
माबोवर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनोळखी लेखकाच्या पहिल्या पुस्तकाची विक्री दुकानातून जवळ जवळ होतच नाही. जी काय होते ती ऑनलाइन. भरपूर विद्यार्थी आपले फॅन असण्याचा एक प्रचंड फायदा असतो. पुस्तक amazon वर विक्रीला आलं आणि बारा तासात out of stock दाखवायला लागलं! हल्ली पूर्वीसारख्या हजार प्रती छापून ठेवत नाहीत. print on demand पद्धत असते. घाईघाईनी आणखी प्रती छापल्या. आता उपलब्ध आहेत.
तुम्ही त्या सर्व हकीकती वाचल्या आहेतच. कोणीही अजिबात ते पुस्तक विकत घेऊ नका. मात्र ज्याला इंग्रजीत त्या वाचायला आवडतील असा कोणी तुमच्या माहितीत असला तर त्याला ही amazon ची लिंक कृपया पाठवा.
पुस्तकांचं नाव आहे 'We are the Quarry, Fate is the Hunter'.
https://www.amazon.in/We-are-quarry-fate-hunter/dp/8197057885/ref=sr_1_1...
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
मस्त! अभिनंदन आणि शुभेच्छा
मस्त! अभिनंदन आणि शुभेच्छा
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
मस्त! मनःपूर्वक अभिनंदन आणि
मस्त! मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा ! हार्दिक अभिनंदन !
अरे वा ! हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन ! तुमचे लेख रोचक
अभिनंदन ! तुमचे लेख रोचक असतातच !
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
सर्वजण, पुन्हा एकदा धन्यवाद!
सर्वजण, पुन्हा एकदा धन्यवाद!
अरे वा, मस्तच. अभिनंदन
अरे वा, मस्तच. अभिनंदन तुम्हा दोघांचही. तुमचे लेख, शैली, अनुभव आणि त्यातील जग खूप आवडत असे.
Pages