द अप्पर बर्थ

Submitted by Revati1980 on 10 May, 2024 - 11:21

गोल्डी: अरे शैलेंद्रजी, नमस्ते, कधी आलात तुम्ही?

शैलेंद्र: नमस्ते गोल्डी सहाब, अर्धा पाऊण तास झाला असेल. बर्मनदा येतायत ना?

गोल्डी: हां हां, आते ही होंगे, त्यांच्या कलकत्ता मीठा पानाचा डबा आणून ठेवलाय भाई… ये लो…आ गये दादा..

बर्मनदा: शुभो प्रभात भद्रलोक. सॉरी लेट झाला.

गोल्डी: कोई बात नहीं दादा, सुरुवात करू या?

शैलेंद्र: बिलकुल.

गोल्डी : दादा, शैलेंद्रजी सुनिए, हे गाणे इतर रोमँटिक गाण्यासारखे बागेत, झाडामागे, तलावाच्या काठावर, नदी किनारी, डोंगरावर वगैरे शूट होणार नाही, देवला वहिदाला पटवायचे आहे म्हणून देवला साजेसे असे रोमँटिक शब्द आणि शांत संगीत.

शैलेंद्र: कुठे शूट करणार आहात हा सीन गोल्डी सहाब?

गोल्डी: चालत्या ट्रेनमधले रिझर्व कंपार्टमेंट.

शैलेंद्र: क्या?चलते ट्रेन में? सोलवा साल रिपीट?

बर्मनदा: चलंता ट्रेने? उडी बाबा, आसेपासे कोनो यात्री थाकबे ना?

शैलेंद्र: दादा, देवने अख्खी बोगीच रिझर्व केली असेल. त्याचा काय भरोसा, लडकी पटानेके लिये देव कुछ भी करेगा.

बर्मनदा: शोत्य बोलते की, देबो ए शोब कोरबे.

गोल्डी: आणखी दोन पॅसेंजर असतील देव, वहिदा सोबत.

शैलेंद्र: आणखी दोन?

बर्मनदा: त्यांच्या समोर गाणं म्हणणार?

शैलेंद्र: दादा, अरे अभी दो बरस पहले सोलवा साल मध्ये “ है अपना दिल तो आवारा ” म्हटलं होतच की त्याने ट्रेनमध्ये. तेंव्हा वहिदाजीच होत्या. देव बरोबर त्याचा मित्र होता, सुंदर. आता सुंदर आणि दुसरा शायद राशिद खान रहेगा.

गोल्डी: नाही नाही, ते दोन पॅसेंजर वहिदाजीचे आईवडील असतील.

बर्मनदा: की बोलो?की बोलो? मा, बाबा, सोब पोरीबार?

शैलेंद्र: देव साब वहिदाजींच्या आईवडीलांसमोर रोमँटिक गाणे म्हणणार? माय गॉड!!!?

गोल्डी: म्हणूनच शब्द असे हवेत की त्यातून दोन अर्थ निघतील. वहिदाजी वेगळा अर्थ लावतील आणि मां बाबा वेगळा अर्थ लावतील.

बर्मनदा: भीषण भालो.

शैलेंद्र: मला सीचुएशन समजावून सांगा गोल्डीसहाब.

गोल्डी: दादा, इंट्रो पीस आणि ट्रेनचा आवाज मिक्स करूया. देव पाठमोरा दिसेल ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघतांना. बाबा पण बाहेर बघतायत. आता देव वळतो आणि वरच्या बर्थवर मां बसलेली बघतो म्हणजे त्याच्या बरोबर कॅमेरा टील्ट होतो वरती. तिच्या हातात जपमाळ आहे, मणी ओढत आहे आणि डोळे मिटलेले आहेत.

शैलेंद्र: अच्छा, भगवान से गुफ्तगू चाललीय.

बर्मनदा: रोबिंद्र सोंगीत चोलेगा इधर.

गोल्डी: हां हां, करेक्ट दादा. मग कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला देव बघतो, जरा पुढे क्लोज अप मध्ये येताना वरच्या पंख्याने त्याचे केस भुरभुर करतायत, तो वरच्या बर्थ वर जिथे वहिदाजी डोळे मिटून झोपल्या आहेत, एक मंद स्मित त्यांच्या चेहऱ्यावर आहे, त्यांच्या छातीवर उलटे उघडलेले एक पुस्तक आहे, तिथे देवची एन्ट्री कॅमेऱ्याच्या उजवीकडून होते, त्यांना थोडा वेळ डोळे भरून बघतो, देवच्या डाव्या कानामागे कॅमेरा आहे, त्याचा डावा डोळा, तो ही फक्त पापण्यांची हालचाल दिसणार आहे पण त्याला रोमँटिक भावना व्यक्त करायच्या आहेत, ही हॅज टू ॲक्ट ही हॅज फॉलन इन लव्ह विथ हर. तो मला हवी तशी एक्स्प्रेशन देत नाही तो पर्यंत टेक रिटेक चालत राहणार. दादा, इथे वहिदाजींचे सौंदर्य सोज्वळ आहे अशा अर्थाची धून हवीय. मग कॅमेरा खिडकी बाहेर. ढग,सूर्य आणि पळणारी झाडे दिसतील. पिताजी भी बाहर देख रहे है, इथे एक उसासा सोडून देव खाली बर्थ वर बसतो. मग इथे गाण्याच्या पहिल्या ओळी येतील, पण देव दिसणार नाही, तेंव्हा कॅमेरा अगोदर मां, मग वहिदाजी असा असेल.

शैलेंद्र: एक मिनिट, वहिदाजी कुठल्या बर्थवर आहेत?

गोल्डी: अप्पर बर्थ, म्हणजे मांच्या समोर.

शैलेंद्र: आणि देव साहेब मां के नीचे वाल्या बर्थवर, सो दॅट ते वहिदाजीना बघू शकतील. करेक्ट?

गोल्डी: राँग, वहिदाजीचे वडील तसं कसं करू देतील? तेच वहिदाजीला बघतील. देव वहिदाजीच्या खालच्या बर्थवर असेल. पिताजी देवच्या समोर.

शैलेंद्र: ओके. म्हणजे वहिदाजी, देवसाहब एकमेकांना बघू शकत नाहीत.

गोल्डी: करेक्ट. गाण्याची पहिली ओळ म्हणताच कॅमेरा अगोदर मां, मग वहिदाजी असा असेल. बाबा वळून देवकडे बघतील. वहिदाजी डोळे उघडतील, मां हातातली माळ थांबवतील. नंतर गाण्यात वहिदाजी ह्या ओळी आपल्याला उद्देशून आहेत का, मां लां पण तसच वाटतं का? तसे काही नाही, तो वरती देवाला साद घालत आहे असे हसत हसत मां कडे बघत हावभाव करतील मग त्या परत आडव्या होतील आणि पुस्तक उघडतील. साधारण तीन कडव्याचे गाणे. शेवटचे कडवे थोडेसे तत्त्वज्ञान सांगून गाणे संपेल. शैलेंद्रजी, तुम्ही गाणं लिहिलं की त्या प्रमाणे आपण शूट करु.

शैलेंद्र: ओके. लेट मी व्हिज्युअलाईज…. तुम्ही सुरूवातीला सांगितलं, देव एक उसासा.. याने के आह…करेक्ट? मग “अपनी तो हर आह इक तूफान है, क्या करे वो जानकर अंजान है “ किंवा “ उपरवाला जान कर अंजान हैं, अपनी तो…” इथे इंटरल्यूड घेउया. ओके?

गोल्डी: सुपर्ब!.. शब्द ही साधे आहेत, सोपे आहेत.” अपनी तो हर आह इक तूफान है, क्या करे वो जानकर अंजान है “ किंवा “ उपरवाला जान कर अंजान हैं, अपनी तो…” मस्त ! पण शैलेंद्रजी, “ अपनी तो या शब्दा ऐवजी मेरी तो हर आह इक तूफान हैं.. कसं वाटतं? मेरी इंस्टिड ऑफ अपनी?

शैलेंद्र: अं… गोल्डीसाहब, वो पेन और कागज दीजिए प्लीज…. हां….योर सजेशन इज गुड, पण त्याला जरा एगोइस्टिक, अहंचा फील येतो. या सीच्युएशनला ठीक से बैठता नही है.

गोल्डी: आह में एवढा तूफान कशाला शैलेंद्रजी? आह तर सिंपल असते ना?

शैलेंद्र: देवसाब की आह है वो, साधा उसासा नाही!!!

गोल्डी: दादा, की बोलो?

बर्मनदा: ७/८ रिदम, गिटार सुरुवातीला, मग वायोलिन, देन सॅक्सोफोन. अपनी आणि तूफान हेच शब्द राहू दे गोल्डी, आणि शैलेंद्रला डिस्टर्ब कोरबे ना.

गोल्डी: येस दादा, येस.

शैलेंद्र: देवसाहेब वरती देवाला साद घालत आहेत असे वहिदाजी हसत हसत हावभाव…. …“ अब तो हंस के “… हं..हं..हं..हं.. हां, वहिदा जी के दांत चमक रहे हैं.. “ अब तो हंस के अपनी भी किस्मत को चमका दे, “ उनकी मां को कह नही रहे है वहिदाजी, समझा रहे है…. हो ना? “ कानों में कुछ कह दे जो इस दिल को बहला दे, ये भी मुश्किल है तो क्या आसान है, ऊपरवाला…”

गोल्डी: ये इतनी सिंपल बात अगर मुश्किल है, तो फिर आसान क्या है भई?... व्वा!! दादा, की बोलो?

बर्मनदा: खूब शुंदोर!! भालो!!

शैलेंद्र: गोल्डी साहब, हा पहिला अंतरा झाला की आपण जेंव्हा इंटरल्यूड घेऊ तेंव्हा वहिदाजी, शी इज ऑन अप्पर बर्थ ॲज यू से, कुशीवर वळतील आणि त्यांचा हात थोडासा बाहेर येईल जो देव ला दिसेल असे शूट करु. कारण हाताला उद्देशून देवसाब काय मजाकवाल्या ओळी म्हणतील ते आताच मी लिहिलंय. ऐका, “ सर पे मेरे तू जो अपना हाथ ही रख दे , फिर तो भटके राही को मिल जायेंगे रस्ते, दिल कि बस्ती बिन तेरे वीरान हैं… ऊपरवाला…”

गोल्डी: माय गॉड!! राही को रास्ता मिल जाता है फिर वो बस्ती बसा लेता है और जब बस्ती वीरान हो जाती है तो वो साथी चाहता है. शैलेंद्रजी, राजकपूरनीं तुम्हाला कविराज ही पदवी उगाच बहाल नाही केली. यू आर जीनीयस.

बर्मनदा: हां, तीनी प्रोतिभाबान, शातो टाका.

शैलेंद्र: अरे नाही. हसरत, मजरुह, शकील, साहिर, हे सगळे जीनियस. मैं तो स्मॉल टाईम कवी हूं गोल्डी साहब... उर्दुवर माझी पकड नाही. अच्छा, ते जाऊ द्या. तुम्हाला एंड मध्ये एक फिलॉसॉफीकल कपलेट हवी आहे ना? हे घ्या….” दिल ही तो है इस ने शायद भूल भी की है, जिंदगी हैं भूल कर ही राह मिलती है, माफ कर बंदा भी एक इन्सान हैं… ऊपरवाला जान कर….” ठीक आहे?

गोल्डी: ठीक क्या.. सॉलिड झालंय. वंडरफुल पीस. देव ला या ओळी गाताना थोडं सिरियस चेहरा करावा लागेल बट आय विल गेट इट डन. दादा, रेकॉर्डिंग कधी करणार? आणि गाणार कोण?

बर्मनदा: ये गाना तो रोफी ही गायेगा. किशोर जरा लाऊड वाटेल. हेमंतो भी नहीं, मन्ना भी नहीं. तलत..? मुकेश..? नो, इथे मखमली गळा हवा पण मोहम्मद रफीचाच. याला तोच जस्टिस देईल. मी त्याला उद्या फोन करतो आणि रिहर्सलला बोलावतो. रेकॉर्डिंग शनिवारी. तू मीनू कात्रकला फोन करून स्टूडियो बुक करून टाक.

गोल्डी: ओके दादा, मी देवला रेकॉर्डिंगच्या वेळी पाठवीन.

बर्मनदा: नको, देव लीप सिंकिंगचा मास्टर आहे.
गाणे हिट होणार. ये मेरा.. नहीं अपना वादा है.

……

Group content visibility: 
Use group defaults

आत्ताच हिंदू मुसलमान वाला अँगल येईल मगच येईल म्हणून वाचत गेलो..
वहिदा - देव बहुतेक रिव्हर्स लव्ह जेहाद सुरू केलं कि काय , ४ जून जवळ आल्याने. खूपच कंफ्युजन आहे.

उर्दू शब्द संस्कृतमधे दिलेत तर बरं होईल. बाकी पुन्हा वाचतो.
अपेक्षाभंग !

आत्ताच हिंदू मुसलमान वाला अँगल येईल मगच येईल म्हणून वाचत गेलो >>>> मी पण.
बहुतेक वहिदाला upper berth दिला , देवाला नाही असापण angle वाटून गेला.
Total confusing . परत निवांत वाचेन

Reverse 'Love' Jihad Case.!!!

Guwahati, Assam: Raghu Achari alias Nirmal Singh,an alleged khalistani terrorist befriended and lured a Muslim girl, Salima.

Their relationship started soon after and she told him to get his Khatna done and convert to Islam so that she could marry him. He became cutpiece and started doing Namaz. Soon he performed Nikah with her.

After some time due to black tent and five times showing his ass to the sky, he got fed up and k! lled Salima. He cut her into pieces and stuffed them in suitcase and despatched it to Canada. He is absconding since then.

Since Raghu Achari alias Nirmal Singh is alleged Khalistani Terrorist, IA has issued lookout notice.

This is probably a first case of Reverse Love Jihad in India.
..

This is probably a first case of Reverse Love Jihad in India. >> किती किलो पेढे वाटलेत?

This is probably a first case of Reverse Love Jihad in India.
.. That's shocking, indeed! However, we cannot call it as reverse Love Jihad as Khalistanis feels more connected to Islam than Hinduism.