चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोन हफ्ते फेडणे मुश्किल होणे, महागड्या पर्सेस न घेता येणे, पायलट न होता हवाईसुंदरी होणे ही काय स्मग्लींग ची कारणं नाहीत
>>
सहा महिने पगार मिळालेला नाही
कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
वर तुम्ही दिलेली करणं + घरमालकाचा तगादा, एक्सटेंडेड फॅमिली चं प्रेशर वगैरे वगैरे
या परिस्थितीत समोर घबाड मिळवण्याचा मार्ग दिसत असताना, तो चुकीचा आहे हे समजून देखील टाळणं सोपी गोष्ट नाही

आणि जर त्यांनी तेच टाळलं असतं तर पुढचा सिनेमा कसा घडला असता???

लापता लेडीज बघितला. खूप आवडला. चित्रपटाविषयी इथे बरंच आधीच लिहून झालं आहे.

त्यात प्रत्येकजण काही ना काही निशाणी सोडून जातात ते खूप मस्त दाखवलं आहे. फूलची कुंकु-तांदुळाची पिशवी मंजूमाईकडे येते. रवि किशन जयाला रुमाल देतो तो ती तिच्याबरोबरच घेऊन जाते, त्याला परत देत नाही. दीपकची भाभी चित्र काढून जयाला देते. शेवटच्या प्रसंगात जयाची जी शाल आहे अगदी तशीच फूलची आहे, कदाचित फूलने तिला दिली असेल.

सुरुवातीची आणि शेवटची रेखाचित्रेही एकदम चपखल आहेत. शेवटचे धीमी धीमी गाणं आणि डाऊटवा गाणं मस्त आहे.

त्यात प्रत्येकजण काही ना काही निशाणी सोडून जातात ते खूप मस्त दाखवलं आहे. >> सॉलिड निरीक्षण.

बरे झाले कोणीही ओळखीचा कलाकार घेतला नाही रवी किशनच्या जागी. रवी किशन माहीत असला तरी मेनस्ट्रीम हिंदी मधे अजून बर्‍यापैकी अनोळखी आहे. भोजपुरीमधे असतो हे माहीत आहे. इथे पहिल्यांदा पिक्चर पाहताना तो कोणत्या सीनला नक्की कसा वागणार आहे हा टोटल सस्पेन्स राहतो. आमिर किंवा एखादा नेहमीचा लीड असता ती अनप्रेडिक्टिबिलिटी आली नसती.

नाव विसरलो पण राजस्थानी पार्श्वभूमीवर तो एक लहान मुलाचा पिक्चर आहे, त्यात गुलशन ग्रोव्हरचा रोलही असाच अनप्रेडिक्टेबल वाटल्याने उत्कंठा राहते.

नाव विसरलो पण राजस्थानी पार्श्वभूमीवर तो एक लहान मुलाचा पिक्चर आहे, >>>>>>>> आय एम कलाम का?

आमिर रविकिशन सारखा बनेल, रगेल, लबाड, चीप अजिबात वाटू शकला नसता.

रवी किशन मला बिग बॉस हिंदीतही आवडलेला, पहिल्या सीझनमध्ये होता. पहिले दोन बघितलेले. तो मराठी मस्त बोलतो, राखीशी बोलायचा.

जिंदगी झंडवा, फिरभी घमंडवा. ही म्हण त्याने फेमस केलेली.

जिंदगी झंडवा, फिरभी घमंडवा. ही म्हण त्याने फेमस केलेली.
>>> अरे हो, विसरले होते. मी वापरते ही बरेचदा. 'सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही' ला रिटायर केले याने. Lol

आमिर खान शोभला नसता हे आमिर खान आणि किरण राव दोघांनाही ठाउक होतं बहुधा. ती नेटफ्लिक्सवरच्या मुलाखतीतली गंमत होती. 'अहो रुपं -अहो ध्वनी' करावं लागतं प्रमोशनच्या वेळी तसं काही वाटलं. त्यात तथ्य नसावं. 'ये तो आपका बडप्पन है' टाईप. हे बघा.

https://youtu.be/vrH7CT0eexw?si=r3QEICBkP2zYv46M
रवीकिशन 'तनु वेडस् मनु' मधे जिमी शेरगीलचा मित्र आहे. जो त्याच्या सांगण्याप्रमाणे मनुजीला कानाखाली ठेवून देतो. 'खाकी' सिरीजमधेही तुरुंगात स्नान करताना त्याचा गळा आवळून खून होतो. एकेकाळी अत्यंत वाईट संवादफेक वाटायची त्याची. नको त्या शब्दावर जोर देऊन बोलायचा. असह्य व्हायचा. आता बरीच सफाई आली आहे.

आय ॲम कलाम मध्ये गुलशन ग्रोव्हर फारच क्यूट आहे. Happy

ला ले पाहिला. आधीचे प्रतिसाद वाचले नाहीत. मला सुरुवात बोर झाली. रवी किशन आल्यावर मजा यायला लागली. त्याचे सर्वच सीन्स आवडले. तितके बाकीचे फार नाही.

त्यात प्रत्येकजण काही ना काही निशाणी सोडून जातात ते खूप मस्त दाखवलं आहे. >> हो हे निरीक्षण भारी आहे. माझ्या लक्षात नव्हतं आलं. शालीचं आठवत नाही पण बाकी रुमाल, चित्र वगैरे आठवलं.
रवीकिशन 'तनु वेडस् मनु' मधे जिमी शेरगीलचा मित्र आहे. हां म्हणून तो ओळखीचा वाटला. कानाखाली मारण्याचा सीन आठवत नाही, पण चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटत होता नक्कीच.
अनप्रेडिक्टेबल भूमिका आहे नक्कीच. शेवटच्या प्रसंगात तो जयाचा नवरा आल्यावर तिने सांगितलेली गोष्ट व्हेरिफाय करतो हेही चांगलं दाखवलं आहे.
आमीर खानला जमली नसती असं नाही, पण अनप्रेडिक्टेबल नसती राहिली हेही खरं आहे.

रवी किशन अभिनयात बराच मॅच्युअर झालाय.मामला लीगल है मध्ये तर धमाल.हा हेराफेरी2 मध्ये डॉन चा तोतरा मुलगा पण होता. मी आधी याला गरिबांचा मिथुन समजायचे जरा मिथुन सारखा दिसतो म्हणून.
सुपरहिट भोजपुरी चित्रपट पाहिले नाहीयेत.

आजच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत छाया कदमचा मुलाखतवजा लेख आहे. लापता लेडीज, सैराट, झुंड, न्यूड, फँड्री ते आता कान चित्रपट महोत्सवातला विजेता चित्रपट अशी इम्प्रेसिव्ह फिल्मोग्राफी आणि भूमिका आहेत.

ला ले मध्ये रवी किशन लालची पोलिस दाखवलाय किंवा असे म्हणुया की पोलिस स्टेशनची पायरी चढायची वेळ आजवर आली नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना असे पैसे देणे कानुनन जायज है हे मला माहित नव्हते Happy . जयाकडे १५० ग्राम सोने आहे हे माहित असल्यामुळे तो तिच्याबाबतही लालचीच आहे. त्यामुळे तो शेवटच्या सिनमध्ये कसा वागेल याचा अंदाज येत नाही. जयाच्या कानाखाली नवरा लगावतो आणि लेडी पोलिस व रविकिशन दोघेही फक्त बघतात हे मला खुप खटकले, त्या लेडी पोलिसलाही खटकते बहुतेक, ती बघतेही तिच्या बॉसकडे…. पण त्याला हे अपेक्षित असावे. नंतर हे वापरुन घेता येईल याचा त्याला अंदाज असेल.

>> रवी किशन अभिनयात बराच मॅच्युअर झालाय.मामला लीगल है मध्ये तर धमाल

अगदी अगदी. मामला लीगल है मध्ये एका एपिसोड मध्ये तो एका सिनियरला इंप्रेस करायला एक शेर पाठांतर करत असतो आणि त्यातली एक लाईन त्याला काही केल्या पाठ होत नसते. आयत्या वेळेला पण नेमकी तीच लाईन तो विसरतो आणि एकदम शेवटच्या सेकंदाला ती आठवून तो शेर पूर्ण म्हणून दाखवतो तेव्हा त्याने दाखवलेले एक्स्प्रेशन्स तर एकदम लाजवाब...

मडगाव एक्सप्रेस पाहिला आताच.
प्राईमवर आहे.
टाईमपास आहे. वेगवान आहे. आवडला.
गाणी तेवढी पुढे ढकलली. शेवटचे बेबी ब्रिन्ग ईट ऑन आयटम साँग सोडून. कारण ते सध्या ट्रेंडींग असल्याने घरी वाजत राहते. आज पुर्ण पाहिले. या पिक्चरमधील होते हे सुद्धा आताच समजले. आणि तेव्हा ट्यूब पेटली की त्यातली हिरोईन जी ओळखीची वाटत होती ती नोरा फतेह अली खान आहे. अन्यथा आजवर तिला ईथे तिथे नाचतानाच पाहिले होते Happy

छान आहे दिसायला ही सुद्धा. मागे क्रिती सेनॉनच्या दिसण्यावरून चर्चा झालेली ते आठवले. हिचे सौंदर्य सुद्धा त्याच कॅटेगरीतले आहे. पारंपारीक नाहीये.

शेवटचे बेबी ब्रिन्ग ईट ऑन आयटम साँग सोडून.
>>> 'जाऊ द्या ना बाळासाहेब' मधलं 'ब्रिंग इट ऑन आलिंगनाला' आठवलं. धमाल होते तेही. Happy

मडगाव एक्स्प्रेस नोटेड.

आज सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' बघितला. अर्धवट सोडून दिला. फार कंटाळवाणा आहे. विनोद डेटेड आहे आणि उगाच आरडाओरडा करतात. ममव गमती जमती ओढूनताणून वाटल्या. स्वतंत्र घर मिळवण्यासाठी घटस्फोटाचं नाटक करतात, मग त्या नाटकाचं नाटक करतात. साराला दोन ओळींचा अभिनय येत नाही, त्यात नाटकावर नाटक. सगळ्यांनी ओव्हर ॲक्टिंग आणि विकीने अंडरॲक्टिंग केली आहे. इंदौर शहराचा अभिनय मात्र पर्फेक्ट. साराला काहीच जमत नाही पण तिने विकीची सुद्धा माती केली आहे. त्याच्यात केवढी एनर्जी असते, ती वापरलीच नाही. सच अ वेस्ट...!

स्वतंत्र घर मिळवण्यासाठी घटस्फोटाचं नाटक >>>> विकी कौशलचे या जॉनरचे काही चित्रपट आवडले होते. त्यातला विकी कौशल सुद्धा आवडला होता. त्यामुळे उत्सुकता होती. पण त्यालाच वेस्ट घालवले असेल तर बघायला नको...

तसे सारा अली खान अभिनय जमत नसला तरी दिसण्याबाबत मला आवडते. केदारनाथची गाणी फार आवडीची असल्याने सतत घरी लागलेली असतात. त्यात ती सुद्ध दिसत राहते. साध्या सिंपल लूक मध्ये छान वाटते.

शैतान सुद्धा बघणे झाले नुकतेच.
मुलीला तिच्या मैत्रीणींसोबत बघायला पाठवले नव्हते. पण नेटफ्लिक्सवर आल्यापासून तिची बघण्यासाठी चुळबूळ चालू होती कारण मैत्रीणींनी पाहिला होता. कधीतरी गपचूप बघणारच ती म्हणून आधी कसा आहे ते आपणच बघून घेऊया म्हणून लावला. अर्धा तास ढकलत पाहिला आणि कळले की पांचट चित्रपट आहे. मग मुलीसोबत बघायला घेतला. तिलाही अगदी तसाच वाटला. घाबरणे दूर, दोघे मिळून पुर्ण चित्रपटभर जे काही चालू आहे त्याला रोस्ट करत होतो, ओवर अ‍ॅक्टींगचे पैसे कापत होतो. आणि क्लायमॅक्स तर अजून हास्यास्पद होता. तिलाही प्रश्न पडला की ईतक्या मुली कश्या पळवून आणल्या, आणि ईतके दिवस कोणाच्या नजरेत न येता कश्या लपवून ठेवल्या.. आभारच मानायला हवेत याबद्दल. त्यामुळे हे सारे नकली आणि बंडलच असते हे पटले तिला.

मला सारा अली खान अजिबात सुंदर वाटत नाही, तिला अभिनयही येत नाही. तिला फार एफर्ट्स लागतात आणि ते व्यवस्थित दिसतातही त्यामुळे मजा येत नाही. तिचा नाचही अतरंगीतले 'हाय चकाचक चकाचक है तू' मधे बघा, स्टेप्स पाठ करून गणेश मंडळात केलेल्या नृत्याची आठवण येते. पुन्हा त्याचा तणावही दिसतो चेहऱ्यावर. चेहरा इतका वेडावाकडा करते की घराच्या दरवाजातील पीप होलमधून माणूस कसा ॲन्गलयुक्त दिसेल तशी ती इन्टेन्स सीन मधे दिसते. हे मी काय लिहिले. Lol कशामुळे सहन करायचं कळत नाही. विकी कौशल मात्र आकर्षक, उंचापुरा, चुणचुणीत दिसतो. काही तरी हलकंफुलकं बघावं म्हणून सुरु केला होता. एकत्र कुटुंबही डेलीसोप टाईप कृत्रिम वाटलं. कसातरी पूर्ण करेन व उरलेली नावं ठेवेन.

मला तर हल्लीच्या बरेच हिरोईन दिसायला आवडतात. प्रत्येक जण काही वेगळा लूक, वेगळा फीचर घेऊन येतात असे वाटते. अन्यथा आधीच्या म्हणजे नव्वदीतील हिरोईन एकाच छापाच्या, सौंदर्याची एकच फूटपट्टी लाऊन असायच्या. जसे की श्रीदेवी जयाप्रदा, माधुरी, जुही, राणी, करीना, ऐश्वर्या.. एक ठराविक गोलाकार चेहरा रुपरंग कदकाठी, या निव्वळ दिसण्याबाबत कधीच आवडल्या नाहीत. पहिले वहिले क्रश मनिषा कोईराला होती तर दुसरी प्रियांका.., पण आता तर एकाचवेळी खूप आवडतात.
असो, झोपायची वेळ झाली. त्या आधी ही तार छेडल्याने झोप छान येईल अशी आशा. आणि उद्या सुट्टी असल्याने स्वप्ने अर्धवट न सोडता पुर्ण बघता येतील Happy

Happy मलाही यावेळी माबोवर 'अंधेरी रातोंमे सुनसान राहोंपर'- शहेनशाह सारखं पोस्ट टाकल्यासारखं वाटतं, तुला गाठलं पण..! Lol

मी ही आहे वाचायला Lol

विकी आवडतो म्हणून साराला कशाला सहन करायचं , जाऊदे नको बघूस उरलेला. पिसे काढायला बघणार असशील तर बघ.

काल मडगाव एक्सप्रेस सुरू केलेला. पण इथेच कुणी तरी जिंनामिदो ची नक्कल करण्याचा प्रयत्न असे म्हटल्याचे आठवले म्हणून लगेच पंचायत सुरू केली.

इथे पहिल्यांदा पिक्चर पाहताना तो कोणत्या सीनला नक्की कसा वागणार आहे हा टोटल सस्पेन्स राहतो. ....... खरंय.
त्याचे नावही इथे वाचून कळले.

जरा हटके जरा बचके बघितला विकी कौशल आणि सरा खानसाठी.Sam बहादूरपासून विकी कौशल आवडतो आणि सारा खानचे हसणे आणि एकूण वावर आल्हाददायी वाटतो.बाकी मूव्ही कंटाळवाणा आहे.तेरे नाम फलक्से आणि दुसरे एक गाणे आवडते होते.

काल झोपी गेल्यावर फिल्म्स डिवीजन कि भेंट म्हणून पाटी असलेली एक डॉक्युमेंटरी पाहिली.
जान्हवी कपूर, सारा अली, आदित्य रॉय कपूर, झबा, सता, चिमां ,वाणी कपूर आवडणार्‍यांबद्दल बाळ कुरतडकर म्हणत होते..
"त्यांना आपले म्हणा, त्यांना जवळ घ्या, त्यांचे लाड करा. त्यांना मारू नका. ते ही तुमच्यासारखेच माणूस आहेत.
पण परिस्थितीने त्यांना जान्हवी कपूर, सारा अली आवडू लागले. याला जबाबदार कोण ?
तुम्ही, आम्ही, आपण सर्वच "

मडगाव एक्स्प्रेस पाहिला.मजेशीर आहे.वन टाईम वॉच. जरा जिंनामीदो आणि दिल चाहता है आणि धमाल पटांचा स्पूफ वाटला.मराठी छाया कदम उर्फ कांचन कोंबडी आणि उपेंद्र लिमये दोघांनी चांगले काम केलंय.
शेवटी टीम मध्ये कुठेतरी फरहान अख्तर चं पण नाव दिसलं.

Pages