चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या मिठ्या म्हणजे 'मिठ्या मारत रहा फळाची अपेक्षा करू नका' या गटातल्या निघाल्या. >>>>>

च्च्च्च्च्च्च्च!!!!!!!!!

2024 मध्ये पाहिलेले चित्रपट
paradise now (hebrew)
jhimma 2
Shower (chinese)
Aatmpamphlet
Navardev bsc agri
Jawan
Gangubai Kathiawadi
Teri baaton main aise Uljha Jiya
Mother and Child
modern Love Amsterdam
jailer
Modern Love Tokyo ep1-7
chef
Vihir
The Darjeeling limited
Shaitaan
welcome home
American Fiction
Anatomy of a fall (French - *****)
Rocky aur rani ki prem kahani
Aalvandhan (Tamil)
Dweepa (kannada)
Bramayugam
The Kid with a bike(2011) (french)

2022 मध्ये पाहिलेले चित्रपट/वेब सिरीज -
NENJAM MARAPATHILLAI
MAANADU
HIDDEN FIGURES
FIFTY SHADES OF GREY
BHOOTKAALAM
OH BABY
CHATUR MUKHAM
SHYAM SUNDAR ROY
CHANDIGARH KARE AASHIQUI
BHOOT POLICE
HRIDAYAM
CHAPPA KURISHU
ICE AGE
GEHARAIYAAN
ICE AGE 2
BADHAI DO
BOOK THIEF
JUST MARRIED
MY SISTER'S KEEPER
SHAITAN
PUSS IN BOOTS (ANIMATION)
UNFRIEND
PONDICHERRY
LAMB
BAD LUCK BANGING OR LUNI PORN
A HERO
"BETWEEN TWO DAWNS
Original title: Iki Safak Arasinda"
INVICTUS
GOD MUST BE CRAZY
HALF FULL (SHORT FILM)
"BARISH AND CHAUMIN
(SHORT FILM)"
"KHUJLI
(SHORT FILM)"
FATAFAT (SHORT FILM)
GURGAON
UGLY
MUSTANG
OUR LITTLE SISTER
COBALT BLUE
WADJDA
JAI BHIM
KARKHINSANCHI WARI
TABLE NO 21
Ballad of a Soldier
Vikram
The Cranes are flying
About Elly
Purple Hearts
shaolin soccer
The sound of music
Kantara
modern love, Mumbai
Pada
Chotushkone

डबल धमाका

काल मडगाव एक्सप्रेस आणि क्रू पाहिले
पहिल्यांदाच थिएटर ला बॅक टू बॅक शो पाहिले.

मडगाव ला जवळपास ५०% अन् क्रू ला ४०% प्रेक्षक होते.
दोन्ही सिनेमे लाईट एंटरटेनिंग आहेत. मजा आली.
दोन्ही मधे चांगलं करायला स्कोप होता पण जे प्रॉडक्ट तयार झालंय ते ही बरं वाटलं.
मडगाव प्राईम वार तर क्रू नेटफ्लिक्स वाट येईल

अरे तुम्ही लोक उगाच गवताचा माणूस बनवून त्याच्याशी कुस्ती खेळत बसला आहात. Proud 'जया संधीसाधू असते' किंवा तेच तिचं नेचर आहे असं लिटरली कुणीच लिहिलं नाहीये. कुणी लिहिलेलं दाखवून दिलं तर मी त्याला/तिला एक धोतरजोडी/साडीचोळी द्यायला तयार आहे. पण ती संधी साधून घेते यावर तर सगळ्यांचं एकमत आहे. टेक्निकली फूल लापता होण्यातली व्हिलन असते ती जयाच, याचा अर्थही ती गालावर मोठ्ठा चामखीळ असलेली, एका डोळ्याला आयपॅच लावलेली मोगॅंबो किंवा लायन टाईप व्हिलन असते असा लिटरली घ्यायची गरज नाही, इट'स र्हेटरिक, फोक्स. व्हिलन शब्द जास्त वाटत असेल तर 'दोषी' घ्या. समजा अ हा पुरुष आणि ब ही स्त्री टायटॅनिकवर आहेत. फक्त स्त्रिया आणि मुलांना लाईफबोटीवर घेत आहेत. पण ब झोपली आहे/बेशुद्ध आहे. हे अ ला माहित आहे. मग अ ने ब चं मुटकुळं आणून बोटीत टाकण्याऐवजी स्वतःच स्त्रीचा वेष घेऊन, अंधाराचा फायदा घेऊन लाईफ बोटीत घुसला तर त्याने ब वर अन्याय केला असं म्हणता येणार नाही का? मग अ ला व्हिलन मी नाही, व्हिलन आहे ती पुरेशा लाईफबोट्स न ठेवणारी बोट कंपनी/बोटीचा पायलट/आईसबर्ग असं म्हणता येईल का?
फूल बद्दलपण व्हिक्टिम ब्लेमिंग होत आहे असं वाटतं. शी इज लिटरली अ चाईल्ड ब्राईड. युपी-बिहारसारख्या ठिकाणच्या छोट्या गावातल्या अशिक्षित बायकांची रिऍलिटी तुलनेने प्रीव्हीलीज्ड आयुष्य जगलेल्या शहरी उवउव (उच्च वर्णीय उच्च वर्गीय) स्त्रियांना ग्रॅस्प करणं कदाचित कठीण असू शकेल. त्या सासरच्या गावाचं नावही विसरून जाण्याइतक्या बुडबग का काय ते असणं शक्य आहे. त्यातून नॉर्थ इंडियन पुरुषांची एकट्या बाईकडे सावज म्हणून बघण्याची मानसिकता. शी वॉज रिअली पुट इन मॉर्टल डेंजर. आता जया स्वतःच्या हातून घडलेलं कोलॅटरल डॅमेज फिक्स करते. पण ते तिचं नैतिक कर्तव्य म्हणून नाही, तर एक डू-गुडर हीरॉईन म्हणून केल्यासारखं दाखवलं आहे, ही मला सादरीकरणातली एक (लहानशी) त्रुटी वाटली.

टेक्निकली फूल लापता होण्यातली व्हिलन असते ती जयाच >>> फूल लापता होण्यामागे जया जबाबदार नसते. दीपक असतो. तोच (फूल समजून) तिचा हात धरून उतरवतो गाडीतून. रस्त्यात तिला लक्षात येते तेव्हा ती एक क्षण थबकलेली दिसतेही. पण अर्थातच ती चालून आलेली संधी घ्यायची ठरवते.
त्यामुळे मोरोबा तुमचे पुढचे सगळे लॉजिक गंडलेले आहे Happy

>>> आता जया स्वतःच्या हातून घडलेलं कोलॅटरल डॅमेज फिक्स करते. पण ते तिचं नैतिक कर्तव्य म्हणून नाही, तर एक डू-गुडर हीरॉईन म्हणून केल्यासारखं दाखवलं आहे,
नाही पटलं. नैतिक कर्तव्य - मुळातच सद्वर्तनी आहे म्हणूनच करते. फूलचा शोध सोडाच, पण त्या भाभीला चित्रकलेचं सामान आणून देणं, शेतीसाठी सुचवण्या देणं, यातलं काहीही तिने केलं नसतं तरी चाललं असतं. ती चांगुलपणातूनच ते करते.

जयाच्या मागे का लागलेत माबोकर Proud
कुठलीही हिंमत असलेली मुलगी सरव्हावल साठी अब्युजिव माणसाच्या तावडीतून पळून जायची संधी सोडणार नाही , तिला कोण फुल माहितही नसतं, दीपक तिला चुकून स्टेशन वर उतरवतो, ती स्वतः फुल ला ढकलून नाही उतरत Happy
कोलॅटरल डॅमेज वगैरे काही नाही, माणुसकी म्हणून थांबते ती.

कुठलीही हिंमत असलेली मुलगी सरव्हावल साठी अब्युजिव माणसाच्या तावडीतून पळून जायची संधी सोडणार नाही ,
+1
>>>>>
ती हुशार आणि जिद्दी आहे, त्यामुळे तिचे इन्स्टिंक्ट इतरांपेक्षा धारदार असले तर ती संधीसाधू होत नाही. हे नैसर्गिकरीत्या येत असतं. उलट आलं नसतं तर हुशारीचा काय उपयोग वाटलं असतं. हुशार माणूस रिसोर्सेस वापरणारच...! 'बुकस्मार्ट' आणि 'स्ट्रीटस्मार्ट' दोन्ही आहे ती, त्यामुळे जास्त आवडली.

नेफिवर "किंग रिचर्ड" पाहिला. फार आवडला. व्हीनस आणि सेरेना विल्यम्स चे वडील रिचर्ड विल्यम्स यांनी अगदी लहानपणीपासून (किंवा पिक्चर मधे म्हंटले आहे तसे त्यांच्या जन्माआधीपासून) त्यांचा टेनिस मधला आलेख प्लॅन केला होता व त्यांना सराव व संधी मिळावी म्हणून पूर्ण काळ त्याला वाहून घेतले त्याची ही कहाणी आहे. अगदी एंगेजिंग आहे. विल स्मिथ व त्या मुलींचे काम, त्यांच्या दोन्ही कोचेस चे रोल्स (त्यातला विशेषतः फ्लोरिडा मधला कोच हा द वॉकिंग डेड मधला "शेन" - इथे त्याचा एकदम वेगळाच रोल आहे), त्या विल्यम्स बहिणींचे एकत्र सीन्स फार मस्त/मजेदार आहेत. या दोघींव्यतिरिक्त आणखी तीन बहिणी आहेत पण त्या टेनिस खेळत नाहीत वगैरे माहिती नव्हती. सेरेनाचे काम केलेली मुलगी बहुधा "अकीला अ‍ॅण्ड द बी" मधली आहे.

व्हीनस वर जास्त फोकस आहे. सेरेनाला कमी फुटेज आहे. "दंगल" शी अनेक पॅरलल्स आहेत. इव्हन नेफिवर असलेल्या त्या क्रिकेटसंबंधी सिरीज ("सिलेक्शन डे") मधला तो बाप व त्याची दोन मुले - त्यातही खूप साम्य आहे. असे "हेलिकॉप्टर बाप्/आई" खेळांच्या बाबतीत बघितले आहेत. आपल्या मुलांना संधी देणे व त्यांना तयार करणे हा एकच ध्यास घेतलेले असतात. त्या करता अनेक तडजोडी करतातच पण इव्हन इतरांना संधी मिळू न देणे, लोकांना गरजेपुरते वापरणे हे सगळे प्रकार पाहिलेले आहेत. यातला रिचर्डही तसाच आहे.

विव्ह रिचर्डस ला पण किंग रिचर्डस म्हणतात. त्यामुळे क्षणभर नीनाशी झालेला गुप्त संघर्ष यात आहे काय असे वाटले.

एकदा येऊन तर बघा कसाबसा पूर्ण केला. पिसाच्या टॉवरवरून ढकलता येईल का एव्हढाच इंटरेस्ट.

रस्त्यात तिला लक्षात येते तेव्हा ती एक क्षण थबकलेली दिसतेही>>> नाही. तिचा नवरा तिला गुरकाऊन शेजारी बस म्हणून सांगतो. मग ती उठून त्याच्या शेजारी बसते. नंतर त्यांच्या जागा बदलत नाहीत. मग तिसराच कुणी तिचा हात धरतो आणि ती सरळ चालायला लागते हे कसं शक्य आहे? हे पंचनामा केल्यासारखं वाटतय Happy पण फॅक्ट आहे. आणि आपले सासुसासरे कुठे गायब झाले असा प्रश्न त्या स्मार्ट मुलीला पडत नाही?
तिचा नवरा टॉयलेटला उठून जातो आणि त्याच्या जागी दुसरा येऊन बसतो असं काहीतरी दाखवलं असतं (आणि सासुसासर्यांची सुद्धा काहीतरी लॉजिकल विल्हेवाट लावली असती) तर मला चाललं असतं. चांगल्या पिक्चरमध्ये अशा पटकथेत गॅप सोडल्या आहेत हा (पुन्हा एकदा) बारीकसा इश्यु आहे.
आता मी थांबतो.

मग तिसराच कुणी तिचा हात धरतो आणि ती सरळ चालायला लागते हे कसं शक्य आहे? >>>>>
ती ही झोपेत असते आणि घुंघट, त्या दिवशीचं लग्न आणि ठेचून भरलेल्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास. कोणीही डिसओरिएंट होईल. नंतर गावाचं नाव दिसल्यावर ती थबकते. पण दीपकचा मित्र विचारतो ‘का हुआ भौजाईजी? चलिए’ असं काहीतरी. तिला नक्कीच कळलं असेल तेव्हाच. पण परत कशाला जाईल?
पण तिच्या खविस नवऱ्याला शंकाही येत नाही की आपली बायको हरवली असेल किंवा तिचं काही बरंवाईट झालं असेल. या पार्श्वभुमीवर दीपकचं फुलसाठी तडफडणं बरंच काही बोलतं.

नंतर गावाचं नाव दिसल्यावर ती थबकते. >> ती ट्रेनमधे असतानाच ठरवते कि आता आपण इथून पळायचे. ट्रेनमधून उतरल्यावर थबकते तेव्हढ्यात दिपक हाक मारतो बस निघून जाईल म्हणतो. बसवर पुष्पा ट्रॅव्हल्स लिहिलेले असते. नंतर तेच नाव स्वत:चे म्हणून सांगते. गावचेनाव काय आणि किती लांब आहे ते वाचण्यासाठी ती क्षणभर थांबते.

नाच गं घुमाचे काय रिव्ह्युज आहेत? ट्रेलर तरी फार खास वाटला नाही. झिम्मा, बाईपण भारी वगैरे पिक्चरमध्ये ४,५ बायका घ्यायचा फॉर्म्युला चाललाय म्हणून हा काढलाय असं वाटतंय.

मला परेश मोकशीमुळे अपेक्षा आहे जरा. पण मराठी सिनेमे, तेही मोठी बाया बायांची स्टारकास्ट घेतलेले, गाजावाजा केलेले सहसा फुसके बार निघतात ( माझ्या बाबतीत तरी) त्यामुळे सांगता येत नाही.
येऊ देत रेव्ह्यू Happy

Pages