पुअर थिंग्ज्स
व्हिक्टॉरिअन लंडन मधलं एक भलंमोठं नोकर चाकरांनी भरलेलं घर. कृष्णधवल पडद्यावर एक लहान मुलगी दिसते आहे. दिसायला अशी काही लहान वाटत नाहीये, पौंगडावस्थेतील असावी. पण तिच्या एकूण वागण्या-बोलण्यातून, बोलण्या-चालण्यातुन, शब्दसंग्रह, भाषेच्या वापरावरुन तिच वय, तिचं भावनिक वय लहानच वाटत आहे. कदाचित स्पेशल नीड असावी. तिची काळजी घ्यायला नोकर चाकरांची फौज आहे. पण कोणी तिला काही शिकवत नाही असं दिसतंय. ती जे काही वागेल, बोलेल त्यातुन जे काही पसारे होतील ते चकार शब्द न काढता आवरायचे. तिला काही इजा पोहोचत नाही ना इतकंच बघायचं, असं त्यांचं काम असावं असं दिसतंय. असं वाटण्याचं कारण म्हणजे, बहुतेक दृष्यांत असलेले तिचे वडिल किंवा वडिलकीच्या भूमिकेतंल पात्र. विक्षिप्त शास्त्रज्ञ. पण या सगळ्या परिस्थितीवर चांगलंच जरबेचं नियंत्रण असलेले दिसत आहेत.
चित्रपट चालू केल्यावर पहिल्या काही क्षणांत मला इतकं दिसलं, किंवा तसं असावं असं मी ताडलं. साधारण चित्रपट बघण्यापूर्वी अगदी संपूर्ण प्लॉट वाचला नाही तरी तो कशाबद्दल आहे, किमान ट्रेलर तरी बघुनच चित्रपट बघितला जातो. पण 'एमा स्टोनला' ऑस्कर मिळालेलं बघितलं आणि डिस्नीवर हा चित्रपट दिसल्यावर शुक्रवारी दुपारी काम अर्धवट सोडून बाकी काहीही न वाचता, कुठली मुलाखत वगैरे न बघता तो चालू केला त्यामुळे पुढे काय वाढलेलं आहे याची अजुन तरी मला अजिबातच कल्पना न्हवती.
तिचा बाप... बापच म्हणू आपण त्याला, ती त्याला गॉड (गॉडविन बॅग्स्टर - ) म्हणते...सर्जन आहे. त्याचा चेहरा बघितला की फ्रँकेस्टाईन आठवतो. चेहरा किमान सहा सात तुकड्यांत शिवलेला आहे. बाकी शरीरातील किती अवयव असे जोडलेले असतील कोण जाणे. तो शल्यचिकित्सा शिकवतो, आणि ते करतानाही शरीरातील अवयव काढून ते बदलणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया तो करत असावा असं एकुण परिस्थिती वरुन वाटतंय. तर तो त्याच्या विद्यार्थ्यांपैकी एकाला मॅक्स मकॅन्डेल्सला (रेमी युसुफ) त्या मुलीच्या म्हणजे 'बेला बॅक्स्टरच्या' (एमा स्टोन्स) वागण्या बोलण्यात काय फरक पडतो आहेत याच्या नोंदी ठेवायला त्याच्याच घरी बोलावतो.
पुढचा चित्रपट ही कथा आहे एका 'वयात' येणार्या मुलीची. वयात येताना तिला जगाची.. आपल्या दृष्टीने चांगल्या, वाईट, झगमगत्या, कचकड्या जगाची... सफर घडवुन आणतो डंकन वेडर्बन (आपला मार्क रफेलो , बोलेतो हल्क.). हा या कथेत का आणि कसा येतो आणि काय काय करतो ते चित्रपटात समजेलच. म्हटलं तर मार्कचं पात्र अगदी खलनायकी नाही तरी गडद रंगाचं आहे. आपल्याला राग यावा असं, पण तरी नाळही जुळावी असं. ते मार्क रफेलोने साकारलं आहे म्हटल्यावर तो आवडण्याशिवाय गत्यंतरच रहात नाही. काय गुणी अभिनेता आहे! आता हा चित्रपट जवळ जवळ रोम-कॉम होऊ लागला आहे. पण बेला तिच्या निरागस, ज्ञानपिपासू आणि तर्कनिष्ठ जाणिवेतून आपल्याला एक एक धक्के देत राहते, आणि हसवतही.
बेला 'वयात' येण्यापूर्वी अशा काही परिस्थितीतून आलेली आहे की तिला काही पूर्वग्रह नाहीत. नाहीत म्हणजे अजिबातच नाहीत. ती सगळ्या जगाकडे, आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो, आणि हे वाईट आपल्या नजरेत अगदी घृणास्पद वाईटही असू शकेल, तर या सगळ्या पसार्याकडे संपूर्ण पूर्वग्रह विरहित आणि तरीही डोळस दृष्टीने बघते. त्या बर्या-वाईटाचे रसरसून अनुभव घेते. अगदी आकंठ म्हणू असे! आपल्या पांढरपेशा.. आता पांढरपेशाच कशाला... शरीर विकायला लागणे, हा कुणाहीसाठी वेदनादायकच अनुभवच.. तर इथपासून सगळ्या प्रकारचे अनुभव घेते. बुद्धीनिष्ठ तार्कीक अनुभव. मानवी भावभावना समजुन घेण्याचा, लैंगिकसुख अनुभवण्याला असोशीने सामोरी जाते. त्यातुन झरझर अनेक गोष्टी शिकते. त्यात हे रोकडे शरीर आले, हे सारं जग चालवणारा नियंता म्हणजे... पैसा आला, मेंदू जसा एकेक अनुभव घेतो तसा त्याच्यात काय आणि कसा केमिकल लोचा होतो ते आलं... सगळं शिकण्याच्या लालसेतून ती शिकत रहाते. एका परिस्थितीत आपल्याला यात एक विनोद दिसू लागतो. अगदी खळखळून हसू येईल इतका विनोद, जवळपास प्रत्येक दृष्यांत विनोद. खळकळुन हसुन झालं की त्याच विनोदावर टंग-इन-चीक हसुन विचारांची चक्र चालू करणारा विनोद. हे फार फार रोचक आहे. हा विनोद डार्क आहे, ट्विस्टेड आहे, परिकथा वाटेल असा निरागसही आहे, आणि शब्दांत मांडता येणार नाही असा ही आहे. पण कुठेही डोळ्यातुन पाणी वगैरे काढणारा नाही.
पण हे ती असं सगळं का करते? आपण तर असं वागत नाही ना? मग हे सगळं एक रुपक आहे का? तर अर्थतच आहे. यात अनेकोनेक एकावर थर असलेली रुपकं आहेत. अगदी खोर्याने आहेत. तिरपाकडी आहेत. एमा स्टोन आपल्या देहबोलीतून, आवाजातून, चालण्यातून, लकबीतून बेलाच्या जडण घडणीत होत जाणारे सूक्ष्म बदल अगदी मार्मिकपणे दाखवते. कथा पटकथा, संवाद, अभिनय, कपडे, कॅमेरा, दृष्यात्मकता आणि दृष्यांगणित बदलत जाणारं, आपल्या जाणीवेला समजेल असं बदलत जाणारं पार्श्वसंगीत. यॉर्गोस लॅटिमोस! ते म्हणतात ना 'द होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ पार्ट्स'!
यॉर्गोस लँटिमोसच्या ह्या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक निवडलेल्या, विलक्षण आहेत. सुरुवातीची बेला, त्या बॅक्स्टर मँशन मध्ये गॉड सोबत रहाणारी बेला, संपूर्णपणे कृष्णधवल आहे. तिच्या अविरत अनुभव घेण्याच्या भुकेमुळे ती रफेलो बरोबर जगाची सफर करायला निघाल्यावर त्या दृष्यांत रंग भरू लागतात. रंग भरलेले सुंदर तर आहेतच, पण सगळे पेस्टल कलर. नवी पहाट दिसते ती पण पेस्टल रंगात. नंतर पॅरीस मधले प्रसंग, त्यात तिच्या भूतकाळाच्या आधीचा तिने जगलेला पण आठवणींतून समूळ नाश झालेला भूतकाळ. यासगळ्याला कोर्या पाटीने सामोरे जाणे, अगदी भिडणेच. यात अनेकदा फिश लेन्स वापरली आहे. त्यातुन नक्की काय फरक दाखवायचा आहे, ती नक्की कोणाची नजर आहे हे मला बघताना तरी समजलं नाही.
एकदा पाटी कोरी असेल आणि ही कोरी पाटी निव्वळ अनुभवांनी, शिक्षणाने, वाचनाच्या अभावाने कोरी नाही तर याव्यतिरिक्त आपण माणसामाणसातील परस्पर व्यवहारातून जे अतीप्रचंड ज्ञान मिळवतो, त्याच्या जोरावर आडाखे बांधतो, काळ्या पांढर्या करड्या रंगात माणसे रंगवतो, आपल्याला स्वतःला इतरांसमोर सतत सादर करत रहातो, लोक काय म्हणतील याचा सदैव मन:पटलावर नेणिवेत जयघोश चालू ठेवतो या सगळ्याचा अभाव एखाद्या व्यक्तीत असेल तर आपण त्याला लाज कोळून प्यायलेला वगैरे म्हणू, किंवा स्पेशल आहे म्हणून सहानुभूती देऊ... पण हे सगळं एका अतीव निरागसतेतून आलेलं बघणं विस्मयकारी आहे.
**** याच्या पुढे एक किंवा दोन स्पॉयलर असतील. बाकी हा काही सस्पेन्स थ्रिलर वगैरे सिनेमा नाही. सिनेमात स्पॉयलर असे काही नाहीत. ते दिले अथवा न दिले तरी दृष्य परिणाम, कथावस्तू आणि त्याची मांडणी इतकी अफाट परिणामकारक आहे की स्पॉयलरचा फरक पडू नये. शिवाय हे स्पॉयलर गॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क रफेलो आलेले असताना त्यांनी सांगितले आहेत. चित्रपटातही ते पहिल्या अर्ध्यातासात समजतं. त्यामुळे फार काही बिघडणार नाही. तरी वाचयचं नसेल तर इथे थांबा. ****
आणखी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. बेला हा एक गॉडचा प्रयोग आहे. फॅन्केस्टाईन प्रयोग आहे. ते सगळं शरीर बेलाचं आहे, पण मेंदू लहान बाळाचा आहे. ते कसं झालं काय झालं हे चित्रपटांत कळेलच पण ते फार महत्त्वाचं नाही. तर अशी ही 'अनुभवविरहीत प्रोसेसर आणि फॉर्मॅटेड मेमरी' जर पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीला लाभली तर.... आणि या तर पासूनच ही विलक्षण परिकथा चालू होते आणि आपल्या डोक्यात विचारांचे काहुर माजवुन संपते.
---------------------------------------------------------------------------------------
टीपा:
चित्रपटात नग्न आणि प्रणयदृष्ये खोर्याने आहेत.
ग्रॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क.
एमा स्टोनचा बेस्ट अॅक्ट्रेस ऑस्कर. किती लाघवी असावं कोणी!
ब्रॅडली कूपर आणि एमा स्टोनच्या गप्पा. यात ती लहान मुलीपासून प्रौढ महिले पर्यंत असणारा ग्राफ. त्यातील सुरुवातीचे आणि शेवटचे सीन्स एका लोकेशनला असल्याने ते आधी चित्रित करणे इ. बद्दल बोलली आहे. दोघांनी अगदी दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आणि फारच छान दिसत आहेत. ब्रिलियंट गप्पा आहेत. नक्की बघा.
लेट शो वर स्टीव्हन कोलबेअर बरोबर.
स्वप्नाळूपणा तिला अद्याप
स्वप्नाळूपणा तिला अद्याप यायचा आहे असं वाटलं. उलट सोशल कंडिशनिंग मधून ब्रेक हवी असणारी लोक 'वाईल्ड इमॅजिनेशन' असलेली असतात. बहुतेक माझं पूर्ण उलट मत आहे. त्यांनी प्रेक्षकांवर सोडून दिले आहे.
पण to what end?>>> It's endless..! That's the Crux.
९: मला वाटतं एल्फीला मरू न
९: मला वाटतं एल्फीला मरू न देता त्याला दुसर्या माणसाचा मेंदू न बसवता बकरीचा बसवणे हा सूड पक्षी इनस्टिंग्ट नाही का?
त्याला गॉडचा मेंदू बसवता आला असता. पण ते ही न करणे हा ही गॉडला काव्यात्म न्याय वगैरे होता का?
११: पुअर थिंग्ज्स: आपण मूलतः
११: पुअर थिंग्ज्स: आपण मूलतः चांगले असतो. पण परिस्थिती, परस्पर व्यवहार, पैसे, राजकारण, सामाजिक स्तर इ. पुअर थिंग्जस मुळे उच्च नीचपणा तयार होत तो मेंदूत आत आत कोरला जातो.
तुआनेत बद्दल बहुदा आहे तिला
तुआनेत बद्दल बहुदा आहे तिला प्रेम, मैत्री पेक्षा काहीतरी जास्त भावना आहेत, तिच्या बरोबरचा प्रणय पण शांत आणि गहिरा वाटला. मॅक्स बद्दल चे कोडे नाही उमगले. ती जेंव्हा त्याला सोडून जाते त्यावेळचा संवाद परत ऐकला तेंव्हा ती लगीन adventure करून आल्यावर असे म्हणते. मग तो संवाद खरा करण्यासाठी का लगीन? बाकी त्यांच्यात काही इट्ट दिसले नाही. बेसिकली मॅक्स का हवा आहे तिला????? Poor things chaa अर्थ मला तरी सगळं काही फुका आहे पण तरीही आपण काहीतरी मिळेल ह्या शोधत बरे वाईट (जास्त करून वाईटच) अनुभव घेतच रहातो असा वाटला.
>>> t's endless..! That's the
>>> t's endless..! That's the Crux.
Hmm true.
>>> त्याला गॉडचा मेंदू बसवता आला असता.
गॉडला कॅन्सर होतो ना? की मला चुकीचं आठवतंय? मग त्याचा मेंदू रीयूजेबल असेल का?
फेअरीटेल आहे ती.
रीयुजेबल वगैरे मर्त्य बंधने नको बघायला. फेअरीटेल आहे ती.
मेंदूचा कॅन्सर नसेल झाला.
६. >> . तिचा आत्मशोध सुरू आहे
६. >> . तिचा आत्मशोध सुरू आहे आणि जोवर तिला घटितं 'प्रोसेस' करून त्यांचा अर्थ आणि पॅटर्न मेंदूत 'सेटल' करता येत नाही, तोवर ती घटितं त्या फिशआय लेन्समधून दिसतात >> इंटरेस्टिंग. परत बघताना हे डोक्यात ठेवून बघेन.
८. 'सेन्स ऑफ बिलॉन्गिंग' शोधायचा प्रयत्न असेल का >> ह्म्म. असेल कदाचित. मला तरी फक्त उत्सुक्ता/ भूतकाळ जाणून घ्यायची उर्मी इतपतच वाटलेलं. पण शेवटी आपण कोण? कुठुन आलो? यांचा शोध हेच तर सेन्स ऑफ बिलाँगिंग. पण ते इतकं खोल असलं तरी ते दिसलं तरी नाही.
त्या प्रसंगात तिला आपण जे काही पूर्वी होतो.. क्रूर, दुसर्यांच्या वेदनेने आनंदी होणारे ते 'चांगलं' न्हवतं हे तिला जाणवलं असं वाटलं. थोडक्यात, तिच्यात मोरल कंपास आला. धिस इज अ लीप! आता कदाचित इतर भावनिक पदर.. पझेसिव्हनेस इ. होतील जागृत.
तिला आपण आता विकृतपणा एक्सप्लोअर करू असं वाटलं नाही. एल्फी आपल्याला जे सांगतोय ते मला नको आहे हे कळण्या इतकी ती उत्क्रांत झाली आहे.
'याचा मेंदू त्याच्यात आणि
'याचा मेंदू त्याच्यात आणि त्याचा मेंदू याच्यात' वरून झपाटलेला मधला बाहुला बेला बॅक्सटरपेक्षा उत्क्रांत वाटायला लागला.
लंपन, पोस्ट आवडली.
>>> तिच्यात मोरल कंपास आला.
>>> तिच्यात मोरल कंपास आला. धिस इज अ लीप!
हो.
>>> बाकी त्यांच्यात काही इट्ट दिसले नाही.
हो, नाहीये - पण तिला उत्क्रांत झाल्यावरही जोडीदार म्हणून तो पसंत आहे कारण तो एकटाच नॉन जजमेन्टल आणि नॉन कन्ट्रोलिंग असा पुरुष तिला भेटलेला आहे.
नाही नाही मॅक्स पण कंट्रोल
नाही नाही मॅक्स पण कंट्रोल करू पहात असतो, फक्त गॉड पुढे त्याच काही चालत नाही एवढंच. तेव्हढी त्याच्यात धमक नाही.
>>तो एकटाच नॉन जजमेन्टल आणि
>>तो एकटाच नॉन जजमेन्टल आणि नॉन कन्ट्रोलिंग असा पुरुष तिला भेटलेला आहे. >> पण तिला पुरुष गरजेचा आहे/ अजुनही हवा आहे का? ते ही जरा अर्धवटच सोडलं आहे. त्यामुळे सेक्शुअॅलिटी एक्सप्लोर करता करता आजुबाजूचे एक दोन चेकमार्क चेक करुन परत स्क्वेअर वनला नक्की का आली? परिस्थितीमुळे आली की स्वेच्छेचा काही भाग होता? हे अनुत्तरितच राहिलं.
>>> गॉड पुढे त्याच काही चालत
>>> गॉड पुढे त्याच काही चालत नाही एवढंच. तेव्हढी त्याच्यात धमक नाही.
हो, पण त्यानंतर ते भेटतात तेव्हा दोघेही इव्हॉल्व झाले आहेत. आता तो तिने शरीरविक्रय केला म्हणून जज करत नाही वा तिला नाकारत नाही, राइट?
>>> पण तिला पुरुष गरजेचा आहे/ अजुनही हवा आहे का?
गरजेचा कदाचित नाही, पण हवा आहे बहुतेक - कारण नदीकाठी ती तसं म्हणते ना?
ती जर मूळ पाताळयंत्री असते,
ती जर मूळ पाताळयंत्री असते, स्वार्थी असते तर अशावेळी केवळ बाळ होणार म्हणून आत्महत्या करायला का जाते, बाळ नको असेल तर दुसरे मार्ग होते ना. अर्थात मग पिक्चर कसा झाला असता पुढे म्हणा पण एनीवे मनात आलं हे.
तिला गॉड सारखे डॉक्टर व्हायचय
तिला गॉड सारखे डॉक्टर व्हायचय, त्यात मॅक्स मेन्टर म्हणून लागेलच तिला
>>> ती जर मूळ पाताळयंत्री
>>> ती जर मूळ पाताळयंत्री असते, स्वार्थी असते तर अशावेळी केवळ बाळ होणार म्हणून आत्महत्या करायला का जाते
नवरा अब्यूजिव आणि कन्ट्रोलिंग असतो.
मुळात ती स्वतः पाताळयंत्री असते की त्याला खूश ठेवायला त्याची री ओढत असते याबद्दल मला शंका आहे. पण मूल झाल्याने ती त्या आधीच नकोशा झालेल्या नात्यात आणखी घट्ट जखडून गेली असती.
हो पण त्याच्या तशा वागण्याचे
हो पण त्याच्या तशा वागण्याचे स्पष्टीकरण / प्रेम किंवा त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम कुठेच आले नाहीये पिक्चर मध्ये.. एक अगदी कृत्रिम सीन सोडला तर, त्यात पण तो तिला म्हणतो मी passionate आहे हा, म्हणजे त्याने स्वतः ला कुठेतरी justify केल्यासारख वाटल ...पुन्हा तिला इमोशनल कोशंट नाहीच असेही नाही, गरिबीची जाणीव होते आणि मरणारी मुलं बघितल्यावर एकदम धाय मोकलून रडते, मैत्रिणीबरोबर अगदी नॉर्मल बोलते.
त्या नोकराणीला घाबरवुन तो
त्या नोकराणीला घाबरवुन तो पातेलंभर पातळभाजी तिच्या पातळावर पाडतो आणि पाताळविजयम मधल्यासारखा पोटधरुन हसतो तेव्हा म्हणतो ना की आपण दोघे असं करुन जाम वात आणायचो या नोकर्ड्यांना. ती पण आल्याआल्या नोकरांना विचारते मी कशी होते तर त्यांचे चेहेरे बघण्यासारखे/गप्प होतात. सो पापात अर्धावाटा असणार, नुसता वाल्याकोळी प्रकार नसावा.
>>> हो पण त्याच्या तशा
>>> हो पण त्याच्या तशा वागण्याचे स्पष्टीकरण / प्रेम किंवा त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम कुठेच आले नाहीये पिक्चर मध्ये.. एक अगदी कृत्रिम सीन सोडला तर
हो, खरं आहे.
>>> पाताळविजयम मधल्यासारखा पोटधरुन हसतो तेव्हा म्हणतो ना की आपण दोघे असं करुन जाम वात आणायचो या नोकर्ड्यांना
ते त्याचं पर्सेप्शन झालं ना? ती त्याला प्लीज करायला हसते आहे की खरंच तिला त्यात आनंद मिळतो हे नोकरांना तरी कसं कळणार?
मला पुन्हा बघावं लागेल.
धन्यवाद स्वाती आंबोळे, लंपन,
धन्यवाद स्वाती आंबोळे, लंपन, अमितव. साधारण कल्पना आली.
त्याच नदी किनारी सीन मध्ये तो
त्याच नदी किनारी सीन मध्ये तो तिला असं पण म्हणतो की तुला काही तसला ' रोग ' नाही ना झाला? चेक करून घेतलं आहेस ना? त्यावर ती म्हणते नाही करेन मी चेक , मला आपल असं प्रॅक्टिकल प्रेम फार आवडत अशा आशयाचा काहीतरी संवाद आहे नक्की.
हो आहे तो डायलॉग. तेव्हा
हो आहे तो डायलॉग. तेव्हा त्याच्या "मी पॅशनेट पण आहे" ला ती हसून "यू आर अडोरेबल" असे देखिल म्हणते
>>> मला आपल असं प्रॅक्टिकल
>>> मला आपल असं प्रॅक्टिकल प्रेम फार आवडत
हो हो.
मॅक्स पण कंट्रोल करू पहात
मॅक्स पण कंट्रोल करू पहात असतो >> मॅक्स म्हणजे होणारा नवरा ना? मॅक्सनी कधी कंट्रोल केलं? जिच्याशी लग्न ठरलंय ती दुसर्या माणसाबरोबर खूप दिवस ट्रीपला जाऊन येते म्हटल्यावर कोणीही हरकत घेईल. याला कंट्रोल करणे म्हणतात असं मला वाटत नाही. नंतर ती ऐकत नाही म्हटल्यावर गप्पपण बसतो की. बाकी कोणीही लग्न तोडेल.
आणि मनुष्य प्रयोगात सर्वात वर का असंही चर्चेत आलंय त्याला.. माणुस प्रयोग करतोय तर मग तो स्वतःलाच वर ठेवणार की. प्राणी प्रयोग करत असते तर त्यांनी आधी मनुष्यावर प्रयोग केले असते व मग प्राण्यांवर.
नंतर ती ऐकत नाही म्हटल्यावर
नंतर ती ऐकत नाही म्हटल्यावर गप्पपण बसतो की.>> ही बया त्याला गुंगीच्या औषधाचा रुमाल प्रसाद देते तेंव्हा कुठे हा गप्प होतो. आणि हे त्यांच्या प्रॅक्टिकल प्रेमाशी सुसंगत नाही ना मग. परत तुझी बॉडी आहे तू काय पण कर ह्याच्याशी पण. एकदा हे असे डायलॉग मारायचे मग परत रोग नाही ना झाला ह्याची पण भीती. दोन अधिक दोन चार असं खर्या आयुष्यात असत का? म्हणजे इतकं प्रॅक्टिकल?? अजून भरीस भर त्या गॉडला पण नपुंसक दाखवलाय, हा पुरुष असता तर ह्याने बेला बरोबर काय केले असते कोणास ठाऊक. म्हणजे ह्याच्या भावना पण qualified आहेत.
मला प्रॅक्टिकल प्रेमाचे कधी
मला प्रॅक्टिकल प्रेमाचे कधी दाखवले सिनेमात ते आठवत नाहीये. की धाग्यात विषय निघालाय?
लेख वाचून काल बघितला सिनेमा
लेख वाचून काल बघितला सिनेमा फायनली..
स्पॉइलर भीतीने प्रतिसाद वाचले नव्हते आता वाचेन निवांत..
बघितला फायनली. नक्की सांगता
बघितला फायनली. नक्की सांगता येत नाहीये आवडला की नाही. पण मनात रेंगाळतो मात्र नक्की.
तेव्हाचा काळ इतका प्रभावीपणे दाखवलाय की मी सिनेमा बघताना पूर्णपणे त्या फ्रेम्समधे इन्व्हॉल्व्ह झाले होते. बदलत्या रंगछटा,
गुढ वाजणारी वाद्ये, पात्रांचे कपडे, तेव्हाचं वातावरण सगळं काही फार मेस्मरायझिंग आहे.
एमा स्टोन आणि गॉडची अॅक्टींग प्रचंड आवडली. ती जरी त्याचा एक्स्प्रिमेंट असली (त्याचं काय करणार पुढे माहित नाही) तरी त्याचे ते फादरली फिलिंग्ज खूप छान दाखवलेत. ती निघून गेल्यावर हताशपणे खाली बसून ते सत्य स्विकारतानाची मनस्थिती बघून २ मिनिटं वाईटच वाटलं.
आवडलेले काही काही डायलॉग्स /सिन्स - बेलाला डंकनचे इमोशन्स कळत नसतात तेव्हा ती रोबॉटीक पद्धतीने त्याच्या पाठीवर थोपटत तू फार कन्फ्युजिंग आहेस म्हणते तो सीन, मॅक्स बरोबर ती दाणे खात असताना तो नोंद करत असतो तेव्हा ती अर्धे थुंकून बाहेर टाकते आणि म्हणते हाऊ मेनी?
पहिल्यांदा ती वर्ल्ड बघायला गॅलरी/गच्चीत जाते तेव्हाचे एक्स्प्रेशन्स फार मस्त जमलेत.
गॉड काही गोष्टी मॅक्सला समजावून देताना प्रत्येक वेळी त्याचं व्हॉट? म्हणतानाचे एक्स्प्रेशन्स!
गॉड जेव्हा तिच्याबरोबर काय केलंय हे सांगतो आणि म्हणतो तुच तुझी आई आहेस या अर्थाचं काहीतरी.
गॉड मेंदूच्या चकत्या कापताना विचित्र सॅटीस्फाईंग वाटलं (लोल... ये क्या हुआ मुझे) तो त्याचं काय करणारे देवाला माहित
बाकी तिचा स्वत्वाच्या जाणीवेकडचा प्रवास हळूहळू फुलत जातो ते बघायला फार छान वाटतं. पण काही ठिकाणी बालमेंदूचा परिणाम न वाटता ती रोबॉट वाटलीये. तो जसा हळू हळू विकसित होत जाईल तसं तिचं वागणं, चालणं, अडखळत बोलणं यात सुसुत्रता येतानाच विचारात काय बदल घडतील याची उत्सुकता होती. काही अंशी ते ठिकच दाखवलंय. काही ठिकाणी फार अॅबरप्टली. जसं हॅरीसोबत रडणं, जगात दु:ख असल्याची जाणीव होणं हे फार अचानकपणे आल्यासारखं वाटलं. त्याशिवायच्या भावभावना फारशा दिसून आल्या नाहीत किंवा तिने चेहेर्यावर दाखवल्या नाहीत. बहुतेक अजून एकदा बघावा लागेल.
पण शेवटी गॉडला वरचढ ठरून एक वेगळीच सर्जरी/एक्स्प्रिमेंट करते तो सीन एकदम अनएक्स्पेक्टेड आहे. गॉडमदर!
बादवे ती फेलिसीटी म्हणून जी दाखवलीये ती मेड मुव्ही मधली आहे ना? इंग्लिश रेवती वाटते
छान लिहिलंय अंजली.
छान लिहिलंय अंजली.
रच्याकने: तुला प्री-टीन्स/ टीन्स आहेत ना! 'सॅटीस्फाईंग' शब्दाने हल्ली इतका वात आणलेला की आता तो मी सगळीकडे वापरू लागलोय. काहीही विंटरेस्टिंग दिसलं की पोरांचा सॅटीस्फाईंग जप चालू!
>>>>मॅक्स बरोबर ती दाणे खात
>>>>मॅक्स बरोबर ती दाणे खात असताना तो नोंद करत असतो तेव्हा ती अर्धे थुंकून बाहेर टाकते आणि म्हणते हाऊ मेनी?
हाहाहा मलाही आवडलेला तो सीन. लहान असते ती
तुला प्री-टीन्स/ टीन्स आहेत
तुला प्री-टीन्स/ टीन्स आहेत ना! >>>>> हो तिथूनच आलाय आणि स्ले पण.. तो अजून कुठे वापरायचा कळलेलं नाहीये
Pages