चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंपन - बस नाम ही काफी है
https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws

चित्रण फार सुंदर दिसतं आहे. पण भाषा अजिबात बेळगावी नाही - हे लंपनप्रेमींना लगेचच खटकेल. त्या भाषेची मजा पाहिजे होती यार इथे.

पण भाषा अजिबात बेळगावी नाही
>>
अगदीच...
बेळगाव ऐवजी रत्नांग्रीस गेला बहुतेक

बा द वे,
रस्त्यातल्या दुकानांच्या पाट्या मात्र कानडी आहेत.
नकादु चेण्या पकासके ला मिस केलं...

अरेरे काय विचका बघायला मिळणार ( ऐकायला ) का ?? त्या आजीची एक प्रतिमा निर्माण झाली आहे पुस्तके वाचून, गीतांजली पाहून एकदम बोरच झाले..श्या.. बेळगावी भाषा पण हवीच हवी. किती मटेरियल आहे ह्यात.. विचका करू नकोस निपुण प्लिजच.

लंपन पुस्तकच होते का? की सिरीज सुद्धा होती? असल्यास कुठे बघायला मिळेल?
मी पुस्तक वाचले नाहीये. मला कल्पना नाही. पण कीर्ती ऐकून आहे.

बाकी सिरीज चांगली असेल, तर माझी पाटी कोरी असल्याने कोकणी भाषेत सुद्धा आवडेल

पुस्तकांची सिरीज होती. वनवास, झुंबर वगैरे नावं होती. अजून दोन नावं आठवत नाहीयेत.

इंदिरा संत यांचा मुलगा लेखक प्रकाश संत. त्याच्या आजोळी ते दत्तक गेलेले म्हणून त्यांचं दुसरं नाव भालचंद्र दीक्षित, तेच लंपन. त्याची बालमैत्रीण सुमी म्हणजेच नंतर त्यांची झालेली बायको, जिने अमलताश आत्मचरित्र लिहिलं, त्या कराडला डॉक्टर आहेत .

मी खूप वर्षांपूर्वी वाचल्यात लंपन कथा, बरंच विसमरण झालंय. कर्नाटक भागातली बेळगावजवळची मराठी भाषा आवडते मला. आमचे एक जुने शेजारी बेळगावचे असल्याने ऐकली आहे, मस्त तो हेल आवडतो मला ऐकायला आणि लंपनमध्ये वाचली आहे.

पुस्तकांची सिरीज होती. >>> ओके म्हणजे फाफे स्टाईल. लहानपणी मिस केले म्हणजे मी हे वाचणे. ही मालिका चांगली असेल तर जरूर बघेन.

मला आधी वाटलेलं की लंपन ही सीरीज असेल. एका चित्रपटात किती गोष्टी दाखवणार! बघण्याची हिम्मत होईल का माहीत नाही, आधीचा आवडत्या पुस्तकांवर बेतलेल्या सिनेमांचे हाल बघता याच्या वाटेला जायचा धसकाच आहे खरं तर. खूप भारी रिव्ह्यू आले तरच बघेन. भाषा आणि परिसराविषयी वरच्या प्रतिसादांना अनुमोदन. गीकु बेळगावी आज्जी अजिबात वाटत नाही खरंच.
पुस्तके ज्यांनी वाचली नसतील त्यांना एक स्वतंत्र कथा म्हणून आवडू शकेल असा अंदाज आहे.

पंखा व शारदा संगीत ही उरलेली २ पुस्तकं. फाफे नाही, थोड्याफार प्रमाणात मालगुडी डेजसारखी पण त्याहूनही निरागस. ऍमेझॉनवर आहेत.

रौतु का राज ट्रेलर आवडला.
थोडक्यात सिनेमाची कल्पना देणारा ट्रेलर आहे. सौम्य विनोद, पोलीस खात्यातला गचाळ पणा, गलथानपणा या दिशेनेही जात नाही आणि एकदम सीआयडी / क्राईम पॅट्रोल च्या दिशेनेही न जाणारी हाताळणी.

यातले पोलीस नेहमीच्या पोलीसांसारखे आहेत. त्यात एका दुर्गम गावात झालेली घटना. नवाजुद्दीन हा तिथला पोई मनापासून काम करतोय म्हणजे याचं काहीतरी चुकतंय असं समजून "योग्य" सल्ले देणारा स्टाफ यातून निर्माण होणारा विनोद स्मित आणतो.

बरेच दिवसांनी बघण्याचा मोह झाला तर कमिंग सून ची पाटी!
नवाजुद्दीन ने असेच रोल करावेत. हड्डी वगैरे रोल केले म्हणजे अभिनय क्षमता सिद्ध होते या अंधश्रद्धेतून बाहेर पडावे.

अल्याड पल्याडचा ट्रेलर आवडला. बॅकग्राऊंड म्युझिक कमाल आहे.
हॉरर कॉमेडी असावा असे वाटते. अलिकडच्या अशा सिनेम्यात हॉरर कमी कॉमेडीच जास्त असते. किमान कॉमेडी नीट जमलेली असावी.
नाहीतर फर्स्ट हाफ उत्कंठावर्धक आणि सेकंड हाफला सगळाच सिनेमा हातातून निसटून भरकटल्याची उदाहरणे आहेतच.

अल्याड पल्याड हे नाव ह्याला गाढ त्याला गाढ सारखे वाटते.

बरेच नवीन नवीन ट्रेलर आले आहेत. बघायला हवेत वेळ मिळाला तर निवांत...

कल्की चा ट्रेलर आला आहे. विअर्ड हिंदी. एक्सट्रीम सीजीआय.
https://youtu.be/kQDd1AhGIHk?si=d46ZEMcMnCVP5Rfi
(मला तरी) विचित्र आणि ब्रम्हास्त्र छाप सुपर फ्लॉप कॅटेगरी वाटला Happy

तबू & अजय देवगण चा औरोमें कहा दम था येतोय.. बघावासा वाटतोय.

इतरांचं माहित नाही मला त्या दोघांचा (तो पन्नाशीत प्रेमात पडतो तरूण मुलीच्या) तो मुव्ही आवडला होता...

ट्रेलर वरून काही कळले नाही> खरं तर तसच असायला हवं.. ईंटरेस्ट टिकून राहतो.

कमल हसन वर देखील रजनीप्रमाणे वयाचा काही एक प्रभाव नाही वाटत.>>> बापरे. नाही हो. दोघे ही प्रचंड म्हातारे दिसतात, बिना मेकप चे पहा.

इंडियन2 मधला कमल हसन बराच कृत्रिम वाटतो.फ्रेम्स ट्रीट करायला जे काही वापरले आहे ते कळून येतेय.
शिवाय लॉजिक मध्ये झोल आहेच.इंडियन 1 च्या रिलीज इयर प्रमाणे आता सेनापती चे वय 103 असेल.त्यांनी यावर काही लॉजिकल स्पष्टीकरण द्यायला हवे कथेत, सेनापती ला काहीतरी गुप्त अँटी एजिंग वनस्पती ची माहिती आहे वगैरे.

गुप्त अँटी एजिंग वनस्पती ची माहिती आहे वगैरे.>>>> भारत भूषणचे इंजेक्शन आठवले Lol (माबोवर कुठेतरी लिंक बघितली होती)

दोघे ही प्रचंड म्हातारे दिसतात, बिना मेकप चे पहा. >> पडद्यावरच पाहू शकतो. बिना मेक अपचं पहायला जाण्यासाठी चहावाला, पोर्टर, मालिशवाला, कटींग वाला ( याला हेअर आर्टिस्ट म्हणतात असं ऐकलं आहे), दाढीवाला (ए हजामत इधर आओ ऐकायची तयारी ठेवून) बनून जावं लागेल.

हिंदूस्तानी २ ट्रेलर काहीही आहे. कशाला तो या वयात अ‍ॅक्शन हिरोचा हव्यास. बसा ना घरी आरामात. Uhoh
(देजावु ? - असं इतक्यातच केव्हा म्हटले होते बरं ? ...हां काल बायडन - ट्रंप डीबेट बघताना म्हटले होते Proud )

मी जात्याच फार विचार करत नसल्याने माझ्या डोक्यात आला नाही, मी लेखात वाचला Happy
त्यांनी असं म्हटलंय की त्याला माणूस न समजता सुपरमॅन समजा.वयाचा संबंध नाही.(म्हणजे पुढे हिंदुस्थानी 3, 4...10 पण येऊ शकतील.)

Pages