चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैतान ट्रेलर बघूनच आवडला नव्हता. कुठल्या उद्देशाने बनवतात असे चित्रपट असे वाटले होते. त्या ट्रेलर धाग्यावर सुद्धा अशीच पोस्ट होती. आमच्या बिल्डिंगमधील सगळे लहान मुले थेटरला बघून आली होती हा चित्रपट, एक माझी मुलगी सोडून. कारण आम्हीच पाठवले नाही. हे असे काही जगात असते आणि ते खरे असते असे उगाच डोक्यात भरायला नको. सोसायटी मधील एका वय वर्षे दहा मुलीबाबत तेच झाले. झोपेत दचकून उठायला लागली. हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी का नाही ठेवला असे वाटले ते ऐकून..

शैतान सारख्या अंधश्रद्धा पसरू नये हे खरं असलं तरी त्यातून बरेच कॉमन सेन्स धडे पक्के मनावर ठसवता येतात मुलांच्या.बाहेरच्या माणसासमोर काय माहिती शेअर करावी काय नको,स्वतःच्या सुरक्षित असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगायला नको,अगदी निरुपद्रवी माणूस वाटलं तरी दिलेलं अनोळखी खाणं खायला नको वगैरे. शैतान च्या कथेत वेगळ्या स्वरूपाचा प्रकार असला तरी याचे नॉर्मल नॉन-अतिमानवी प्रकार शक्य आहेत.गुंगीचं औषध, ड्रग परफ्युम हुंगायला लावून किंवा खायला देऊन देणे.

शैतान सारख्या अंधश्रद्धा पसरू नये हे खरं असलं तरी त्यातून बरेच कॉमन सेन्स धडे पक्के मनावर ठसवता येतात मुलांच्या.बाहेरच्या माणसासमोर काय माहिती शेअर करावी काय नको,स्वतःच्या सुरक्षित असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगायला नको,अगदी निरुपद्रवी माणूस वाटलं तरी दिलेलं अनोळखी खाणं खायला नको वगैरे. शैतान च्या कथेत वेगळ्या स्वरूपाचा प्रकार असला तरी याचे नॉर्मल नॉन-अतिमानवी प्रकार शक्य आहेत.गुंगीचं औषध, ड्रग परफ्युम हुंगायला लावून किंवा खायला देऊन देणे.

मी अनु हो मुलांना या गोष्टी सांगायला, समजवायला हव्यात.
पण ते मुलांच्या मनावर ठसवायला शैतान एकच चित्रपट जगात शिल्लक नाही ना...
योग्य पर्याय निवडणे हे पालक म्हणून आपले कर्तव्य आहे असे वाटते.

तुमचा मुद्दा हा आहे की इतक्या विकृत स्वरूपात त्या मुलीकडून करवलेल्या गोष्टी दाखवणारा चित्रपट हा ते मुद्दे शिकवायला अजिबात योग्य मिडीयम नाही.परी चे वय लक्षात घेता मुद्दा बरोबर वाटतो.
आमच्या घरात आता कंटेंट बघून बघून या सगळ्याला इम्युनिटी आली आहे.'स्वतःचं डोकं चालवा, जे बघाल ते काल्पनिक आणि तिखटमीठ लावलेलं आहे हे लक्षात घेऊन सोडून द्या' इतकंच सांगतो.

हो, आमच्याकडे सुद्धा मुले (सहा वर्षांचा पोरगा सुद्धा) हॉरर स्टोरी बघत राहतात. आणि घाबरत राहतात. आम्ही ओरडत राहतो. पण ते ॲनिमेशन असल्याने हे खोटे असते मुलांना सांगणे सोपे पडते. किबहूना ॲनिमेटेड असल्याने मुलांनाही जे चालू आहे ते खोटे आहे असे फिल येते. पण चित्रपट वेगळा प्रभाव पाडतो. मी स्वतः भूत चित्रपट थिएटरला बघितला होता आणि महिनाभर एकटे झोपायला घाबरत होतो. आईच्या बाजूला झोपायचो. तेव्हा मी कॉलेजला होतो. त्यामुळे चित्रपट किती प्रभावी माध्यम आहे याची कल्पना आहे. अश्या अघोरी घटना मुलांच्या डोक्यात बसायला नको. कारण निव्वळ भीती नाही तर चुकीचे विचार सुद्धा आपण त्यांच्या डोक्यात भरत असतो. त्याचा परीणाम पुढे काय होईल हे नंतर आपल्या हातात नसते.

असो. चित्रपट बघितला नाही. ट्रेलर बघून जे वाटले त्यावर हे मत आहे.

Its a simple horror story. A करायला हवी होती हे योग्यच मत.

हॅकसॉ रीज बघायला सुरवात केली, अर्धा बघितला, रीज कडे निघालेत. खिळवून ठेवणारा आहे, थांबवणे भाग होते म्हणुन थांबवला. बाकीचा उद्या बघेन.

रूनमेश, अनुमोदन!

एवढी लहान मुले क्रौर्याला इम्यून होऊ नयेत, असे वाटते.

न सांगता एके ठिकाणी अंनाबेला लावलेला.. लकीली मी फोन केला तर मुलगी घाबरत होती. मी आणि अजून एका आईने बंद करायला लावला.

मला भयकथांच वावड नाही.

बहुधा माझा मुद्दा मिसइंटरप्रिट होतोय.'मुद्दाम मुलांना शैतान दाखवाच.सगळ्या लहान मुलांनी पाहिलाच पाहिजे,काही होत नाही,मुद्दाम सगळे क्रूर चित्रपट दाखवा' हा माझा मूळ मुद्दा नाही.(मी देवगण प्रोडक्शन च्या पब्लिसिटी टीम मध्ये नाही.) आणि दाखवूही नये.चित्रपट रेटिंग काय हे पाहिलं नाही, पण यु नक्कीच नसेल.(यु ए असेल-13 वर्षांवरील मुलांनी जबाबदार ऍडल्ट सोबत पहावा, विथ डिस्क्लेमर्स आणि स्वतःच्या जबाबदारीवर), सोसायटीतली जी लहान मुलं 13 च्या खाली आहेत आणि तरीही यूए चित्रपट बघतात ती मुलं आणि त्यांचे पालक अर्थातच कायदेशीर गाईडलाईन्स प्रमाणे वागत नाहीयेत.
आम्हीही थिएटरमध्ये दाखवला नव्हता लहान मेम्बरना.

सध्या यु ए रेटिंग मध्ये असलेल्या चित्रपट किंवा कंटेंट मध्येही प्रचंड प्रमाणात मारामारी, किसिंग सीन्स,क्रौर्य असतं.सगळीकडे टाळता येत नाही.मुलं कळत नकळत या कंटेंट ला(अगदी सर्टिफिकेट रेटिंग त्यांच्या वयात बसणारं असेल तरी) एक्सपोझ होतात.अश्या वेळी त्यांच्यात 'हे काल्पनीक आहे,अर्थातच वाईट आहे,फिक्शन आहे,प्रत्यक्ष आयुष्यात याचे परिणाम असतात' इतका विवेक आणणं ही सेफ प्रॅक्टिस आहे.

एक माणूस शंभर जणांना लोळवतो, हेलिकॉप्टर जमिनीला ९० अंशाचा कोन करून उडवतो अशा अंधश्रद्धा पसरवणारे चित्रपट दाखवावेत का ? त्याचा मुलांवर काय परिणाम होतो ?

ऋन्मेऽऽष चे बरोबर आहे. कितीही लॉजिकल विचार आपण मुलांना पटवून द्यायचा प्रयत्न केला तरी कधी कसली भीती मनात बसेल सांगू शकत नाही.
मी लहानपणी जेव्हा भाड्यानं VCR आणले जायचे तेव्हा EvilDead आणि Demons बघितलेला. डेमन्स पिक्चर हा थिएटर मधेच घडतो आणि एकट्याने बघून दाखवणाऱ्या ला एक लाख बक्षीस मिळणार हि अफवा तेव्हाही होती. तो पाहिल्यावर किती तरी दिवस मी खुर्ची/सोफ्यावर पाय खाली सोडून बसायला घाबरायचे कारण कुणीतरी खालून येऊन पाय पकडेल हि भीती वाटायची.

Pearl इंग्रजी नेटफ्लीक्सवर
काळ १९१८ , एक पर्ल नावाची मुलगी, आई आणि अपंग वडिलांबरोबर एका गावात राहत असते..तीचा नवरा युध्दावर गेलेला असतो..पर्लला हिरोईन व्हायचे असते पण तीच्या आईचा याला विरोध असतो..आपली म्हत्वांकाक्षा पूर्ण करायला नायिका काहीही करायला तयार असते..भयंकर वायोलंस,डार्क, सायकोथ्रीलर, क्राईम सिनेमा...

लापता लेडिज पाहिला.. आवडला.

'हे काल्पनीक आहे,अर्थातच वाईट आहे,फिक्शन आहे,प्रत्यक्ष आयुष्यात याचे परिणाम असतात' इतका विवेक आणणं ही सेफ प्रॅक्टिस आहे.>>+१ माझा मुलगा ७ वर्षाचा आहे. जे चित्रपट आम्ही लहान असताना पाहिले ते जरी आता टिव्हीवर लावले तर तोही बघतो. त्यात बेदम हाणामारी, जीव घेणे आहेच. मग ॲक्टींग काय असते. ॲक्टर आणि कॅरॅक्टर मधला फरक, नट-नट्यांच्या मुलाखत, शूटींग कसे करतात ते व्हिडीओ त्याला दाखवलेत. त्यामुळे वाईट गोष्टींबरोबर एकदम भारी गोष्टीपण(ज्या टिव्हीवर दिसतात) खऱ्या नाहीत हे त्याला कळते.
मागे एकदा कृष्णाच्या कथा(अमरचित्र कथा) वाचून दाखवत होते. तेव्हा त्या त्यातला अत्याचार बघून त्या बंद केल्या.

शैतान पाहिला. आर माधवन रॉक्स! कसले भारी एक्स्प्रेशन्स, डोळे, क्रिपिनेस, खूनशीपणा, विकृत दिसणं सगळंच अमेझिंग.
काही सिन्स अचाट अतर्क्य आहेत. चालवून घेतलं.

सुनिधी सेम पिंच मी पण the idea of you बघितला. आवडला.

शैतान पाहिला - टेन्शन चांगलं ठेवलंय, पण एकूण देवगणभाऊंचं पात्र माधवनपेक्षाही सुपरनॅचरल दाखवलंय असं वाटलं. सुटकेचे प्रयत्न कन्व्हिनिअन्टली जुळून येतात, सुरा भोसकलेल्या हातानिशी बाइक राइड करता येते, कुठूनही कुठेही पडलं तरी हाडंबिडं मोडत नाहीत. असो. बघायला मजा आली. मी _अनु म्हणाल्या तशी मॉडर्न 'लिटल रेड रायडिंग हुड' बोधकथा!
मला फक्त तो लाडू मस्ती करताना मुलीऐवजी मुलाने खाल्ला असता तर गडबड झाली असती असं वाटलं - शैतानने कसा काय तो चान्स घेतला?

सैतान मला पण आवडला. मूळ गुजराती सिनेमा वश हा आणखी खूप डार्क आहे म्हणे. पण कुठे दिसत नाहीये आता.

मला फक्त तो लाडू मस्ती करताना मुलीऐवजी मुलाने खाल्ला असता तर गडबड झाली असती असं वाटलं - शैतानने कसा काय तो चान्स घेतला?>>>> ++११
पूर्वी लोकल, बस मधे पोस्टर्स दिसायची. वशीकरण, काला जादू वर तोडगा उपाय वगैरे.
तेव्हा लसीकरण सारखं वशीकरण असं काहीतरी वाटायचं.

मुलीऐवजी मुलाने खाल्ला असता तर गडबड झाली असती असं वाटलं -
>>>> आधी त्याने मानवी पद्धतीने संमोहन केले होते, तिच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवून, हसून, बोलून, मेन्यू वाचायला लावून तिला उद्युक्त केले होते. सहसा कुमारिकांचा बळी द्यायचा प्रघात असतो, ऐकीव आहे. लाडू तिळगुळाच्या प्लास्टिक डबीतला आणि अतिशय छोटा होता हेच मला जास्त खटकलं. त्याला लाडू म्हणण्यापेक्षा 'बुंदी' म्हणायला हवे. डबी BPA free होती की नाही असे कुकातकुका विचार आले. Lol

>>> डबी BPA free होती की नाही
Lol

>>> तिच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवून, हसून, बोलून, मेन्यू वाचायला लावून तिला उद्युक्त केले होते
शक्य आहे, पण मुलगा तरीही ती डबी घेऊ शकला असता, भावंडं त्यासाठी गमतीने माफक झटापट करताना दाखवली आहेत.

>>> सहसा कुमारिकांचा बळी द्यायचा प्रघात असतो, ऐकीव आहे
यासंदर्भात कुमारिका म्हणजे खरंतर अजून ऋतुप्राप्ती न झालेल्या वयातील मुलगी ना? (माझीही ऐकीव/वाचीव माहिती.)
या सिनेमातल्या 'बळी' मुली चांगल्या मोठ्या आहेत.

बीपीए फ्री वर सर्च केले. स्वातीच्या वरच्या प्रश्नाबद्दल कोणी वेब सर्च करायला जाऊ नका Happy Happy

मी आधीच केले आहे. Lol
कुमारिका म्हणजे नुकतीच ऋतूप्राप्ती झालेली पण व्हर्जिन. नवरात्रीच्या कन्यापूजनासाठी मोठ्या असलेल्या पण लहानच. हा माझा समज. मी कुतूहलापोटी दोन-चार तांत्रिक साधनेचे पॉडकास्ट बघितले आहेत, हिंदू तांत्रिक ज्या क्षुद्र दैवतांची उपासना करतात त्याला सैतान म्हणत नाहीत. Setan , Lucifer, diablos हे परदेशी नागरिक आहेत. Proud स्मशानकालीची पूजा करतात हे लोक म्हणे. जी demi-god आहे. त्यामुळे ते नाव खटकलंच. ती मूर्ती सुद्धा मला Indiana Jones मधल्या कालीचं स्वस्त आणि अशक्त रूप वाटली.

(मला लोक आहोजाहो करतायत..बापरे.बापरे. उठा उठा मेंदी आणि इंडिगो लावण्याची वेळ झाली Happy )
वश शेमारुमी च्या पेड व्हर्जन वर आहे, आणि मिनिमम वर्गणी 6 महिन्याची आहे.सबटायटल ऑन करण्याची युक्ती सापडली नाही आणि गुजराती कळतेच ऐकल्यावर त्यामुळे गुजरातीतच पाहिला वश.

शेमारुमी, त्यावर बरेच जुने क्लासिक बॉलिवूड(70-80 चे बहुतेक) आहेत.कोणी ठरवून 2-3 जणांनी घेऊन आलटून पालटून वापरले तर जास्त बरे.

मधला बराच काळ देवगण आणि फिल्मी देवगण पत्नी ज्योतिका नुसते बघत असतात.माधवन ने सॉलिड रोल केलाय.वश च्या मानाने शैतान खूप ब्युटीफाय केलाय.
सर्वांत जास्त भीती ती जानकी स्माईल करत असते तेव्हा वाटते.आणि गॅस सिलिंडर च्या वेळी.

लाडू सॉफ्टवेअर चं इव्हॅल्यूएशन व्हर्जन होता.बिस्कीट पुडा लायसन्स वालं पूर्ण व्हर्जन. म्हणून लाडू लहान.

मंजुमेल बॉईज बघायला घेतला. पण गुहा पाहिल्यावर भीती वाटायला लागली म्हणून बंद केला.दुपारी शनिवारी वगैरे उरलेला बघू.

'बळी मुली मोठ्या'-त्या एकदम साध्यासुध्या, संस्कारी घरातून नीट ग्राउंड अभ्यास करून उचललेल्या असल्याने माधवन ला त्या कुमारिकाच असणं सी मधल्या 'धिस' पॉइंटर सारखं गृहीत आणि अपेक्षित आहे.

संस्कारी घरातून नीट ग्राउंड अभ्यास करून उचललेल्या असल्याने माधवन ला त्या कुमारिकाच असणं सी मधल्या 'धिस' पॉइंटर सारखं गृहीत आणि अपेक्षित आहे. >> Rofl
संस्कारी घरातून >> म्हणजे या धिस पोरींची 'कास्ट' बघुन का? Proud बाकी या धिस पॉईंटरची कास्ट खात्री असेल तरच बघावी, नैतर आपण रेफरंस काढायला (डी रेफरंस करायला) जावं आणि बोंबला! Wink
आता या जोक साठी तरी शैताना लवकर बघण्याचं करतो. Happy

Pages