चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol अनु
त्या मुली भारतातल्या कानाकोपऱ्यातून उचललेल्या वाटल्या, यांना मात्र सायकलवरून जाता येईल इतक्या जवळ. Lol

अमित, लवकर बघ. नाही तर आम्ही जास्तच विनोद करू.

कास्ट चा संबंध नाही बा.'सभ्य, पापभिरू घरातल्या, खोडकर असल्या तरी सरळमार्गी' या अर्थाने Happy आगागा.काय मंद मी.सरळ सरळ कास्ट चा विनोद मिस केला.
अजून पुढे खेचायचा झाला विनोद तर मुलीरूपी पॉइंटर लाडूरुपी इफ कंडीशन ने तपासून कास्ट योग्य मॅच झाल्यास पुढची बिस्कीटपुडेरूपी ऑपरेशन केली.
बाकी माधवन ने काय विचार करून मोठ्या वयाच्या मुली उचलल्या हे मी कसं सांगणार बरं?

स्वाती आंबोळे यांनी लिहिलंय कुमारिका, माझाही समज तसाच. कुमारिका वगैरे जेवायला आमंत्रण देतात तेव्हा अशाच मुलींना बोलवायचा प्रघात होता किंवा असेलही. नवरात्रातही असंच बघितलं आहे कुमारिका पूजन. मी स्वतः पूजन वगैरे करत नाही पण नवरात्रात आजूबाजूच्या कुमारीकाना काहीतरी गिफ्ट्स देते तेव्हा मात्र मला लहान मोठ्या चालतात. इथे आजूबाजूला मात्र लहानच बोलावतात.

वशीकरणा बाबत मात्र अज्ञानी Lol

स्वर गंधर्व सुधीर फडके.. कुणी हा सिनेमा पाहिला आहे का?>>> चांगला आहे. बहुतेकांचा अभिनय चांगला. विस्तृत मांडणी. संवाद ठीक. पण सगळ्यात उत्तम भाग म्हणजे दर थोड्या वेळाने कथेला अनुसरून येणारी मूळ आवाजातली अजरामर गाणी. त्यामुळे आपण गुंतून जातो.

माधवनवर पाणी सोडावं लागणार >> Lol हवं तर सुरुवातीचा अर्धा तास पहा. सिरिअस भाग सुरु झाला की बंद कर. तो काय आल्या आल्या ओम्फट्स्वाहा करायला लागत नाही.

नाच ग घुमा- बोअर वाटला एकदम. मुक्ता बर्वेचे कॅरेक्टर भयंकर इरिटेटिंग वाटलं. त्या बाईवर इतकी वस वस , आरडाओरड करणे तरी तिच्यावरच पूर्ण अवलंबून असणे इतके की बाई नसेल तर ही दिवस भर सायको सारखी वावरणार., स्वतः काहीच टाइम मॅनेजमेन्ट न करणे. मग अश्रू ढाळायला मोकळी की कशी माझी स्वप्नं अपुरी राहिली. वेळच नाही मिळत वगैरे. मग एक तद्दन फालतू इन्टर बँक स्पर्धा. त्यात पण त्या बाई ची मदत हवी हिला. थोडक्यात फालतू प्रॉब्लेम्स आपणच तयार करायचे मग रडून सहानुभूती घ्यायची आणि मग झटक्यात प्रॉब्लेम सॉल्व तोही अगदी एन्टायटल्ड अ‍ॅग्रेसिव पद्धतीने सोडवते. मला काहीच अपील झाले नाही की हसायलाही आले नाही अजिबात. गाणी नाच पण बळेच आहेत. मुक्ता बर्वे आता बघाच मला काय काय येतं ते सगळे करूनच दाखवते अशा आवेशात आहे. तसे सीन्स तिला बळेच दिलेत. ती मायरा वयाला न शोभणारे बोलणार्‍या आगाव लहान मुलीच्या रोल मधे आहे. नम्रता संभेराव चे काम मात्र चांगले आहे.

नेटफ्लिक्सवर डिअर बघितला. साऊथ मधे नेहमी काहीतरी वेगळे विषय असतात. यात असं आहे की एका लग्नाळू मुलीला जोरात घोरायची सवय असते आणि ते ती तिच्या होणार्‍या नवर्‍याला आईच्या दबावात येऊन ती सांगत नाही कारण या आधी मुलांनी तिला या कारणावरून रिजेक्ट केले असते.
ते लग्न तर होतं पण हिचा नवरा असतो एकदम लाईट स्लीपर. तिची घोरायची सवय लक्षात आल्यावर ते वेगवेगळ्या युक्त्या लढवतात, एक दिवस तू झोप एक दिवस मी अशा टाईप्स (तो कानात बोळे घालायची युक्ती का करत नाही ते नाही कळलं)
पण शेवटी झोपेचं खोबरं सतत होत असल्याने प्रॉब्लेम्स अजून वाढतात, त्याचा परिणाम म्हणजे नवरा डिवोर्सपर्यंत पोचतो.
मधेच एक हिरोच्या आई-वडीलांचं सेपरेट असण्याचं उपकथानक आहे. त्या सगळ्याचा इथून तिथून संबंध जोडून शेवट टिपीकल वळणावर जातो.
ओके टाईप्स आहे.

डार्क वॉटर्स (नेफि) - बघण्यासारखा आहे. वेस्ट व्हर्जिनिया/ओहयो मधल्या काही भागामधे ड्यूपॉण्ट कंपनीच्या प्लांट्स मधून केमिकल्स सोडले जातात. तेथील जनावरे व माणसे यांच्यावर त्याचा परिणाम होतो. त्याबद्दल अशा कंपन्यांचे सहसा प्रतिनिधित्व करणारा एक लॉयर (मार्क रफेलो) त्यांच्याविरूद्ध खटला उभा करतो. तो सगळा लढा यात आहे.

अशा चित्रपटांचा एक साचा बनला आहे, हा ही चित्रपट साधारण त्याच मार्गाने जातो. पण एंगेजिंग आहे. मॅट डेमनचा "द रेनमेकर", ज्युलिया रॉबर्ट्सचा "एरिन ब्रोकोविच" चाच पॅटर्न. अर्थात एरिन ब्रोकोविचचा अतरंगीपणा यात नाही. जॉर्ज क्लूनीचा "मायकेल क्लेटन"ही साधारण असाच होता. आता लक्षात नाही. मॅट डेमनचाच अजून एक "प्रॉमिस्ड लॅण्ड" यापेक्षा थोडा वेगळा आहे. आणि चार्लीज्/शार्लीज थेरॉनचा "नॉर्थ कंट्री" सुद्धा.

हे सगळेच पिक्चर्स चांगले आहेत. जे बघितले नसतील ते नक्की पाहा.

प्राइमवर 'फोर्स मेजर' (Force Majeure) नावाचा स्वीडिश चित्रपट पाहिला आणि आवडला.
एक चौकोनी सुखी कुटुंब स्कीइंग ट्रिपला गेलेलं आहे. एका आउटडोअर लंचच्या वेळी ते बसलेल्या जागी एक छोटंसं कन्ट्रोल्ड अ‍ॅव्हलान्च होतं. आपल्या दिशेने घसरत येणारा स्नोचा लोट पाहून माफक पळापळ होते, त्यात त्या कुटुंबातली बायको अंतःप्रेरणेने पटकन मुलांना कुशीत ओढून अंगाची ढाल करते तर नवरा त्या क्षणात पटकन टेबलावरचं पाकीट आणि फोन उचलून तिथून बाजूला पळतो. काही मिनिटांतच धुरळा बसतो आणि लोक आपापल्या जागी परततात. पण त्या काही मिनिटांत त्या कुटुंबाचं ते हसरं चित्र विसकटून जातं. उठून एकटाच दूर पळणारा नवरा हे दृश्य तिला प्रयत्न करूनही डोळ्यांसमोरून पुसताच येत नाही.

छोटासा जीव आहे कथेचा, पण परिणामकारक आहे.

हॅकसॉ रीज खूप आवडला. सत्यघटनेवर आधारित चित्रपट आहे. (हे मागील पानावर फारएण्ड ने लिहिले ते कुणी मिसलं असेल तर परत लिहितोय.)

दोन गोष्टी अतिरंजित /बालिश वाटल्या (भारतीय चित्रपटात मात्र हे कॉमन/मस्ट आहे).
दुसऱ्यांदा रीजवर जाताना फलटण डेसमंडची प्रार्थना पूर्ण होईस्तो वाट बघते, आणि नंतर डेसमंडचे बायबल पडले म्हणुन ते आणायला एकजण परत ऐन धुमश्चक्रीत जातो.

God give me one more म्हणत तो एक एक जखमी सैनिक शोधत रहातो, परत आणत रहातो (हे अतिरंजित नाही) हे खरेच महान आहे.

या सत्यघटने बद्दल अजून वाचेन.

तो काय आल्या आल्या ओम्फट्स्वाहा करायला लागत नाही. >>> पॉइंट आहे Lol

'फोर्स मेजर' (Force Majeure) नावाचा स्वीडिश चित्रपट >>> नोटेड

पण सगळ्यात उत्तम भाग म्हणजे दर थोड्या वेळाने कथेला अनुसरून येणारी मूळ आवाजातली अजरामर गाणी. त्यामुळे आपण गुंतून जातो. >>> जानेवारीत गीत रामायण बघितले होते , लाईव्ह . तेन्व्हा श्रीधर फडके यांनी चित्रपटाबद्दल सांगितले होते , सुनील बर्वे पण होता . तेव्हा ते म्हणाले होते , जेन्व्हा हा चित्रपट करायचा ठरला तेन्व्हा मी एकच सांगितलेलं की सर्व गाणी मूळ बाबूजींच्या आवाजातलीच ठेवा . लोक संगितामूळे त्यांच्यावर प्रेम करतात , त्यांचा चित्रपट लोक गाणी एकायला येणार मग ती मूळच असली पाहिजेत .
मला ट्रेलरमध्ये तरी सुनील बर्वे फार अवघडलेला वाटला . बायोपिक फारसे आवडत नसल्याने , बघेन की नाही माहित नाही .

नाच ग घुमा मध्ये मदतनीस बाई मिळणे किती कठीण व त्या टिकविणे किती गरजेचे आहे हे जास्त प्रकर्षाने जाणवते बाकी मुक्ताचे 'योग' बद्दल असलेले प्याशन काहीच दाखवले नाही फक्त तोंडी लावणं. तो शेवटी दाखवलेला हॉल हा 'भारत रत्न गणसम्राञी लता मंगेशकर नाट्य गृह ऑडिटोरियम' मीरा रोड ला आहे.

शैतान बघण्याचा प्रयत्न केला.
तो फार्म हाऊसवर जाऊन जान्हवीला वश करून काय काय करून घेतो इतपर्यंत पाहिला. अजिबातच जमला नाहीय, कुणालाही अभिनयही जमला नाहीय. एकदमच बोअरिंग वाटला, बंद केला.

मानव +१. मी पण तिकडेच सोडला. पुढे नाही बघावासा वाटला.
अर्थात त्यात अभिनयापेक्षा, स्टोरी कनविंसिंग न वाटणे आणि ह्युमन ट्रॅफिकिंग आणि पोरांना नका रे त्रास देऊ असा रावसाहेबी विचार थोडाफार असावा.

कस्टडी ठीकठाक आहे. वेगवान आणि एंगेजिंग. कमल हसन च्या विक्रम पासून मशीनगनचं वेड लागलंय साऊथला.

मायबोलीचा प्राईम , नेफ्लिशी करार झालाय. अधून मधून पट्टी येत होती.
खूप वेळ झाला ओटीटीवर . चला वेमा वाट बघत आहेत.

Barbarian आणि death whisperers दोन्ही Netflix वर.. हॉरर. आवडले दोन्ही.
शैतान चा शेवट बघताना एक हसीना थी शेवट आठवला.

डार्क वॉटर्स >> एरिननी भलतेच चांगले काम करुन ठेवलेले असल्याने पहावासा वाटला नाही.

Barbarian >> आवडला होता.

यात एक नमुद करायचे असे की असे सिनेमे थिएटरमधे जास्त पकड घेतात. घरी तसं होत नाही.

johnny english strikes again काल जिओ सिनेमा वर पहिला. तिथे फक्त हिंदी ऑडिओ उपलब्ध आहे. इंग्रजी मधनं पाहायला आवडला असता. जॉनी इंग्लिश सिरीज मधल्या पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा किंचित डावा वाटला, पण तरीही मजा कोठेही कमी झाली नाही. याच धर्तीवरचे दोन्ही नवीन (स्टीव्ह मार्टिन चे) पिंक पँथर सिनेमे आवडते आहेत. दुसऱ्यात ऐश्वर्या राय ने काम केले आहे. जुने पिंक पँथर पाहण्याचा प्रयत्न केला होता, आवडले नाहीत.
भारतात अश्या थिम वरचे सिनेमे आहेत काय?

प्राईम वर इंग्रजीत आहे. युट्यूबवर पण काही दिवसांपूर्वी होता. हटवला नसेल तर सापडेल.

Pages