माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Oh... धन्यवाद सोनाली आणि प्रज्ञा.
Actually व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मळून घ्या नीट, भेगा दिसू नयेत इतपत, तसं केलं. जास्त मळलं बहुतेक, पुढच्या वेळेस थोडं कमी मळेन.

मी देखिल आजच रसमलाई बनवली. पनिर थंडपाण्याखाली धुऊन घ्यायचं आणि फक्त १५ मि. कपड्यात बांधून ठेवायचं. त्यानंतर केवळ ५-७मि. मळून घ्यायचं. त्यामुळे फॅट्स पनिरपासून वेगळे होत नाहीत. रसमलाई खूप छान झाली.

माझ्या साबा उलट नेहमी इतकं मळतात तेव्हाच रसमलाई/रस्गुल्ला छान होतात. त्यातर मैदा नाहीच घालत.

‘ज्यास्त मळल्याने नाही‘, तर मैदा ज्यास्त झाल्याने पाणी शोषून कोरडे झाले.

मी आज नारळ वडी केली होती.
नारळाचा चव, दूध, साखर असं घालून बराच वेळ मिश्रण शिजवलं.
वड्या पडल्या आहेत पण खुटखुटीत झाल्या नाहीत
मऊसर झाल्या.
खायला उत्तम लागतायेत पण खुट खुटीत का नाही झाल्या ते कळाले नाही.
मिश्रण अजून हलवले असते तर करपले असते.
आणखी काही कारणानी ओलसर राहतात का

खोबर्‍याच्या वड्यात दूध घालत नाही.घातलंच तर एकदम थोडे.खोबरे वाटण्यापुरतेच.कदाचित त्यामुळे तर मौ झाल्या नसतील ना?

2चव (नारळ) 1 साखर , 1 दूध प्रमाणात घेते. घट्ट होत आलं मिश्रण की गैस बंद करून मिल्क पावडर टाकयची..

मी काल केली. १ नाच+ १ रवा+ १दूध+ २साखर. हे सगळे एकत करून घट्ट होइपर्यंत शिजवायचे मग शेवटी व्हॅनिला इसेन्स टाकायचा. वड्या करायच्या. (https://youtu.be/zgN6PqGpZ1Y )
मी ते जरा जास्त वेळ शिजवायला हवे होते पण आता खोब-याची चिक्की म्हणून खाता येइल. चव खूपच मस्त आहे.

दूध घालतात
साखरेच्या पाकचे तंत्र असते

माझ्या साबा करायच्या त्या फक्त खोबरे आणि साखर एवढेच घ्यायच्या.नंतर त्यात उकडलेला बटाटा घालायच्या.मस्त करायच्या.आम्हाला गावावरुन यायच्या आणि स्वतः करण्याचा उल्हास,त्यामुळे काय प्रमाण ते कधी विचारले नाही.

ऑफिसमधे एकीने दिलेली वडी खाल्ली,ती पांढरीशुभ्र आणि गुळगुळीत.त्यावर त्या म्हणाल्या की खोबरे,दूध घालून वाटले.

आमची आजी बराच वेळ मंद गॅस वर खोबरे, साखर, दूध आटवत असायची. मस्त लालसर रंग येई पर्यंत. तसा रंग आला की बरोबर घट्ट होते. त्या वड्यांची चव खुप सुंदर खरपूस असायची

पांढर्‍या रंगाच्या वड्या करायच्या असतील तर मात्र दूध कमी / अजीबात घालत नाहीत बहुदा.

खोबर्‍याच्या वड्या कधीच बीन दुधाच्या खाल्य्या/बघितल्या नाहीत. माझ्या मामींची पांढर्‍या शुभ्र खोबर्‍याच्या वड्या खासियत आहे एकदम. त्या नारळ जराही काळा भाग न येता खवून घेतात आणि दुधाबरोबर मिक्सर मधुन साखरे बरोबर काढतात. एकदम रवाळ दाट असे मिक्स्चर दिसते .नंतर मंद आचेवर शिजवितात.
कधी वेलची तर कधी कधी vanilla किंवा rose इसेन्स घालतात. दुध फुल फॅट पाहिजे. मिल्क पावडर वगैरे न घालता मंद आचेवर हलवित रहाणे हेच कौशल्याचे काम आहे.

माझ्या साबा करायच्या त्या फक्त खोबरे आणि साखर एवढेच घ्यायच्या.नंतर त्यात उकडलेला बटाटा घालायच्या. >>> आई असंच करायची.

दुध फुल फॅट पाहिजे. मिल्क पावडर वगैरे न घालता मंद आचेवर हलवित रहाणे हेच कौशल्याचे काम आहे.>> खरंय, मी नेहमी करते छान घट्ट दूध नारळाचा चव बुडेल इतकं घालून, जितका चव तितकी साखर, मंद आचेवर ना कंटाळता सतत हलवत राहावं लागतं, specially जेव्हा साखर पूर्ण विरघळते आणि थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा सतत हलवायचं

काल मास्टर रेसीपी विश्णू मनोहर ह्यांची खोबर्‍याची वडी ही रेसीपी बघित ली . म्हणजे आलीच ती सजेशन मध्ये नाकासमोर. तर त्यांनी किनै तुपावर नारळाच चव परतून साखर घातली मग अजून परतले मग गॅस बंद करून दोन चमचे मिल्क पावडर घातली. दोन वाटी चव, एक ते दीड
वाटी, वेलची पाव डर एक छोटा चमचा आणि दोन चमचे मिल्क पाव डर असे साधारण प्रमाण आहे. ही वडी आहे बर्फी नव्हे.

पण मग ते हाताने तो गोळा थापतात ते अगदी बघवत नाही.

नारळ, दूध आणि साखर ह्याची एकत्रित चव सुरेख लागते फार.
प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.
कदाचित दूध थोडे जास्ती पडले असावे.
आणखी एकदा गॅसवर परतून खुटखुटीत करायचा प्रयत्न केला असता पण कंटाळा आला फार.
पण खायला अश्याही मस्तच लागतायेत.

मंजूताई, BLACKCAT, धनी, शब्दसखी आणि सीमा
ह्यांना अनुमोदन.
दुध न घालता नारळ वड्या आजतागायत खाल्ल्या, केल्या नाहीत.
आणि तीच चव जास्ती भावते त्यामुळे ह्या पुढेही त्याचं पद्धतीने करेन.
दूध म्हशीचे होते.

माझ्या साबांची भजन मैत्रिण, मायक्रोव्हेव मध्ये नारळाच्या वड्या करते, पटकन होतात. मला पहायचे होते पण कोरोना मध्ये कडमडला. Angry

आमच्याकडे नाही घालत दूध. बटाटा घालून केल्या तरी नाही घालत.
नारळाचे चूर्ण/चुन्न/चून/चोन/चोंय/चोय/सोय/चव मिक्सर मधून काढून साखरेमध्ये मिसळून थोडा वेळ ठेवून द्यायचा. पाणसर दिसू लागला की पातेले विस्तवावर चढवायचे. खुटखुटीत होतात. हव्या असतील तर मऊसुद्धा होऊ शकतात.

नारळाच्या वडिचे भरपुरच व्हर्जन करता येतात . आन्बा घालुन, टोमॅटो घालुन्,बटाटा घालुन, नुसत्या खोबर आणि साखरेच्या वडिला मात्र स्किल लागतिल पटापट कराव लागत नाहितर सगळ भगराळ होवुन जात.
आमच्या शेजारच्या काकु एक व्हर्जन करायच्या त्यात दाट खरवस( पाणी न घालता )उकडुन घ्यायचा मग त्यात नारळाचा चव साखर घालुन अगदी कमी आचेवर करायच्या त्या वड्या, अप्रतिम लागायची ती वडि.

नारळाच्या वडिचे भरपुरच व्हर्जन करता येतात >>> हो मी गाजर, बीट घालून करते. एकदा गुलकंद घालून पण केलेल्या.

आंबा दरवर्षी आला की त्याच्या करते आणि आटवलेला रस जास्त आला गावाहून तर त्याच्याही करते.

इथे खूप वेगवेगळ्या कृती समजल्या खोबऱ्याच्या वड्यांच्या.

त्या खरवस च्या वड्या

आधी खरवस करून मग तो किसून नारलासारख्या वड्या, त्यात नारळ न घालताही करतात

>>>>>आमच्याकडे नाही घालत दूध. बटाटा घालून केल्या तरी नाही घालत.<<<<<
माझी आईची खासिहत आहे, शुभ्र वड्या. अजिबातच दूध वगैरे नाही घालत, बर्फी करायची असेल तरच मावा, आटीव दूध.

आधी खरवस करून मग तो किसून नारलासारख्या वड्या, त्यात नारळ न घालताही करतात>> हो नारळ न घालताही करतात ! अप्रतिम लागते तशी वडी, नुसत्या खरवसापेक्षा तर केव्हाही भारी

नुसती साखर घालूनही नारळाची वडी होतेच पण घट्ट साय आणि दूध घातलं की ती अजून शाही होते. आमच्याकडे लाडवाच्या पाकासाठी पण पाण्याऐवजी दूध वापरतात. चव अजून मस्त लागते त्याने.

Pages