अरेंज मॅरेज, अजुन एक किस्सा - ताटातलं वाटीत.. !

Submitted by छन्दिफन्दि on 15 June, 2023 - 02:58

“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”

मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.

तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.

***

स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.

“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “

“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “

“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.

“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.

मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.

चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.

इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.

ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.

“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.

“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.

***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.

इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.

तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.

तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ पण ज्यांना b &b शेअर करायचीय त्यांच्यात १००% पारदर्शकता आहे.” - खोटं बोलण्याविषयी पारदर्शकता आहे. तरिही ह्या नात्याचा आधार फसवणूकीचाच आहे जे मला नाही पटू शकत.

जे लोकं पारदर्शकता , खोटं बोलणं गैर , खरे पणावर सहजीवनाचा पाया वगैरे argue करतायत त्यानी स्वतःला एकदा विचारून पहा मनाशी आपण किती हरिश्चंद्र आहोत ते , आणि आपण मनात आपली स्वतःची अशी किती सिक्रेट ठेवली आहेत ते ही तपासून बघा .
हा मुलगा आपल्यासाठी एवढं करायला तयार आहे ही एकच गोष्ट ती त्याच्या प्रेमात पडायला मला वाटत पुरेशी आहे.

मी_अनु, ऋन्मेश, स्वाती, मै, फेफ सगळ्यांशी सहमत.
कुठल्याही अंगाने हे वागणे व्हाईट वॉश होऊ नये.
कथाबीज उचलून कथा म्हणून लिहिला असेल तर वर उल्लेखलेले अनेक कमजोर दुवे आहेत. टॉक्सिक बिहेवियरला शरकरावगुंठीत केलेली कथा भावली नाही.

सिक्रेट ठेवणं आणि क्रिमिनल ऑफेंस याची तुलना का करतोय?
सहजीवनाचा पाया खरेपणा नाही, सिक लिव्ह सिक् नसताना घेतली, आणि पोरांशी खोटं बोललो याची तुलना हुंडा आणि मिसाजनिस्ट वागणे याच्याशी? जीवनात काही लक्षणरेषा न ओलांडायला असतात आणि काही तळ्यात मळ्यात करायच्या असतात. त्यातील हुंडा ही कथेतही व्हाईटवॉश न करण्याची गोष्ट आहे. बाकी सीक लिव्ह इ. तुलना करून हुंड्यासारखा नराधम कॅटेगरी गुन्हा ट्रीव्हीअलाईज करू नका.

त्या त्या भागातल्या जीवनाची कल्पना आल्याशिवाय कुणाला काय म्हणायचंय हे समजणार नाही या नोटवर थांबतो.
आता सुरूवात कुठून झाली हेच लक्षात नाही. Lol
बहुधा मित्राच्या बाबत असे झाले आहे , ग्रामीण भाग असा उल्लेख आलेला आहे. तर त्या मुलीला जो मुलगा मिळाला त्याच्याशी तिने लग्न केलं नसतं तर हुंडा द्यावा लागेल असाच मुलगा पदरात पडण्याची शक्यता जास्त होती.

इथे बऱ्याच कंमेंट्स ह्या मूळ कथा न वाचता काही सिलेक्टिव्ह कंमेंट्स वाचून उगाच साप साप म्हणत भुई धोपटम्यासारख चालू आहे.

१. हुंड्या चे कोणतेही उदात्तीकरण (व्हाईट वॉशिंग )कथेत केलेले नाही
२. मुलाने स्वकष्टार्जित पैसे आपल्याच बाबाना ऑफर केलेत.
खर तर बारकाईने वाचणाऱ्या कोणाच्याही लक्षात येईल की तो खोटं बोलत नाही तर तो
"त्याचेच पैसे दिलेत" हे वडिलांना कळू देत नाही.
३. ह्यातील नायिका पहिल्यांदी इंटरेस्टेड नसते पण जसजसे तो बोलू लागतो तसतसे ती आकर्षित होते किंवा इंप्रेस होते (त्यात त्या मुलातीळ काही गन जे तिला आवडत जातात त्याचा उल्लेख आहे)
४. अर्थात काही जणांच्या सुरक्षित आयुष्याच्या कल्पनेला तिचा निर्णय तडा देणारा असूच शकतो

५. वरील नरो व कुंजरोवा आणि तत्सम कंमेंट ही "व्हाइट लाइज आर स्टिल लाइज!"" ह्या कंमेंटला होत्या

बरेच जण स्वतःला वेगळे नियम दुसऱ्यांना वेगळे नियम हा दुटप्पीपणा नेहेमीच करत असतात आणि त्याचा वरील काही कंमेंट्स च्या निमित्ताने पुन्हा प्रत्यय आला.

बाकी प्रत्येकाची वाचनाची पद्धत आणि आकलन करून घ्यायची तयारी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मला वाटतं मी वरचे बरेचसे मुद्दे कव्हर केलेत.

ते सगळं ठीक आहे,
प ण
<< भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते. >>
हे वाचून धोक्याची घंटा वाजू लागली आहे माझ्या मनात.
(टीप: त्या मुलीच्या जागी माझी मुलगी असती तर, अशी कल्पना करून दिलेला प्रतिसाद आहे.)

येथील बऱ्याचशा मूल्याच्या/ नीती अनीतीचा कंमेंट्स करणार्यांनी वाळवी सारख्या तद्दन illogical/ इंसेन्सिबल/ कथा असणाऱ्या, सगळी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करावे, वारेमाप कौतुक करावे ह्याचे आश्चर्य वाटले.

एक तर त्यांच्या विचारात कॅलॅरिटी नाही कि सिलेक्टिव्ह कंमेंट्स सारखे तिथेही काम सिलेक्टिव्हली चालते.

१. एक्सट्रा मॅरेटीअल अफेअर चे उदात्तीकरण
२. डॉक्टर - पेशंट नात्यातील confeditiality, तत्व पायदळी तुडविणे
३. इतके सारे खून एखाद्या सराईत किलर च्या थंडपणे करणे
न संपणारी यादी आहे

सर्वात मूर्खपणाचा कळस म्हणजे
एव्हढा मोठं कोणत झुंबर प्लास्टिक च्या दोरीने टांगलेल असत (जो ह्या कथेचं गाभा आहे )

तै, तुमचा वरील प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर आला आहे का?
जाता जाता: माझ्या माहितीनुसार प्लॅस्टिकची दोरी, वाळवी कुरतडत नाही.

सिक्रेट ठेवणं आणि क्रिमिनल ऑफेंस याची तुलना का करतोय?
सहजीवनाचा पाया खरेपणा नाही, सिक लिव्ह सिक् नसताना घेतली, आणि पोरांशी खोटं बोललो याची तुलना हुंडा आणि मिसाजनिस्ट वागणे याच्याशी? जीवनात काही लक्षणरेषा न ओलांडायला असतात आणि काही तळ्यात मळ्यात करायच्या असतात.त्यातील हुंडा ही कथेतही व्हाईटवॉश न करण्याची गोष्ट आहे. बाकी सीक लिव्ह इ. तुलना करून हुंड्यासारखा नराधम कॅटेगरी गुन्हा ट्रीव्हीअलाईज करू नका.>>>
दुसऱ्यांना सल्ले देण्याआधी कथा आणि सगळ्या कमेन्टस ओळीने वाचा.

तै, तुमचा वरील प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर आला आहे का?
जाता जाता: माझ्या माहितीनुसार प्लॅस्टिकची दोरी, वाळवी कुरतडत नाही. >>>> वाळवी बघा

हुंडा कुठल्याही प्रकारे / स्वरुपात मागणे / घेणे हे सर्वस्वी चुकच आहे. पण चर्चा वाचून काही प्रश्न पडले ते असे की -
जी मंडळी हुंडा विषयी एवढी चीरफाड़ करत त्रागा करत बोलून फक्त एका पार्टीला दूषण देत आहेत त्यांनी स्वताच्या/ जवळच्या नातेवाईक मुलीच्या लग्नात नक्की काय स्टैंड घेतला, प्रतिपक्षाची मागणी सपशेल नाकारली भले लग्नाची चाळीशी उलटली तरी चालेल असे तत्व निष्ठपणे म्हणत / की जी मागणी (हुंडा) ठरण्याच्या बैठकी झाल्या त्यात फक्त घासाघीस केली आणि अंशतः हुंडा ( गिफ्ट्स म्हटले म्हणजे अर्थ बदलत नाहीच) दिलाच. आणि तो द्यावाच लागला म्हणून त्यावेळचा राग सर्वजण पंचिंग बैग सारखे ह्या कथाबिज/ धाग्यावर काढून त्याकाळी झालेली मनाची असहाय्य तड़फड़ कठोर प्रतिसादातून काही अंशाने शांत करण्याचा सांसदीय मार्ग आचरणात आणला जातोय !!

इथल्या व्हाईट लाईज आणि क्रिमिनल ऑफेन्स मतांशी सहमत. गोष्ट आहे हे बरोबर , पण अशाच हळव्या, क्युट गोष्टी वाचून काही मूर्ख मुली , मुलं प्रेमात वगैरे पडू शकतात आणि हवेत तरंगतात. त्यामुळे अशा गोड गोष्टीच्या खाली अशा घमासान चर्चा पाहीजेतच.

वर जो कोणी स्वतः काय कराल विचारले आहे यावर मी माझा अनुभव देउ शकते. माझ्या आई वडिलांचं इंटरकास्ट लवमॅरेज. यामुळे माझ्यासाठी 5 वर्षे स्थळ बघत होते, जातीमुळे प्रचंड प्रॉब्लेम आला होता.

त्यावेळी जर अशी भरपूर दक्षिणा देण्याची तयारी दाखवली असती तर मला पाच वर्षे वाट बघावी लागली नसती. हे बोलणी अर्थातच सटली होतात, कोणी तुम्ही हुंडा घेणार का, आम्ही देणार नाहीये बरं का, असं म्हणत नाही. पण मेसेज दोन्ही पार्टी पर्यंत बरोबर पोचतो.

अजून एका स्थळ म्हणून वरवर छान वाटणाऱ्या मुलाने काही प्रथा, पद्धती घरासाठी , आई वडिलांसाठी, मोठ्या माणसांची मनं दुखवू नये म्हणून पाळाव्या लागतील असे सांगितले होते. काय ते इथे लिहीत बसत नाही, क्रिमिनल गोष्टी नव्हत्या, पण तरीही ते करताना मला त्रास झाला असता,

वर माझं ते मत नाही, पण त्यांच्यासाठी काही दिवस एडजस्टमेंट कर, नंतर हळूहळू तुझ्या हातात येईल सगळं मग तूच बंद कर वगैरे सांगितले होते.
पण या कुटुंबाबरोबर, माणसाबरोबर मी काहीही वेळ घालवला नसल्याने , त्याचा अंदाज, त्याचा शब्द वगैरेवर विश्वास ठेवावा लागला असता. वर कोणी म्हटलंय तसं आता पासून एकाला एक दुसऱ्याला वेगळं सांगून ते निभावण्याची याची तयारी दिसत होती. मी त्या मुलाला नाही म्हणून सांगितलं.
गोष्टीतल्या या मुलीला तिच्या व्हॅल्यूज आणि भारताचा कायदा धाब्यावर बसवावा लागत आहे. प्रेमात पडताना ह्या पॉसिटीव्ह नाही तर रेड फ्लॅग आहेत.

छन्दीफंदी, तुम्ही ही चर्चा पर्सनली घेऊ नका. पण अशा अयोग्य गोष्टींना भाळून निर्णय घेणाऱ्या मुली, आई वडील अजून असतात, त्यांच्यासाठी ही चर्चा.

पीनी तुमची स्टोरी सांगितल्याबद्दल धन्यवाद!

मी गेल्या दोन दिवसात अशा ५-६ गोष्टी ऐकल्या. त्या संदर्भातील प्रत्येकीची मते/ प्रतिक्रिया वेगवेगळी त्यांच्या अनुभवानुसार होती.
"मुलगा समजूतदार होता, मुलगी नशीबवान होती, लग्न व्हायच्या आधीच कट कट असते नंतर सगळं सुरळीत होत, " पासून ते
"नंतर सगळं नीट होवो,
किंवा "५ वर्ष तुम्ही थांबलात, "हो" म्हणणं खूप रिस्की असू शकत (तुमच्या स्वानुभवातून आलेल)" इथपर्यंत.

कालपासून मी डॉट्स कनेक्ट करत्ये तेव्हा अजून काही आठवलं.
------------------------------------

२०१४ पर्यंत काही अशा गोष्टी ऐकल्यात, MNC मध्ये काम करणाऱ्या सुशिक्षित बायकाही ह्याला अपवाद नाहीत.

कोणाला लग्नात कार दिली नाही, अलाना-फलाना दिला नाही म्हणून थोडी कूच कूच अशा प्रकारच काही बाही

"इंजिनियर का इतना लाख, डॉक्टर का उतना , UPSC का इतना " एकीने अक्ख्या मोठ्या क्लास मध्ये rate कार्ड सांगितले. ज्याला १२ वर्ष सुद्धा उलटून गेली नाहीयेत

"अभी कोई दहेज नाही मांगता. बस हर महिना पगार आती है ना. समझ लो इन्स्टॉलमेन्ट मे दहेज आता है" हे वाक्य मी माझ्या कानांनी ऐकलंय.

---------------------------------------

यातील एखादी घटना मी माझ्या नोकरी न करणाऱ्या आईला सांगितली तर तिला धक्का बसला होता कारण तिने नातेवाईक, सगे सोयरे ह्या मर्यादेपलीकदिल जग पाहिलेच नव्हते.

पण हे असं सगळं इतक्या उघडपणे चालू असताताना त्याच समाजात वावरणारे येथील लोक पाल झटकल्या सारख्या प्रतिक्रिया देतायत, किंवा याविषयी अनभिज्ञ आहेत याच राहून राहून आश्चर्य वाटल. की प्रत्येकजण आपल्या बबल मध्ये आहे आणि ज्यात हुंडा मागणे , स्त्रीभ्रूण हत्या ह्या कायद्याने बंदी असलेलया गोष्टी (त्यांच्या बबल मुळे) अस्तित्वातच नाहीत म्हणून असा रिऍक्ट होतो.

तुम्हाला खरंच कळत नाहीये लोकांचा आक्षेप नक्की कशावर आहे ते???

ओके. संत्र सोलतो. हुंडा घेतला जात होता, आजही घेतला जातो, आजही त्यावरून मुलीचे जीव जातात, त्यांना शारीरिक मानसिक इ. इ. त्रास होतो. त्यावर इथल्या एकाही व्यक्तीचे दुमत नाही. हे असं होत हे अर्थातच सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही इथे कथा लिहिली आहे (ती चुकून विनोदी लेखात आहे तो विभाग आधी बदला... तर ते असो..) त्यावर चर्चा चालू आहे.
त्या कथेत सरळ सरळ हुंड्याचे शरकरावगुंठण झालेले आहे. व्हाईट वॉश केलेला नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खरंच कथा परत एकदा वाचा आणि काही शब्द बदलून ते होणार नाही याकडे बघा. इतक्या लोकांना तसे वाटले तर त्यात तथ्य असावे हा दृष्टीकोन ठेवून वाचा.

कुठलीही चांगली सोशल पार्श्वभूमीवर लिहिलेली कथा काळाच्या एक पाऊल पुढे गेली नाही तरी दोन पावलं मागे तरी येऊ नये असं मला मनापासून वाटतं. इथवर आपण केलेली प्रगती सोपी न्हवती, रूढी परंपरा इ. वर तुम्ही कथा लिहिताय ते चांगलंच आहे पण वर पिनी म्हणताहेत त्यावर खरंच विचार करा. कथेत हुंडा इ. तुम्ही लिहिलेलं लिहून थोडा शेवट टेलर केलात तर बघा काही आयाम देता आला तर. याचा अर्थ यावर कथा लिहुच नये असं नाही तर जबाबदारी ठेवून लिहा. आपण जी प्रिन्सिपल उराशी जपतो त्याच्याशी प्रतारणा करणारे, त्याचे समर्थन केलेले वाचले की त्रास होतो.
मला पिनी यांचा अशी चर्चा अशा कथांखाली झाली पाहिजे दृष्टीकोन फार आवडला.

लिहा हो - तुम्ही पाहिलेलं वास्तव तुम्ही लिहा.

भरगच्च पाकीट बघून लाळ गाळणाऱा सासऱा, त्याचा मुखदुर्बळ जुगाडू मुलगा, पदराआड खुदुखुदू हसणारी सून आणि कशी का होईना, उजवली एकदाची म्हणून सुखावणारे तिचे आईवडील हे चित्र २०२३मध्येदेखील ज्यांना गोऽऽड वाटतं त्यांना त्यांचा बबल लखलाभ, आम्हाला आमचा!

या निमित्ताने: मेड इन हेवन सिरीज चा सिझन 1 एपीसोड 4 'price of love' नक्की बघावा सर्वांनी.सुंदर चित्रीकरण आणि रोशे गाणं आहे यात.

ज्यांना गोऽऽड वाटतं त्यांना त्यांचा बबल लखलाभ, आम्हाला आमचा>>> exactly हेच आधी म्हंटल असतं तर Bw

लिहा हो - तुम्ही पाहिलेलं वास्तव तुम्ही लिहा>>> लिहायचं होत म्हणूनच लिहिलं. मला तुमच्या anumodanachi आवश्यकता भासली नव्हती.

ती गोष्ट अशी अशी घडली - असं म्हणून लिहिलं असेल तर ठीक आहे. गोष्टीत तरी लेखिकेने अमुक एक बरोबर किंवा चूक अशी बाजू घेतलेली नाहीये. फक्त कथेत तसं होणं का चूक आहे ह्याबाबत अनु यांचे सगळेच मुद्दे पटले. इथे लग्नाला तयार होऊन पोरीने फार मोठी रिस्क घेतली आहे असं वाटतं. ज्या ज्या रिस्कस वाटताहेत (वर अनेकांनी नमूद केलेल्या) त्या तशा प्रत्यक्षात घडू नयेत या शुभेच्छा.

इतक्या लोकांना तसे वाटले तर त्यात तथ्य असावे हा दृष्टीकोन ठेवून वाचा.≥>>>
१२०० लोकांमध्ये १० लोकांना तसे वाटतं असेल तर ते प्रमाण १ टक्क्यांहून ही कमी आहे
बर ही लोक (<१%) ह्या गोष्टीकडे १०००० फुटांवरून बघतायत आणि उंटावरून शेळ्या hakatayat
इकडे एक फक्त पिनी आहे जी स्वानुभवातून बोलत्ये.

तिची गोष्ट नीट वाचलीत तर तिनेही तिच्या निर्णयाची किंमत मोजली
५ वर्ष (ऐन उमेदी्तली)

चांगली सोशल पार्श्वभूमीवर लिहिलेली कथा काळाच्या एक पाऊल पुढे गेली नाही तरी दोन पावलं मागे तरी येऊ नये असं मला मनापासून वाटतं. इथवर आपण केलेली प्रगती सोपी न्हवती, रूढी परंपरा इ. वर तुम्ही कथा लिहिताय ते चांगलंच आहे पण वर पिनी म्हणताहेत त्यावर खरंच विचार करा. कथेत हुंडा इ. तुम्ही लिहिलेलं लिहून थोडा शेवट टेलर केलात तर बघा काही आयाम देता आला तर. याचा अर्थ यावर कथा लिहुच नये असं नाही तर जबाबदारी ठेवून लिहा. आपण जी प्रिन्सिपल उराशी जपतो त्याच्याशी प्रतारणा करणारे, त्याचे समर्थन केलेले वाचले की त्रास होतो.
>>> परत परत तेच म्हणत राहिल्याने मुद्दा खरा होत नाही.

सतत दुसऱ्यांना तुम्ही काय करा किंवा कसं लिहा अस सेल्फ-सेंसोरींग करू नका. आचार विचार विहार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्याच थोड भान असू द्या

मतभेद असतात. त्यावरून एकमेकांना लक्ष्य करू नये. एव्हढे टा़ळून चर्चा पुढे चालू रहावी.

हुंडा ही अनिष्ट प्रथा आहे त्यामुळे आणि हुंड्यापायी जाणार्‍या बळींपायी जे प्रतिसाद येत आहेत त्यात त्यांना जिवाची रिस्क दिसतेय. हे बरोबरच आहे. त्यामुळे ही मतं बाळगणार्‍यांना धोपटण्यात अर्थ नाही.

पण जिते मुलगाच मुलीच्या समर्थनार्थ आहे आणि रहायला स्वतंत्र आहे तिथे रिस्क कमी आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे. तसेच ज्या अर्थी मुलाने आधी भेटून हुंड्याची रक्कम द्यायचा प्रस्ताव मांडला आहे त्या अर्थी उद्या उघडकीला आले तरी हुंडाबळीपर्यंत आपले घरचे जाणार नाहीत ही खात्री असेल. तसा विचार केलेला नसेल तर मग अवघड आहे. या अनुषंगानेच मी लिहीले होते कि हुंडाबळीची प्रकरणे सर्रास होत नसतात. ती शहरात सुद्धा होतात. काही प्रकरणांमुळे ग्रामीण भाग किंवा काही गोष्टींचे सरसकटीकरण होते. त्या कल्पना घेऊन लोक वावरतात.

प्रत्यक्षात तसे नसते. सामोपचारानेच लोक शक्यतो घेतात.
तसे नसते तर मुलाने आणि मुलीने पळून जाणे ही सुद्धा घरच्यांची फसवणूकच आहे. त्या केस मधे पण सर्रास ऑनर किलिंग होते असे म्हणून भुई धोपटण्यात अर्थ नाही. जर अशा शंभर टक्के केसेस मधे हत्या होत असत्या तर मग कुणी पळूनच गेले नसते.
कुणी चुकतंय असे नाही. आपण कुठून बघतोय त्यावरून आपल्याला दृश्य कसं दिसतं इतकंच.
शहरात सुद्धा लग्नावर भरपूर खर्च होतो. हे पण कंपल्शन झालेलं आहे. पुण्यात हुंडाबळीच्या तीन केसेस गाजलेल्या आहेत. एक सारडा, दुसरी मुंडडा आणि मेहता. हे लोक शहरात राहून आजही हुंडा प्रचंड प्रमाणात देतात, घेतात. लग्नावरचा खर्च, दागदागिने यावर प्रचंड खर्च होतो.
पण त्या घरात मुलगी देणे, लग्नच करणे ही रिस्क आहे असे आपल्या कुणालाच वाटत नाही.

“ खोटं बोलत नाही तर तो
"त्याचेच पैसे दिलेत" हे वडिलांना कळू देत नाही. >> ते पैसे मुलीकडून आले आहेत हे वडिलांना सांगणं म्हणजेच खोटं बोलणं आहे - कितीही शब्दाचे खेळ खेळले तरी ही वस्तुस्थिती बदलत नाही.

“अर्थात काही जणांच्या सुरक्षित आयुष्याच्या कल्पनेला तिचा निर्णय तडा देणारा असूच शकतो” >> कुणाच्या सुरक्षित आयुष्याला कसले तडे गेले आहेत?

“बरेच जण स्वतःला वेगळे नियम दुसऱ्यांना वेगळे नियम हा दुटप्पीपणा नेहेमीच करत असतात” - हे कसं ठरवलं?

त्याचा मुखदुर्बळ जुगाडू मुलगा , त्यांना त्यांचा बबल लखलाभ, आम्हाला आमचा >>> Lol

प्रत्येक जण सुधारक (आगरकर), महात्मा फुले असत नाही. दुर्दैव आहे पण वडीलधार्‍यांच्या चुकीच्या कल्पनांना विरोध करत नाहीत . थेट संघर्ष करण्यापेक्षा चांदोबा छाप ट्रीकनेच वेळ मारून नेली जाते. अशा प्रकरणात सुद्धा मी स्वत: पाहिलेले आहे. काही वेळा जुनी खोंड धुसफुसत राहतात, पण इतर लोक "झालं गेलं गंगेला मिळालं" म्हणून समजूत काढतात.

हट्टाला जाऊन झालेलं लग्न मान्य नाही म्हणून मुलाचं दुसरं लग्न लावून देणारी केस पाहण्यात आहे. पण टक्केवारी पाहिली तर नगण्य भरेल. बातमी झाली तर त्याच केसची होईल. ज्यावरून शहरात राहून ग्रामीण भागात या केसेस सर्रास घडतात असेच कुणाचेही मत बनेल.

निर्णयाची किंमत मोजली ५ वर्ष (ऐन उमेदी्तली)>> समजतंय का काय लिहिताय! कोणी पर्सनल अनुभव लिहिला असेल तर त्यावर इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट! स्पीचलेस!
अमांची पहिली प्रतिक्रिया अत्यंत कमी शब्दात परफेक्ट होती.

ते पैसे मुलीकडून आले आहेत हे वडिलांना सांगणं म्हणजेच खोटं बोलणं आहे >> अहो पण फेफ, वडीलांच्या कल्पना चुकीच्याच आहेत ना ? त्यांच्या घरातल्या पोझिशन मुळे थेट विरोध केला जात नाही इतकेच. नाहीतर बघा मुलीसाठी बापाला आडवं लावायला लागलं पोरगं असं बोलतील लोक. लोक काय खोलात जाऊन विचार करत नाहीत. समोरासमोर बोलू, चर्चा करू असा ओप्शन नसेल म्हणून एकदा घडून गेल्यावर बघू असा विचार केला जातो. प्रेमविवाह सुद्धा फसवणूकच होईल या व्याख्येनुसार.

Honor killing वाला सैराट,
Literally बिनडोक कथानक असलेला, basic values Ani morality पायदळी तुडवलेला वाळवी..
आणि त्यासारख्या इतर अनेक वेब सीरिज, चित्रपट डोक्यावर घेणारी लोक स्वतः ची interpretations karun एका साध्या सरळ गोष्टीत जे लिहिलंच नाहीये ते घुसडतायत.
त्या दुटप्पी वागण्याचा जास्त वैताग येतो.

Pages