आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्टार्क, हार्दिक, अय्यर ह्या सारख्या इंज्युरी-प्रोन (मोडक) प्लेयर्सवर बराच विश्वास ठेवलाय. हार्दिक आणि अय्यर तर कॅप्टनपण आहेत. ह्यांचा सीझन कसा जाईल, ही सुद्धा उत्सुकता आहे. रॉयल्स यंदा विकेटकीपर्सची फौज घेऊन खेळतायत. संजू हॅज नथिंग टू लूज. आणि दुसरीकडे शुभमन हॅज अ लॉट टू प्रूव्ह.

अरे हैद्राबाद सॉलिड पैसा ओततय! कमिन्स आणि हेड! जिंकायचं आहे ह्यावेळी असं दिसतय.

स्टार्क! :बाबो: पैसे दिले. येवढा भारी आहे का? आय मीन मॅच विनर?

Cricbuzz च्या youtube चॅनेलवर हर्षा भोगलेचे "Voice Of Cricket" म्हणून सगळ्या टीमचे reviews आहेत
त्यावरुन सगळ्या टीमच्या बलाबलाचा एकंदर अंदाज येईल!!

>> चुम्मा इज बॅक !
येस्स..... फिलींग गुड फॉर हिम!!
मोठ्या अपघातानंतर आणि इतक्या दिवसाच्या गॅपनंतर तो कसा रिकव्हर झालाय हे बघण्याची उत्सुकता आहे.... All the best to him Happy

चुम्मा इज बॅक !
येस्स..... फिलींग गुड फॉर हिम!! ~~~ येस पण ते चुम्मा वाचलं की टाळी वाजवून पैसे मागितल्या सारख वाटत

येस पण ते चुम्मा वाचलं की टाळी वाजवून पैसे मागितल्या सारख वाटत >> धन्यवाद ! आमच्या भावनांना वाचा फोडल्याबद्दल Happy

रोहित ला काढून हार्दिक कप्तान विषयावर काय वाटतंय सगळ्यांना? >> वर्थ द गँबल ! रोहित चे वय बघता तो २-३ वर्षे खेळेल असे वाटतेय. तसे असेल तर सक्सेशन प्लॅन आधीच केलेला बरा. हार्दिक चे कॅप्टन म्हणून दोन सीझन खटकण्यासारखे नक्की नव्हते. एक ऑल राऊंडर म्हणून फिट असता तो टी २० टीम मधे नक्की बसतो. भारताच्या नसेल तर कुठल्याही आयपीळ टीम मधे तो आज तरी वॉक ईन आहे त्यामूळे असा खेळाडू कॅप्टन म्हणून असणे साहजिक चॉईस आहे. टायटन्स कडून त्याला ट्रेड केले तेंव्हाच हे होणार उघड होते. आता ह्यात रोहित ला विश्वासात घेतले होते कि नाही वगैरे कल्पना नाही. ते ट्रांझीशन स्मूथ केले असावे अशी आशा धरूया. रोहित ची बॅटींग भराला येईल असे धरूया.

मी सहज मागे जाऊन पंत ची ईंटर्नॅशनल टी २० स्टॅट्स बघितले. प्रामाणिकपणे एक्स फॅ़टर वगळता त्यात काहीच उल्लेखनीय वाटले नाही. त्यामुळे वर्ल्ड कप साठी साहजिक निवड न धरता सॅमसन, किशन, जुरेल , राहुल इत्यादी मधे स्पर्धा असलेली बरी असे वाटले.

“ त्यामुळे वर्ल्ड कप साठी साहजिक निवड न धरता सॅमसन, किशन, जुरेल , राहुल इत्यादी मधे स्पर्धा असलेली बरी असे वाटले.” - जितेश शर्माचं नाव कदाचित आघाडीवर आहे ह्या लिस्टमधे. त्याला मिळालेल्या लिमिटेड संधीत त्याने काही वाईट केलेलं नाहीये. किशनविषयी मला वाटत नाही कि त्याला बीसीसीआय लगेच संधी देईल.

पंतविषयी तुझं म्हणणं खरंय. तो टेस्टमधे जास्त यशस्वी आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे त्याला म्हणावा तितका प्रभाव पाडता आलेला नाहीये.

जितेश शर्माचं नाव कदाचित आघाडीवर आहे ह्या लिस्टमधे. >> हो तो राहिलाच . पण जनरली कोणी तरी एकदम नवीन नाव पुढे नाही आले तर संघ बर्‍यापैकी ठरलेला आहे

जैस्वाल, रोहित, (गिल्/कोहली), सूर्या, पांड्या, कीपर, रिंकू, जाडेजा, सुंदर्/कुलदीप, बुमरा, एक फास्ट बॉलर. (फार तर सहा बॉलर्स हवे असतील असा कल असेल तर रिंकू किंवा (गिल्/कोहली) ह्यातले एक कोणि तरी उडेल. एकूण कीपर फिनिशर म्हणून खेळणार असे दिसतेय तेंव्हा त्यानुसार प्लेयर उचलतील असे वाटते.

मला वाटतं मध्यवर्ती निवडणुकांमुळे फक्त २१ दिवसांचंच वेळापत्रक जाहीर केलंय.

आणखी एक ‘गायकवाड’ दक्षिणेत नेतृत्व करणार
>>
येस
त्यानी लग्नासाठी ब्रेक घेतला अन् तेवढ्यात जयस्वाल टेस्ट मधे स्थिरावला. आता ब्रेक इन करण्यासाठी कडक परफॉर्मन्स ची गरज.
टी २० इंटरनॅशनल मधे गायकवाड चा परफॉर्मन्स जयस्वाल शी मिळता जुळता आहे (१७ डावात ५०० रन, १ शतक अन् ३ अर्धाशतकं vs १६ डावात ५०२ रन, १ शतक अन् ४ अर्धाशतकं). पण आपल्याकडची एकूण पद्धत बघता टेस्ट फॉर्म वर जयस्वाल चा विचार आधी केला जाऊ शकतो.

मला वाटतं मध्यवर्ती निवडणुकांमुळे फक्त २१ दिवसांचंच वेळापत्रक जाहीर केलंय. > ओह ओके.

आणखी एक ‘गायकवाड’ दक्षिणेत नेतृत्व करणार >>> फेफ Happy Happy मी अशीच एक कॉमेण्ट फेबुवर टाकली होती काही महिन्यांपूर्वी. त्याला जे काही थोडेफार लाइक्स आले त्यातल्या अनेकांना हा संदर्भ लागण्याइतके त्यांना पिक्चर व क्रिकेटबद्दल माहिती नाही याची मला कल्पना होती. त्यामुळे त्यातील एक दोघांना खोदूनखोदून विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्यांनी ते काहीतरी विनोदी दिसतंय म्हणून लाइक करून टाका स्टाईलने ते केले होते Happy

बाय द वे, बहुतांश गेम्स रात्री असतात त्यामुळे या गायकवाडनेही आपले टोपणनाव 'रजनी'कांत ठेवायला हवे. किंवा साउथचे लोक स्वतःहूनच ठेवतील Happy

पण ते चुम्मा वाचलं की
>>
दक्षिण भारतात चुम्मा हा शब्द धूम धडाका मधल्या अती-सामान्य सारख्या अर्थी अन् प्रकारे वापरला जातो ...

“ ते काहीतरी विनोदी दिसतंय म्हणून लाइक करून टाका स्टाईलने ते केले होते” Lol
“ बहुतांश गेम्स रात्री असतात त्यामुळे या गायकवाडनेही आपले टोपणनाव 'रजनी'कांत ठेवायला हवे. ” - व्वा!! Happy Happy

“ टी २० इंटरनॅशनल मधे गायकवाड चा परफॉर्मन्स जयस्वाल शी मिळता जुळता आहे” - ते जरी खरं असलं, तरी जैस्वाल चा स्ट्राईक रेट पहिल्यापासून जास्त असतो आणि गायकवाड नंतर accelerate करतो असं वाटतं. पॉवरप्ले मधे जैस्वाल चा स्ट्राईक रेट १५२ चा आहे. मला गायकवाड चे स्टॅट्स सापडले नाहीत. Numbers can prove my perception wrong.

ते जरी खरं असलं, तरी जैस्वाल चा स्ट्राईक रेट पहिल्यापासून जास्त असतो आणि गायकवाड नंतर accelerate करतो असं वाटतं. >> +१. परत तो डावखुरा आहे हा भाग मोठा आहे.

रजनीकांत Lol

बाकी रियान पराग अजून रॉयल्स मध्ये टिकून आहे. Proud

धोनीला काय झालं मध्येच? परवा त्याच्या नावाशेजारी (WC)(C) बघून धन्य झालो होतो आणि आज बातमी आली. वंडर व्हॉट हॅपन्ड? पर्सनल असावं कारण. कारण मॅनेजमेंटनी गेम केली असती तर आधीच जाहिर केलं असतं. त्यात त्याचे अनंत उपकार आहेत सि एस के वर. Happy

ट्रान्झिशन असेल. कदाचित या सीझन नंतर तो रिटायर होणार असेल. त्यामुळे एक सीझन तो टीम मधे असण्याचा फायदा होईल.

“ धोनीला काय झालं मध्येच?” Passing the baton. सुनंदन लेलेच्या रिपोर्टप्रमाणे ह्याची कुणकुण आधीच लागली होती. ऋतुराज ने त्याच्या फॅमिलीला चेन्नईला बोलावून घेतलं होतं.

“ रियान पराग अजून रॉयल्स मध्ये टिकून आहे.” - होपफुली सैद मुश्ताक मधला त्याचा फॉर्म आयपीएलमधे टिकेल.

>>रियान पराग अजून रॉयल्स मध्ये टिकून आहे

डॉमेस्टिकमध्ये चांगला खेळलाय यावर्षी तो असे ऐकलेय!!

“ डॉमेस्टिकमध्ये चांगला खेळलाय यावर्षी तो असे ऐकलेय!!” ५१० रन्स, ८५ चा अ‍ॅव्हरेज आणि १८३ चा स्ट्राईक रेट + ११ विकेट्स. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड!!

Pages