चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवी किशन ला मामला लीगल है सिरीज नंतर अजून एका मस्त रोल मध्ये पाहिले.. त्याचे फार चित्रपट पाहिले नव्हते आधी मी..

हॅकसॉ रिज - नेफि (लौकरच जात आहे वाचले) - अगदी रेकमेण्डेड. जबरी पिक्चर आहे. मात्र लढाईचे सीन्स खूप असल्याने मेलेल्यांचे, जखमींचे चित्रण खूप भीषण आहे. तरीही पिक्चर बघण्यासारखा आहे. खर्‍या घटनांवर व व्यक्तींवर आहे.

डेसमण्ड डॉस हा एक "सैनिक" प्रत्यक्षात कोणालाही मारणार नाही असे म्हणून त्याच्या लष्करी ट्रेनिंग मधे सुद्धा रायफल बाळगायचे नाकारतो. आधी त्याच्यावर कोर्ट मार्शल केले जाते. पण अमेरिकन कायद्यानुसार त्याला तो हक्क आहे असे निष्पन्न होते. तो एक "मेडिक" म्हणून युद्धात सहभागी व्हायला आलेला असतो. त्याला नंतर तशी परवानगी दिली जाते. मग त्याने जपान विरूद्ध च्या लढाईत केलेल्या कामगिरी वर हा चित्रपट आहे. इतपत माहिती विकीवर व इव्हन चित्रपटाच्या नेफिवरच्या "समरी" मधे सुद्धा असल्याने इथे स्पॉईलर होणार नाही. युद्धपट आवडत असतील्/नसतील तरी बघण्यासारखा आहे.

मंडळी इतक्या भयंकर उन्हाळ्यात थंडी वाटायला हवी असेल तर केट्टीचा (म्हणजे kate winslate) Mountain Between Us हा चित्रपट नक्की बघा. Survival movie आहे. Cast away सारखा जिथे तो समुद्रातल्या बेटावर एकटाच अडकलेला असतो. तसे इथे निर्मनुष्य बर्फाळ प्रदेशात अपघाताने अडकतात दोघेच. आणि निकराचा संघर्ष करून जगतात. बघण्यासारखा आहे. नक्की हुडहुडी भरेल असा आहे.

ला ले पाहिला. स्त्री प्रश्नावर काहितरी गंभीर दाखवले असणार असे इतर र्सगळे रिव्यु वाचुन वाटले होते पण इथले रिव्यु वाचुन ने फ्लि वर पाहिला व आवडला.

सहज बोललेली वाक्ये सटाककन कसलाही अभिनिवेश न दाखवता भाष्य करतात. औरत ससुराल आके
मा, बहु, देवरानी, सास बनती है पर सहेली कभी नही बनती हे आवडले. मा ने मुझे खानाबनाना, सिलायी, बुनाई सब सिखाया है, हम मुरख नही है या वाक्यावर जिस ससुराल निकली हो उसका नाम तक पता नही तो मुरख नही तो क्या है हे वाक्य मुलींना वाढवताना आजही काय प्रायोरिटीज आहेत हे एका क्षणात लक्षात आणुन देते. नेहमी शिक्षणासाठी बाहेर पडणारी मुलगी कलेक्टर व्हायलाच बाहेर पडते, यातल्या मुलीला सेन्द्रिय शेती शिकायचीय हे बघुन बरे वाटले.

चित्रपट नक्की पाहा. फुलची सासु दिया और बाती मध्ये गावातली चुलत सासुच्या भुमिकेत होती. सगळ्यांची कामे अगदी नैसर्गिक झालीत. नो मेकप लुकमुळे कोणी चित्रपटात काम करतेय असे न वाटता प्रत्यक्ष घटना पाहतोय असेच वाटते.

हो अगदी साधना.परफेक्ट रिव्ह्यू.खूप नैसर्गिक वाटतात सर्व.12वी फेल मध्ये हिरोची आई झालेलीने इथे पण मस्त काम केलंय.

लापता लेडिज सिनेमा - आमीर खान प्रॉड. )सिनेमा फुटू शकतो (आका स्पॉयलर्स) आपल्या जबाबदारीवरती पुढील कमेन्ट वाचावी.)
प्रॉडक्शनचे नाव बघताच बाह्या सरसावुन सिनेमा बघीतला गेला. निराशा झाली नाही.
मस्त संगीत एकदम मिष्किल म्युझिक पिसेस.
इन्स्पेक्टर व त्याचे सहकारी - एकदम धमाल.
जया शेवटी त्या दीपकच्या मित्राबरोबर विवाह न करता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यास निघून जाते - हे छान वाटले.
नॅह फुल कुमारी नाही आवडली मला. किती बारीक आवाज, भोळंभाळं असण्याचा अ तिरेक.
दीपकचे ओव्हरअ‍ॅक्टिंग वाटले.
बारक्या व मंजू मौसी - खूप भाव खाऊन गेले.

सगळ्याशी सहमत, छान, हलका फुलका मुव्ही...
तो दिपक ९०ज च्या हरिश कुमारची आठवण करुन देतो...करिश्मा बरोबरचा पहिला मुव्हि प्रेमकैदीचा हिरो...अजिबात चालला नाही(मुव्हि आणी हिरो दोन्ही) करिश्मा ताई कपुर असल्याने ग्रुम झाल्या, गोविन्दा,सलमान बरोबर ग्लॅम डॉल रोल करत टिकुन राहिल्या.
जया बरिचशी राजेश्वरी सचदे सारखी दिसते..
नेहमी शिक्षणासाठी बाहेर पडणारी मुलगी कलेक्टर व्हायलाच बाहेर पडते, यातल्या मुलीला सेन्द्रिय शेती शिकायचीय हे बघुन बरे वाटले.>>> +१

अरे हो बरोबर, हरीश सारखा.फक्त हरीश चे गाल थोडे जास्त चब्बी.
ती फुल कुमारी खूप लहान आहे, 16 वर्षाची.त्यामुळे पुढे सुधारेल अभिनय. मला आवडली यात.

प्लॅनेट ऑफ द एप्स सिरीज गेली १०-१२ वर्षे नव्याने रिबूट झालेली आहे त्यातील तिसरा - वॉर ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स- पाहिला. तो ही मस्त आहे. त्यातील चौथा आता येतोय ("किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स").

मूळ जुन्या "प्लॅनेट ऑफ द एप्स" चित्रपटाचा मार्क वाह्लबर्ग वाला रिमेक होता. त्यानंतर "राइज", "डॉन" आणि "वॉर" (ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स) असे तीन पुढचे चित्रपट आले. तिन्ही चांगले आहेत. चौथा आता येतोय ("किंगडम")

ज्यांनी ही सिरीज बघितलेली नाही त्यांनी किमान "राइज" तरी बघाच. यातील एप्स चे मुख्य पात्र "सीझर" आहे त्याची स्टोरी आहे. त्या शेवटी त्या सीझरचे त्याला घरी परत न्यायला आलेल्या हीरो व हिरॉइनला एका वाक्यात दिलेले उत्तर फार जबरी आहे.

नॅह फुल कुमारी नाही आवडली मला. किती बारीक आवाज, भोळंभाळं असण्याचा अ तिरेक.
>>>>
आमच्या जुन्या चाळीत उत्तर भारतीय भैय्या तीस टक्के होते. त्यांच्यात अश्या बायका लहानपणी खूप पाहिल्या आहेत. हुंडा घेऊन यायच्या. घुंघट ओढून राहायच्या. मुलं जन्माला घालायचे आणि त्यांना पोसायचे मशीन म्हणून जगायच्या. शहरात राहताना गरजेचे व्यवहारज्ञान शून्य असायचे. त्यामुळे नवी नवरी कित्येक दिवस घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायची नाही. गावातच वाढलेल्या असायच्या, लग्न करून मुंबई आलेल्या असायच्या. भोळाभाबडेपणा म्हणा किंवा बावळटपणा म्हणा तो त्यांच्या बोलण्यात सुरुवातीला बरेच काळ जाणवायचा. मग हळूहळू रुळायच्या. पोस्ट लिहितानाही बरेच जणी आठवल्या. अश्या बाईला काही करायची संधी मिळाली तर तसेच अप्रूप वाटू शकते. तर विश्वास ठेवा. कॉमन कॅरेक्टर आहे हे..
चाळीत तीस टक्के गुजराती बायका सुद्धा होत्या. त्या मात्र एक आझाद पंच्छी वेगळेच आयुष्य जगायच्या..

लापता लेडीज फारच छान आहे. रविकिशनचे आतापर्यंतचे बेस्ट काम असावे.
ती फूल कुमारी मला अगबाई अरेच्चा मधल्या संजय नार्वेकरची बायको झालेल्या अभिनेत्रीसारखी वाटली. दिसण्या-वागण्या-बोलण्या-आवाजातही
पण चुकीची मुलगी नवरी/सून म्हणून आणली गेलीय हे कळल्यावरही त्या ओळख पाळख नसलेल्या मुलीला इतके दिवस अगदी घरातल्यासारखं कोण राहू देईल असं मात्र वाटलं जरा

ती फूल कुमारी मला अगबाई अरेच्चा मधल्या संजय नार्वेकरची बायको झालेल्या अभिनेत्रीसारखी वाटली. दिसण्या-वागण्या-बोलण्या-आवाजातही <<
हो. हे वाचल्यावर मलाही वाटलं.
पण मला बालिकाबधू मधल्या (जुना, सचिन वाला) रजनीची आठवण येत होती. अर्थात रजनी जास्त नटखट होती.

समजा तुम्ही अगदी जगातली सर्वात बावळट, अनपढ बहू आहात. तरी तुमचा नवरा तुमच्या उजव्या बाजूला बसला आहे हे तुम्हाला माहीत आहे. अशा वेळी डाव्या बाजूला बसलेल्या दुल्ह्याने सांगितलं म्हणून तुम्ही त्याच्यामागून चालू लागाल का? थोडक्यात जया मोक्याचा फायदा घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी फूलचा बळी देऊन, तिला अत्यंत vulnerable, कोणीही गैरफायदा घेऊ शकेल अशा स्थितीत सोडून पळते. म्हणजे टेक्निकली फूल लापता होण्यातली व्हिलन असते ती जयाच.

लापता लेडीज पाहिला. मजा आली.

ती जया थोडी सोनम कपूर सारखी दिसते.
दीपक कुमार बहुतेक ए वतन नामक नव्या सिनेमात पण आहे.

लग्न होऊन फुल ला सासरी घेऊन जाताना किती कठीण प्रवास आहे. भारतात अजूनही अशी दुर्गम खेडी आहेत जिथे जायला धड रस्ता नाही हे अगदी जाणवतं.

((त्या ओळख पाळख नसलेल्या मुलीला इतके दिवस अगदी घरातल्यासारखं कोण राहू देईल)) दुर्गम खेडेगावात राहू देतील असं वाटतंय. पाहुणे आले तरी अगदी गावात ते घरातल्या सारखेच रहातात .

सगळेच मध्यरात्री एकदम गाढ झोपेत असतात शिवाय मध्येच एकदा स्टेशन आल्यावर , एक लग्नी जोडपे उतरते आणि सगळ्यांच्या जागा बदलेल्या असतात. झोपेत दचकून उठल्यावर जयाला लक्षात येत नसावं त्यामुळे. गाडी सुरू झाल्यावर तिला काहीतरी चुकलं हे लक्षात येतं पण तेव्हा ती काहीच बोलत नाही हे खरं...

लापता लेडिज झक्कासच आहे. अजीबात प्रीची न होता चिमटे काढलेले आहेत ते झक्कासच आहेत. किरण राव ला फूल मार्क्स.

चमकिला पन जबरदस्त जमलाय. रेहमान चे संगीत हा सुखद धक्का होता. परीणीती नि दलजित दोघेही एकदम ओरिजिनल वाटतात. त्याची मूल गाणी वाह्यात असली तरी किती सरळ सहज आहेत.

फा जुन्या रेडीयोवर जशी मधेच वेगळीछ स्टेशन लागत एम ऐकताना तसे तुझे होतेय रे वर Lol

जयाला तेव्हाच कळते की आपण चुकीच्या नवर्‍याबरोबर जातोय पण तिला तो नवरा व लग्न नकोच असतं, त्यामुळे ती चान्स घेते. घुंघट काढल्यावर आपण भलतीकडेच आलोत याचा तिला अजिबात धक्का बसलेला दाखवला नाही. ती नंतर पोलिस स्टेशनात सांगते की देवाने अदलाबदल करुन तिला दिलेली संधी हातातुन जाऊ देण्याइतपत मुर्ख ती नव्हती.

दीपकच्या घरातले सज्जन, ते तिला बाजारात व देवळात एकटी जायला देतात पण पोलिस स्टेशनात मात्र नको म्हणतात.

फुल आवडली. गोड दिसते आणि वावरते.

फा जुन्या रेडीयोवर जशी मधेच वेगळीछ स्टेशन लागत एम ऐकताना तसे तुझे होतेय रे वर >>> हो कल्पना आहे Happy

लापता लेडीज पाहायला सुरूवात केली. चांगला वाटतोय. तो बसच्या टपावर तिला चोरी बद्दल ती म्हण सांगतो ती मजेदार आहे. ती रेल्वे स्टेशनात तीच परत सांगते त्या रेल्वेवाल्याला.

हो! फारच मस्त आहे लापता लेडिज. खुप दिवसांनी इतका छान हिंदी सिनेमा बघायला मिळाला. कित्येक सीन आणि डायलॉग खुप मस्त. सोशल मेसेज आहेच पण इतका subtly मांडला आहे स्क्रिनप्ले मध्ये! सगळ्यांची कामं पण खुपच छान झाली आहेत. अगदी तो छोटा मुलगा सुद्धा.
रवि किशननी चांगलाच स्क्रीन डॉमिनेट केलाय!

चमकीला बद्दल लिहायचे राहून गेले. कोण हा चमकिला , त्याचे नाव, त्याची स्टोरी, अन त्याची गाणी काहीच माहित नाही तर त्याचा बायोपिक आपल्याला आवडेल का असंच डोक्यात होतं. इम्तियाज अली, रहमान या नावांवर विश्वास ठेवून बघायला घेतला आणि खरंच खूप आवडला. चमकिला आणि त्याची गाणी माहित असती तर बहुधा अजून जास्त एंजॉय केला असता. दलजित दोसांज आणि परिणितीने मस्त कामे केली आहेत. ८० -९० चा काळ, कपडे , गाड्या, हे उभे करताना मेहनत घेतली आहे हे जाणवते. ओरिजिनल फोटो आणि क्लिप्स अधे मधे घातलेत ते बघतानाही ते लक्षात येते. ते गाण्याचे "आखाडे", स्टेज, एकाच स्टँडिंग माइक मधे आलटून पालटून वाकून दोघांनी गाणे हे इतके क्यूट वाटते की बस. रहमान ची गाणी मस्त आहेत. एकाच वीकेन्ड मधे चमकिला आणि लापता लेडीज, लॉटरीच लागली Happy

मध्य प्रदेशात शुटिंग झालेय पण नाव निर्मल प्रदेश की कायसेसे दिलेय. आणि लोक राजस्थानी वाटतात व बोलतात. मुर्ख ह्या अर्थाचा शब्द गुडबग की बडबग मस्त वाटतो ऐकायला.

आता चमकिला बघायचा आहे!

बुडबख बहुतेक.

स्पोर्ट्स कोटा मे रोज अंडा केला मिलता है Rofl
उदर तुम्हारे गट फिलिंगकी जज सब पतंग उडाएंगे का, सबूत ना हो तो? Lol
फेस नही तो माने की पहचान ही नही. ... चाय ... Proud

Pages