातात फारच जास्त अधिकार आहेत. जो माणूस दोन पायर्याही हात धरल्याशिवाय उतरू शकत नाही त्याला पुढची चार वर्षे केवळ पॉलिसीज वर अध्यक्ष म्हणून निवडून द्या हे फारच हासास्पद आहे. डिबेट संपल्यावर ट्रम्प अगदी तोर्यात निघून गेला व बायडेन ला दयनीय अवस्थेत जिल ने हात धरून उतरवले हे ऑप्टिक्स किती भयाण आहे हे एरवी डिबेट मधल्या सूट चा व टाय चा रंग, पोडियम ची उंची यावर बारकाईने अभ्यास करणार्याना लक्षात येऊ नये? की हे सर्व ठरवूनच केले होते ? अगदी न्यू यॉर्क टाईम्स नेही बायडेन ला ड्रॉप ऑट व्हा अशी विनंती केली आहे.
फॉक्स न्यूज वाहिनीला शिव्या
फॉक्स न्यूज वाहिनीला शिव्या देणे आणि त्यावरील कार्यक्रम बघणार्यांना हीन दर्जाचे लोक समजणे हे बायडनप्रेमी आणि ट्रंप विरोधी लोकांना भूषणास्पद वाटते. पण तुम्ही किती वेळा ह्या वाहिनीवरील कार्यक्रम पाहिले आहेत?
फॉक्स न्यूजला मिळणारे रेटिंग हे निव्वळ मूर्ख रेडनेक लोक बघतात म्हणून मिळते असे वाटते का? अनेक स्लॉटमधल्या कार्यक्रमात फॉक्सला अनेक महिने सर्वोत्तम संख्येने प्रेक्षक मिळतात. हे सगळे मूर्ख आहेत असे मानून आपण स्वतःला मूर्ख सिद्ध करत आहोत. बायडन, हिलरी ह्यांनी वेळोवेळी आपल्या विरोधातल्या लोकांना लोकशाही विरोधी, कुठल्याही बिनडोक गोष्टीवर विश्वास ठेवणारे, अंधश्रद्ध लोक वगैरे संभावना केली आहे. त्यांचे पाठीराखेही तोच कित्त्त गिरवतायत.
MSNBC, CNN, CBS ह्यावरील टोकाचा डेमोक्रॅटच्या बाजूचा पक्षपात केवळ आपले लोक आहेत म्हणून चांगला वाटतो का?
ह्या चॅनेलपेक्षा फॉक्सवर विरोधी विचारांचे लोक जास्त आहेत. अनेक सादरकर्ते ट्रंपच्या कमी अधिक प्रमाणात विरोधात आहेत.
ह्या डाव्या पुरोगामी माध्यमांवर अनेकदा बायडन कसा कुशल, बुद्धीमान, प्रसंगावधानी, चतुर, देशातील आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर मजबूत मांड ठेवलेला नेता आहे ह्याच्या आरत्या ओवाळल्या जात होत्या. डिबेट होईपर्यंत हा बृहस्पतीचा अवतार होता आणि नेमका डिबेटचा कार्यक्रम होताहोता
त्या विद्वान गृहस्थाची सगळी बुद्धी लयाला गेली असे हे चॅनेल ठासून सांगत आहेत. अशा विचारांना माना डोलावणारे अनुयायी काय बुद्धीचे आहेत?
कायम डेमोक्रॅट पक्षाची, बायडनची तळी उचलणे, त्यांचे कुठलेही दोष न दाखवणे, कायम ट्रंपला शिव्या देणे आणि अशा शिव्या देणार्यांनाच पाहुणे म्हणून बोलवणे. ट्रंप समर्थक कुणी आला तर त्याला चक्क कार्यक्रमातून हाकलून देणे (हे तर दोन दिवसापूर्वीच दिसले). हे काय प्रगल्भ, विद्वत्त्तप्रचुर, नि:पक्ष, तटस्थ पत्रकारितेचे लक्षण आहे का?
फॉक्स न्यूज म्हणजे मूर्खांचा बाजार आणि बाकी चॅनेल म्हणजे बुद्धीनिष्ठांची मांदियाळी हा विचार अ त्यंत आंधळ्या गर्विष्ठ आणि दांभिक अहंगडातून आलेला आहे. असल्या खोट्या मदांध, उन्मत्त, घमेंडखोर वृत्तीला कधीतरी सणसणीत तडाखा मिळायला हवा.
विकु, सहमत नाही. असो.
विकु, सहमत नाही. असो.
अमित तू डिबेटच्या क्लिप्स
अमित तू डिबेटच्या क्लिप्स पाहिल्यास का? माझा पॉइण्ट आहे की everything adds up. जे लोक पॉलिसी वगैरे बघतात ते बघतील. पण डिबेट हा "परफॉर्मन्स" आहे. तेथे नुसता मुद्दा मांडता आला नाही इतकेच नव्हते. तो बोलताना मधेच हरवून जात होता, आपण नक्की कशाबद्दल बोलतोय ते त्याला आठवत नव्हते. "beating medicare" सारखे निरर्थक शब्द तो बोलत होता. एकदा तर "बाय द वे" इतके बोलून तेथेच थांबला.
प्रेसिडेण्टला बॅक ऑफिसला काम करून पॉलिसीज नीट आखल्या जात आहेत की नाही पाहणे इतकेच (अशा स्वरूपाचेच) काम असते तर एकवेळ चालले असते. पण वोटर बेस "गॅल्व्हनाइज" करणे, हाउस व सिनेटसमोर बोलणे, वेळोवेळी करावी लागणारी निगोशिएशन्स, उद्या चीन व रशियाशी डिप्लोमसी करायची वेळ आली तर तेथे फर्म राहून अमेरिकन इंटरेस्ट्स पुढे नेणे - हे सगळे करण्याइतका तो फिट आहे असे वाटले नाही. आणि आता ही अवस्था असेल तर पुढच्या चार वर्षाचे काय हा ही प्रश्न पब्लिकला पडेलच.
बाकी ट्रम्प नेहमीसारखाच होता. त्याने काय वाट्टेल ते क्लेम्स केले, कसल्याही गोष्टींचे श्रेय घेतले. एक ते मधेच "H2O" बद्दल काहीतरी बोलून गेला. टिपिकल ट्रम्पिजम. एरव्ही त्यावर मीम्स हून मीम्स आल्या असत्या. पण बायडेनच्या ब्लंडर्सपुढे पब्लिकच्या ते फार लक्षात राहण्यासारखे नव्हते.
बायडेन व्हाइट हाउसमधल्या अनेकांचे भवितव्य तो प्रेसिडेण्ट राहण्यावर आहे. त्यामुळे ते लोक हे लपवत होते त्यात काही आश्चर्य नाही. पण डेम्सची एस्टॅब्लिशमेण्ट काय करत होती हे आहेच. त्यांना हे बरेच महिने माहीत असणार.
आणि हे वन-ऑफ असेल तर आणा त्याला सतत पब्लिकसमोर. दिसू देत किती फिट आहे तो.
ट्रम्प मलाही आवडत नाही, पण
ट्रम्प मलाही आवडत नाही, पण तो प्रेसिडेंट झाला तर काहीतरी भयंकर घडणार (existential threat) असे का वाटते लोकांना ? तो जिंकणे लोकशाहीला धोका आहे म्हणून सर्व लोकशाही विरोधी मर्ग वापरून त्याला पाडायचा हट्ट का ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Scb8Vz85pMA
आम्ही फॉक्स न्यूज चॅनेल बघत नाही म्हणून आम्ही थोर अशी घमेंड मिरवणार्यांनी हे संकलन बघा. बायडन कसा ठणठणीतच नव्हे तर कमालीचा बुद्धीमान आणि अवघड प्रसंगीही क्षणार्धात अचूक निर्णय घेणारा कुशल प्रशासक आहे अशी टिमकी ह्या बिगर फॉक्स चॅनेलवर कितीतरी महिने बडवली जात होती. आणि तमाम चतुर प्रेक्षक ते डोळे मिटून स्वीकारत होते.
इटलीत जी७ च्या कार्यक्रमात कुणी सैनिक पॅराशूटमधून उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करत होता आणि समस्त उपस्थित ते कौतुकाने न्याहाळत होते तेव्हा म्हातारा थिजल्यासारखा तिसरीकडेच बघत होता. (कदाचित वरून निघालेल्या यमाचे दर्शन घडले असेल!)
नंतर जुन्टिन्थ नामक अत्यंत पवित्र मंगल धार्मिक सोहळ्याच्या वेळी समस्त उपस्थित लोक मंत्रोच्चारण होत असताना त्या तालावर नाचत होते तेव्हाही हा थेरडा थिजून गेला आणि पुतळ्यासारखा गोठलेल्या अवस्थेत उभा राहिला.
ह्या सगळ्याची व्हाईट हाऊस प्रवक्त्याने बनावट व्हिडियो. रिपब्लिकन कारस्थान म्हणून संभावना केली आणि समस्त बिगर फॉक्स चॅनेलने तोच कित्ता गिरवत उजव्या पक्षावर तोंडसुख घेणे सुरु केले.
तात्पर्य काय की निव्वळ डेमोक्रॅट पक्षाचे लोकच नाही तर बिगर फॉक्स वाहिन्याही ह्या म्हातार्याच्या डोसक्यात सगळे काही आलबेल असण्याचा धोशा लावण्यात आघाडीवर होत्या.
प्रेक्षकांशी इतका धादांत खोटारडेपणा केला असूनही त्या वाहिन्या फॉक्स तर नाही म्हणून तोरा मिरवणार्या पुरोगाम्यांनी काही धडा शिकता आला तर पहा!
Pages