Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01
सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चुम्मा हे नाव त्याच्या सिडनी
चुम्मा हे नाव त्याच्या सिडनी आणि गाबा इनिंग नंतर ठेवले होते. त्यानंतर आमच्या इथेही आता सारे त्याला चुम्मा याच नावाने ओळखतात.
धोनीच्या जागी जडेजा करण्यात हा प्रयोग दोन वर्षांपूर्वीही करून झाला होता. पंजाबी च्या अगदीच गोंधळून गेलेला वाटला त्यामुळे पुन्हा धोनीच कर्णधार झाला. आणि धोनीने जिंकून सुद्धा दिले.
आता परत एकदा धोनीने भविष्याचा विचार करून अजून एका खेळाडूला संधी दिली आहे. जे रोहित शर्माने मुंबईसाठी केले ती ऋतुराज ने चेन्नई साठी करावे आणि भारतीय संघात सुद्धा स्थान मिळवावे यासाठी त्याला शुभेच्छा.
रीयान पराग खेळाडू वाईट नाही. पण डोमेस्टिक खेलतो आणि आयपीएल फेल जातो. अर्थात वयाने लहान आहे. बघू यंदा काय करतो. फक्त त्याने आपला attitude control करायला हवा.
ओह ओके फेफ. धन्यवाद. होपफुली
ओह ओके फेफ. धन्यवाद. होपफुली चांगला खेळेल ह्या वेळी.
जैस्वाल तो क्या पुछो मत. त्याचा विडियो पाहिला मध्यंतरी. कशा कशा मधून वर आलाय पोरगा. अमेझिंग स्टोरी आहे त्याची!
होपफुली सैद मुश्ताक मधला
होपफुली सैद मुश्ताक मधला त्याचा फॉर्म आयपीएलमधे टिकेल. >> तुम्ही दोघे परागचे झाड काही सोडायला तयार नाहि एव्हढी वर्ष झालीत तरी.
आर सी बी ची बॅटींग ऑर्डर बघून धडकी भरावी अशी आहे पण स्लो होल्ड होणार्या विकेट्स वर एकही कामाला आला नाही.
चेन्नईचे नेतृत्व
चेन्नईचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे धोनीच करत आहे
ऋतुराजसाठी कप्तानीचे कोचिंग क्लास घेत आहे.
“चेन्नईचे नेतृत्व
“चेन्नईचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे धोनीच करत आहे” - नेमक्या कुठल्या चॅनेलवर मॅच बघतोस रे? इथे तर कॉमेंटेटर्स आवर्जून ऋतुराजच्या कॅप्टन्सीचं कौतूक करत होते. टीव्ही वर पण ऋतुराज कॉल घेताना दिसत होता.
“तुम्ही दोघे परागचे झाड काही सोडायला तयार नाहि एव्हढी वर्ष झालीत तरी.” - अरे २२ वर्षाचा आहे. डोमेस्टिकमधे आसामला बरेचवेळा एकहाती मॅचेस जिंकवून देणारा आहे. त्यामुळे अश्या प्लेयरला यश मिळावं असं वाटतं.
नेमक्या कुठल्या चॅनेलवर मॅच
नेमक्या कुठल्या चॅनेलवर मॅच बघतोस रे? इथे तर कॉमेंटेटर्स आवर्जून ऋतुराजच्या कॅप्टन्सीचं कौतूक करत होते.
.,.>>>>>>>
सिरियसली..
मी जिओ सिनेमावर बघतोय. हिंदी कॉमेंट्री.
वाटल्यास दोन इनिंग मध्ये जी चर्चा असते ती सुद्धा मिळाली तर शोधून देतो. हाच मुद्दा होता.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=yVgVOZg9w9M ही अॅड बघा. फनी आहे.
दिवसभरात आठ वेळा पाहिली ही
दिवसभरात आठ वेळा पाहिली ही जाहिरात.. कप्तान पांड्या आहे पण अश्या जाहिरातीत शर्माचं जास्त दिसत आहे. या शूटींग त्या आधीच केल्या होत्या का?
“ हिंदी कॉमेंट्री.
“ हिंदी कॉमेंट्री.
वाटल्यास दोन इनिंग मध्ये जी चर्चा असते ती सुद्धा मिळाली तर शोधून देतो. हाच मुद्दा होता.” - हाच मुद्दा असतो नेहमी. मिडिया हाईप आणि इंडियातली व्यक्तीपूजा. जाऊ दे. खूप उगाळून झालंय ह्या विषयावर.
कप्तान पांड्या आहे पण अश्या
कप्तान पांड्या आहे पण अश्या जाहिरातीत शर्माचं जास्त दिसत आहे. या शूटींग त्या आधीच केल्या होत्या का? >>>> कॅप्टन कोण आहे आणि जाहिरातीत कोण दिसतय ह्याचा काय संबंध ? म्हणजे जाहिरातीतल्या "स्टोरी"मध्ये मुंबईचा कॅप्टनच हवा अशी काही गरज नाहीये.
अनुज रावत छान खेळला. 5 विकेट
अनुज रावत छान खेळला. 5 विकेट गेल्यावरही डोकं शांत ठेवून कार्तिक सोबत रिस्पेक्टेबल टोटल सेट करून दिली. शेवटच्या ओव्हर मधे कार्तिक नी त्याला लवकर स्ट्राईक देऊन 50 चा चान्स द्यायला हवा होता.
हाच मुद्दा असतो नेहमी. मिडिया
हाच मुद्दा असतो नेहमी. मिडिया हाईप आणि इंडियातली व्यक्तीपूजा
>>>>>
मगाशी म्हणालात तू कुठे हे ऐकलेस.. आणि आता हेच असते नेहमी म्हणत मान्य सुद्धा करत आहात
आणि व्यक्ती पूजा कोणाचीही होत नाही. त्यासाठी सचिन किंवा धोनीच असावे लागते.
बाकी आयपीएल हे फ्रॅंचाईजी क्रिकेट आहे. धोनी हा एक ब्रँड आहे जो तिला व्यावसायिक यश मिळवून देतो. यात काहीच वावगे नाही.
कॅप्टन कोण आहे आणि जाहिरातीत
कॅप्टन कोण आहे आणि जाहिरातीत कोण दिसतय
>>
जिओ सिनेमा होम पेज वर आजच्या मॅच च्या कव्हर इमेज वर धोनी अन् कोहली आहेत, ऋतू अन् फाफ नाहीत...
जाहिरातीतल्या "स्टोरी"मध्ये
जाहिरातीतल्या "स्टोरी"मध्ये मुंबईचा कॅप्टनच हवा अशी काही गरज नाहीये.
>>>>>
हो. तशी गरज तर नाहीये. शर्मा हा पांड्या पेक्षा मोठा ब्रँड आहे. त्याचे चाहते कित्येक पटींनी जास्त आहेत. जाहिरातीसाठी तोच योग्य व्यक्ती आहे. पण साधारण जाहिरातीतील त्याचा वावर मुंबईचा कप्तान असावा असाच वाटतो. त्यामुळे शंका आली. जाहिराती आधीच्या आहेत की काय..
मॅच च्या कव्हर इमेज वर धोनी
मॅच च्या कव्हर इमेज वर धोनी अन् कोहली आहेत, ऋतू अन् फाफ नाहीत...
>>>>
आमच्या व्हाट्सअप ग्रुप चे नाव सुद्धा आज धोनी विरुद्ध कोहली असेच आहे
मीच ठेवले आहे
डोळ्यासमोर हेच दोन माणसे येतात. ग्रुप वर राडा यांचेच समर्थक घालतात
त्यामुळे शंका आली. जाहिराती
त्यामुळे शंका आली. जाहिराती आधीच्या आहेत की काय.. <>> तूच बनवल्या असतील
“ अनुज रावत छान खेळला.” -
“ अनुज रावत छान खेळला.” - मस्तच खेळला. शॉट्स पण क्रिस्प होते. तो सुद्धा २४ च वर्षाचा आहे. असे यंगस्टर्स चांगले खेळले कि छान वाटतं. यश दयालने पण चांगली सुरूवात केलीय.
तूच बनवल्या असतील >>
तूच बनवल्या असतील
>>
“ अनुज रावत छान खेळला.” -
“ अनुज रावत छान खेळला.” - मस्तच खेळला. शॉट्स पण क्रिस्प होते. >> +१ शॉट्स मसल्ड होते
“ आता हेच असते नेहमी म्हणत
“ आता हेच असते नेहमी म्हणत मान्य सुद्धा करत आहात ” - काय नेमकं मान्य केलं मी असं तुला वाटतंय? भारतीय मिडिया एखाद्या गोष्टीचा विनाकारण हाईप करते, व्यक्तीपूजेच्या नादात सत्याचा विपर्यास करते ह्या अर्थानं मी नेहमी हेच होतं म्हटलंय.
रावत च्या बोटाची दुखापत फार
रावत च्या बोटाची दुखापत फार सीरियस नसूदे
विसल पोडु...
विसल पोडु...
1. कॉमेंटेटर्स आवर्जून
1. कॉमेंटेटर्स आवर्जून ऋतुराजच्या कॅप्टन्सीचं कौतूक करत होते.
2. व्यक्तीपूजेच्या नादात सत्याचा विपर्यास करते
नक्की काय खरे समजावे?
की धोनीचे कौतुक केले तरच ती व्यक्ती पूजा गणली जाते
चला! धोनी केस वाढवून
चला! धोनी केस वाढवून शिकेकाईनी डोकं धुवून वगैरे आला. मॅच जिंकलं सि एस के.
द शिवम द दूबे नी मस्त मारले. रहाणे पण सुटलाच होता.
अरे त्या रचिन रविंद्रच्या केसाच्या टोपात एक अख्खं चिमण्याचं कुटूंब राहू शकतं. (त्याच्या आईचं एकत नाही वाटतं तो. नाहीतर केव्हाच त्याचा मस्त कट झाला असता )
सामन्याचा निकाल अगदीच
सामन्याचा निकाल अगदीच अपेक्षित
चेन्नईमध्ये धोनीला मात देण्यास कोहली पुन्हा एकदा अपयशी
“ की धोनीचे कौतुक केले तरच ती
“ की धोनीचे कौतुक केले तरच ती व्यक्ती पूजा गणली जाते” - ओळख पाहू तूच..
टीव्हीवर ऋतुराज निर्णय घेताना दिसत असताना त्याचं कौतूक करणं ही सत्यपरिस्थिती. आणि उगाच कसलाही संबंध नसताना धोनीला त्याचं श्रेय देणं हा झाला विपर्यास.
ऋतुराजच्या आयलीएलमधल्या कॅप्टन म्हणून मिळालेल्या पहिल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन!! वेल डन ऋतुराज!!
“ धोनीला मात देण्यास कोहली
“ धोनीला मात देण्यास कोहली पुन्हा एकदा अपयशी” - हेच ते मिडियाच्या विपर्यासानं झालेलं ब्रेनवॉशिंग. ऋतुराजच्या कॅप्टन्सीखाली सीएसकेच्या टीमने फाफच्या आरसीबी टीमविरूद्ध विजय मिळवलाय.
टीव्हीवर ऋतुराज निर्णय घेताना
टीव्हीवर ऋतुराज निर्णय घेताना दिसत असताना
,.,>>>>>>>
टीव्हीवर धोनी त्याला मार्गदर्शन करताना चे क्लिप दाखवूनच मग त्याचे कौतुक करत होते.
असो..
धोनीला काही सिद्ध करायची गरज नाही
“ धोनीला काही सिद्ध करायची
“ धोनीला काही सिद्ध करायची गरज नाही” - चला, इतपत तुला पटलं हे सुद्धा पुष्कळ झालं.
ऋतुराजच्या आयलीएलमधल्या
ऋतुराजच्या आयलीएलमधल्या कॅप्टन म्हणून मिळालेल्या पहिल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन!! वेल डन ऋतुराज!! >>> +१
आरसीबी म्हणे २००८ नंतर चेन्नई विरूद्ध चेन्नईमधे जिंकलेले नाहीत!
Pages