चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरी बातोंमें ऐसा उलझा जिया' मधे कुणीही कुणाला मिळतबिळत नाही बिनधास्त बघा. जाह्नवी आली की नावं आली समजून बंद केला तरी चालेल. >> असं कस अश्मिता ? शेवटचे गाणॅ तर सगळ्यात बेस्ट भाग आहे नि ते त्या नंतर आहे.

अरे हो असामी, जानुबेबीचं तेवढं स्किप करा लोकहो. Happy गाणं सोडू नका.
राज, खोच वाया जाते आहे हे बघून माझाच जीव तळमळला. Lol

स्टार्टप शो वर वाईल्ड पाहिला. फक्त रीस विदरस्पूनचा च सगळा सिनेमा आहे . बाकी कलाकार नावालाच आहेत.
पूर्वायुष्यात घडलेल्या वाईट आठवणींमधून बाहेर पडायला किंवा स्वत:ला शोधायला म्हणून ती सोलो हिचहायकिंग करायला निघते. पॅसिफिक कोस्ट नावाच्या एकदम खडतर अशा हजारो माईल्सच्या या ट्रेल्सवर तिला काय काय अनुभव येतात, ती कशी सामना करते त्याचा हा वाईल्ड अनुभव.
मला हा मुव्ही आवडला ते काही भडकपणा किंवा अचाटपणा नसल्यामुळे.
ती सराईत हायकर नसल्याने ट्रेलवर जाताना छोट्या मोठ्या चुका होणं, त्यातून शिकत पुढची वाटचाल, एवढ्या मोठ्या पट्ट्यात येणारे वेगवेगळे वेदरचे अनुभव, काही ठराविक माईल्स अंतर चालून गेल्यावर बेसिक सुविधा मिळत असतात पण तरी तो मोठा पूर्ण प्रवास एकटीने करणे, त्यात तिला येत जाणार्‍या भूतकाळातल्या आठवणी, भावभावना यातून हा मुव्ही समजत जातो. छान वाटला एकदा बघायला.

असामी Lol

अंजली छान पोस्ट, रिस आवडते मला, स्वीट होम अलाबामा वालीच ना. हे स्टार्टअप शो काय आहे. इथे कुठे दिसेल.

हो तीच. अंजूताई. भारतात कल्पना नाही पण प्राईम आहे का तुझ्याकडे त्यावर आहे इथे रेंट चा ऑप्शन दिसतोय पण.

हनुमान निखळ फँटसी आहे. बाहुबली सारखा. त्यामुळे डोकं काढून पाहता आला.
३० कोटीच्या बजेटमधे बनला. त्या मानाने ग्राफिक्स उच्च दर्जाचे आहेत.

इथे अस्मिताने दिलेलं काकडा रणबीर रील पाहून ए दिल है मुश्किल पाहिला.अलिझे चं पात्र मस्त आहे.अनुष्का इंटर्व्हल आधी काहीतरी विचित्र दिसते, जबडा फाटल्या सारखी.इंटर्व्हल नंतर छान दिसते.
रणबीर चा रोल 90% रॉक स्टार मधल्या सारखा आहे.
गाणी आवडली.रणबीर चा अभिनय पण.पिक्चर ओके टाईप्स होता.

वाईल्ड ट्रु स्टोरी वर बेस्ड आहे
किती तरी वर्षांपासुन पेड च आहे प्राईम वर, फ्री मधे बघण्याची वाट बघते आहे ..

तेरी बातोंमे... ठिक होता, खुप आवडला नाही पण मुव्ही पेक्ष्या जास्त एन्टर्टेंट्मेन्ट ह्या धाग्यावर झाली... हाहा

अनु Happy
मला फार आवडला होता 'ऐ दिल है मुश्किल'. अलीझेची भूमिका अक्षरशः जगली आहे अनुष्का. अगदी उत्कटपणे आयुष्याचा आनंद घेणारी आणि एकदम एक घाव दोन तुकडे करून नाती सोडून देणारी कमालीची चक्रम आणि धमाल आहे. रणबीर अलीझेमुळे स्वतःला ओळखायला लागतो त्यामुळे ती नसली की हरवल्यासारखा वाटतो. त्याचं तिच्याशिवाय कुणावरच प्रेम नाही आणि ते होऊही शकत नाही. धमाल, संवेदनशील व वेडं नातं आहे त्यांचं.

मला ऐश्वर्याचा रोल प्रथमच इतका वेगळा वाटला. ती नेहमी प्रतिमेचा ताण घेऊन वावरतेय असं वाटतं, फार क्वचित खुलते. इथे ती खुलली असल्याने जबरदस्त आवडली आहे. Sexually dominant older woman सहसा आपल्या पेट्रिआर्कल चित्रपटात नसतेच. त्याच्या उलट सहज बघायला मिळते व त्याला ॲक्सेप्टंसही आहे. त्यामुळे तुलनेने लहान तरीही एक बोल्ड, वेगळी आणि चांगली वठलेली भूमिका होती. ती कमालीची आकर्षक दिसते, शायरी करते- गझलेत बोलते. ती जे लिहिते तशीच जगतेही. 'मै किसीकी ख्वाईश बनना चाहती हूं जरुरत नहीं' - तिनं त्याचं प्रेम अलिझेवर आहे हे लक्षात येताच तत्काळ त्याला सोडून देते. मला तिघेही वेगळे वाटले आणि प्रचंड आवडले. सिनेमा इन्टेन्स आहे तरीही रडका नाही. न बोलताही पुष्कळ बोलून जातो.

मला या चित्रपटात फक्त तो lisa haydon चा "वाsssतावरण" सीन जाम आवडतो. Alize toxic वाटलेली.

Lisa haydon क्वीन मध्ये सुद्धा भयंकर आवडलेली.

हो, आणि असलाम वालेकुम पण.एकंदर अलिझे ने मजा आणलीय पहिल्या भागात.तो बेबीडॉल सोनेदी वाला सिन आणि नाच पण छान.

मला ऐश्वर्याचा रोल प्रथमच इतका वेगळा वाटला. >>> मी पिक्चर पाहिलेला नाही. पण "बुलेया" गाण्याच्या चित्रीकरणात ती वरती लिहीले आहे तशीच वाटली. कधीतरी पाहू म्हणून पार्क करून ठेवलेला आहे हा पिक्चर.

तो 'वातावरण' सीन धमाल आहे. आणि नंतर अलिझे 'तुम निहायतही बेवकूफ हो, काले शर्टपे कोई वाईन फेकता है क्या' म्हणून जे करते तेही.

'बुलेया' माझं ऑटाफे आहे. ऐकायला- बघायला तर आवडतेच पण ऊर्दू गीत व त्यातील अन्वयार्थही फारच आवडतो. मॉडर्न, एनर्जेटिक तरीही उत्कट वाटतं.

ज्यावेळेस आला होता तेव्हाच आवडला असे लिहिले होते (तेव्हाच चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला Wink )
बुलेया खूप आवडते. ऐश्वर्याचा लूक आणि रोल आवडलेला. शारूखाचा ही.

रणबीर कपूर थोडा अती करतो असे वाटले होते. ते सायलेंट डिस्को मधले गाणे पण भारी आहे.

परवा राजनीती परत पाहिला. कलाकार व थोडेफार कथानक सोडले तर बराचसा विसरलो होतो. त्यामुळे एंगेज झालो परत. पण राजकारण बरेच ढोबळ वाटते यातले. अजय देवगणचा ऑथर-बॅक्ड म्हणतात तसा दीवार मधल्या विजय सारखाच रोल आहे. पण एखादा स्थानिक भडकू यूथ लीडर एकदम काही दिवसांत स्टेट लेव्हला मुरब्बी राजकारण्यासारखा पिढ्यानपिढ्या त्यात मुरलेल्या लोकांना सल्ले देतो ते अचाट आहे. मनोज वाजपेयीला प्रकाश झा च्या राजनीती व आरक्षण दोन्ही मधे फारच वन डायमेन्शल रोल्स दिले होते. त्याच्या कुवतीपेक्षा फारच साधे रोल्स वाटतात ते. तसेच विनय आपटे - असल्याच राजकारणात बाप वाटेल असा रोल तो करू शकत असताना त्यालाही अगदी पुचाट रोल होता. अर्जुन रामपाल, रणबीर आणि कत्रिना यांचे रोल्स मस्त होते. नाना सर्वात भारी.

ओव्हरऑल कथेवर गॉडफादरची छाप जाणवते. तर कत्रिनाच्या रोल मधे सोनिया गांधींची. ती म्हणे शूटिंग च्या वेळेस हिंदी संवाद नीट म्हणून शकत नव्हती. त्यामुळे सोनिया गांधींचा रोल ऑथेण्टिक झाला असेल अशी कॉमेण्ट मी इथेच कधीतरी केली होती ते आठवले Happy

"८३" सुद्धा पुन्हा पूर्ण पाहिला. हा पिक्चर कम्फर्ट वॉच म्हणून परफेक्ट आहे. रणवीरचा प्रचंड अंडरेरेटेड परफॉर्मन्स आहे. भारतीयच नव्हे तर इतर देशांतील काही खेळाडूंच्या अ‍ॅक्शन्स, मॅनरिजम्स वर किती मेहनत घेतली आहे ते पुन्हा पुन्हा जाणवते.

हा पिक्चर कम्फर्ट वॉच म्हणून परफेक्ट आहे. रणवीरचा प्रचंड अंडरेरेटेड परफॉर्मन्स आहे. भारतीयच नव्हे तर इतर देशांतील काही खेळाडूंच्या अ‍ॅक्शन्स, मॅनरिजम्स वर किती मेहनत घेतली आहे ते पुन्हा पुन्हा जाणवते.
>>
अगदी
मी तर थोडाच वेळ असेल तर फक्त १७५ वाली इनिंग बघतो किंवा श्रीकांत ची स्पीच

83 हिट होता ना?
>>>>
दुर्दैवाने नाही.. पण चांगली गोष्ट म्हणजे मी चित्रपट हिट फ्लॉप होतोय हे समजायच्या आधीच सहकुटुंब थिएटरमध्ये पाहिला होता. अन्यथा चालत नाही तर चांगला नसेल या विचारात बघितला जात नाही.

175 इनिंग आणि श्रीकांत स्पीच माझे सुद्धा टॉप चे दोन फेवरेट सीन.. आम्ही घरी सुद्धा पिक्चर अजून दोन तीन वेळा पूर्ण पाहिला आहे.. आणि 175 इनिंग वाला सीन कित्येकदा पाहिला आहे. ती खेळी रेकॉर्ड झाली नाही याची जी खंत लहानपणापासून वाटायची ती आता तितकी वाटत नाही Happy

ऐश्वर्याचा लूक आणि रोल आवडलेला. शारूखाचा ही.
+786
मी शाहरुख फॅन आहे ते सोडा.. पण शाहरूखचे एकतर्फी प्रेमाचे डायलॉग खरेच सरस आहेत.. मी पुन्हा पुन्हा ऐकतो ते..

Pages