चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘लापता लेडीज’ बघितला, आवडला. आधी इथल्या कमेंट वाचल्यामुळे जया संधीसाधू आहे हा पूर्वग्रह होताच डोक्यात. तरीही तिचा नवरा ती सापडत नाही तरी हनिमून(?) साजरा करायला जातो तिथंच खटकायला लागलं. स्टेशनवरची दादीही एकदम सॉर्टेड. तिच्या प्रभावाखाली फुलचं अलगद उमलणं आवडलं. स्पर्श श्रीवास्तवने दीपकचा साधेपणा छानच दाखवलाय. जीतू कुमार असा आवडला होता ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मधे. रवि किशनचं कामही आवडलं.
पंचेस जबरदस्त. किरण रावला फुल मार्क्स.

संधीसाधूपणा ही वृत्ती असते. जयाची ती अदरवाइज वृत्ती नाही. ती पीडित आहे. लग्न मनाविरुद्ध झालेलं, त्यात नवरा उघड उघड अब्यूजिव वृत्तीचा आहे, त्याची पहिली बायको संशयास्पद पद्धतीने मेली होती - अशा परिस्थितीत ती सुटका करून घेईल यात नवल नाही. पण तिला आपल्या सुटकेची किंमत फूल चुकवते आहे याची जाणीव आहेच म्हणून ती तिला शोधण्याचाही प्रयत्न करते. त्यासाठी पळायची संधी असताना आणखी एक दिवस पकडलं जाण्याचा धोका पत्करून थांबते.

तसेही पहिली चूक दीपक कडून होते. जया फक्त त्याच्या चुकीची संधी वापरून सुटका करून घेते. ती काही व्हिलन वगैरे वाटली नाही मला.

+१ आणि म्हणुनच हा चित्रपट भावतो.
तो पोलिसही लाच घेणं बंद करत नाही की खाक्या सोडत नाही. पण तरीही प्रसंगात माणुसकी दाखवतो.

+१ , माझी पोस्ट गेली गडगडत मागे. जया हिरो आहे , हिरोईन किंवा व्हिलन नाही.

जया व्हिलन नाहीच वाटली किंवा तिचं सुटका करून घेणंही वावगं नाहीच वाटलं मलाही. फक्त आधी कमेंट वाचल्या नसत्या तर कोऱ्या पाटीने तिचं कॅरॅक्टर उमगलं असतं मला.

लापता लेडिज फार आवडला.
काही वेळेस फुल इतकी कशी भोळसट असं वाटत राहिलं. पण बाकीच्या गोष्टी इतक्या उठावदार आहेत की कथेची गरज म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं.
छाया कदम निव्वळ ऑस्सम! वेळी सुनावणारी, आसरा देणारी, कसं जगावं शिकवणारी, एकटेपणाचा बाऊ न करता तोच स्ट्राँग पॉईंट मानणारी
शेवटी फुल घर पहोच गयी म्हटल्यावर एक हळूच कलाकंद तोंडात टाकणारी मंजूमाई एकदम छा गयी! तो छोटू पण गोड आहे. त्या ३-४ दिवसात त्याचं एक मस्त जग बनून जातं फार गोड वाटतं. लहान गावातली अटॅचमेंट अशीच असते.
फुलच्या सासूचं काम करणारी पण मस्त. आपल्या सासूशी प्रेमळ नोकझोक करत, घरी चुकून आलेल्या मुलीशी पहिल्यांदा थोडी फटकून वागणारी,
पण नंतर सामावून घेणारी, जयाने तुमच्या आवडीचं का नाही करत म्हटल्यावर अब क्या औरत की पसंद का खाना बनेगा हे वास्तव माहित असणारी,
पण शेवटी तिला तिच्याच आवडीची कमळकाकडीची भाजी करून देणारी लेडी.
जयाचं फसवणं थोडं स्वार्थी वाटतं पण आयती चालून आलेली संधी कोण घालवेल? त्याचं एक्स्प्लनेशन ती शेवटी पोलिस स्टेशनमधे देते. दिपकची अवस्था बघून परत पळून जाणारी ती शेवटी थांबते त्याला मदत करायला. तो पोलिस स्टेशन मधला सीन जो आहे तो फार मस्त दाखवलाय. बाकी सगळ्या पुरुषांचे कपडे एकदम मळकट टोन मधले आहेत. तिची एकदम ब्राईट यल्लो साडी त्या कळकट्/मळकट टोनवर उठून दिसलीये. एक खटक्लं की जेव्हा तिचा नवरा येऊन तिला कानाखाली मारतो तेव्हा तिनेच विरोध करायला हवा होता किंवा पोलिस स्टेशनमधले ती लेडी हवालदार किंवा बाकीचे कोणीच पुढे येत नाहीत.
रविकिशनचं सुरवातीचं पान खाऊन बोलणं फार यक्क वाटत होतं. तो सीन जरा ढकलत पाहिला.
बाकी त्याचे पंचेस फार मस्त जमलेत. तुम्हारे गट फिलिंग की पतंग वगैरे Lol त्याची आणि दुबेची केमिस्ट्री महान.
दिपक एकदम टिपीकल गाव का छोरा. जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिले आहेत तिला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा थोडा इंग्लिश बोलता येण्याचा अभिमान, ती खूश झालेली बघून लाजणं आणि त्याच वेळी डोळ्यात पाणी फार परफेक्ट जमलंय. तिची जबाबदारी आता आपली भले तोही वयाने लहानच दिसतो पण तिचे दागिने सुरक्षित काढून ठेव सांगत नवरेपण दाखवतो. आपल्या चुकीमुळे घरी दुसरीच व्यक्ती आली आहे म्हटल्यावर तिला सही सलामत पोचवायची जबाबदारी घेणारा, शेवटी तिला नवर्‍याकडे जायचं नाही म्हटल्यावर तिला सपोर्ट करतो बघून बरं वाटलं.
ओव्हरॉल आवडेश.

नेफ्लि इंडीया युट्युबवरची एक छोटी लिंक.. सगळे किती वेगळे दिसतात
https://www.youtube.com/watch?v=vrH7CT0eexw

>>> तिला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा थोडा इंग्लिश बोलता येण्याचा अभिमान, ती खूश झालेली बघून लाजणं आणि त्याच वेळी डोळ्यात पाणी फार परफेक्ट जमलंय
हो हो, अगदी!

कुणाला कशाचं तर अमितला वेलांटीचं > > अमितचा एकदम "आई"ने अकबरी झालाय Lol

आधी इथल्या कमेंट वाचल्यामुळे जया संधीसाधू आहे हा पूर्वग्रह होताच डोक्यात >> संधीसाधू किंवा व्हिलन जास्तच कडक शब्द वाटतात एकंदर कथेच्या पोतासाठी.

मला चमकिला गाण्यांच्या लिरिक्स सकट पुन्हा एकदा पहायचाय.
ओरिजनल चमकिला आणि अमरज्योत परफॉर्मन्सेस आहेत युट्युबवर , मजा वाटतेय पहायला !
अल्पना,
छान माहिती, अजुन डिटेल्स लिही माहित असतील ते /ऐकिव कुठलेही , इंटरेस्टिंग कॅरॅक्टर आहे चमकिल्याचे

लापता लेडीज बद्दल छान लिहिलंय सर्वांनी. नेफ्लि नसल्याने बघता येणार नाही.

एक हिंदी सिरीयल आठवली ज्यात श्रीमंत गरीब मैत्रिणींच्यात ट्रेन accident मुळे नवऱ्याची अदलाबदल होते. गरीब मैत्रीण दुसरीच्या नवऱ्याबरोबर मस्त जीवन जगत असते, तिला समजलेलं असतं की हा मैत्रिणीचा नवरा. दुसरी मात्र शोधत येते आपल्या नवऱ्याला. ह्यातही असं काही आहे का, की टोटली वेगळी आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटलेलं, तो श्रीमंत घराण्यातला डिफेन्समध्ये असतो तरी बायकोचा फोटो वगैरे बघितला नसतो त्याने, दुसरीला बायको समजून संसार करत असतो.

अन्जुताई , यात असं नाही. फक्त 'घुंगटा'मुळे चुकामूक होते कारण चेहरा दिसत नाही आणि चार-पाच दिवसात आपापल्या घरी परत जातात. एकमेकींच्या नवऱ्यांसोबत काहीही आकर्षण निर्माण होत नाही. सगळा वेळ शोधण्यात जातो.

----
ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स नाही आणि प्राईम आहे, त्यांनी Ocean's 8 बघा. त्यातही आठ 'लेडीज' आहेत फक्त त्या दरोडा घालून नंतर 'लापता' होतात. Happy

ओशन-८ पाहिला आहे. मस्त आहे. क्लूनी वाल्या सिरीज ची सर नाही पण तरीही त्याच कॅटेगरीतील म्हणून पाहिला आहे.

अदलाबदल झाली तरी काय, शेवटी ठरवुन केलेल्या लग्नात दोघेही अनोळखीच असतात एकमेकांना. संसार सुखाचा झाला म्हणजे झाले. जी शोधत येते तिचा अर्थातच झाला नसावा.

अंजु, लाले मध्ये चार दिवसात नवरी मिळे नवर्‍याला होते पण ह्या चार दिवसात एका अनपढ गंवार नवरीला आपले घरकामाचे शिक्षण बाहेरच्या समाजात वावरायला पुरेसे नाही हे कळते पण त्याचवेळी ते स्किल आपल्याला पैसे कमावुन देऊ शकते हेही कळते. नवर्‍याचे नावही घ्यायला संकोचणारी नवरी त्याला चारचौघात नावाने हाक मारायची हिंमत मिळवते. दुसरी नवरी चांस पे डांस करत स्वतःला हवे तसे आयुष्य मिळवते.

जया संधीसाधू वगैरे नाही. आईच्या धमकीमुळे तिने नवरा व घुंघट स्विकारलेला असतो. दैवाने एक संधी समोर आणुन दिल्यावर मात्र ती संधीचा हात पकडते. फुल अगदीच अनपढ गंवार, तशी ही नसते.

थँक्स अस्मिता, साधना.

अस्मिता प्राईम उतारा भारी दिलास पण स्टोरी टोटली वेगळी वाटतेय, बघ बाई काहीतरी लापता अंजुताई Lol

साधना थोडक्यात छान विश्लेषण केलंय लापता लेडीजचं.

एकदा येऊन तर बघा प्राईमवर आहे. गिकु मुळे सुरूवात केली पहायला.
प्रसाद खांडेकर लेखक दिग्दर्शक असल्याने हास्यजत्राची टीम आहे. गिकुचा प्रश्नच नाही, पण हास्यजत्रा वाले अजूनही बारा मिनिटांच्या स्किट मोडमधेच वावरले आहेत. ओंकार भोजनेचे सर्व पंचेस सपाट आणि अनावश्यक आहेत, नम्रता संभेरावने चित्रपट आणि स्किट मधला फरक समजून घेतला तर बरं. कुणी पाहिला असेल तर पुढे पाहू का कळवा.

लंडन मिसळचं पोस्टर थेटरला पाहिले होते. प्राईमवर दिसला.

एकदा येऊन तर बघा प्राईमवर आहे >>> एक मिनिट मला वाटले "नेफिला सगळेच लाइक करतात. प्राइमला एक तरी लाइक बनतोच" सारखे एकदा प्राइम वर येउन तर बघा असे र.आ. सांगत आहेत. मग प्रकाश पडला डोक्यात Happy

अग अंजु, मागे लिहिलेय ना मी. तिला जैविक शेती शिकायची असते, घरातली शेती असते पण एकेक तुकडा विकली जात असते. ती ८००-९०० पोरापोरींत पैला नंबर काढते, कृषी विद्यापिठात प्रवेशाचे बघते तेवढ्यात श्रीमंत स्थळ गळ्यात पडते. आई मरण्याची धमकी देते तेव्हा नाईलाजाने लग्न स्विकारते. वय १८ पुर्ण म्हणजे १२ वी झालेली असते बहुधा. पोर्गी हुशार असते, त्या चार दिवसातही गव्हावर पडणार्‍या किड्यांच्या निवारणार्थ किटकनाशक फवारु नका तर स्टिकी ट्रॅप शेतात लावा हे ज्ञान देऊन जाते. चित्रपटातील काळ ९१ चा धरला तर तेव्हा ती पुढे जैविक शेतीचाच ढोल वाजणार आहे हे भाकित करते.

अरे देवा, मलाही फारेंडा सारखेच वाटले. गिकु मुळे बघावेसे वाटले वाचल्यावर गिचमिडीत डोळ्यांनी मान डोलवत गिकु सगळा प्राईम व्यापुन राहिलाय की काय असे वाटले Happy

मी महिनाभरापूर्वी गिकुंचा 'भिरकिट' बघितला होता. गिकुंमुळेच लावला होता. गिकु त्यात पुलंच्या 'नारायणा' सारखा लग्नापासून मयतीपर्यंतची सगळ्यांची सगळी कामं करत असतो. गावातल्या बायकांचा तर 'मदनगोपाळ' असतो, त्या याच्या मिठीत उठसूठ प्रपंचाचे गळे काढत असताना थोपटत असतो. पण अर्धा सिनेमा सरला की गिकुचं पात्र श्री श्री श्री नारायण होऊन जे उच्चासनावर जाऊन बसलं ते काही नंतर खाली उतरलंच नाही. दिसला माणूस सल्ला देणार, बायकांना सासूशी कसं वागावं सांगणार, सासूला तडजोड करायला सांगणार, प्रेमाने कसं वागावं असं सांगणार. साध्या संवादाचं क्षणात प्रवचन होऊ लागलं. कंटाळवाणा होता. चांगलं काम करायला चांगलं काम मिळावंही लागतं.

मिठीत्??????? उरलेला चित्रपटात ह्याचा आसाराम होणार ह्याची बीजे ह्या मिठ्यांत दिसली नाहीत का???? Happy Happy

कुर्नाड Lol
गिरीश कुलकर्णी.

त्या मिठ्या म्हणजे 'मिठ्या मारत रहा फळाची अपेक्षा करू नका' या गटातल्या निघाल्या. Lol

भिरकीट मध्यंतरापर्यंत सुसह्य होता. नंतर भिरकिटला.
बहुतेक डोक्यात विषय चमकला म्हणून माबोवर कथा लिहायला सुरूवात करावी आणि नंतर आळस यावा तसं यांचं होत असेल. Happy

Pages