चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@फारएण्डची पोस्ट -
नेफिवर "किंग रिचर्ड" पाहिला. फार आवडला. >>>>>

मी ट्रेलर बघितलं होतं तेव्हा मला दंगलची आठवण आली होती. खास करुन विल जेव्हा तिच्या कोचला समजावतो की तिची स्टाईल कशी असायला हवी. दंगल मधे गिकुला (आले पुन्हा गिकु) आमिर असंच समजावतो. आमिर तळमळीने समजतोय असं वाटतं आणि हा जरा आततायीपणे. विल नेहमी उत्तमच काम करतो.

छान पोस्ट.

नाच ग घुमा मधे बाकीच्या बायका सपोर्टिंग कास्ट मधे आहेत.,मुक्ता आणि नम्रताच मेन आहेत.
सुकन्या मुक्ताची आई आहे आणि सासूचे कॅरॅक्टर करणारी सुप्रिया पाठारे आहे.
श.रा. आणि मधुगंधा छोट्याच रोल मधे आहेत म्हणे, त्या दोघी निर्मात्यांमधेही आहेत, मधुगंधा लेखिका आहे.
मला परवा समजले कि मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशीची बायको आहे ते !
मधुगंधा कुठल्याशा इंटरव्ह्यु मधे म्हणत होती कि हिन्दीत पुरुषप्रधान चित्तपट चालत असताना मराठीत स्त्री प्रधान चालतात तर काय वाईट आहे Happy !

मोरोबांचे बरोबर आहे.. तीला बरोबर माहित असते आपला नवरा कुठला ते. मी काल लाले परत पाहिला. दीपक ट्वायलेट मध्ये गेलेला असतो तेव्हा फुलच्या बाजुला बसलेले जोडपे उतरुन जाते व फुल खिडकीच्या सिटवर येते. जयाचा नवरा लगेच तिच्या बाजुला येऊन बसतो. आणि जयावर खेकसतो की माझ्या बाजुला जागा आहे येऊन बस. हे झाल्यावर दीपक येतो. तो समोरच्या सिटवर बसतो. तो जाताना फुल तिसर्‍या सिटवर असते, ती खिडकीत सरकली हे त्याला कुठे माहित्..

जयाचा हात धरुन तो जागी करतो तेव्हा ती नवर्‍याकडे नजर टाकते, आणि क्षणात निर्णय घेऊन ऊभी राहते. गाडीबाहेर आल्यावरही ती उभी राहते, जावे की न जावे.. दीपक आवाज देतो तेव्हा निघतेच. बहुतेक एवढी मोठी संधी जाऊ नको देऊस हेच मनाला सांगते. तिला बस दिसते तीच्यावर पुष्पा ट्रवेल्स लिहिलेल्र असते. नवर्‍याचे नावही खोटेच साण्गते. रस्त्यात चालताना ती मैलाचा दगड दिसतो तेव्हा ती थबकुन गावाचे नाव बघते.

फुलने खुप छान काम केलेय,विषेशत: गाडीतुन उतरल्यावर नवरा दिसत नाही हे कळल्यावर… तीही तशी हुशार, बायांच्या टोउलेट मध्ये जाऊन संडासात रात्र घालवते. Happy

ती कलाकंद करते ते गेस्चर खुप छान आहे. माझ्या घरासमोर रस्ता बनतोय आणि तिथे काम करणार्‍या दोघी पाणी मागायला घरी आल्या. मी माझ्यसाठी चहा बनवत होती म्हणुन त्यांनाही विचारुन चहा दिला. ती बाई मला म्हणाली अंगण झाडुन देते. मी म्हटले नको, मी बागकाम करतेय, नंतर झाडायचे आहे. मी बाग खणत होते हळद लावायची पुर्वतयारी म्हणुन. थोडे काम शिल्लक होते. तीने ते खणायचे काम पुर्ण करुन दिले. मी म्हटले तिला तुझा मुकादम ओरडेल, काही ओरडत नाही म्हणत तिने काम केले. मला फुलची आठवण झाली. कोणी आपल्याला मदत केली तर लगेच परत्फेड करायची. शहरी लोक कोरडे थंक्यु म्हणुन मोकळे होतात.

छोट्या गावातल्या अशिक्षित बायकांची रिऍलिटी तुलनेने प्रीव्हीलीज्ड आयुष्य जगलेल्या शहरी उवउव (उच्च वर्णीय उच्च वर्गीय) स्त्रियांना ग्रॅस्प करणं कदाचित कठीण असू शकेल.>>>>>. माबोवर व इतरत्र शहरी बायकांच्या प्रतिक्रियांमध्ये हे वारंवार जाणवलेले आहे.

लापता लेडीज मधली सर्व पात्रे क्युट आहेत.जया ला फुल च्या सासरच्यांनी 'कुठे जाणार एकटी मुलगी' म्हणून 3-4 दिवस अगत्याने ठेवून घेतलं तसा प्रस्ताव जयाच्या नवऱ्याने फुल बद्दल दिला नाही हे बरं वाटलं.अर्थात ते दोघे उघड उघड वेगळे असल्याने त्याला स्कोप नव्हताच.

फुल इतके दिवस एक साडी नेसून आहे, किमान रात्री त्या माई च्या घरी वेगळी साडी नेसून लाल साडी धुवून वाळत घालतेय दाखवायला हवं होतं Happy (इतके लोक काथ्याकूट करत आहेत त्यात माझाही एक काथ्या आणि एक हातोडा कुटायला)

जयाच्या नवऱ्याला अदलाबदल झालीय हे कळत नाही. जया कुठेतरी निघून गेली/गायब झाली असे समजतात. फूल लपून बसते. तेव्हा फुलला त्यांनी ठेऊन घेणे न घेणे हा प्रश्नच उद्वभवत नाही.

बाकी दुसऱ्या पॉइंटबद्दल : सगळ्या चित्रपटात वॉशरूम दाखवायला हवी आणि सगळी पात्रे त्या दिशेने एकदातरी जाताना दाखवयाला हवीत. नाहीतर माबोकर सगळ्यांना बद्धकोष्ठ झालंय असे समजतील.

तो दुष्ट नवरा स्वतःची बायको शोधत एकदा प्लॅटफॉर्मवर बावचळलेल्या लांब उभ्या फुल कडे बघताना दाखवलाय.अर्थात संबंध येतच नाहीं हे खरे.

किमान रात्री त्या माई च्या घरी वेगळी साडी नेसून लाल साडी धुवून वाळत घालतेय दाखवायला हवं होतं >>> मला पण असंच वाटलं.

फुलला पाहून तो आपली बायको समजून तिच्या खांद्यावर हातही ठेवतो. मग चेहरा दिसल्यावर सॉरीसदृश काहीतरी बोलतो. पण काही मदतीचं वगैरे विचारत नाही. अर्थात तो जसा आहे ते पाहता फुल स्टेशनवर राहिलेली जास्त सेफ…

आता फूलच्या साडी न बदलण्यावरुन बोलताच आहात तर.. ती त्या माईकडे पोळ्या लाटते आणि गॅसवर टाकते. गॅस नुसता मोठा लावलेला आहे, फूल काही पोळी परतताना दाखवलेली नाही. मी मनातल्या मनात ‘बाई, ती पोळी परत‘ म्हणतेय. Wink

मध्ये 2 मायक्रोसेकंदात फ्रेम बदलली असेल त्या दुसऱ्या फ्रेम च्या आधी तिने पोळी उलटली असेल Happy
हे असं होतं आपलं स्वयंपाक आणि त्याचा विचार करायला लागल्यावर.फॅमिली मॅन मध्ये पण मुसा साजिद शी पोळ्या भाजत भाजत गप्पा मारत असतो तेव्हा बराच वेळ पोळी न उलटता इंटेन्स गप्पा मारत असतो तेव्हा मी मनात अशीच 'अरे पोळी उलट,उलट आता' करत होते.
किंवा सीन पुरती एखादी जाड कागदाची किंवा मॉडेल क्ले ची पोळी बनवून रिटेक्स ना सारखी तीच तीच भाजत असतील.

माई तिला कपडे बदलण्याबद्दल बोलते. ती म्हणते दुसरे कपडे घातले आणि त्यांने ओळखलेच नाही तर????

तिचा प्रश्न अगदीच चुकीचा नाही.. तिला ताजा ताजा अनुभव आहे Happy

सायो Lol

फुल बद्दल वाचून, एकदा तरी ते वधूवस्त्र धुऊन, वाळवून परत घालायला हवं होतं असं वाटलं. नवऱ्याने ओळखण्यासाठी चार दिवस त्यावरच रहाते.

फुलचा नवरा माणूस म्हणून चांगला असतो, तसेच सासरचे चांगले असतात, वाचून बरं वाटलं. जयाचा नसतो वाचून, तिचा निर्णय योग्य वाटतो.

जया झालेली नेहमीच्या फोटोत खूप वेगळी, नाजुक, अजुन सुंदर दिसते. गुलाबी गोरी वाटते. ती बहुतेक हिमाचल प्रदेशचीच आहे. लालेलालेलाआआआले… करता अजुन एक प्रतिसाद. Proud

लाले मला पहायचा आहे. काही वेळा प्रतिसादातून कथेचा अंदाज येतो, त्यामुळे स्किप करावे लागतात.
हिरामंडी भन्साळीचा असल्याने पाहणार नाही. महागडा फुसका बार निघतो.

लाले हा यावर्षीचा सर्वोत्कृष्ठ पिक्चर आहे आत्तापर्यंत! टोटल अफलातून. पटकथा, संवाद, गाणी, अभिनय सगळे जमून आले आहे. आजकाल हिंदी पिक्चर्स बद्दल जरा सिनिकल व्ह्यू झाल्याने एखाद्या पिक्चर मधे इतके गुंग व्हायला क्वचित होते. पण या पिक्चरमधे तसे झाले. पाहिला सुमारे अर्धा तास पाहिल्यावर मधे एक दोन दिवस बघायला जमले नव्हते. आज उरलेला बघितला. पुढे पुढे खूपच रंगत जातो.

अगदी बघाच. दुसरे काहीही बघत असलात तरी ते थांबवून बघा.

लालेला थोडावेळ बाजुला ठेऊन,
प्राईमवर ‘ The Idea of You’ पाहिला. बरेच दिवसात रोम्यान्टीक सिनेमा पाहिला नव्हता. छान आहे. Anne Hathaway आवडते. यातपण सुंदर दिसते, छान काम करते. थोडं वास्तव पण दाखवलंय, तोही भाग चांगला घेतलाय.

लाले हा यावर्षीचा सर्वोत्कृष्ठ पिक्चर आहे आत्तापर्यंत! टोटल अफलातून.
<<<<
टोटली , पण मी चमकिला आणि लाल.ले मधे कोणाला पहिला नंबर द्यावा कनफ्युज होईन !

लापता लेडिज पाहिला. मस्त चित्रपट... अभिनयही सर्वांचा छान..!

दिपककुमार बनलेला अभिनेता आवडला.
' फूल इंग्लिस बोल के बता दे ..?' वाला प्रसंग मस्त जमलायं... फूल आणि दिपककुमारच्या चेहऱ्यावरले हावभाव आणि देहबोली एकदम परफेक्ट ..!

पोलिस स्टेशनमधले सगळे सीन मस्त जमलेत. रवी किशनने लाचखोर इन्स्पेक्टरची भूमिका छान पार पाडलीयं.. पान खाऊन चेहऱ्याची , ओठांच्या हालचालींची लकब भारी जमवलीयं..! एकंदरीत सगळीच पात्र उत्तम अभिनय करतात.

' चमकीला ' बघायचाय .. बघेन नंतर..! सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर नेटवर वाचलं होतं चमकीला बद्दल..!

हो, शैतान बघितला. आवडला. शेवट जरा भितीदायक कमी नाट्यमय जास्त वाटला. सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत. वशीकरणाने माधवन छोट्या जाह्नवीकडून जे काही करवून घेतो आणि तिचे जे हाल होतात,त्याचा अदृष्य तणाव येतो बघताना. जोतिका फार छान काम करते, ती न बोलताही वेगवेगळ्या भावमुद्रा दाखवते. काळी जादू- तंत्रविद्या अजूनही दाखवू शकले असते. ती एक्झिक्यूट केलेलीच दाखवली आहे. त्यामुळे जरा अकस्मात वाटते. सिनेमाचं नाव वशीकरण जास्त सूट झालं असतं. शेवटी सैतानाची पूजा-बळी वगैरे जरा कृत्रिम वाटलं. सिनेमा आवडला कारण कथेने मनावरची पकड ढिली होऊ दिली नाही. अजय देवगणचं काम काही वेगळं वाटलं नाही. इतरांची कामं जास्त उठावदार वाटली. हॉररपेक्षा डार्क फॅन्टसी म्हणता येईल.

अनुमोदन.

वशीकरणाने माधवन छोट्या जाह्नवीकडून जे काही करवून घेतो आणि तिचे जे हाल होतात,त्याचा अदृष्य तणाव येतो बघताना >> अगदी खरंय. आम्ही तर थिएटरमधे पाहिला होता. त्यामुळे अजुनच डेन्जर वाटला.

Pages