नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
आजच कन्यकेच्या वर्गात नव्याने
कन्यकेच्या वर्गात नव्याने दाखल झालेल्या मुलाचे नाव प्रग्नय अन मुलीचे सिंध्या.
शर्विलक म्हणजे चोर ना?
शर्विलक म्हणजे चोर ना?
हो. धूमधडाका सिनेमात उल्लेख
हो. धूमधडाका सिनेमात उल्लेख आहे "शर्विलकाचा प्रतिशंखनाद" म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.
फॉर ए चेंज, मी धातुरूपावलीऐवजी धूमधडाका वापरतोय संदर्भ म्हणून
हर्पा सर, तुम्ही वापरताय
हर्पा सर, तुम्ही वापरताय म्हणजे संदर्भ अचूकच असेल.
धन्यवाद आ_रती
धन्यवाद आ_रती
शर्विलक बहुतेक शेवर्लेट मधून
शर्विलक बहुतेक शेवर्लेट मधून येणार्या चोराला म्हणत असतील.
काही लोकं ते सर्सास कृष्णाचं
काही लोकं ते कृष्णाचं नाव म्हणुन सांगतात.
'शर्विल' हे बहुतेक कृष्णाचे
'शर्विल' हे बहुतेक कृष्णाचे/विष्णूचे नाव आहे. शर्विलक म्हणजे चोर हे नक्की...
शर्विल म्हणजे शंकर ना?
शर्विल म्हणजे शंकर ना?
>>शर्विलक बहुतेक शेवर्लेट मधून येणार्या चोराला म्हणत असतील. >>
एकदा एक सहकारी म्हणाला, "
एकदा एक सहकारी म्हणाला, " तुला सांगितलं चंचलला जाऊन भेट. तर तुला काय वाटेल?"
मी गोंधळले हा काय प्रश्न आहे? तर तोच पुढे बोलायला लागला, " कोणीतरी एखादी चुलबुली टाईप ची मुलगी असेल अस वाटेल ना..
"
वैतागून हसला.. " लोकं काहीही नाव ठेवतात.. "
**
काही दिवसांनी मला पण चंचल ल भेटावे लागले. चंचल म्हणजे एक ताडमाड सहा फुटी मुच्छड होता, अगदी एखादा मेजर वगैरे शोभावा असा..
शर्विलक म्हणजे चोर नाय काय.
शर्विलक म्हणजे चोर नाय काय. त्या नावाचं एक character चोर असतं कुठल्याशा संस्कृत नाटकात म्हणून चोराला शर्विलक म्हणतात.
जसं तळीराम म्हणजे बेवडा.
Bruhannada म्हणजे ट्रान्स.
वगैरे.
'मृच्छकटिकम्' नाटकात चोराचं
'मृच्छकटिकम्' नाटकात चोराचं नाव शर्विलक आहे. पण कृष्णाला माखनचोर/ नवनीतचोर म्हणतात तशा अर्थाने असू शकेल. कृष्णाची बरीच नावं खट्याळमिथकांच्या- संदर्भाने येतात. खोटूश्याम, रणछोडदास, मुरारी, मधुसूदन पण प्रिफिक्सच(उपसर्ग?) ठेवलं आणि सफिक्स( मराठी शब्द? प्रत्यय ) सोडून दिले तर वेगळा अर्थही( खोटू, रणछोड, मुर आणि मधुदैत्य) निघू शकतो. त्याच्या उलट करूनही अर्थाचा अनर्थ करता येतो ( एकदंत, अजातशत्रू, पुरुरवा ) जो जे वांछिल तो ते लाहो.
शेवर्लेट आणि धूमधडाका>>>>
मृच्छकटिकम वरून उत्सव मधला
मृच्छकटिकम वरून उत्सव मधला चोर आठवला.
मी 'एकदंत डेंटल क्लिनिक'
मी 'एकदंत डेंटल क्लिनिक' बघितलं होतं, का जावं वाटेल तिथे. टू ग्राफिक.
डेक्कनला प्रकाश डोळे यांचे
डेक्कनला प्रकाश डोळे यांचे डोळ्यांचे हॉस्पिटल होते.
सातारा ते कर्हाड या प्रवासात मानमोडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल पाहिले आहे.
श्लेष्मा नावाच्या खरंच
श्लेष्मा नावाच्या खरंच शेकड्यानी मुली आहेत फेसबुकवर. मला थाप वाटलेली.
आणि हार्दिक महाडिक पण खूप आहेत. काय मेली नावं..
एकदंत डेंटल क्लिनिक -
एकदंत डेंटल क्लिनिक - खोपोलीला आहे डॉ निखिल वालेकर यांचं
माझ्या एका मित्राचं नाव जयंत
माझ्या एका मित्राचं नाव जयंत वसंत संत आहे.
हर्पा सर, तुम्ही वापरताय
हर्पा सर, तुम्ही वापरताय म्हणजे संदर्भ अचूकच असेल. >> झालं, निघालीच लक्तरं माझ्या संदर्भाची.
शर्विलक या शब्दाचा अर्थ तरीही अजून मला समजलेला नाही. 'अमुकतमुकचं नाव' हा काही अर्थ होऊ शकत नाही. व्युत्पत्ती शोधतो आहे. शर्व् म्हणजे हिंसा करणे. हिंसक स्त्री या अर्थाने दुर्गेचं नाव शर्वाणी असं आहे. पण शर्विल किंवा शर्विलक हा शब्द कसा तयार झाला याचा उलगडा होत नाही. तो 'इल' कुठून आला बघायला पाहिजे. आता धातुरूपावली उघडायला लागणार. धूमधडाक्यावर विसंबून माती खाल्ली.
एकदंत डेंटल क्लिनिक>>
एकदंत डेंटल क्लिनिक>>
पुण्यात मेहेंदळे गॅरेज रोडवर एक 'जबडे डेंटल क्लिनिक' आहे.
मै और मेरी धातूरूपावली अक्सर
मै और मेरी धातूरूपावली अक्सर ये बाते करते है
संदर्भ : अस्मिता ची post
कुणाला उद्देशून ते लिहायची आवश्यकता नाहीच मुळी
स्वप्निल म्हणजे स्वप्न बघणारा
स्वप्निल म्हणजे स्वप्न बघणारा/ घडवणारा
मग शर्विल म्हणजे हत्या (अन्त) घडवणारा असा होइल का? ( शंकराला ते नाव योग्य वाटते)
पण मग शर्विलक मधला शेवटचा क कुठून आला? (Back to Har Pa)
एकदंत डेंटल क्लिनिक!
एकदंत डेंटल क्लिनिक!
आता
सुडोमिसुतोंमि!स्वप्निल >> बरोबर माधव. पण या
स्वप्निल >> बरोबर माधव. पण या शब्दात स्वप्न हे नाम घेऊन त्यापासून ते विशेषण (किंवा तद्धित) बनवलं आहे. शर्व् हा धातु आहे. त्याचं तद्धित बनवता येणार नाही.
शेवटच्या क बद्दल >> 'ते करणारा' असा अर्थ होतो. चालन करणारा चालक, वाहून नेणारा वाहक, संपादन करणारा संपादक, लेखन करणारा लेखक इत्यादी. मग शर्विल/शर्विलन (अशा नावाची कृती) करणारा तो शर्विलक असा अर्थ लागेल. पण मग पुन्हा तेच, ये शर्विल-शर्विल क्या है?
मागे मी कुणालातरी अशीच 'क' शेवटी येणार्या शब्दांची उदाहरणं देत होतो, वाहक, चालक वगैरे, तर म्हणे 'मालक म्हणजे काय'! डोक्याला हात.
कोण होता तो बालक?
कोण होता तो बालक?
(No subject)
सदाशिव पेठेत दाते दातांचे
सदाशिव पेठेत दाते दातांचे हॉस्पिटल आहे. नशीब शेजारी मानेच्या आजारावर माने हॉस्पिटल नव्हते.
(गुगल करा. हे आधी डोळे डोळ्यांच्या हॉस्पिटलशेजारीच डेक्कनला होते हे नक्की).
'आपटे' मोटार स्कूल आहे की
'आपटे' मोटार स्कूल आहे की पुण्यात
हपा
हपा
हातवळणे हस्तकला वर्ग पण आहे.
आपटे' मोटार स्कूल
आपटे' मोटार स्कूल
Pages