लंबी रेस का घोडा - ब्राईट हॉर्स ऋषभ पंत !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2019 - 17:25

एक तो डार्क हॉर्स असतो. जो उमदा असतो पण डार्क असल्याने कोणाच्या नजरेत येत नाही. आणि सुमडीत रेस जिंकून जातो तेव्हाच प्रकाशझोतात येतो.

एक हा ऋषभ पंत आहे जो असाच एक उमदा घोडा आहे. पण डार्क हॉर्स ऐवजी त्याचा ब्राईट हॉर्स झालाय. याचे कारण म्हणजे एखाद्या नवोदीत खेळाडूला आजवर लाभली नसावी ईतकी प्रसिद्धी, आणि ईतका प्रकाशझोत त्याला अल्पावधीतच लाभला आहे. आणि याला जबाबदार आहे ते त्याचा बिनधास्त आणि तितकाच अतरंगी खेळ, त्यालाच शोभेसा त्याचा मैदानावरचा वावर, (यात ते ऑस्ट्रेलियातील बेबी सीटींग प्र्करणही जोडा) त्याने आयपीएलमध्ये घातलेला धुमाकूळ आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केलेले काही विक्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो ज्या खेळाडूची जागा संघात घेणार आहे तो आहे सचिननंतरचा वा त्याच तोडीचा ऑल टाईम ग्रेट भारतीय क्रिकेट लिजण्ड महेंद्रसिंग धोनी. त्याचा तो संभाव्य वारसदार म्हणून ओळखला जातोय. चर्चा तर होणारच!

तर ऋषभ पंत हे नाव गेल्या वर्ष दिड वर्षात चर्चेला आले असले तरी मी त्याचा थेट २०१७ आयपीएलपासून फॅन आहे. जेव्हा त्याने ४२ चेण्डूत ९७ वगैरे धावा मारत २००+ टारगेट चेस केले होते. अर्थात आयपीएलमध्ये बरेचदा सोमेगोमेही चमकतात. पण त्या खेळीत वा त्यानंतरही त्याचे जे फटके पाहिले ते त्याच्यातील स्पेशल टॅलेंट दर्शवणारे होते. जसे सेहवागला फक्त बॉल दिसायचा, तो टाकणारा बॉलर कोण आहे याच्याशी घेणेदेणे नसायचे, त्यामुळे तो जगातल्या दिग्गज गोलंदाजांनाही फारशी ईज्जत न देता बिनधास्त खेळायचा. पंतचेही थोडेफार तसेच आहे. आयपीएलमध्येही त्याने त्याच्या दिवसाला भुवी, बुमराह, जोफ्रा आर्चर, स्पिनमध्ये राशीद खान या सर्वांना लीलया हवेत भिरकावले आहे. आयपीएलच्या तीन सीजनमध्ये मिळून ३५+ सरासरी आणि १६०+ स्ट्राईकरेट अशी कामगिरी आणखी कोणाची नसावी.

आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याचे चटचट आठवणारे विक्रम म्हणजे षटकार मारत कसोटीत पदार्पण, भारतीय उपखंडाबाहेर दोन शतके, त्यातील एक चौथ्या इनिंगमध्ये आलेले, सलग तीन कसोटी इनिंगमध्ये ९०+ धावा मारायच्या गिलख्रिस्टच्या विक्रमाशी बरोबरी. ऑस्ट्रेलियात पुजारापाठोपाठ कोहलीपेक्षा जास्त धावा, मी त्याला फॉलो करत असल्याने एक मजेशीर निरीक्ष्ण असे की ऑस्ट्रेलियात त्याने प्रत्येक इनिंगमध्ये किमान २५ धावा म्हणजे पावशतक मारलेच. जेव्हा पुजारा कोहली रहाणे शर्मा ही मिडल ऑर्डर मिळून ६ धावांत बाद व्हायचा नीचांक झाला तेव्हाही पठ्ठ्याने ४० धावा मारत लाज व मॅच राखली. खुद्द धोनीने ऑस्ट्रेलियाच्या तीन दौरयात मिळून जितक्या धावा केल्या नाहीत तितक्या याने एका दौरयात केल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटीमध्ये भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे आजवरचे सर्वोत्तम असे १४ वे मानांकन पटकावले. खुद्द धोनीचे कारकिर्दीतले सर्वोत्तम मानांकन १९ वे च होते.
बरं फलंदाजीसोबत विकेटकीपिंग जिथे खरे तर अजून त्याला सुधारणा करायची आहे तिथेही काही विक्रम रच्ले. एका सामन्यात ११ बळींच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. केवळ ११ सामन्यात बळींचे अर्ध्शतक साजरे केले. याआधी धोनीला तब्बल १५-१६ सामने लागले होते.

हे कसोटीचे म्हणाल तर २०-२० मध्येही धोनीची आजवर दोन अर्धशतके होती आणि ५६ सर्वोत्तम होता. याने ती धावसंख्या दोन वेळा मागे टाकली. दोन्ही वेळा चेस करत जिंकवून् दिले हे विशेष.

एकूणच सतत काही ना काही घडत राहिल्याने अपेक्षाही तितक्याच वाढल्या आणि त्यांची पूर्तता करायची जबाबदारीही.
विश्वचषकाला तर रायडू रहाणे व नंतर केदार जाधव यांना वगळून पंतला संघात निव्वळ फलंदाज म्हणून संघात स्थान दिले. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टॉप ऑर्डर कोसळत असूनही याला थेट नवीन चेण्डूचा सामना करायला पुढे पाठवले. आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे चुकीचा फटका मारून बाद होण्याअगोदर त्याने आधीचा क्रिटीकल पिरीअड व्य्वस्थित खेळूनही काढलेला.

एकंदरीतच त्यामुळे तो एक यष्टीरक्षक फलंदाज आहे याचा लोकांना विसर पडून त्याच्या फलंदाजीवरच फोकस होऊ लागला. एवढेच नव्हे गेले एक दोन मालिकांत विशेष काही न केल्याने त्याच्या प्रत्येक इनिंगवर आणि प्रत्येक बाद होण्यावर चर्चा झडू लागली. क्रिकेटरसिकांमध्येच नाही तर समालोचकांमध्येही. सामना संपल्यावर ऋषभ पंतच्या आजच्या खेळीचे बरेवाईट विश्लेषण केल्याशिवाय तो सामना अधिकृत धरलाच जाणार नाही असा आयसीसीने नियम तर काढला नाही ना ईतपत शंका यावी. तिथे तो दादा गांगुली ओरडून सांग्तोय की त्याला मोकळे सोडा पण ते संघ व्यवस्थापनालाही जमत नाहीये. सलग चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवणे म्हणजे मोकळीक देणे नव्हे. पण तरी त्यावर लंबी रेस का घोडा म्हणत निव्ड समितीने दाखवलेला विश्वास ही जमेची बाजू आहेच.

ईथे रोहीत शर्माची आठवण काढल्यावाचून राहवत नाही. एकेकाळी तो चुकीचे शॉट सिलेक्शन करून झटपट बाद होण्यासाठी बदनाम होता. पण निवडसमितीचा त्यावर विश्वास होता. माझाही होता. माझे मित्र त्याला टू मिनिट मॅगी नूडल्स चिडवायचे तेव्हाही मी त्यालाच सपोर्ट करायचो. पुढे जेव्हा त्याने आपले प्रॉब्लेम सोडवले तेव्हा तो काय झाला हे जग बघतेय. आज शतक मारणे त्यासाठी खेळ झालाय.

रोहीत शर्माचा तेव्हा प्रॉब्लेम होता की त्याकडे शॉट खेळायला ईतका वेळ असायचा की आता कुठचा खेळू याचा जास्त विचार केला जायचा.
सध्या पंतही त्याच्यावरील चर्चेमुळे फार जास्त विचार करून खेळू लागलाय. आज ना उद्या ही स्टेज जाईलच. पण आशा करूया तो यातून लवकर बाहेर पडेल. जेव्हा पडेल तेव्हा तो अफाट मनोरंजन करेल यात शंका नाही.

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजिंदर आपल्या मुलाची ताकद वाढवण्यासाठी एनर्जी पावडर असलेले दूध प्यायला द्यायचे. त्यामुळे रिषभ पंतची ही ताकद ब्रिस्बेन येथील सामन्यात दिसून आली.
>>> कायपण छापतात

हायला च्रप्स.. आपके घर मे बोर्नविटा नही है.. बोर्नविटा तो होना चाहिये.. और रोज पिना भी चाहिये.. Proud

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 January, 2021 - 00:05 >>> ह्या फोटोत पंतच्या शेजारी हातात स्टंप धरलेला खेळाडू कोण आहे ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 January, 2021 - 00:05 >>> ह्या फोटोत पंतच्या शेजारी हातात स्टंप धरलेला खेळाडू कोण आहे ?
>>>>>>

कार्तिक त्यागी

पंत ला यष्टीरक्षण सुधरवणे खूप आवश्यक आहे, भारतात spinners ला किपिंग करताना त्याचा कस लागेल
>>>>
लागतोच, म्हणून त्याला न खेळवता साहाला खेळवतात. अन्यथा तो फिरकी गोलंदाजांवरही अन्याय होतो. त्यानेही आता ही जबाबदरी स्वतः घ्यायला हवी.
पण एक विचार असाही मनात येतो की कश्याला सगळेच फॉर्मेट खेळायची गरज आहे. जर २०-२० आणि एकदिवसीयमध्ये स्थिरावला तर कसोटीत त्याला फक्त परदेशात खेळवता येईल.

पंतने, घेतला वसा सोडू नये.

द्वारकानाथ संझगिरी

हृदय रोग तज्ञा कडे गेल्यावर तो आपल्या रोग्यांना नेहमी सांगतो" तेलकट खाऊ नका. सिगरेट बंद. अमुक बंद, तमुक बंद"
त्यात यापुढे एक भर पडू शकते.
" वृषभ पंतची फलंदाजी पाहू नका. तुमच्यासाठी ती हानिकारक आहे"
त्याची फलंदाजी म्हणजे डोळे दिपवणारीं रोषणाई सुरू असते आणि खाडकन फ्युज जातो.ते नैराश्य पचवायची ताकत तुमच्या हृदयात हवी.
पंत फलंदाजी करताना फलंदाज बाद होतो हे त्याला माहीत नसावं असं वाटतं.
चेन्नई कसोटीची भारताची पहिली इनिंग आठवा. समोरच्या संघाने पावणे सहाशे धावा केल्या आहेत, आपले चार बळी गेले आहेत. धावफलक अजून ८० च्या आत रेंगाळतो आहे, ह्याचा दबाव कुठे त्याच्यावर जाणवला? . त्याची सुरवात पाहून त्याने धावफलक वाचलेला नाही असं वाटलं. हिंदीत डब केलेल्या दाक्षिणात्य फिल्मचा हिरो एकावेळी पन्नास जणांना अंगावर घेतो तेंव्हा त्यालाही दबाव जाणवतो अस वाटत नाही.पण त्याला पुढची कथा ठाऊक असते.तो जिंकणार हे पटकथाकार लिहून गेलेला असतो. इथे नियतीने मन उघडं केलेलं नसतं. तरी हा तीन पत्ती ब्लाइंड खेळावी तसा ब्लाइंड खेळतो. आणि तरी गेल्या तीन कसोटीत मी त्याला तीनदा जिंकताना पाहिलं.
चेन्नईला, पहिल्या डावात त्याच्या ऑफ स्टंप बाहेर जो पॅच होता त्यात चेंडू टाकण्यासाठी डावखुऱा फिरकी गोलंदाज "लीच "कडे कर्णधार रुटने चेंडू दिला. रुटची अपेक्षा पंतच्या मुसक्या बांधल्या जातील. ह्याने त्यालाच फेकून दिलं. नाक शिंकरून टिश्यू डस्टबिन मध्ये फेकावा तसा.
मला एक जुना प्रसंग आठवला. चेन्नईलाच मॅच होती. समोर इंग्लंडच होती. दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी भारताला फक्त ८० धावा हव्या होत्या. तरी विकेट्स गमावून भारतीय संघ तिथवर पोहचायला धापा टाकत होता. सलीम दुराणीने गिफोर्ड नावाच्या डावखोऱ्या फिरकी गोलंदाजांला पुढे जात दोन उत्तुंग षटकार मारले. टार्गेट जवळ आलं. भारतानं मॅच जिंकली. त्यानंतर काही वर्षांनी सलीम मित्र झाल्यावर मी त्याला बावळटपणें विचारलं," सलिमभाई, डर नही लगा?"
तो म्हणाला," मुझे उसमे डर पैदा करना था. उसे दिखाना था बॉस कौन है"
पंत ने नेमकं तेच केलं. सीमारेषेवर क्षेत्र रक्षक ठेऊनही त्याने त्यांच्या डोक्यावरून फटके मारले. हा जाणीवपूर्वक दाखवलेला उद्दाम पणा होता.
पुन्हा एक जुना किस्सा आठवला. सर डॉन ब्रॅडमनचा. एकदा विनू मंकडने ब्रॅडमनला मिड ऑनला क्षेत्ररक्षक ठेवला. ब्रॅडमनने त्याच्या डोक्यावरून मंकडला मारलं. त्याने क्षेत्ररक्षकाला थोडं मागे सरकवलं. त्याने त्याच्या डोक्यावरून चेंडू मारला. मंकडने त्याला सीमारेषेवर ठेवलं. त्याने प्रेक्षकांत मारलं.
त्याने बॅटने दाखवलं त्यापलीकडे क्षेत्र रक्षक ठेवता येत नाही. मंकडं हा ऑल टाईम ग्रेट फिरकी गोलंदाज होता.मी चुकूनही ब्रॅडमन आणि पंत ची तुलना करत नाही. प्रवृत्ती बद्दल बोलतोय.
प्रवृत्ती मात्र तिच!
१९७०च्या दशकात मी कुणी तरी लिहिलेलं सुंदर वाक्य वाचलं होत. त्यावेळी अस्सल साहसी आक्रमक फलंदाज कमी आणि नांगर टाकणारे , बचावात्मक जास्त होते. तेंव्हा लिहिलं होत, "A stroke maker may fail once. He may fail twice. But he cannot fail always. And the success of the stroke maker is the greatness of the game"
सेहवाग, पंत सारखे फलंदाज पाहिले की त्याची आठवण होते.
मला त्याची इंग्लंड मधली पाहिली कसोटी खेळी आठवते. फटके विसरल्यासारखा तो खेळला.प्रेस बॉक्स मध्ये मला कळेना मी कारंजासारखा उसळणारा पंत पाहतोय की सय्यमी पाद्री?आणि दुसऱ्या डावात, सर्वच फटके एकाच क्षणात जगाला दाखवायच्या नादात तो फसला. नंतर ओवलवर शतक ठोकलं तेंव्हां,त्याला समतोल सापडलाय अस वाटलं. मग २०१८ला ऑस्ट्रेलियाविरुध्द चांगला खेळला. पुन्हा हरवला. पण ऑस्ट्रेलिया मध्ये ह्यावेळी तो वेगळं प्रगल्भ रूप घेऊन आला. त्याने आक्रमणाचा वसा सोडला नाही. पण आक्रमण बेबंद नव्हतं. त्यात एक मेथड होती. चेन्नईला सुद्धा त्याने पहिल्या डावात बेस आणि आर्चरच्या चांगल्या चेंडूला आदर दाखवला. आक्रमक फलंदाजाला कधीतरी बॅटची ढाल करावी लागते.विव्ह रिचर्ड्स किंवा सोबर्सलाही ते चुकलं नाही.पण त्यांच्यासारख्या गुणवत्ता आणि प्रवृत्तीच्या फलंदाजांवर अशी वेळ कमी येते.
तो आपल्याला सुंदर स्वप्नात घेऊन जातो आणि अचानक क्लायमॅक्स वर स्वप्न तुटलं की आपण निराशेने म्हणतो" कशाला हा फटका खेळायला गेला.?"
आधी अशाच फटाक्यांवर त्याने धावा लुटलेल्या असतात. तेंव्हा त्या लुटीच्या आनंदात आपणही सामील असतो. एक लक्षात ठेवायला हवं की आगीशी खेळणारा माणूस कधीतरी भाजणारच. आगीशी खेळणं आपल्याला भावत असेल तर भाजणं स्वीकारलं पाहिजे.
त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात अजून सुधारणेला वाव आहे. पण त्याच्या प्रवृत्तीत कुणी कोचने बदल करू नये.
निव्वळ सातत्यतेच्या लालसेने तर नाहीच.मधल्या फळीत ४५ च्या सरासरीने त्याने धावा केल्या तरी आपल्याला फायदेशीर आहेत. कारण त्याच्याकडे मॅच फिरवायची ताकद आहे.
तो नव्वदित चार वेळा बाद झाला. मला वाईट वाटलं. शतकं हे माॅन्युमेंट ( monument) असतं. ते स्वतःच्या हाताने उध्वस्त करायचं नसतं, . त्यालाही ते चुकल्याचा आनंद होत नसतो ना? तो मोहात फसतो.
नव्वदित मेनका कशी टाळायची हे त्याचं त्याला उमगेल.
काही माणसं आपले पैसे बचत खात्यात ठेवतात. त्यांना जोखीम नको असते. पुजारा तसा फलंदाज आहे. पंत हा शेअर बाजारात खेळणारा फलंदाज आहे. त्यामुळे उसळणं , कोसळणं आलं. पण पंतला पाहून चेन्नईत पुजाराला सुद्धा शेअर मध्ये पैसे गुंतवावे असं वाटलं. तो नेहमीपेक्षा जास्त आक्रमकपणे, फिरकी गोलंदाजांना पुढे जात खेळला.
जयसुर्या, सेहवाग, गिलख्रिस्ट, लारा, ह्यांनी शेवट पर्यंत आपला नैसर्गिक खेळ बदलला नाही.
पंतने त्याच मार्गावरून जावं. घेतला वसा सोडू नये.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ७१-४ अश्या स्थितीत येत पाच सहा षटकार खेचत ८८ चेंडूत ९१ चेंडूची तडाखेबाज खेळी
आणि
दुसर्‍या कसोटीत तळाच्या फलंदाजांना सोबत घेत माती उडणार्‍या अवघड खेळपट्टीवर तडाखेबंद नाबाद ५८ धावा
या दोन खेळींचे फळ पंतला मिळाले
आयसीसी कसोटी मानांकन ११ वर त्याने झेप घेतली.
भारतातर्फे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिल्यांदाच कोणीतरी ईतके टॉपला पोहोचले आहे.
एक घर पुढे जात टॉप टेनमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पंतला शुभेच्च्छा Happy
ते याच मालिकेत होईल आणि भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचेल अशी आशा...

अरे वाह वर आयसीसी मानांकन ११ ची पोस्ट होती.
त्यानंतर भारत ईंग्लंड मालिकेच्या अखेरच्या निर्णायक सामन्यात पंतने पुन्हा एकदा निर्णायक खेळी करत सलग दुसर्‍या महत्वाच्या मालिकेत निर्णायक सामन्यात सामनावीर पुरस्कार तर मिळवलेच पण भारताला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही पोहोचवले.

आणि याचे फळ म्हणून त्याचे मानांकन ११ वरून थेट ७ ला पोहोचले आहे.
कोहली, स्मिथ, रूट, विल्यमसन हे मॉडर्न फॅब फोर तसेच बाबर आझम आणि लाबुशान हेच तेवढे त्याच्या पुढे आहेत. आणि हे सारे क्लासिकल फलम्दाज आहेत. यांच्या पंक्तीत सो कॉल्ड अडमतडम पंतने स्थान पटकावले आहे Happy

आता आजच्या भारत ईंग्लंड वन डे सामन्याबद्दल.

आज पंतने ४० चेंडूत ७७ धावा मारले = १९२.५० स्ट्राईकरेट

भारतातर्फे ७७ पेक्षा जास्त धावांची एकही इनिंग नाही जी यापेक्षा जास्त स्ट्राईकरेटने आली आहे Happy

पंत हल्ली खेळायला उतरतो ते एखादा विक्रम रचायलाच Happy

अहो ७७ धावा वा त्यापेक्षा अधिक धावा असलेली ईतकी फास्ट खेळी आजवर कोणा भारतीयाने खेळली नाही असा एक रोचक विक्रम आहे तो.

लवकरच तो भारतातर्फे सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाजही बनेल. कालच खरे तर ती संधी होती. पण अश्या संधी येत राहतील जसा तो प्लेअर आहे हे पाहता.

.

बिग ब्रेकिंग
पंतला दिल्ली कॅपिटल्सने कप्तान केले
जीव घेणार पोराचा Happy

.

@ च्रप्स मग आता निर्णायक सामन्यातील निर्णायक ठरलेल्या खेळीबद्दल काय म्हणाल.. सातत्याने तिसरया मालिकेत निर्णायक सामन्यात प्रेशर सिच्युएशनमध्ये निकाल पलटवणारी खेळी Happy

आता काही विक्रमी कामगिरीच्या पोस्टरचा आनंद घेऊया..

FB_IMG_1617127338003.jpg

.

FB_IMG_1617127409862.jpg

.

FB_IMG_1617127696169.jpg

.

IMG_20210331_005324.jpg

आपला चुम्मा फलंदाज दिल्लीचा आयपीएल कप्तान ऋषभ पंत आज त्याचा पहिलाच सामना जिंकला. ते सुद्धा त्याचाच आदर्श असलेल्या धोनी विरुद्ध. ते सुद्धा स्वत:च विनिंग शॉट मारून Happy

ऋषभ पंत निकले कोविड-19 पॉजिटिव, लापरवाही की तस्वीर आयी सामने

https://ndtv.in/cricket/eng-vs-ind-now-name-is-come-out-rishabh-pant-is-...

ईंग्लंड दौरा आहे राजा.. काय केलेस हे Sad

Hoping for your speedy recovery!!
Come back stronger champ
- एक चाहता

आफ्रिकेतील शतकानंतर...

*ऋषभ पंत सेना (SENA) देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) तीन शतके ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज बनला आहे.*

*यासोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याच्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शतके काढणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक आहे.*

*यासोबतच रिषभने आपल्या भारताबाहेरील अवघ्या २२ व्या सामन्यात तिसरे शतक केले. भारतासाठी आतापर्यंत विविध देशांत यष्टीरक्षण केलेल्या इतर सर्व यष्टिरक्षकांनी २०४ सामन्यांमध्ये मिळून ३ कसोटी शतके केली आहेत.*

.

आयसीसी टेस्ट टीम ऑफ द ईयर २०२१

१. हिटमॅन
२. चुम्मा
३. आश्विन

अभिनंदन Happy

IMG_20220122_015401.jpg

IND vs SA: संकट काळात खेळला पंत, द्रविडचा 21 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला

पंतनं यावेळी दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही भारतीय विकेटकिपरकडून वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर केला. त्याने सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा 21 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. द्रविडने 2001 साली डरबनमध्ये 77 रनची खेळी केली होती. पंतने द्रविडला मागे (Pant Broke Dravid Record) टाकले

हो तोच द्रविड. पण हे क्रिकेटच्या धाग्यावर लिहा. हा धागा चुम्मा स्पेशल आहे. जो १९४ वर असताना कोणी डिक्लेअर करतेय नाही करतेय याची वाट न बघता स्वत: सिक्स मारण्यात बाद होईल Happy

.
फास्टेस्ट फिफ्टी ईन टेस्ट फॉर ईंडिया
ऋषभ पंत !

हा माणूस जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा मी हातातले सारे काम बाजूला ठेऊन मॅच बघतो मग फॉर्मेट कुठलाही असो.
ईतकेच नाही तर मस्तपैकी हिंदी कॉमेंटरी लावतो आणि वॉल्युम फुल करतो. कारण याची अतरंगी फटकेबाजी बघून कॉमेंटेटरना बोलायलाही मजा येते आणि आपल्याला ऐकायलाही.
जोपर्यंत हा खेळणार तोपर्यंत हा चर्चेचा विषय राहणार. कोणाला त्याचे बिनधास्त खेळणे रुचो न रुचो पण त्याने आपली खेळायची शैली कधी बदलू नये. मजा त्यातच आहे Happy

IMG_20220313_181555.jpg

Pant is the first Player to make 30+ runs at a 150+ strike rate in both innings of a test match.

हे एक अजून Happy

ऋषभ पंतचा अजून एक किर्तीमान !

आज कसोटी सामन्यांमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे ऋषभ पंत Happy

निर्णायक सामना आणि ऋषभ पंत !
फॉर्मेट - क्लासिकल क्रिकेट

१. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाब्बाला ईतिहास रचत सामानवीर झाला.

२. पुढच्याच मालिकेत ईंग्लंडविरुद्ध निर्णायक कसोटीत लो स्कोअरींग सामन्यात ईंग्लंडच्या २०५ धावांना प्रत्युत्तत देताना भारताची स्थिती ११२-५ अशी झाली असताना ११८ चेंडूत १०१ असे झुंजार शतक फटकावून पुन्हा एकदा सामनावीर पुरस्कार पटकावला.

३) आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत निर्णायक कसोटीत निर्णायक डावात अजून एका लो स्कोअरींग सामन्यात भारताची स्थिती ५८-४ असताना तो आला. आणि १३९ चेंडूत १०० धावांची खेळी करत अखेरपर्यंत नाबाद राहिला. भारत सर्वबाद १९८, ईतर कोणत्याही फलंदाजाला ३० चा आकडाही गाठता आला नाही. परीणामी आपल्याला सामना गमवावा लागला. पंतचे ते शतक मात्र अव्वल दर्जाचे ठरले.

४) श्रीलंकेचे आव्हान काही खास नव्हते. पण तिथेही निर्णायक सामन्यात तूफान फटकेबाजी करत एक ईंटरेस्टींग रेकॉर्ड रचला. दोन्ही डावात १५०+ स्ट्राईकरेटने (किमान ३०-३० धावा) खेळणारा पंत हा कसोटीच्या ईतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. त्यात त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळवणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला.

५) आज ईंग्लडमध्ये या रखडलेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात ऋषभ पंत पुन्हा आपले जलवे बिखरतोय. ९८-५ अश्या स्थितीतून १११ चेंडूत १४६ धावांची खेळी हे निव्वळ अदभुत आहे !

खेळायच्या शैलीवरून तो कितीही बेभरवश्याचा वाटत असला तरी क्रिकेटच्या क्लासिकल फॉर्मेटमध्ये जिथे तुमच्यात क्लास असल्याशिवाय तुम्ही परफॉर्म करू शकत नाही तिथे गेल्या एकूण एक कसोटी मालिकात जेव्हा सर्वात जास्त गरज असते अश्या निर्णायक सामन्यात आणि निर्णायक क्षणी ऋषभ पंतने हमखास कामगिरी ऊंचावणे हे त्याला स्पेशल बनवते Happy

*अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम*

ऋषभ पंतने २४ वर्षे २७१ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत.
ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने २५ वर्षे असताना हा पराक्रम केला होता.

*सर्वात जलद २००० धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज*
रिषभ पंत कसोटी सामन्यात सर्वात जलद २००० धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी महेंद्रसिंग धोनी आणि सय्यद किरमाणी यांनीही कसोटी सामन्यात २००० धावांचा टप्पा पार केला आहे. .

*आशियाबाहेर भारतासाठी सर्वात वेगवान कसोटी शतकाच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.*
यामध्ये वीरेंद्र सेहवाग पहिल्या तर मोहम्मद अझरुद्दीन पहिल्या स्थानावर आहे.

*इंग्लंडमध्ये दोन शतक झळकावणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज*
याशिवाय रिषभ पंत इंग्लंडच्या धर्तीवर दोन शतके झळकावणारा जगातील पहिला बाहेरील देशातील यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही देशाच्या यष्टीरक्षकाला इंग्लंडमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही.

*एकाच वर्षात दोन शतके*
टीम इंडियाचा प्रतिभावान खेळाडू पंत एका कॅलेंडर वर्षात दोन शतके झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. वृद्धिमान साहानेही त्याच्याआधी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये साहाने हे चमत्कार केले होते. तर धोनीने हा पराक्रम २००९ मध्ये केला होता.

Pages