“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”
मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.
तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.
***
स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.
“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “
“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “
“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.
“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.
मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.
चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.
इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.
ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.
“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.
“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.
***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.
तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.
थॅंक्यु आचार्य आणि बुवा:-).
थॅंक्यु आचार्य आणि बुवा:-).
आचार्य षटकार तुम्ही मारलेत इथे, मला काय लेडी युवराज म्हणताय.
सगळे STY आवडले - आशादायी आहेत
सगळे STY आवडले - आशादायी आहेत.
हि सगळी मल्टीवर्सची ठिगळे
हि सगळी मल्टीवर्सची ठिगळे वाचून लेखिका बेशुद्ध पडल्या. प्रशासकांनी ताटातल्या वाटितला कांदा फोडून त्यांना हुंगवून शुद्धीवर आणले. डोळे उघडल्यावर त्यांनी सवाल केला "मै कहां हूं ?"
फा घे खो तुला ....
कथा आणि प्रतिसाद मजेशीर.
कथा आणि प्रतिसाद मजेशीर. माबोकरांच्या जजमेंटल बायसातून कथेतील पात्रं देखील सुटू शकत नाहीत.
सगळी मल्टीवर्सची ठिगळे वाचून
सगळी मल्टीवर्सची ठिगळे वाचून लेखिका बेशुद्ध पडल्या. प्रशासकांनी ताटातल्या वाटितला कांदा फोडून त्यांना हुंगवून शुद्धीवर आणले. डोळे उघडल्यावर त्यांनी सवाल केला "मै कहां हूं ?"≥>>>
A new high of MaBo's intellectual and creative minds !
निर्देश धन्यवाद!
निर्देश धन्यवाद!
माबोकरांच्या जजमेंटल बायसातून कथेतील पात्रं देखील सुटू शकत नाहीत.>>>>> आणि झुंड शाहितून
मला हा झुंडशाही शब्द समजत
मला हा झुंडशाही शब्द समजत नाही.
जेव्हा ढिगाने अनुकूल प्रतिसाद मिळतात तेव्हाही ते झुंडशाहीने दिले असं समजायचं का?
कथा वाचली तेव्हा काही खटकलं
कथा वाचली तेव्हा काही खटकलं नाही पण प्रतिसाद वाचले तेव्हा डोळे उघडले आणि दुसरी बाजू समजली. असे विचारमंथन उपयोगी ठरते. चांगली चर्चा झाली.
शाही झुंड
शाही झुंड
मला खरंतर खुप दिवस झाले इथे
मला खरंतर खुप दिवस झाले इथे प्रतिक्रिया लिहायची होती पण काही कारणानी जमलं नाही. आता फदफदं फारच पसरलय ताटात त्यामुळे नवीन काही लिहावं का हा प्रश्न पडला होता. तेवढ्यात आता चंपा यांची प्रतिक्रिया आली आणि विचार केला की लिहु.
मला ही प्रतिक्रिया विशेष वाटते कारण त्यात एक प्रकारचे ट्रान्जिशन, मतपरिवर्तन आहे जे फार महत्वाचे आहे. माझ्या बाबतीत म्हणायचे तर असच काहीसं झालेलं आहे.
माझ्या अगदी जवळच्या मित्राने अगदी हेच केलं होतं साधारण २१ वर्षांपुर्वी. फरक एवढाच होता की त्यांचा प्रेमविवाह होता. खरं तर प्रेमविवाह असताना सुद्धा नवर्यामुलाला असंकाही करावं लागणं म्हणजे जरा जास्तच होत होतं पण तो मुद्दा नाहीये.
मुद्दा असा आहे की मला आणि माझ्या इतर मित्रांना तेव्हा फार गंमत आणि कौतूक सुद्धा वाटलं होतं. आता पुढे २१ वर्षांनी मी स्वतः एका मुलाचा बाप होऊन जुना झालोय तेव्हा मला हेच सगळं खुपच खटकतय.
मी सुरवातीची ३-४ पानांवरच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि त्यावरुन लिहित आहे. इतर काही लोकांनी निर्देशनास आणून दिलेले धोके आणि ह्या अरेंजमेंट मधले पुढे उघडकीस येतिल असे जे लूपहोल्स आहेत त्याला छन्दिफन्दिंनी दिलेली रियॅक्शन पण अगदी अपेक्षित होती. हे मी चांगले किंवा वाईट म्हणून नाही लिहित आहे. माझ्या स्वतःच्या वैचारिक प्रवासावरुन आणि इतर काही जवळच्या लोकांचा प्रवास जवळून बघत असताना हे होताना मी पाहिलेलं आहे.
आपण बर्याच वेळा बर्याच गोष्टींना एक्स्पोज झालेलो नसतो. लग्न करणे ह्या पेक्षा लग्न ठरवणे ही खुप वेगळी गोष्ट आहे आणि त्याला खुप वेगळा अनुभव ही लागतो. आमच्या घरात म्हणाल तर लग्न समारंभाना गेलो पण लग्न ठरवण्याची अशी वेळ कधी माझ्या आई वडिलांवर आली नाही. ह्याउलट माझ्या सासरकडे सासरेबुवांना त्यांच्या मुलींची लग्नं ठरवण्या आधी इतर लग्न ठरवण्याचा पुष्कळ अनुभव होता. घरातल्या मंडळीला एखाद्या गोष्टीचा अनुभव असला की सहसा त्याच घरातल्या मुलांमध्ये त्याला अनुसरुन एक प्रकारची समज असते. उदाहरणार्थ जर माझ्या लग्नाच्या वेळेस मी असं काही प्रोपोजल माझ्या होणार्या बायको आणि सासर्यांसमोर मांडलं असतं तर त्यांनी मला हाताला धरुन घराबाहेर काढलं असतं.
म्हणजे अनेकांना हिरो वाटणारा मुलगा इथे टोटली प्रेम चोपडा होऊन त्याचा पार कचरा झाला असता.
हे उदाहरण इथे देण्याचे कारण असे की कधी कधी आपल्याला अजून बरच लांब जायचं असतं. काही विचार आपल्या डोक्याच्या पुर्णपणे बाहेरचे असतात आणि ते समोरच्यानी प्रस्तुत केले की समोरचा माणूस आपल्याला अक्कल शिकवतो आहे किंवा स्वतःला फार शहाणा समजतो असं वाटू शकतो. खरं तर तसं काही नसतं.
म्हणून मला चंपा ह्यांची प्रतिक्रिया आवडली कारण त्यांनी दोन्ही बाजू नीट एकल्या. एकच बाजू घेऊन ती डिफेंड करत बसायची काहीच गरज नाही.
धन्यवाद वैद्यबुवा _/\_
धन्यवाद वैद्यबुवा _/\_
हे कथाबीज ज्या गोष्टीवरून
हे कथाबीज ज्या गोष्टीवरून घेतली आहे तिची गोष्ट.
मुंबईत मराठी शाळेत शिकलेली, इंजिनिअर, नोकरी करणारी. मुलगाही सॉफ्टवेअर मधलाच.
तो तिला भेटून त्याच्या बाबांची (जे नॉर्थ इंडियात राहतात ) अट सांगतो जे त्यालाही मान्य नाही. त्याच्याकडे तेव्हढे पैसे नाहीत पण त्याला तिच्याशी लग्न तर करायचंय.
मग ती तिच्या मधल्या (डॉक्टर) बहिणीला सांगते, तर तिघे मिळून ती रक्कम गोळा करून (आपापल्या सेव्हिंग मधून ) त्या मुलाच्या बापाला देतात आणि त्यांचे लग्न होते. त्यावेळी तिघांचेही वय २५च्या आत बाहेर.
<<< हे ऐकून त्या वेळी मला धक्का नाही तर गंमत वाटली आणि ही गोष्ट amusing च्या लेबल खाली माझ्या मेमरीत गेली
>>>> आता मला धक्का का नाही बसला ?
तर इकडे ज्या reaction दिल्या त्या आमच्या कॉलेजमध्ये देऊन झाल्या होत्या.
(नॉर्थ इंडियन मुलां )बरोबर हुंडाबंदी, हे आणि ते, बाचा-बाची, त्यात पोलीस, तुरुंग वगैरे वगैरे सगळं बोलून झालं होत. इतकी चीड की ह्यालाच उचलून तुरुंगात टाकावे "दहेज " बद्दल बोलतो म्हणून.
पण हळू हळू भारतातील, महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या मुला-मुलींना भेटल्यावर, काही सामाजिक घटकांमध्ये हे वास्तव आहे ह्याची जाणीव झाली होती. आणि ते इतकं खोल आहे की कायद्याच्या तावडीतून ते निसटलंय.
त्यामुळे ही (होतकरू नवरा - नवरी आणि मेव्हणी यांची ) आगळी वेगळी टीम आणि अनोखं लग्न त्यावेळच्या माझ्या reaction सहीत save झालेलं. ते बाहेर पडलं ह्या गोष्टीच्या निमित्ताने.
***
आता थोडं त्या मुलीविषयी, जिच्यावर बेस्ड कथा नायिका आहे, जिला “बावळट” किंवा तत्सम नावे ठेवली गेली.
...
ती समजूतदार, हुशार आणि स्मार्ट होती, आहे.
तिने स्वतःचे करिअर करत नवऱ्यालाही प्रोत्साहन दिले. त्याचमुळे ते अमेरिकेलाही आले. इकडे आल्या आल्यातिने बिझनेस analyst ची नोकरी मिळवली. काही वर्ष अमेरिकेत राहून परत भारतात गेले. तिकडे तिला अजून चांगला जॉब मिळाला.
दोन मुलींना चांगले शिकवले. स्वतःच्या आई वडिलांना त्यांच्या आर्थिक आणि इतर गरजेना उपयोगी पडली/ पडत असते.
तिला इतकी लेबल देऊन झालीयेत, पण she deserves better than that.
१ ते १० च्या प्रवासात काही लोकांना हेड्स्टार्ट मिळतो ते ७ भरून सुरु करतात तर काहीना ३ वरून सुरवात करून ते ८ पर्यंत पोहोचतात. पण म्हणजे ते जास्त रेलॅटिव्ह प्रोग्रेस करतात.
वरच्या गोष्टीत अॅरेंज्ड
वरच्या गोष्टीत अॅरेंज्ड मॅरेज दाखवलं आहे. प्रत्यक्षात अॅरेंज्ड होतं की लव्ह / परिचयातून जुळलेलं मॅरेज? याने फरक पडतो.
तसंच गोष्टीत सगळा पैसा मुलाने दिला असं दाखवलंय. इथे तिने आणि तिच्या बहिणीनेही वाटा उचलला. म्हणजे हुंडा दिलाच.
ही तुमच्या कानावर पडलेली गोष्ट. तुम्ही इथे लिहिताना बदलली. प्रत्यक्ष जे घडलं त्यातलं किती बदलून तुमच्यापर्यंत आलं असेल?
मुलग्यांना लग्न, जोडीदार याबाबतींत आईवडिलांना दुखवणं कठीण जातं , हे पाहतो आहे. पुढे त्याची कात्रीत सापडल्यासारखी स्थिती होईल
कदाचित कोणा एकाची निवड करावी लागू शकेल.
परवा एका धाग्यावर लेखकाच्या
परवा एका धाग्यावर लेखकाच्या काही गोष्टी viral ( दुर्दैवाने लेखकांचे नाव काढून ) झाल्याचा उल्लेख झाला..
त्यावर ह्या गोष्टी संदर्भात खूप महिन्यांपूर्वी झालेली एक गोष्ट आठवली ती नमूद करावी असे वाटले म्हणून ही पोस्ट..
इकडे माबो वर ह्या कथेवर इतका गदारोळ चालू असताना, एक गमतीशीर गोष्ट ( माझ्यासाठी) घडली.
आईला तिच्या मैत्रिणीने नेहमीसारखीच एक what's app fwd पाठवली होती. वाचताना आई चमकली कारण ही तर आपल्या लेकीन लिहीलेल्या गोष्टी सारखीच दिसतेय. त्यामुळे लगेच खाली जाऊन नाव तपासले मग तिने निःश्वास टाकला.
अर्थात ही गोष्ट नंतर मला सांगितली आणि पोस्ट मला fwd ही केली.
सहज ही गोष्ट (teenager) मुलाला सांगितली तर तो म्हणे " means is it viral??" मनात म्हटल असावं बहुदा , जरा खुंटा हलवून बघितलं.
भरत तुमच्या पोस्टकडे दुर्लक्ष
भरत तुमच्या पोस्टकडे दुर्लक्ष करायचं हेतू नव्हता .. अनवधानाने उत्तर द्यायचं राहील,.
बरेचसे मुद्दे वरती झाले होते म्हणूनही बहुदा राहिलं असावं.
विशी पंचविशीच्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात काढलेले तोडगे किंवा त्यांच्या परीने त्यावर शोधलेली उत्तरे. तिशीत असताना त्यांची गोष्ट ऐकून जी अर्थातच परीकथे सारखी (त्यांचं happy ending झाल्यामुळे) मला भासलेली आणि माझ्या डोक्यात रजिस्टर झालेली..
तुम्ही म्हणता ते मुद्दे महत्वाचे आहेत जे वयाच्या ठराविक टप्प्यावर, स्थितीत ठळक पणाने जाणवतात..
४०- ४५ ते ७-७५ हा साधारण ह्या प्रकारच्या साहित्याचा वाचक धरला ( ह्यात स्त्री - पुरुष दोघेही येतात, कदाचित स्त्रियांचे प्रमाण जास्त असते) तर त्यांना ही कथा इतकी जास्त relatable kat वाटते.?
मला वाटतं कितीतरी चुकीच्या प्रथा, पद्धती फक्त कायदे करून अजून गेलेल्या नाहीयेत. ह्या ना त्या स्वरूपात त्या सतत समोर येत असाव्यात ज्यावर अजूनही त्यांना पर्याय शोधावे लागत असावेत. संसारात व्यावहारिक बाजू सांभाळताना एक घाव दोन तुकडे किंवा कायद्याची भाषा उपयोगी पडत नाही हे स्वानुभव घेतले असावेत.
कदाचित त्यामुळे त्यांना कथेतील पात्रांनी काढलेला तोडगा पटला असू शकतो म्हणून ती त्यावेळी येव्हढी उचलून धरली गेली असावी..
मला जसे आणि जेव्हढे सुचले ते सांगितले . यापलीकडे माझ्याकडे उत्तरं नाहीत.
छन्दिफन्दि, मला समजू शकतं.
छन्दिफन्दि, मला समजू शकतं. माझ्या कथा चोरीला गेल्यावर ज्यांनी नामनिर्देश केला नव्हता, त्यांना कळवल्यावर अशी उत्तरं आली -
१. आम्हाला जसं आलं तसं ते आम्ही पाठवलं/ब्लॉगवर/फेबुवर चिकटवलं. आमची काही चूक नाही.
२. तुम्हाला उलट अभिमान वाटला पाहिजे की तुमच्या कथा सगळीकडे शेअर केल्या जात आहेत. तुम्ही नाव टाकायला सांगितल्यावर तुमच्या कोतेपणाची कीव आली.
३. आम्ही खाली "ज्याने लिहिलं तो थोर" किंवा "अज्ञात" असं लिहिलं आहे आधीच. त्यामुळे आता तुमचं नाव लिहायची गरज आम्हाला वाटत नाही. आम्ही श्रेय दिलं आहे.
४. ही कथा तुमची नाही, श्री अबक यांची आहे! (हे त्या अबक यांना माहितही नसेल)
५. काहीच प्रतिसाद नाही.
६. माझ्याही काही कथा अश्याच व्हायरल झाल्या होत्या आणि मला उलट छान वाटलं होतं.
७. तुमच्या म्हणण्याप्रमाणे बदल केला आहे आणि मूळ ब्लॉगची लिंक मजकुरात दिली आहे.
वरीलपैकी क्र ७ करणारे कमी आणि १-६ जास्त होते. मी या अनुभवाने हताश झालो.
छन्दिफन्दि, आताच्या
छन्दिफन्दि, आताच्या प्रतिसादाबद्दल - मला तसं काही वाटलं नाही. त्यामुळे No issues.
आवर्जून उत्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.
वरीलपैकी क्र ७ करणारे कमी आणि
वरीलपैकी क्र ७ करणारे कमी आणि १-६ जास्त होते>>
शब्दांकन फार छान, सुबक, फार
शब्दांकन फार छान, सुबक, फार पाल्हाळ नाही असं.सुरेख.
कथा अजब, न पटणारी. पण आता लिहीली म्हणजे आता त्याला चेंज होणे नाही. जे घडलं ते आहे तस ऍक्सेप्ट कलण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही
शब्दांकन फार छान, सुबक, फार
शब्दांकन फार छान, सुबक, फार पाल्हाळ नाही असं.सुरेख>> धन्यवाद!.
कथा अजब, न पटणारी. पण आता लिहीली म्हणजे आता त्याला चेंज होणे नाही. जे घडलं ते आहे तस ऍक्सेप्ट कलण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही>>> :स्मित
50 वर्षापूर्वी जेव्हा हुंडा
50 वर्षापूर्वी जेव्हा हुंडा कॉमन वाटायचा तेव्हा माझ्या आईची अट होती की मी हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच लग्न करेन.
लोक तिला म्हणायचे की मग तुझ लग्नचं होणार नाही.
बाबांशी बोलताना आईने तिची अट सांगितल्यावर बाबा म्हणाले मला नकोच आहे हुंडा.
आई म्हणाली मुलांना नकोच असतो, त्यांच्या आई वडीलांना हवा असतो.
अर्थातच हुंडा दिला/घेतला नाही.
आईची अजून एक मैत्रीण (लग्नानंतर नोकरी करताना भेटलेली).
लव मॅरेज.
साधारण पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट ही पण.
ऐन लग्नात सासर्यानी हुंडा मागितला आणि अडू न बसले. मुलगी गौरीहर पुजत होती.
तिच्या कानावर बातमी आली.
ती ताडताड उठून बाहेर आली आणि म्हणाली "दिलीप, हे काय ऐकते मी! तुझ्या बाबांना हुंडा हवाय? हुंडा हवा असेल तर मी नाही करणारे लग्नाबिग्न".
शिस्तीत बिगर हुंड्यांच लग्न झालं.
It depends on ur priority.
Pages