गर्दावा

मन कुठेच लागत नाही

Submitted by पुरंदरे शशांक on 11 March, 2024 - 00:49

मन कुठेच लागत नाही

निवळुनी नभ सावरले
रानात भरारे वारा
गर्दावा दाटून आला
गंधाळून कंच पिसारा.... 1
पण भुलवित नाही काही
मन कुठेच लागत नाही

त्या दूर दूरशा वाटा
ना खुणाविती ते काही
निश्चलशी डोंगरमाथी
काजळीत बुडूनी राही....2
एकटा उसासून जाई
मन कुठेच लागत नाही

मी स्तब्ध उभा माझ्यात
शोधी ना काही त्यात
तळहात निरखिता नाही
उरले ना तरीही पाही....3
ना खंत न काही सरले
मन कुठेच लागत नाही

Subscribe to RSS - गर्दावा