कविता मी तसा शाळा कॉलेजच्या दिवसांपासून लिहतोय. त्या त्या वेळी शाळा कॉलेजच्या नियतकालिकांतून वगैरे छापूनही आल्या पण त्यापलीकडे जाऊन त्याचे काही करावे किंवा कुठे सादर कराव्यात वगैरे फारसा अट्टहास नव्हता. कालांतराने मायबोलीवर आलो. गुलमोहरावर, झुळकेवर रमलो. इथे दर्जेदार लिहणाऱ्यांकडून त्या काळात दादही मिळत गेली आणि कविता लिहित राहिलो.
मध्ये बरीच वर्षे कामामुळे आणि इतर प्रायोरिटीजमुळे कवितालेखन खुप कमी झाले..... जवळजवळ नाहीच!!
चांगले चांगले वाचत होतो; youtube, podcasts वगैरेच्या माध्यमातून खुप चांगले ऐकत होतो.... पण बसून परत कविता लिहिणे वगैरे होत नव्हते.
तीन चार वर्षापूर्वी सहज म्हणून काही लिहले आणि फेसबुकवर पोस्ट केले...... काही चांगल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढला आणि मग सातत्याने लिहित राहिलो!!
काही दिवसांपुर्वी एका फॅमिली गेटटूगेदर मध्ये काहीजण म्हणाले की तू चांगले लिहतोस असे ऐकले; आम्ही काही फेसबुकवर नाही तर आमच्यासाठी काहीतरी ऐकव ना किंवा रेकॉर्ड करुन पाठव!!
आता आली का पंचाईत!! कारण लिहण्याचा कॉंफिडंस यायला लागलेला पण सादर करणे एक वेगळे स्कील आहे..... तेंव्हा काहीतरी बोलून वेळ मारुन नेली पण नंतर एका निवांत वीकांताला वाटले की करुन बघायला काय हरकत आहे!! जमले तर जमले
सुरुवात छोट्या चारोळ्यांपासून केलीय आणि थोडीफार हिंदी शायरी ही आहे..... येत्या काही वीकेंडसना मोठ्या कवितांही वाचून बघायचा प्लॅन आहे
जसे रेकॉर्ड करेन; आणि चॅनेलवर अपलोड करेन तसेतसे इथे अपडेट देतच राहीन.
मायबोलीकर नेहमीप्रमाणे प्रेम देतीलच पण हक्काने सुधारणा सांगितल्यात तर अजुन आवडेल कारण सादरीकरणात अजुन तसा नवखा आहे. जुन्या जाणत्यांचे मार्गदर्शन आणि अभिप्राय मोलाचा असेल
चॅनेलची लिंक देत आहे:
https://youtube.com/@SwaroopkulkarniPoetry?si=W-ttJIyj4v7FBSMn
Like, Comment, Share, Subscribe हा प्रेमळ आग्रह
अभिनंदन स्वरुप! चॅनल बघतो.
अभिनंदन स्वरुप!
चॅनल बघतो.
अरे व्वा! चेक करणार..
अरे व्वा! चेक करणार..
एक व्हिडिओ पाहिला. छान आहे.
एक व्हिडिओ पाहिला. छान आहे. सबस्क्राईब केलंय. पु. का. शुभेच्छा.
अभिनंदन स्वरुप.
अभिनंदन स्वरुप.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
चॅनल नक्की बघेन.
धन्यवाद अमित, नानबा, प्राचीन,
धन्यवाद अमित, नानबा, प्राचीन, अस्मिता आणि अंजू!!
ऐकून अभिप्राय नक्की कळवा
खूप सुंदर सादरीकरण आणि लिखाण.
खूप सुंदर सादरीकरण आणि लिखाण....
अरे वाह छान आहे सादरीकरण..
अरे वाह छान आहे सादरीकरण..
सुधारणेला वाव तर नेहमी राहणार.. पण हे बिलकुल बोर वाटले नाही. एका पाठोपाठ एक सगळे ऐकले.
बाकी कविता शायरी पद्य साहित्याचे मूल्य मापन करायची मला अक्कल नाही .. त्यावर नो कॉमेंट्स.
अभिनंदन स्वरुप.
अभिनंदन स्वरुप.
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
छान आहे. शुभेच्छा.
छान आहे. शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद दत्तात्रेय
खुप खुप धन्यवाद दत्तात्रेय साळुंके, ऋन्मेष, साद, अश्विनी आणि सुनिधी
अभिनंदन आणि शुभेच्छा स्वरुप
अभिनंदन आणि शुभेच्छा स्वरुप
अभिनंदन.. आणि शुभेच्छा..!
अभिनंदन.. आणि शुभेच्छा..!
छान सादरीकरण आणि पार्श्वसंगीत देखील उत्तम..!
छान तिकडे कंमेंट करून आले
छान
तिकडे कंमेंट करून आले
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खुप खुप धन्यवाद पराग, रुपाली,
खुप खुप धन्यवाद पराग, रुपाली, किल्ली आणि देवकी
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
धन्यवाद शर्मिला
धन्यवाद शर्मिला
नवीन कविता (म्हणजे लिहलीय खुप
नवीन कविता (म्हणजे लिहलीय खुप आधीच पण रेकॉर्ड कालच केलीय) अपलोड केली आहे.
आधुनिकीकरणाच्या झपाट्यात एखादे शहर आपली ओळख हळूहळू कशी हरवत जाते त्यावर आहे.
https://youtu.be/6Lpn10ydtsA?si=mDcDwKRY4OyPDhJm
क्या बात हैं स्वरूप!! मस्तच!!
क्या बात हैं स्वरूप!! मस्तच!! अभिनंदन आणि शुभेच्छा!!
खुप खुप धन्यवाद फेफ
खुप खुप धन्यवाद फेफ
मी बदलत्या पुण्याची बघितली
मी कायापालट बघितली कविता, फार सुरेख. पुढच्याही ऐकेन सवडीने.
धन्यवाद अंजू!!
धन्यवाद अंजू!!
जरुर ऐका आणि अभिप्राय कळवा
नवीन अपलोड:
नवीन अपलोड:
"तुझे लहरी वागणे"...... संभ्रमाची कविता
https://youtu.be/pufW6nrN4Zs?feature=shared
>>>>>"तुझे लहरी वागणे"......
>>>>>"तुझे लहरी वागणे"...... संभ्रमाची कविता
बहोत बढिया!
धन्यवाद सामो!!
धन्यवाद सामो!!
नवीन कविता:
नवीन कविता:
वर्तुळ...... एका प्रवासाची कविता!!
काही लोकांना नेहमीच प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी रहायला आवडते पण त्या अट्टहासापायी त्यांची जगण्यातील मौज आणि एकंदर अनुभवविश्व सिमित होऊन जाते का? त्यावरची ही कविता
https://youtu.be/Fy1IpJDALLs?si=XbK2FIvk65Eaaeu-