माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकण ठेवले होते
आंबट गोड, पुढच्या वेळी ट्राय करुन बघते. धन्यवाद

काय कारण असेल? आणि काय उपाय करता येईल>> दह्याची क्वालिटी चेक करा. त्यासाठी दूध करेक्ट वापरले गेले आहे ना ते बघा. हे झाले की कढी करताना: दही व बेसन मीठ किंचित साखर गार असतानाच हे सर्व नीट मिसळून घ्यायचे. फोडणी केल्यावर ओतायचे गॅस फार मोठा ठेवायचा नाही. अगदी मंद गॅस वर पाच सात मिनि टे ठेवुन खाली उतरवा. माझी कढी म्हणजे गुजराती पद्धतीची पण तूप जिरे हिंग हिरवी मिरची फोडणी. आले थोडे ठेचुन घालते व सर्व्ह करताना कोथिंबिर इतकीच असते.

,घरच दही वापरता का?घरच्या दह्याची कढी फुटण्याची जास्त शक्यता असते... घरच दही असेल तर मिठ सगळ्यात शेवटी घाला आणी आल थोड कमी घाला बाकी अमाच्या सुचना योग्य आहेत.

एकदा कढी फाटली की काही करता येतं का?>>>> एका वाटीत वरचं पाणी घ्यायचं थंड झाल्यावर त्यात बेसन टाकायचं वर सांगितल्याप्रमाणे उकळी काढावी.

कढीचाच थ्रेड कंटीन्यू करते.

कढी गोळे करताना गोळे टाकल्यावर कढी फुटली. बेसन लावले होते व मध्यम आचेवर ठेवली होती. गोळे टाकायच्या आधी उकळी आली तेव्हा व्यवस्थित होती.
माकाचु?

पहिल्यादाच गुळ पापडी केली आहे पण ती फारच अलवार आणी जरा भुसभुशित झालिये, किचित अगदी किचित कडसर पण लागते आहे
२वाट्या कणीक
१वाटि तुप वितळुन
१ वाटी गुळ पावडर
१/२ वाटी डेसिकेटेड कोकोनट भाजुन घेतले होते.
कणीक निट भाजली होती पण समहाऊ गुळ पावडर घातल्यावर थोड पाकासारख व्हायला हव ते झालच नाही थोड कोरड कोरडच वाटत होत मिश्रण.

मला अलीकडेच २ मातीच्या पाण्याच्या बाटल्या भेट मिळाल्या. त्यात ४८ तास पाणी भरून ठेवायचे असते. आणि मग ते ओतून टाकून नवीन पाणी भरून वापरायला काढायचे असते असे ज्यांनी बाटल्या दिल्या त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे केले. पण एका बाटलीतले पाणी जेमतेम गार होते.

दुसऱ्या बाटलीतले पाणी काही गारच होत नाही. गार व्हावे म्हणून खूप वेळ ठेवले तर पाण्याला विचित्र चव येते. (एरवी माठातल्या पाण्याला येते तशी चांगली चव नाही.) पाणी गार न होण्यामागे मुंबईत ह्यूमिडिटी जास्त आहे हे कारण असू शकते. पण विचित्र चव कशी घालवावी? त्यात एकदा वाईट चव येते म्हणून कडकडीत पाणीही घालून ठेवले होते. तेव्हा चव गेली पण परत पाणी 24 तास ठेवले तर तीच चव.

ज्यांनी बाटल्या दिल्या त्यांच्याकडच्या बाटलीत पाणी छान गार लागत होते. ते आवडले म्हणून त्यांनी कौतुकाने २ बाटल्या आमच्यासाठी घेऊन दिल्या.

माकाचु ?

कधीकधी मिळणारे माठ हे पूर्ण 'माठ' नसतात.मोठ्या साईझ च्या माठात सिमेंट किंवा काँक्रीट पण मिसळलेलं असू शकतं.(अर्थात लहान बाटलीत असं नसेल.तोंड अगदी लहान असेल तर हवा खेळती रहात नसेल.

बनेश्वर च्या बाहेरून एक माठ जग आणलाय.पाणी थंड होतं.पण बहुतेक पूर्ण थंड व्हायला वेळ लागतो, आम्ही आधीच संपवतो.ज्यांच्याकडे बघून हा माठजग घेतला त्यांच्याकडे गार होत होतं.

अनु>>>> माठजग आवडला.

तू म्हणतेस तसं माठलीचं तोंड निमुळतं आहे. पण ती सिमेंटची नसावी. कारण तळाशी थोडं पाणी बाहेर झिरपलेलं असतं.
आत्तापर्यंत मी अगदी तोंडापर्यंत पाणी भरून ठेवत होते. आज पाऊण बाटली भरून बघते गार होतंय का.

काल चिकाटी ने नविन ब्रँड वर ट्राय केले असता ६ शिट्यांमधे राजमा शिजला ते पण मऊ. भोवळ यायची बाकी होती.
सिरियसली जो वापरताय तो ब्रँड & जुना/नवा प्रॉडक्ट नक्कीच फरक पडतो.
कित्तेक वर्षांनी घरचा राजमा मसाला एंजॉय केला Happy

जून डाळीचे उडद वडे पण दडस लागतात!

६ शिट्यांमधे राजमा शिजला ते पण मऊ. भोवळ यायची बाकी होती. >>>>>
aashu29 वा…. याबद्दल माबोवरील राजमाग्रस्तांतर्फे तुम्हांला ‘राजमामर्दिनी’ पुरस्कार देण्यात येत आहे.

Pages