Submitted by पुरंदरे शशांक on 11 March, 2024 - 00:49
मन कुठेच लागत नाही
निवळुनी नभ सावरले
रानात भरारे वारा
गर्दावा दाटून आला
गंधाळून कंच पिसारा.... 1
पण भुलवित नाही काही
मन कुठेच लागत नाही
त्या दूर दूरशा वाटा
ना खुणाविती ते काही
निश्चलशी डोंगरमाथी
काजळीत बुडूनी राही....2
एकटा उसासून जाई
मन कुठेच लागत नाही
मी स्तब्ध उभा माझ्यात
शोधी ना काही त्यात
तळहात निरखिता नाही
उरले ना तरीही पाही....3
ना खंत न काही सरले
मन कुठेच लागत नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!
वाह!
खूप छान
खूप छान
छान!
छान!
सुंदर!
सुंदर!
काजळीत बुडूनी राही >> इथे मी चुकून काळजीत वाचलं, पण काजळीत या शब्दाने खूप वेगळी अर्थाछटा आली आहे.
वाह!! बहोत बढिया.
वाह!! बहोत बढिया.
खिन्नता पोचली.
खिन्नता पोचली.
सुंदर..!!
सुंदर..!!
" मी स्तब्ध उभा माझ्यात ...."
" मी स्तब्ध उभा माझ्यात ...." ची अनुभूती अतिशय तरल..! छान!!
छान आहे.
छान आहे.
'गर्दावा' शब्द आवडला.
छानच!
छानच!
छान
छान
खिन्नता पोचली.+१
खिन्नता पोचली.+१