शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक एकाक्षरी ( गोरे कोश) :
. जैं = छप्पर व भिंत यामधील जागा
(जैं मोकळी केली)

. ज्या= धनुष्याची दोरी

. झा = म्हातारा, जराग्रस्त
( तो झालेला माणूस आहे)

. झे = अतिशय, खूप
(झे पाऊस पडला की सगळीकडे पाणीच पाणी झालं).

मस्त माहिती
भूमितीत सुद्धा एक ज्या असते

ज्या >>> होय.
ज्या = त्रिज्या = अर्धा व्यास. ( = त्रिभज्या )

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

ह्या ज्या ची एक गम्मत.

माझे तीन मित्र आहेत.
राज्या, गज्या आणि विज्या.
ह्या तिघांनी मिळून एक फर्म चालू केली तिचे नाव त्रिज्या.

रिवणावायली
हा अपरिचित आणि वैशिष्ट्यपूर्ण शब्द एका चित्रपटाचे नाव आहे. ( यु ट्यूबवर आहे).
रिवण = वर्तुळ/ रिंगण
आणि
वायली (प्राकृत) = वेगळं

या चित्रपटात, एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा आहे.

https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/actre...

वायला = वेगळा हे विदर्भात कॉमनली वापरतात.

बहिणीच्या मुलासाठी जामेय असा शब्द वाचला.

जामेय = भाचा.

जामेय
>>> छान.
हे पाहा : https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%...

जा(जां)वई : [वैसं. जामेय; पूर्वीं बहिणीचा मुलगा (जामेय) जांवई करून घेत; तेव्हां हा शब्दहि तसाच (जामि = बहीण; जामेय = भाचा) बनला आहे.

@ मानव, ती वेबसाइट चांगली वाटतेय, उच्चारांसकट अर्थ दिले आहेत.

मला न्याहार (हिन्दीतला निहार- निहारना) हा मराठी शब्द आहे आणि अर्थ सेम आहे हे आत्ताच त्या वेबसाइटवर समजले !

न्याहार >>>
आपण 'न्याहाळणे' वापरतो, यांनी ळ ऐवजी र लावला आहे.

जाम / ज्याम
या शब्दाच्या भिन्न जातींनुसार त्याची अर्थभिन्नताही पाहण्यासारखी आहे :

(नाम) : एक प्रकारचे भांडे, शोभेसाठी लावण्याचा वृक्ष

(वि.) : दुर्बल; अशक्त.

(क्रिवि.) : पक्के; घट्ट; काही केले तरी

(वाप्र.) जाम होणे = अडकून पडणे; खलास होणे.

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE+

असा ही एक जाम -

जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह तक तो सारी उतर जायेगी।
हमने आपकी आँखों से पी हैं, खुदा की कसम, सारी उम्र नशे में गुजर जायेगी।

तमिळात मध्यरात्रीला (की प्रहराला?) जामम् म्हणतात त्याची आठवण झाली. पोन्नियीन सेल्वनमध्ये हा शब्द ऐकाला होता. स्वाती_आंबोळे यांनी याम म्हणजे प्रहर आणि त्याला समांतर जामम् (तमिळ) आणि यामिनी ( = रात्र, संस्कृत) अशी व्युत्पत्ती असल्याचं मागे सांगितलं होतं.

Happy जाम म्हणजे दुर्बल, अशक्त हे आधी माहिती नव्हते.
कामवाल्या बायकांनी शिकवला!!
" ताई, लैच जाम झालीय बघा सर्दी खोकल्यानी. थंडी वाजून ताप येतोया. मी यायची न्हाय तीनचार दिवस! "

जाम पे जाम पीने से....जाम हो जाओगे!
Happy

लैच जाम झालीय बघा सर्दी >>> अगदी !
सर्दीच्या बाबतीत जाम हे विशेषण बऱ्यापैकी प्रचलित आहे.
नाकपुड्या बंद होण्याचा अनुभव खरंच बेक्कार असतो

मी तरी जाम हा शब्द 'खूप, भरपूर' या अर्थाने वापरते Happy
जाम मजा आली, जाम गर्दी होती, जाम खोकला झालाय, जाम वेळ लागला, वगैरे वगैरे कुठेही Lol

मला खूप दिवसांपासून प्रश्न आहे की
राजा हा शब्द कसा उच्चारायचा?
जहाजातला ज की जाम मधला ज?
Happy
महेश काळे कानडा रा जा ( जहाजातला ज) पंढरीचा म्हणतो.

Pages