एक तो डार्क हॉर्स असतो. जो उमदा असतो पण डार्क असल्याने कोणाच्या नजरेत येत नाही. आणि सुमडीत रेस जिंकून जातो तेव्हाच प्रकाशझोतात येतो.
एक हा ऋषभ पंत आहे जो असाच एक उमदा घोडा आहे. पण डार्क हॉर्स ऐवजी त्याचा ब्राईट हॉर्स झालाय. याचे कारण म्हणजे एखाद्या नवोदीत खेळाडूला आजवर लाभली नसावी ईतकी प्रसिद्धी, आणि ईतका प्रकाशझोत त्याला अल्पावधीतच लाभला आहे. आणि याला जबाबदार आहे ते त्याचा बिनधास्त आणि तितकाच अतरंगी खेळ, त्यालाच शोभेसा त्याचा मैदानावरचा वावर, (यात ते ऑस्ट्रेलियातील बेबी सीटींग प्र्करणही जोडा) त्याने आयपीएलमध्ये घातलेला धुमाकूळ आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केलेले काही विक्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो ज्या खेळाडूची जागा संघात घेणार आहे तो आहे सचिननंतरचा वा त्याच तोडीचा ऑल टाईम ग्रेट भारतीय क्रिकेट लिजण्ड महेंद्रसिंग धोनी. त्याचा तो संभाव्य वारसदार म्हणून ओळखला जातोय. चर्चा तर होणारच!
तर ऋषभ पंत हे नाव गेल्या वर्ष दिड वर्षात चर्चेला आले असले तरी मी त्याचा थेट २०१७ आयपीएलपासून फॅन आहे. जेव्हा त्याने ४२ चेण्डूत ९७ वगैरे धावा मारत २००+ टारगेट चेस केले होते. अर्थात आयपीएलमध्ये बरेचदा सोमेगोमेही चमकतात. पण त्या खेळीत वा त्यानंतरही त्याचे जे फटके पाहिले ते त्याच्यातील स्पेशल टॅलेंट दर्शवणारे होते. जसे सेहवागला फक्त बॉल दिसायचा, तो टाकणारा बॉलर कोण आहे याच्याशी घेणेदेणे नसायचे, त्यामुळे तो जगातल्या दिग्गज गोलंदाजांनाही फारशी ईज्जत न देता बिनधास्त खेळायचा. पंतचेही थोडेफार तसेच आहे. आयपीएलमध्येही त्याने त्याच्या दिवसाला भुवी, बुमराह, जोफ्रा आर्चर, स्पिनमध्ये राशीद खान या सर्वांना लीलया हवेत भिरकावले आहे. आयपीएलच्या तीन सीजनमध्ये मिळून ३५+ सरासरी आणि १६०+ स्ट्राईकरेट अशी कामगिरी आणखी कोणाची नसावी.
आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याचे चटचट आठवणारे विक्रम म्हणजे षटकार मारत कसोटीत पदार्पण, भारतीय उपखंडाबाहेर दोन शतके, त्यातील एक चौथ्या इनिंगमध्ये आलेले, सलग तीन कसोटी इनिंगमध्ये ९०+ धावा मारायच्या गिलख्रिस्टच्या विक्रमाशी बरोबरी. ऑस्ट्रेलियात पुजारापाठोपाठ कोहलीपेक्षा जास्त धावा, मी त्याला फॉलो करत असल्याने एक मजेशीर निरीक्ष्ण असे की ऑस्ट्रेलियात त्याने प्रत्येक इनिंगमध्ये किमान २५ धावा म्हणजे पावशतक मारलेच. जेव्हा पुजारा कोहली रहाणे शर्मा ही मिडल ऑर्डर मिळून ६ धावांत बाद व्हायचा नीचांक झाला तेव्हाही पठ्ठ्याने ४० धावा मारत लाज व मॅच राखली. खुद्द धोनीने ऑस्ट्रेलियाच्या तीन दौरयात मिळून जितक्या धावा केल्या नाहीत तितक्या याने एका दौरयात केल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटीमध्ये भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे आजवरचे सर्वोत्तम असे १४ वे मानांकन पटकावले. खुद्द धोनीचे कारकिर्दीतले सर्वोत्तम मानांकन १९ वे च होते.
बरं फलंदाजीसोबत विकेटकीपिंग जिथे खरे तर अजून त्याला सुधारणा करायची आहे तिथेही काही विक्रम रच्ले. एका सामन्यात ११ बळींच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. केवळ ११ सामन्यात बळींचे अर्ध्शतक साजरे केले. याआधी धोनीला तब्बल १५-१६ सामने लागले होते.
हे कसोटीचे म्हणाल तर २०-२० मध्येही धोनीची आजवर दोन अर्धशतके होती आणि ५६ सर्वोत्तम होता. याने ती धावसंख्या दोन वेळा मागे टाकली. दोन्ही वेळा चेस करत जिंकवून् दिले हे विशेष.
एकूणच सतत काही ना काही घडत राहिल्याने अपेक्षाही तितक्याच वाढल्या आणि त्यांची पूर्तता करायची जबाबदारीही.
विश्वचषकाला तर रायडू रहाणे व नंतर केदार जाधव यांना वगळून पंतला संघात निव्वळ फलंदाज म्हणून संघात स्थान दिले. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टॉप ऑर्डर कोसळत असूनही याला थेट नवीन चेण्डूचा सामना करायला पुढे पाठवले. आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे चुकीचा फटका मारून बाद होण्याअगोदर त्याने आधीचा क्रिटीकल पिरीअड व्य्वस्थित खेळूनही काढलेला.
एकंदरीतच त्यामुळे तो एक यष्टीरक्षक फलंदाज आहे याचा लोकांना विसर पडून त्याच्या फलंदाजीवरच फोकस होऊ लागला. एवढेच नव्हे गेले एक दोन मालिकांत विशेष काही न केल्याने त्याच्या प्रत्येक इनिंगवर आणि प्रत्येक बाद होण्यावर चर्चा झडू लागली. क्रिकेटरसिकांमध्येच नाही तर समालोचकांमध्येही. सामना संपल्यावर ऋषभ पंतच्या आजच्या खेळीचे बरेवाईट विश्लेषण केल्याशिवाय तो सामना अधिकृत धरलाच जाणार नाही असा आयसीसीने नियम तर काढला नाही ना ईतपत शंका यावी. तिथे तो दादा गांगुली ओरडून सांग्तोय की त्याला मोकळे सोडा पण ते संघ व्यवस्थापनालाही जमत नाहीये. सलग चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवणे म्हणजे मोकळीक देणे नव्हे. पण तरी त्यावर लंबी रेस का घोडा म्हणत निव्ड समितीने दाखवलेला विश्वास ही जमेची बाजू आहेच.
ईथे रोहीत शर्माची आठवण काढल्यावाचून राहवत नाही. एकेकाळी तो चुकीचे शॉट सिलेक्शन करून झटपट बाद होण्यासाठी बदनाम होता. पण निवडसमितीचा त्यावर विश्वास होता. माझाही होता. माझे मित्र त्याला टू मिनिट मॅगी नूडल्स चिडवायचे तेव्हाही मी त्यालाच सपोर्ट करायचो. पुढे जेव्हा त्याने आपले प्रॉब्लेम सोडवले तेव्हा तो काय झाला हे जग बघतेय. आज शतक मारणे त्यासाठी खेळ झालाय.
रोहीत शर्माचा तेव्हा प्रॉब्लेम होता की त्याकडे शॉट खेळायला ईतका वेळ असायचा की आता कुठचा खेळू याचा जास्त विचार केला जायचा.
सध्या पंतही त्याच्यावरील चर्चेमुळे फार जास्त विचार करून खेळू लागलाय. आज ना उद्या ही स्टेज जाईलच. पण आशा करूया तो यातून लवकर बाहेर पडेल. जेव्हा पडेल तेव्हा तो अफाट मनोरंजन करेल यात शंका नाही.
- ऋन्मेष
*ऋषभ पंत आयसीसी कसोटी
*ऋषभ पंत आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर*
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज पंतने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १११ चेंडूत १४६ धावा आणि दुसऱ्या डावात ५७ धावा केल्या. त्याने मागील सहा कसोटी डावांपैकी ५ डावांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. तर सहाव्या खेळीतही केवळ २६ चेंडूत ३९ धावा मारल्या होत्या. ऋषभ पंतने कमालीचे सातत्य दाखवले आहे. या कामगिरीमुळे तो आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला आहे. आतापर्यंतची त्याची ही कसोटीतील सर्वोत्कृष्ठ क्रमवारी ठरली आहे. तुलना करायची झाल्यास महेंद्रसिंग धोनीचे सर्वोत्तम मानांकन १९ वे होते.
निर्णायक सामन्यात निर्णायक
निर्णायक सामन्यात निर्णायक क्षणी पंतचा पुन्हा एकदा राडा.
ऋषभ पंतचे पहिले एकदिवसीय शतक आणि भारताचा ईंग्लंडविरुद्ध मालिकाविजय.
साधंसुधं शतक या माणसाला मारताच येत नसावे.. त्यातही निर्णायक सामना असेल तर आणखीच चेव चढतो. त्यात प्रेशर जितके जास्त तितके हा जोरदार मुसंडी मारतो. लोकं मायदेशातील अनुकूल खेळपट्यांवर डरकाळ्या फोडत खेळतात. पण हा परदेशातील प्रतिकूल परीस्थितींमध्ये दादागिरी करून येतो.
मालिका १-१ बरोबरीत होती. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ईंग्लिश फलंदाजांना धारातिर्थी पाडल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ईंग्लिश गोलंदाजांनी आपल्या स्विंगवर भारतीय फलंदाजांना नाचवले.
ईंग्लंडच्या २४६ धावांच्या प्रत्युतरादाखल भारतीय संघ १४६ धावात गुंडाळला गेला. १०० धावांनी पराभूत झाला.
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा ईंग्लंडने २६० धावांचे लक्ष्य भारताला दिल्यानंतर भारत पुन्हा त्याच मार्गाने पराभवाच्या दिशेने वेगाने धावू लागला..
१३ ला १
२१ ला २
३८ ला ३
आणि ७२ ला ४ विकेट डाऊन ..
वेगाने शर्मा, धवन, कोहली, सुर्यासारखे मातब्बर फलंदाज तंबूत परतू लागले.
एक पंत पांड्या जोडी तेवढी मैदानावर होती आणि मागे केवळ सर जडेजा.
पण पंत तर चुम्मा आहे. आधी संयमाने ईनिंग बिल्ड करत हळूहळू या जोडीने भारताला मॅचमध्ये परत आणले. आणि त्यानंतर पंत जे ईंग्लिश गोलंदाजावर तुटून पडला की बस रे बस. ११३ चेंडूत १२५ धावांची नाबाद खेळी करत तब्बल आठ ओवरचा खेळ शिल्लक ठेवून भारताला जिंकवून दिले.
पांड्या बाद झाल्यावर देखील भारताला विजयासाठी ५५ धावांची गरज होती. पण पंतने जडेजाला त्यातील केवळ ७ धावा फटकावू दिल्या.
शतकाजवळ असताना वेगवान गोलंदाजांना स्पिनरला खेळावे तसे गुडघ्यावर बसून भिरकाऊन देणे हे काम चा माणूस करू शकतो.
विजयाला २४ धावांची गरज असताना विल्लीला पाच चेंडूवर मैदानाच्या पाच दिशांना चौकार मारतानाचे फटके निव्वळ अदभुत.
पण त्याचवेळी सहाव्या चेंडूल सन्मान देत सिंगल घेत सहाव्या चौकाराचा मोह टाळणे हे तोच माणूस करू शकतो.
पण तो तिथेच थांबला नाही तर पुढच्याच ओवरला रिव्हर्सस्वीपचा चौकार लगावत अँतिम आणि निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा एक ऐतिहासिक शतकी खेळी करत, भारताला सामना आणि मालिका जिंकवून देत, चुम्मा सामनावीर ठरला
*आशिया बाहेर भारतीय
*आशिया बाहेर भारतीय विकेटकीपरची शतके*
१) राहुल द्रविड १४५ (सामना ईंग्लंडमध्ये मात्र प्रतिस्पर्धी श्रीलंका)
२) ऋषभ पंत १२५ नाबाद
३) के एल राहुल ११२ vs न्यूझीलंड
*# चेस करताना ऋषभ पंत एकमेव*
तसेच ईंग्लंडमध्ये त्यांच्याविरुद्ध कसोटी आणि वन डे या दोन्ही प्रकारात शतक झळकावणारा पंत हा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक बनला आहे.
(No subject)
>>Submitted by ऋन्मेऽऽष on 19
>>Submitted by ऋन्मेऽऽष on 19 July, 2022 - 13:27<<
ऋन्म्या, स्वतः लिहिलं आहेस कि कॉपि+पेस्ट? तुझंच असेल तर चांगलं लिहिलं आहेस. साइडने एखादा स्पोर्ट्स कॉलम्न लिहायला सुरुवात कर; सध्याचा डे जॉब पुढेमागे साइड-जॉब होइल... ते एक विजेटिआयचेच सिविल एंजिनियर आहेत, त्यांचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेव...
ते एक विजेटिआयचेच सिविल
ते एक विजेटिआयचेच सिविल एंजिनियर आहेत
>>>>
हो संझगिरी
खरे तर हे असेच घाईत लिहिलेय. अजून चांगले लिहू शकेन. तरी कौतुकाबद्दल धन्यवाद. लिहायला हवे मात्र क्रिकेटवर असे वाटले खरे. आपले प्रेम आणि पॅशन आहे ते
पंतचे कार ॲक्सिडंट.. कारचे
पंतचे कार ॲक्सिडंट.. कारचे फार बेक्कार फोटो आलेत. धडकी भरवणारे
पंतसाठी प्रार्थना _/\_
Get well soon champ
(No subject)
जेंव्हा फिनिक्स थक्क होतो.
जेंव्हा फिनिक्स थक्क होतो.
द्वारकानाथ संझगिरी
ऋषभ पंतने राखेतून जन्मणाऱ्या काल्पनिक फिनिक्स पक्षाला कॉम्प्लेक्स दिलाय.
त्याचं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे काल्पनिक वाटावं इतकं अचाट आहे.
त्याचं भयाण कार अपघातातून वाचणं जेवढं अविश्वसनीय होतं तेवढं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं.
नव्या वर्षाच्या संध्येला आईला भेटायला निघालेल्या पंतला डेहराडून दिल्ली रस्त्यावर रूरकी जवळ अपघात झाला. त्याला रात्री डुलकी लागली आणि त्याने गाडी ठोकली. पुढे आधी डेहराडून आणि नंतर मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार झाले .
पुढे, त्याला डॉक्टरांनी सांगितलं, " तू जिवंत आहेस हाच चमत्कार आहे"
त्या मती गुंग करणाऱ्या क्षणीही त्याच्या लक्षात आलं की त्याचा उजवा पाय उलट्या दिशेला काटकोनात वाकडा झालाय. त्याने त्याला मदत करणाऱ्या तिथल्या माणसाच्या आधाराने तो चक्क सरळ केला.
पुढे डॉक्टर त्याला म्हणाले, " तुला तसं करणं सुचलं ते बरं झालं, नाही तर तो कापावा लागला असता."
गुडघ्याच्या लिगामेंट्सचं त्याचं ऑपरेशन केलं गेलं. त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली गेली.
पण त्या अपघाता नंतरच्या पहिल्या काही दिवसात, त्याला मैदान, क्रिकेट खेळणे आता इतिहासजमा झालं असं वाटलं असावं.
सुरवातीला त्याला गादीवर बसून खाली पाय टेकवता येत नव्हता. मग त्याने आधाराने उभ रहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी १५- २० सेकंदात त्याला कसोटी सामना खेळल्यासारखा दम लागायचा.
अनेकांना त्यानंतर क्रिकेट खेळणे ही पुढच्या जन्मीची गोष्ट वाटली असती . पण प्रचंड इच्छाशक्ती, आणि मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा मैदानात पाय ठेवला.
डॉक्टरांना वाटत होतं की त्याला बरं व्हायला किमान २ ते ३ वर्ष लागतील . तो १४ महिन्यात खेळायला लागला.
नुसतं नाही तर भारतीय संघात त्याने प्रवेश केला.
एकदा संघातून बाहेर गेल्यावर पुन्हा स्थान मिळवणं कठीण असतं. अलीकडे तर टी २० मध्ये भारतात स्पर्धा मोठी आहे. तो तर जणू हॉस्पिटल बेडवरून मैदानावर आला.
नुकत्याच संपलेल्या आय पी एल मध्ये त्याने २५३ षटकं याष्टिरक्षण केलं. जवळपास १५८ च्या स्ट्रायिक रेटने ४४६ धावा केल्या. १६ बळी याष्टिमागे घेतले. २५ षटकार ठोकले.
फिनिक्स पक्षालाही स्फूर्ती मिळाली असती!
आणि परवा भारत पाकिस्तान ह्या मानसिक शक्तीचा कस पाहणाऱ्या सामन्यात त्याने सर्वाधिक ४२धावा केल्या, ३ झेल घेतले, शारीरिक दृष्ट्या कुठेही कमी वाटला नाही. जणू अपघात त्याच्या आयुष्यात झालाच नव्हता असं वाटलं. बस ते एक दुस्वप्न होतं!
पूर्वी अनेक मोठे खेळाडू अशा अपघातातून जिद्दीने बाहेर येऊन मोठं क्रिकेट खेळले आहेत.
टायगर पतौडीचा एक डोळा गेला होता. पुढे आयुष्यभर तो मोठं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एका डोळ्याने खेळला.
इंग्लंडच्या ब्रायन क्लोज ह्या फलंदाजाच्या मते टायगरचे दोन डोळे शाबूत असते तर तो विव
रिचर्ड्स एव्हढा मोठा फलंदाज झाला असता.
आणि एका डोळ्याने तो उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होता.
१९५७ साली गॅरी सॉबर्स
ला कारचा अपघात इंग्लंडमध्ये झाला. तो इतका भीषण होता की वेस्ट इंडीजचा एक अत्यंत गुणवान खेळाडू कॉली स्मिथ त्यात गेला.
गॅरी वाचला. त्याचे सर्व विक्रम आणि त्याचं इतिहासातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होणं हे त्या नंतरचं आहे. स्मिथ त्याचा जिवलग मित्र
गॅरी म्हणतो, " कॉलीचा आत्मा माझ्यात शिरला त्यामुळे मी विक्रम करू शकलो."
अशा अपघातातून आलेला माणूस अधिक कणखर बनतो. त्याने मृत्यू जवळून पाहिलेला असतो. वेदना सहन केलेल्या असतात.
पंतला अपघातातून सावरताना कुणीतरी विचारलं, " तू अपघातामुळे मैदानावरचं काय मिस करतोस?"
तो म्हणाला, " षटकार ठोकणे "
आक्रमकता त्याच्या नसानसात आहे. आक्रमक ,बेडर फलंदाज हे वरदान आहे. पण आक्रमकतेलाही थोडी शिस्त पाळावी लागते. साहसी असावं पण साहसाच रूपांतर बेदरकारपणात होऊ नये.साहस आणि बेदरकारपणा ह्यातली रेष महत्वाची. ती अस्पश्ट होऊ नये.
पांच खेळीत २ अपयश साहसात स्वीकारली जातात. पण ३ नाही.
लहानपणी मी एक वाक्य वाचलं होत. कुणी लिहिलं ते आठवत नाही. त्याकाळी फक्त वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज आक्रमकपणे खेळत.
" A strokemaker may fail once ,he may fail twice, he can not fail always. And success of the strokemaker is the greatness of the game,,
तो मॅच विनर आहे. त्याने कसोटी जिंकून दिल्या आहेत.
त्याची दुसरी खेळी अधिक यशस्वी आणि चमकदार व्हावी.
ताजा कॉलम
वेगाची हौस असेल तर खेळीचा वेग वाढवावा
गाडीचा नको.
यम नेहमीच चुकीच्या फटाक्यांचा झेल सोडत नाही.
बापरे! हे सगळं काही माहित
बापरे! हे सगळं काही माहित नव्हतं. स्पोर्टस स्पिरिट विन्स!
खरोखरच amazing आहे! मलाही ऋषभ
खरोखरच amazing आहे! मलाही ऋषभ पंतला खेळताना बघून खूप आनंद झाला, जसा युवराज सिंगला परत खेळताना बघून झाला होता!
ऋषभ पंत माझा आवडता खेळाडू
ऋषभ पंत माझा आवडता खेळाडू असल्याने मी त्याच्या तब्येतीचे अपडेट चेक करायचो.
बराच काळ बेडवर आडवा होता, त्यांनतर कुबड्या घेऊन लंगडत चालायचा. ते पाहून हा खेळला तरी पाहिल्याचा ऋषभ पंत कधीच दिसणार नाही असेच वाटायचे.
बहुधा माजी विकेट किपर सय्यद किरमानी यांनी म्हटले होते की विकेट कीपरला सतत उठबस करावी लागते. त्याला पायांचा सर्वाधिक फिटनेस लागतो. याचे तर पायच गेले आहेत. त्यामुळे पंत यापुढे खेळलाच तर फक्त फलंदाज म्हणून खेळू शकतो. विकेट कीपींग तो आता करणे शक्य नाही.
त्यात त्याची फलंदाजी सुद्धा अशी अतरंगी की वेडेवाकडे झाल्याशिवाय आणि अंगाचे आलोखेपिलोखे दिल्याशिवाय तो आपले हुकुमी फटके मारू शकत नाही. थोडक्यात आपला आवडता खेळाडू आता संपला आहे आणि त्याला आता फक्त आयपीएल खेळताना बघणे इतकेच नशिबात आहे अशी मनाची तयारी केली होती.
त्यामुळे तो यंदाची आयपीएल खेळणार अशी बातमी कानावर आली तेव्हा आधी ती अफवा वाटली होती. जेव्हा खरे आहे समजले तेव्हा केवळ दोन चार सामने खेळवून चेक करतील त्याचा फिटनेस असे वाटले होते.
पुढे निवडसमितीने सुद्धा जाहीर केले की पंत जर पहिल्या सारखा फिट आणि फॉर्म मध्ये असेल तर वर्ल्डकपला त्याचा सुद्धा विचार केला जाईल. पण हे सुद्धा औपचारिक बोलणे वाटले होते. कारण वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत अशी रिस्क घेणे अशक्यच. मी स्वतः असतो निवड समितीत तरी अशी रिस्क घेतली नसती. किंवा संघ हिताचा विचार करून पंतवर फुली मारली असती.
त्यामुळे आयपीएल मध्ये तो खेळू लागला तरी वर्ल्डकप खेळेल अशी स्वप्ने काही बघत नव्हतो. त्यात पहिले दोन तीन सामने तो अवघडलेल्या अवस्थेत खेळला. स्पेशली फलंदाजीत आधीचा पंत दिसत नव्हता. पण त्याचवेळी विकेट किपेंग मात्र चपळाईने करत होता. तिथे फिटनेस आणि रिफ्लकसेस दोन्ही दिसत होते. त्यामुळे बंदा फिट आहे आणि फलंदाजीत सूर गवसू शकतो असा विश्वास हळूहळू वाटू लागला. पुढे त्याच्या धावा होऊ लागल्या आणि सिक्स सुद्धा मारू लागला तसे आता हा राखीव खेळाडू किंवा बदली विकेटकीपर म्हणून वर्ल्डकप जाऊ शकतो इतके वाटू लागले.
संघानिवडीच्या काही दिवस आधी त्याने एक दोन भन्नाट खेळी केल्या जे त्याची वर्ल्डकप संघात निवड झाली. आणि आयपीएल संपता संपता हा आता अकरात सुद्धा येऊ शकतो इतका विश्वास आला.
पण जेव्हा सराव सामन्यात त्याला खेळताना पाहिले तेव्हा हा वर्ल्डकप गाजवनार इतका विश्वास वाटून राहिला. तशी पोस्ट सुद्धा मी मायबोलीवर केली होती.
कारण भारतीय जर्सी अंगात घालताच त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे. देशासाठी खेळणे हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असावी. आजच्या सामन्यातही त्याचा मैदानावरचा वावर बघण्यासारखा होता. पंतच्या परत येण्याने संघात एक वेगळे चैतन्य संचारले आहे असे समालोचक सुद्धा वारंवार बोलत होते.
त्यामुळे भारत हा वर्ल्ड कप जिंकावा आणि तो या वर्ल्ड कप चा युवराज सिंग व्हावा असे मनापासून वाट आहे
शब्द नाहीत ऋषभ पंतसाठी, कौतुक
शब्द नाहीत ऋषभ पंतसाठी, कौतुक आणि दंडवत. छान लेख.
भारत-पाक सामन्यानंतर
भारत-पाक सामन्यानंतर
इंडियन ड्रेसिंग रूम मधील व्हिडिओ..
https://youtu.be/EBrmt-fdemk?si=3qNeMrPcbWrsXA8W
*Rishabh Pant* breaks Adam
*Rishabh Pant* breaks Adam Gilchrist’s all-time T20 World Cup record to register most dismissals in a single edition of T20 World Cup.
Pant has 10 dismissals to his name in T20 WC 2024
The youngster left behind several legends in the list such as AB de Villiers, Adam Gilchist, and Kumar Sangakkara among others who have nine dismissals each to their name.
Pant is also the leading run scorer for India in ongoing tournament.
Pages