एक तो डार्क हॉर्स असतो. जो उमदा असतो पण डार्क असल्याने कोणाच्या नजरेत येत नाही. आणि सुमडीत रेस जिंकून जातो तेव्हाच प्रकाशझोतात येतो.
एक हा ऋषभ पंत आहे जो असाच एक उमदा घोडा आहे. पण डार्क हॉर्स ऐवजी त्याचा ब्राईट हॉर्स झालाय. याचे कारण म्हणजे एखाद्या नवोदीत खेळाडूला आजवर लाभली नसावी ईतकी प्रसिद्धी, आणि ईतका प्रकाशझोत त्याला अल्पावधीतच लाभला आहे. आणि याला जबाबदार आहे ते त्याचा बिनधास्त आणि तितकाच अतरंगी खेळ, त्यालाच शोभेसा त्याचा मैदानावरचा वावर, (यात ते ऑस्ट्रेलियातील बेबी सीटींग प्र्करणही जोडा) त्याने आयपीएलमध्ये घातलेला धुमाकूळ आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केलेले काही विक्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो ज्या खेळाडूची जागा संघात घेणार आहे तो आहे सचिननंतरचा वा त्याच तोडीचा ऑल टाईम ग्रेट भारतीय क्रिकेट लिजण्ड महेंद्रसिंग धोनी. त्याचा तो संभाव्य वारसदार म्हणून ओळखला जातोय. चर्चा तर होणारच!
तर ऋषभ पंत हे नाव गेल्या वर्ष दिड वर्षात चर्चेला आले असले तरी मी त्याचा थेट २०१७ आयपीएलपासून फॅन आहे. जेव्हा त्याने ४२ चेण्डूत ९७ वगैरे धावा मारत २००+ टारगेट चेस केले होते. अर्थात आयपीएलमध्ये बरेचदा सोमेगोमेही चमकतात. पण त्या खेळीत वा त्यानंतरही त्याचे जे फटके पाहिले ते त्याच्यातील स्पेशल टॅलेंट दर्शवणारे होते. जसे सेहवागला फक्त बॉल दिसायचा, तो टाकणारा बॉलर कोण आहे याच्याशी घेणेदेणे नसायचे, त्यामुळे तो जगातल्या दिग्गज गोलंदाजांनाही फारशी ईज्जत न देता बिनधास्त खेळायचा. पंतचेही थोडेफार तसेच आहे. आयपीएलमध्येही त्याने त्याच्या दिवसाला भुवी, बुमराह, जोफ्रा आर्चर, स्पिनमध्ये राशीद खान या सर्वांना लीलया हवेत भिरकावले आहे. आयपीएलच्या तीन सीजनमध्ये मिळून ३५+ सरासरी आणि १६०+ स्ट्राईकरेट अशी कामगिरी आणखी कोणाची नसावी.
आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याचे चटचट आठवणारे विक्रम म्हणजे षटकार मारत कसोटीत पदार्पण, भारतीय उपखंडाबाहेर दोन शतके, त्यातील एक चौथ्या इनिंगमध्ये आलेले, सलग तीन कसोटी इनिंगमध्ये ९०+ धावा मारायच्या गिलख्रिस्टच्या विक्रमाशी बरोबरी. ऑस्ट्रेलियात पुजारापाठोपाठ कोहलीपेक्षा जास्त धावा, मी त्याला फॉलो करत असल्याने एक मजेशीर निरीक्ष्ण असे की ऑस्ट्रेलियात त्याने प्रत्येक इनिंगमध्ये किमान २५ धावा म्हणजे पावशतक मारलेच. जेव्हा पुजारा कोहली रहाणे शर्मा ही मिडल ऑर्डर मिळून ६ धावांत बाद व्हायचा नीचांक झाला तेव्हाही पठ्ठ्याने ४० धावा मारत लाज व मॅच राखली. खुद्द धोनीने ऑस्ट्रेलियाच्या तीन दौरयात मिळून जितक्या धावा केल्या नाहीत तितक्या याने एका दौरयात केल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटीमध्ये भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे आजवरचे सर्वोत्तम असे १४ वे मानांकन पटकावले. खुद्द धोनीचे कारकिर्दीतले सर्वोत्तम मानांकन १९ वे च होते.
बरं फलंदाजीसोबत विकेटकीपिंग जिथे खरे तर अजून त्याला सुधारणा करायची आहे तिथेही काही विक्रम रच्ले. एका सामन्यात ११ बळींच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. केवळ ११ सामन्यात बळींचे अर्ध्शतक साजरे केले. याआधी धोनीला तब्बल १५-१६ सामने लागले होते.
हे कसोटीचे म्हणाल तर २०-२० मध्येही धोनीची आजवर दोन अर्धशतके होती आणि ५६ सर्वोत्तम होता. याने ती धावसंख्या दोन वेळा मागे टाकली. दोन्ही वेळा चेस करत जिंकवून् दिले हे विशेष.
एकूणच सतत काही ना काही घडत राहिल्याने अपेक्षाही तितक्याच वाढल्या आणि त्यांची पूर्तता करायची जबाबदारीही.
विश्वचषकाला तर रायडू रहाणे व नंतर केदार जाधव यांना वगळून पंतला संघात निव्वळ फलंदाज म्हणून संघात स्थान दिले. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टॉप ऑर्डर कोसळत असूनही याला थेट नवीन चेण्डूचा सामना करायला पुढे पाठवले. आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे चुकीचा फटका मारून बाद होण्याअगोदर त्याने आधीचा क्रिटीकल पिरीअड व्य्वस्थित खेळूनही काढलेला.
एकंदरीतच त्यामुळे तो एक यष्टीरक्षक फलंदाज आहे याचा लोकांना विसर पडून त्याच्या फलंदाजीवरच फोकस होऊ लागला. एवढेच नव्हे गेले एक दोन मालिकांत विशेष काही न केल्याने त्याच्या प्रत्येक इनिंगवर आणि प्रत्येक बाद होण्यावर चर्चा झडू लागली. क्रिकेटरसिकांमध्येच नाही तर समालोचकांमध्येही. सामना संपल्यावर ऋषभ पंतच्या आजच्या खेळीचे बरेवाईट विश्लेषण केल्याशिवाय तो सामना अधिकृत धरलाच जाणार नाही असा आयसीसीने नियम तर काढला नाही ना ईतपत शंका यावी. तिथे तो दादा गांगुली ओरडून सांग्तोय की त्याला मोकळे सोडा पण ते संघ व्यवस्थापनालाही जमत नाहीये. सलग चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवणे म्हणजे मोकळीक देणे नव्हे. पण तरी त्यावर लंबी रेस का घोडा म्हणत निव्ड समितीने दाखवलेला विश्वास ही जमेची बाजू आहेच.
ईथे रोहीत शर्माची आठवण काढल्यावाचून राहवत नाही. एकेकाळी तो चुकीचे शॉट सिलेक्शन करून झटपट बाद होण्यासाठी बदनाम होता. पण निवडसमितीचा त्यावर विश्वास होता. माझाही होता. माझे मित्र त्याला टू मिनिट मॅगी नूडल्स चिडवायचे तेव्हाही मी त्यालाच सपोर्ट करायचो. पुढे जेव्हा त्याने आपले प्रॉब्लेम सोडवले तेव्हा तो काय झाला हे जग बघतेय. आज शतक मारणे त्यासाठी खेळ झालाय.
रोहीत शर्माचा तेव्हा प्रॉब्लेम होता की त्याकडे शॉट खेळायला ईतका वेळ असायचा की आता कुठचा खेळू याचा जास्त विचार केला जायचा.
सध्या पंतही त्याच्यावरील चर्चेमुळे फार जास्त विचार करून खेळू लागलाय. आज ना उद्या ही स्टेज जाईलच. पण आशा करूया तो यातून लवकर बाहेर पडेल. जेव्हा पडेल तेव्हा तो अफाट मनोरंजन करेल यात शंका नाही.
- ऋन्मेष
कसला लंबी रेस का घोडा, साबा
कसला लंबी रेस का घोडा, साबा करीम आहे तो.
साबा करीम कोण? ते समालोचक..
साबा करीम कोण? ते समालोचक.. त्यांचे ईथे काय?
नयन मोंगिया
नयन मोंगिया
लंबी रेस का घोडा - ब्राईट
लंबी रेस का घोडा - ब्राईट हॉर्स ऋषभ पंत !
हे मी लंबी रेस का घोडा - ब्राईट हॉर्स ऋन्मेष पंत ! वाचलं म्हटलं कोई शक! नंतर म्हटलं स्वतःची इतकी लाल पण करणार नाही ऋन्म्या शिवाय पंत हे संबोधन आजकाल स्वतः करताच वापरेल अशी शक्यता कमीच.
नंतर मजकूर वाचायला घेतला , तो ,
एखाद्या नवोदीत खेळाडूला आजवर लाभली नसावी ईतकी प्रसिद्धी, आणि ईतका प्रकाशझोत त्याला अल्पावधीतच लाभला आहे. आणि याला जबाबदार आहे ते त्याचा बिनधास्त आणि तितकाच अतरंगी खेळ, त्यालाच शोभेसा त्याचा मैदानावरचा वावर,
इथपर्यंत लागूही होत होता पण मग नंतर काही कळेनासे झाले आणि मग खरी ट्युबलाईट पेटली.
एक लेख ऋन्मेष पंतांवरही येऊ दे रे! भन्नाट आयडीने लिही वाटलेच तर
हर्पेन
हर्पेन
मी पंत नाही संत आहे. आणि संतांची शिकवण आहे. स्वस्तुती करू नये
पंत चा ती २० मध्ये आला तेव्हा
पंत चा ती २० मध्ये आला तेव्हा भारत वेस्ट इंडिज बरोबर खेळात होता, पंत यायचं कारण म्हणजे, भारताने चॅम्पियन ट्रॉफी हरली, युवीला दुखापत झाली होती, तो संघातून बाहेर गेला होता, पंत आला.
मग भारत वेस्ट इंडिजला गेला, तिथे टेस्ट सिरीज जिंकली, एकमात्र टी २० मध्ये पंतला घेतलं, मी फार अपेक्षेने त्याचा खेळ बघत होतो, पण त्याला बॉल टाईम करता आला नाही, रन्स काढता आल्या नाहीत, आऊट झाला.
धोनी गेल्यावर, आता कोण? तर टेस्ट मध्ये सहा होता, त्याला दुखापत झाली, मग आता? म्हणून पंतला घेतले, पहिल्याच कसोटीत, दुसऱ्याचा बॉल वर सिक्स मारून सुरुवात केली, इंग्लंड मध्ये त्याने शतक केले, लगेच पंत.. उगवता तारा, तारणहार.. हे सर्व सुरु झालं, धोनी पेक्षा बरा आहे हे संशोधन लहान मुलांनी करून दाखवले.
आता मग आयपीएल आली, त्यात बुमराहच्या यॉर्कवर सिक्स मारणे हा चमत्कार करून दाखवला, पब्लिक येडं झालं, हाच तो आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देणार अशी स्वप्न पडू लागली, वल्ड कप मध्ये पंत खेळला, जमेल तसं. चार नंबर वर यायचा, चार बॉल खेळून परत जायचा.
पंत चार नंबरवर येतो, त्याला बॅटिंग करायचा भरपूर वेळ मिळतो, पण त्याने मॅच जिंकून दिल्या का? तर नाही, तो हिटर आहे मॅच विनर नाही, त्याला वेळ द्यायला हवा, ते देणं सुरूच आहे, पण किती वेळ द्यावा? आता गेली दोन वर्ष आपण त्याला वेळ देत आलोच आहे. आता साऊथ आफ्रिकेच्या दोन्ही मॅच मध्ये काहीच केलं नाही.
आता पंत नाहीतर कोण? ईशान किशन? ह्या.. कोहलीने त्याला आयपीएलच्या एका मॅच ला शिव्या घातल्या होत्या, तो काय कधी टीम मध्ये येणार नाही, फायनली, गंभीरने संजू सॅमसनच्या बद्दल ट्विट केलं आहे, त्याला संधी द्यायला हवी, पण पंत नको.
पंत फालतू खेळाडू आहे.
पंत फालतू खेळाडू आहे.
आता गेली दोन वर्ष आपण त्याला
आता गेली दोन वर्ष आपण त्याला वेळ देत आलोच आहे.
>>>
कुठली दोन वर्षे? कुठून मोजत आहात? लिमिटेडमध्ये धोनीच पहिला कीपर होता कालपर्यंत..
कसोटी म्हणाल तर तो बरेपैकी स्थिरावला आहे. किंबहुना त्याच्या कसोटी कामगिरीचे कौतुकच करायला हवे.
एकदिवसीयमध्ये विश्वचषकाआधी फारसे न खेळवता अचानक उचलला आणि टाकला संघात. निव्वळ फलंदाज म्हणून खेळवल्याने अपेक्षा जास्तीच्या असतील पण तो काही विश्वचषकात तसा अपयशी झाला नाही. मुळातच त्याला एकदिवसीयमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळवायचा हट्ट अनाकलनीय आहे. निदान सध्या तरी. वन डे ला एकतर तो ओपनिंगला हवा किंवा सहाव्या क्रमांकावर.
२०-२० म्हणाल तर तो फॉर्मेटच बेभरवश्याचा आहे. पण तिथे तो येत्या काळात चमकणारच. हे त्याची आयपीएल कामगिरी बघून समजते. जिथे दिल्लीला त्याने कित्येकदा एकहाती तारले आहे.
उगवत्या सुर्याला सारेच नमस्कार करतात. खरी मजा तर आता त्याची मेकींग बघण्यात आहे....
फायनली, गंभीरने संजू
फायनली, गंभीरने संजू सॅमसनच्या बद्दल ट्विट केलं आहे, त्याला संधी द्यायला हवी, पण पंत नको.
>>>
संजू सॅमसनची मजल जास्तीत जास्त दिनेश कार्तिक होण्याची आहे. जिथे दिनेश. कार्तिक दहा वर्षात एका मर्यादेपुढे जाऊ शकला नाही तिथे संजू कसा जाईल.
ईशान किशनला मात्र मला २०-२० ला बघायला आवडेल.
एकदिवसीयला मात्र धोनीची उणीव फार भासत राहणार..
अररथात जगाच्या अंतापर्यण्त ती जागा भरणे अशक्यच.
कोणी कितीही कौतुक केलं तरी
कोणी कितीही कौतुक केलं तरी माझ्यासाठी तो साबा करीमच आहे. साबा करीमलापण तो आला तेव्हा असाच चढवला होता.
>>> कोणी कितीही कौतुक केलं
>>> कोणी कितीही कौतुक केलं तरी माझ्यासाठी तो साबा करीमच आहे. साबा करीमलापण तो आला तेव्हा असाच चढवला होता. >>>
ग्यानेंद्र पांडे, अतुल बेदाडे, गुलाम परकार, धीरज परसाना, साद बिन जंग, चंद्रकांत पंडीत या परंपरेतील पुढील नाव पंत असेल.
पंत डेब्यू २०१७ ला झाला टी २०
टी २० मध्ये पंतचा डेब्यू २०१७ ला झाला.
मी तुमच्या प्रतिक्रियेचा फार गंभीरपणे विचार केला, मग मी आकड्यांकडे वळलो,कोणीतरी म्हटलंच आहे, नंबर्स डोन्ट लाय, तर आपण त्याचा ऍव्हरेज बघूयात. मजा म्हणजे, टी २० चा ऍव्हरेज, वन डे ऍव्हरेज एवढाच आहे, याचा अर्थ काय? तर फॉरमॅट कुठलाही असो, त्याच शैलीचा वापर करून खेळणं. पंत कॅच आऊट होतो. इनिंग बिल्ड करणं वगैरे असल्या गोष्टी त्याच्या मनात नसाव्यात किंवा तो मानत नसावा. वेस्ट इंडिज विरोधातल्या दोन्ही मॅच मध्ये श्रेयस अय्यरने इनिंग बिल्ड करणं दाखवून दिलं, म्हणूनच अय्यरचा ओडीआय ऍव्हरेज ५० च्या आसपास आहे.
हिटर आणि मॅच विनर यात फरक आहे, रोहित शर्मा हे दोन्ही करू शकतो. त्याने वर्ल्ड कप मध्ये करून दाखवलं. पंत फक्त हिट ए, तो हिटर किंवा मॅच विनर होण्यासाठी त्याने डोमेस्टिक क्रिकेट अजून खेळावे.
चैतन्य, आता वाचली आपली पोस्ट.
चैतन्य, आता वाचली आपली पोस्ट.
मधल्या काळात साहा आला पंत गेला पण ते मी देखील आधीपासून याच मताचा होतो की आश्विन जडेजासमोर साहाला पर्याय नाही.
बाकी पंत काय आहे हे येणारा काळच सिद्ध करेन. मी असाच धागा काढला आहे त्या दिवशी वर काढायला
आता जी टेस्ट क्रिकेट
आता जी टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिप सुरू आहे, त्यावर एक छान धागा यायला हवा.
पंतने आज माझा विश्वास सार्थ
पंतने आज माझा विश्वास सार्थ ठरवला. आज माझा ऊर अभिमानाने भरून आलाय....
सविस्तर रात्री लिहितो...
त्याच्या या अफाट कामगिरीचे आकडेही रात्री आणतो...
आता काही लिहायच्या मनस्थितीत नाही.. आजचा विजय सेलिब्रेट करू या
जय हो टीम ईंडिया.. जय हो ऋषभ पंत !!!
*पण आशा करूया तो यातून लवकर
*पण आशा करूया तो यातून लवकर बाहेर पडेल. जेव्हा पडेल तेव्हा तो अफाट मनोरंजन करेल यात शंका नाही.* -
तुम्हाला खरं ठरवायलाच आज पंत मैदानात उतरला असावा !
*पण आशा करूया तो यातून लवकर
*पण आशा करूया तो यातून लवकर बाहेर पडेल. जेव्हा पडेल तेव्हा तो अफाट मनोरंजन करेल यात शंका नाही.* -
तुम्हाला खरं ठरवायलाच आज पंत मैदानात उतरला असावा !
एक्स फॅक्टर ऋषभ पंत
एक्स फॅक्टर ऋषभ पंत
२७४ धावा ६८.५० सरासरी
(भारतातर्फे सर्वाधिक धावा)
सर्वोत्तम स्ट्राईकरेट - ६९.८९
सर्वोत्तम सरासरीसह सर्वोत्तम स्ट्राईकरेट
यातून डॉमिनेशन दिसून येते.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही मागे टाकले याने
गेल्या दौरयात पंत सर्वाधिक धावांत दुसरया क्रमांकावर होता.
यावेळी धावा, सरासरी, स्ट्राईकरेट सर्वच बाबतीत अग्रेसर आहे
सिडनीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर काऊंटर अटेक करत हरणारा सामना वाचवणारा आहे..
तर करो या मरो, डिसायडींग सामन्यात निर्णायक खेळी करून भारताला विजयी करून सामनावीर देखील आहे
गेल्या मालिकेत त्याचा लोएस्ट स्कोअर २५ होता. ज्याचा मूळ लेखात उल्लेख आहे. यावेळी २३ आहे. त्यापेक्षा कमी धावात त्याला बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यशच आले नाही. दोन्ही दौरे मिळून तब्बल १२ इनिंग झाल्या आहेत त्याच्या..
आणखी एक ईण्टरेस्टींग फॅक्ट म्हणजे गेल्या दशकभरात जगभरातले जे दिग्गज फलंदाज ऑस्ट्रेलियात खेळले त्यात ऋषभ पंत हाच सर्वोत्तम सरासरी राखून आहे
आकड्यांच्याही पलीकडे अशी त्याची जी कालची मॅच्युअर्ड खेळी होती, जे टेंपरामेंट आणि शॉट सिलेक्शन त्याने दाखवले ते कमाल होते. लायनचा एक बॉल क्रॅकमध्ये पडून उसळल्यावर ते डोक्यातून काढून पुढच्याच बॉलला पुढे सरसावत त्याला अगेन्स्ट द स्पिन षटकार मारणे असो वा नवीन बॉलवर पुजारा बाद होताच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना डोईजड होऊ न देता काही सुरेख ड्राईव्हस मारणे लाजवाब खेळी होती. समोरून पुजारा मयंक सुंदर शार्दुल गेले पण हा सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेऊनच खेळत होता. आणि तसाच शेवट केला.
हि खेळी फ्लूक नक्कीच नसणार आहे हे ज्याने आज त्याचा खेळ पाहिला त्याला समजेलच. येत्या काळात नवा पंत आणि त्याच्या अश्या कैक बहारदार खेळ्या बघायला तयार राहूया
ऋषभ इतक्या मॅच्युरिटीने खेळणं
ऋषभ इतक्या मॅच्युरिटीने खेळणं ही भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे. आता तो लवकरच विकेटकिपींग मधल्या त्रुटी पण सुधारेल आणी एक कंप्लीट पॅकेज म्हणून तयार होईल हीच सदिच्छा!
ऋन्मेष पंतचा फोटो टाक की
ऋन्मेष पंतचा फोटो टाक की एखादा
छान आयड्या, पण एखादा कश्याला,
छान आयड्या, पण एखादा कश्याला, लाईनच लावतो थांबा
बाकी प्रतिसादातच टाकता येईल आता, मूळ धाग्यात नाही....
(No subject)
.
.
पंत कसोटी मध्ये अजुनपर्यंत 40
पंत कसोटी मध्ये अजुनपर्यंत 40-90 दरम्यान बाद झाला नाहीये.
छानसा फोटो टाक अरे
छानसा फोटो टाक अरे
चेहरा नीट दिसेल असा.
नंतर बघितले तर ओळखता आले पाहिजे
मधल्या फोटोत छातीला हात लावलेला पंत की स्टंप हातात घेतलेला
स्टंप हातात घेतलेला
स्टंप हातात घेतलेला
स्टंप हातात घेतलेला शुभमन ,
स्टंप हातात घेतलेला शुभमन , छातीला हात लावलेला पंत
स्टंप हातात घेतलेला कार्तिक
स्टंप हातात घेतलेला कार्तिक त्यागी आहे, शुभनम नाही
चेहरा नीट दिसेल असा. >>>> ओके
चेहरा नीट दिसेल असा. >>>> ओके तो टाकतोच. त्याआधी माझ्या पोस्टवर खडूस कॉमेंट करणारया एका मित्राला दिलेले एक ऊत्तर
या पोस्टवर आलेल्या एका पंत न आवडणारया मित्राच्या पोस्टला दिलेले उत्तर
हे पण वाचा.. नुसता फोटो बघू
हे पण वाचा.. नुसता फोटो बघू नका.. त्यावर एक रेकॉर्ड आहे
https://mahasports.in/?p
https://mahasports.in/?p=114286
*ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या घरच्या मैदानावर तडकवणारा पंत असा बनला*
रिषभ पंतचे वडील राजिंदर त्याला उत्तराखंडमधील रुडकी येथे सराव करताना मदत करायचे. ते पंतचा सराव करून घेतांना रिषभ पंतच्या छातीवर उशी बांधून कॉर्क चेंडूने सराव करून घेत असत. कारण रिषभ पंतच्या मनातील गोलंदाजाबद्दल असलेली भीती निघून जावी. राजिंदर आपल्या मुलाची ताकद वाढवण्यासाठी एनर्जी पावडर असलेले दूध प्यायला द्यायचे. त्यामुळे रिषभ पंतची ही ताकद ब्रिस्बेन येथील सामन्यात दिसून आली.
राजिंदर यांनी काही वर्षापूर्वी सांगितले होते की, मी रुडकी येथील आपल्या घरावर सिमेंटने तयार केलेल्या छतावर त्याचा कॉर्क चेंडूने सराव करून घेत होतो. जिथे चेंडू वेगाने येतो. त्या काळी शहरात कोणते टर्फची खेळपट्टी नव्हती. मी त्याच्या छातीवर उशी बांधायचो. कारण वेगवान चेंडू खेळताना त्याला दुखापत होवू नये. मात्र त्याला दुखापत झाली आणि फ्रॅक्चर झाले. हे सर्व मी यासाठी करत होतो, कारण त्याच्या मनातील भीती निघून जावी म्हणून करत होतो. हे अतिरिक्त प्रशिक्षण होते.” अशा प्रकारे राजिंदर आपल्या मुलाला क्रिकेटचे धडे देत होते.
आपल्या मुलाला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे रिषभ पंत वडील राजिंदर आणि आई सरोज यांनी त्याला दिल्ली येथे तारक सिन्हा यांच्याकडे पाठवले. रुडकी पासून दिल्लीचा प्रवास सोपा नव्हता. रिषभ पंतची आई पहाटे तीन वाजता उठून मुलाला सोनेट क्लब मध्ये शनिवार आणि रविवार सराव करता यावा यासाठी बस पकडत असत. त्यांच्या मुलाला सराव करता यावा म्हणून त्या शनिवारी गुरूद्वरात थांबत. ज्यामुळे रिषभ पंतला रविवारी सराव सत्रात भाग घेता यावा. त्यानंतर रिषभ दिल्लीत भाडेच्या घरात राहू लागला.
Pages