लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
खाणंपिणं, घरचा गणपती, मूव्ही
खाणंपिणं, घरचा गणपती, मूव्ही पाहायला गेलं की popcorn, बायकोचा वाढदिवस, लग्नाची anniversary, पोरांचे बर्थ डे, शॉपिंग, निधन वार्ता, सुसू पॉटी सगळं सगळं फेसबुकवर update करणाऱ्या व्यक्ती..... अती डोक्यात जातात. एक वेळ त्यांना इग्नोर करता येतं. पण उठसूट live जाणारे digital creators, celebrities यांचं काय करावं? त्यांना लाखो followers असतात आणि तरीही ते छानपैकी चुकीच्या गोष्टी सांगतात, चुकीचे ट्रेंड्स चालु करतात.
आजच्या पुण्यातील incidence चां live video करणाऱ्या celebrity ने त्या लहान मुलींचे चेहरे एवढ्या वेळा दाखवले की त्याचा त्या मुलींच्या भविष्यावर काय परिणाम होईल. त्यांना सुधारायचे असेल तरी तशी संधी तरी मिळेल का हा विचारच केला नाही. तो व्हिडिओ पाहून मी अतिशय अस्वस्थ आहे.
असे पोटाला हात लावून
असे पोटाला हात लावून विचारणारी माणसे म्हणजे कहर आहे>>>
अगदी अगदी, मुलीच्या वेळी दिवस असताना ऑफिस मधल्या एक मॅडम नेहमीच पोटाला हात लावून "कितवा महिना ग?, किंवा छोटू काय म्हणतोय?" वगैरे अगदी लाडिकपणे विचारायच्या. कधीकधी तर सगळ्यांसमोर![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अशा वेळी चिडचिड व्हायची खूप..
आजच्या पुण्यातील incidence
आजच्या पुण्यातील incidence चां live video करणाऱ्या celebrity ने त्या लहान मुलींचे चेहरे एवढ्या वेळा दाखवले की त्याचा त्या मुलींच्या भविष्यावर काय परिणाम होईल. त्यांना सुधारायचे असेल तरी तशी संधी तरी मिळेल का हा विचारच केला नाही. तो व्हिडिओ पाहून मी अतिशय अस्वस्थ आहे.>> अनुमोदन.
त्याच बरोबर गौतमी पाटील ची जी रील्स अस्तात त्यातही ती ऑडिअन्स मधील लहान मुलींना बोलावुन गालगुच्चे घेते व शेजारी उभे करून व्हल्गर हावभाव करत नाचत असते. त्या मुलींचे आईवडील कसे काय अलाउ करतात असा मला प्रषण पडतो. गौतमीबद्दल आजिबातच जजमेंटल नाही. तिचे काम ती करते व तिचे नाच आव डणारा एक वर्ग आहे. पण त्या अनभिज्ञ मुली नुसत्या त्या झगम गाटात उभ्या राहतात. ते बघून कसेतरीच होते.
हो, त्या मुलींचे चेहरे कपडे
हो, त्या मुलींचे चेहरे कपडे त्यांना ओळखू शकण्या इतके स्पष्ट होते.त्यांना मुलांकडून ट्रोलिंग किंवा आजूबाजूला त्रास होऊ शकतो.
मी इथे लिहायला आले ती एक
मी इथे लिहायला आले ती एक स्पेसिफिक पेट पीव्ह आहे. साखि म्हणजे माझे मोस्ट फेवरिट अन्न. आता कमी केले आहे तरी आईच्या हातच्या कच्च्या दाण्याचे कूट कढईतच परतौन दहा मिनिटात केलेल्या खिचडीची/ ताकाची चव अजून जिभेवर व मनात आहे. पुढे साबांच्या हातची व घरची खास कोब्रा. व्यवस्थित परतलेली भाजलेल्या दाण्याचे कूट घातलेली खिचडी , बरो बर दोन चमचे सायीचे दही. पण आव डते मी दोन्ही प्रकारे करते. सध्या कमी फ्रिक्वेन्सी व प्रमाण पण अर्धी वाटी का होईना करते.
पण पण पण मुंबईत अशी साखि आजिबात मिळ त नाही. ऑफिस कँटिन किंवा कुठे ही आजिबात न परतलेली फिकुटलेली , जिरे पण नीट
तड तडलेले नसते. व संताप ( सात्विक संताप जनक ) बाब म्हणजे अर्धवट भाजलेले थोडे बहुत शेंगदाणे नुसतेच घातलेले असतात. ही काही खिच डी नाही!!!
परवा ज्युपिटर मध्ये डॉ ची अपॉइन्ट मेंट होती. डिस्कशन झाल्यावर स्ट्रेस रिलिफ म्हणून कॅफे मध्ये गेले तिथे खरेच फार चोइस होता. मी कटिन्ग
चाय व ती अशीच वर लिहिलेली का होईना पण साखि घेतली. पाव प्लेट खाल्ली. वैताग व्यक्त करायचे पण त्राण नव्हते. दाणे शोधुन शोधुन खाल्ले. कोथिंबीर लिंबू ओले खोबरे नाहीच. शक्य ताच नाही. ऑफिस कँटिन मध्ये पण हा च प्रकार.
वॉटसअॅप ग्रुपमध्ये कुणाचा
वॉटसअॅप ग्रुपमध्ये कुणाचा वाढदिवस असला की ग्रुपचे नाव हॅपी बर्थ डे अबक...आणि त्याचा फोटो म्हणून ग्रुपचा डिपी ठेवणे हे ही फार डोक्यात जाते.
आजच्या पुण्यातील incidence
आजच्या पुण्यातील incidence चां live video करणाऱ्या celebrity ने त्या लहान मुलींचे चेहरे एवढ्या वेळा दाखवले की त्याचा त्या मुलींच्या भविष्यावर काय परिणाम होईल.
तुमचा मुद्दा मान्य आहे पण मुलींना हे करताना काही वाटले नाही का याचा का नाही विचार केला? कॉलेजला जातात म्हणजे त्यांनी काहीही स्वैराचार करावा आणि नंतर अंगावर किंवा जीवावर बेतला की यांची ओळख लपवावी हे पटत नाही. .....चेहरा blurr केल्याने काय होईल? बऱ्याच वेळा गुन्हेगाराचा चेहरा झाकतात हे पटत नाही. ( गुन्हा जर सिद्ध झाला नसेल त्यावेळी चेहरा झाकल्यास हरकत नाही...नाहीतरी हल्ली मिडीयामध्ये एकेठिकाणी चेहरा झाकतात तर दुसरे ठिकाणी त्या गुन्हेगाराचा फोटो पुर्ण दाखवतात. मग अटक वगैरे केल्यावर चेहरा का झाकतात हे कळत नाही.)
बाकी या व्हीडीओत केवळ मुली आहेत म्हणून यांचे चेहरे झाकायचे असे म्हणायचे का तुम्हाला? उलट असे चेहरे दाखवले तर इतर बरेच जण हा प्रकार करायच्या आधी विचार करतील व बरेच जण बदनामी होऊ नये म्हणून ड्रग्ज घेणे टाळतील ही कदाचित...
आता तुम्ही असेही म्हणाल की या मुलींना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले असतील. पण तसा काही प्रकार वाटत नाही. पण जरी हे खरे असेल तरी यांचे चेहरे असे दाखवून नंतर किती जणांच्या लक्षात रहातील हा प्रश्नच आहे. जवळचे लोक, नातेवाईक, मित्र वगैरे काही दिवस बोलतात व नंतर विसरतात. आपल्यासारखे इतर लोकं हा व्हीडीओ 2-3 वेळा बघतात, जवळच्यांना fwd करतात, मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे ही नोंद घेतात व नंतर हे चेहरे ( सांगितले असेल तर नाव पण )विसरून जातात.
“ पण मुलींना हे करताना काही
“ पण मुलींना हे करताना काही वाटले नाही का याचा का नाही विचार केला? ” - त्या मुलींनी केलेलं कृत्य चुकीचं असेलही (मला सगळे डिटेल्स माहीत नाहीत म्हणून ‘असेलही’ असं लिहिलंय). पण तरिही मिडिया ट्रायलची आणि एखाद्याची प्रायव्हसी भंग करण्याची मुभा कुणालाही नसावी. कदाचित हे बेकायदेशीरही असू शकेल.
फेफ +१
फेफ +१
"वृद्ध व्यक्तींना फसवणारा भामटा" छाप लोक असतात त्यांच्या गुन्ह्यांची खात्री झाल्यावर त्यांचे चेहरे व ओळख उघड करणे हे इतरांकरता महत्त्वाचे असते - आणखी लोकांनी फसू नये म्हणून. या मुलींमुळे इतरांना काही धोका नाही. त्यांच्यावर केस होउन काय शिक्षा/दंड व्हायचा तो होईल. त्यांची ओळख पब्लिक मधे उघड करण्याचे काहीच कारण नाही. पब्लिकला त्या कोण आहेत हे माहीत असायचीही काही गरज नाही.
ज्यांनी कोणी तो व्हिडीओ काढला त्यांनीही फक्त तो पोलिसांना द्यायला हवा होता. पब्लिक मधे उघड करण्याने कोणालाही काही फायदा नाही. उलट यांची जात, धर्म, प्रांत ई ओळख जाहीर झाली तर रिकामटेकडे 'नेटकरी' सोमिवर आणखी भंकस करतील.
डाउनटन अॅबी मधे एक प्रसिद्ध संवाद आहे: It's not secret. It's private.
मीरा, फेफ, फा +१
मीरा, फेफ, फा +१
“ It's not secret. It's
“ It's not secret. It's private.” +१
It's not secret. It's private
It's not secret. It's private.>>> क्या ब्बात है!!
पुणे कोणता व्हिडीओ? म्हणजे लिंक नको पण विषय काय नक्की?
वेताळ टेकडीवर असुरक्षित जागी
वेताळ टेकडीवर असुरक्षित जागी कोपऱ्यात या मुली ड्रग आणि बियर घेऊन पडलेल्या होत्या(वैयक्तिक विचार: फक्त नशा करायला टेकडी चढण्या उतरण्याचे कष्ट घ्यायचे?बंड गार्डन च्या कोपऱ्यात बसा की! उतरताना पडलं वगैरे भानगडी नाहीत.किंवा कोणाच्या फ्लॅट वर जा.)
त्यांना 2 तरुणांनी गाडीवर बसवून सुरक्षित जागी आणलं(आता हे तरुणच वाईट असते तर काय होईल काय माहित.) आणि या सेलेब्रिटी ने चेहरे स्पष्ट दाखवून, क्लोजप घेऊन व्हिडिओ टाकलाय.आता चेहरे ब्लर केले असले तरी तो स्पष्ट चेहऱ्याने सर्व व्हॉट्सअप ग्रुप वर फिरलाय.
ड्रग घेणं चूक असलं, कायदेशीर नसलं तरी एखाद्याने दुसऱ्याला न विकता स्वतःची नशा केली, सार्वजनिक जागेत गोंधळ घातला नाही तर याला काही कायदेशीर कारवाई नसावी बहुधा. जिथे रेपिस्ट चे चेहरे झाकतात, तिथे या मुलींना त्यांच्या नोकऱ्या करियर सर्व व्हायचं असताना थेट पब्लिक केलंय.नोकरीत bgv मध्ये गुगल लेन्स ने व्हिडिओ मिळू शकतो, ओळख पटू शकते.
असे कुणीही कोणाचेही व्हिडिओ /
असे कुणीही कोणाचेही व्हिडिओ / फोटो व्हायरल करण्या विरोधात काही कायदा असेल ना? नसल्यास तसा कायदा करायला हवा.
हो मानव बरोबर आहे तुमचं.
हो मानव बरोबर आहे तुमचं. कोणाचीही आब्रु चव्हाट्यावर मांडायला लोकांना सहज सोपं काम वाटतं, पण तसं करताना हेच आपल्या बाबतीत घडू शकतं याचा विचार एक क्षणभरही लोक करत नाहीत. आणि अगदि जाता जाता कॅमेरा, रेकॉर्डिंग ची साधने उपलब्ध असल्याने वाट्टेल ते व्हायरल केले जाते. पुर्वि या गोष्टींचा रिच कमी होता कारण सोमी, मोबाईल वगैरे नव्हते.
या घटनेबाबत मतांची सरमिसळ आहे. कोण म्हणते व्हायरल झालं चेहरे दिसले बरं झालं, कोण म्हणतं चूक...
पण माझ्या मते अगदी तुम्हाला जे करायचं असेल ते आपल्या किंवा इतर कोणाच्या तरी घरी... सुरक्षित राहून करा...
मला तो व्हिडीओ आधी मिळाला.
मला तो व्हिडीओ आधी मिळाला. त्यात चेहरा ब्लरही नव्हता. तेव्हाच ऑड वाटले होते. कदाचित ज्यांनी त्या मुलींना मदत केली त्यांनी नंतर आपल्या अंगावर काही शेकू नये म्हणून व्हिडीओ बनवला असेल. पण जागृतीसाठी का होईना व्हिडीओ पोलीस सोडून इतर कुणाबरोबर शेअर करायची गरज नव्हती.
आता मला (म्हणजे रँडम व्यक्तीला) चेहरे आठवत नाहीत. पण भविष्यात बॅकग्राउंड चेक्स मध्ये या मुलींना त्रास होणार. मी व्यसनांना सपोर्ट करत नाही. कायदेशीररित्या व्हिडीओ शेअर करणे बहुतेक चुकीचे असेलच. पण माणुसकी म्हणूनही अडनिड्या वयात झालेल्या चुका ज्यामुळे इतर कुणाचे नुकसान झाले नाही त्याबाबत (मुलगे आणि मुली दोन्हींच्या बाबतीत) थोडे लीनायंट असण्याची गरज आहे.
या घटनेबाबत मतांची सरमिसळ आहे
या घटनेबाबत मतांची सरमिसळ आहे. कोण म्हणते व्हायरल झालं चेहरे दिसले बरं झालं, कोण म्हणतं चूक... >>>>> जे म्हणतात चेहरे दाखवणे चूक, त्यामागे भरपूर कारणं आहेत. मी ही ते म्हणते आणि मी आता किमान 7-8 कारणे लिहू शकते.
पण ज्या लोकांना वाटतं की चेहरे दाखवणे बरोबर त्यांनी किमान दोन पटेल अशी कारणं सांगावीत? दक्षिणा हे तुला उद्देशून नाही, पण या platform वर खरंच कोणाला असं वाटतं असेल तर मला समजुन घ्यायला आवडेल, कारण मला चेहरे दाखवणं अजिबात कोणत्याही कारणासाठी योग्य वाटलं नाही.
ते जे कोणी काका होते, त्यांनी तो व्हिडिओ live करायची खरंच आवश्यकता नव्हती. त्यानी काय अशी सामाजिक जागृती केली? आणि जी काही भाषणबाजी करायची होती किंवा व्हिडिओ करायचा होता, तो मुली न दाखवता देखील प्रभावी करताच आला असता. प्रसिद्ध होण्यासाठी काही वाट्टेल ते, यासाठी तो व्हिडिओ होता.
Sorry, pet peeves धाग्यावर हे
Sorry, pet peeves धाग्यावर हे फारच अवांतर झालं आहे, पण हा खुप गंभीर विषय आहे. ( त्यातील एखादी मुलगी आत्महत्या करू शकते, lifelong trauma आणि भविष्यावरती major impact असणार आहे) मी तो व्हिडिओ पाहिल्या क्षणापासून अतिशय अस्वस्थ झाले आहे. आणि इथे त्याबद्दल बोलल्याशिवाय राहावलं नाही.
Reels करताना, लाईव्ह व्हिडिओ बनवताना किंचित responsible आणि sensitive असावं एवढीच अपेक्षा आहे.
माझ्या पूर्वीच्या कंपनी WA
माझ्या पूर्वीच्या कंपनी WA group वर आलेला तो व्हिडिओ.
मुलींची व्यसन करणं ही जशी चूक आहे तसेच त्या मुलींचे चेहरे दाखवणं चूकच आहे.
या घटने बाबत इथे वाचून आणि
या घटने बाबत इथे वाचून आणि इथे जेवढं लिहिलंय तेवढं कळलं.
जर कुणाची चूक झालीही असेल तरी असे सरसकट कुणाचे व्हिडिओ, फोटो व्हायरल करणं योग्य नाही असे मला वाटते. चूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किती का असेना. कुठल्या परिस्थितीत ते पब्लिक करणं योग्य ठरेल यावर फारएण्ड यांनी एक उदाहरण दिले आहे. योग्य त्या ऑथोरिटीज कडुन ते तशा बाबतीत पब्लिक करावेत.
व्यसनांना आळा घालण्याची ही पद्धत योग्य नव्हे.
<<जी काही भाषणबाजी करायची होती किंवा व्हिडिओ करायचा होता, तो मुली न दाखवता देखील प्रभावी करताच आला असता. >> अगदी सहमत, असा तो व्हिडीओ असेल तर.
गंभीर विषय आहे. वेगळ्या
गंभीर विषय आहे. वेगळ्या धाग्यावर याची चर्चा व्हावी.
बरोबर
बरोबर
..
माझं अख्ख आयुष्य पेट पीव झालंय.
डोक्यात न जाणाऱ्या गोष्टी असा धागा पाहिजे.
मला चेहरे दाखवणं अजिबात
मला चेहरे दाखवणं अजिबात कोणत्याही कारणासाठी योग्य वाटलं नाही.±१००
भेटणे / मिळणे, बोलणे, म्हणणे
भेटणे / मिळणे, बोलणे, म्हणणे सांगणे बद्दल सहमत.. हिंदीच्या नकळत अतिक्रमणामुळे हे होत असावे. पेपी वाटत नाही, पण योग्य शब्द आहे तर वापरा कि असं येतं मनात.
बाकी प्रादेशिक लहेजांबद्दल मला तरी फार वावगे नाही. उलट मजा वाटते.. खान्देशी, मराठवाडी, वैदर्भी, सोलापुरी अश्या अनेक लहेजाचा वापर मला व्यक्तिनुरूप करता येतो याबद्दल माझे मला छान वाटते. (इथे मी मी माझे माझे करणाऱ्या लोकांबद्दल पेट पिव्ह असणाऱ्या लोकांनि मला माफ करावे).
पेट पिव्ह्स: रस्त्यावरील बेशिस्तपणा, सिग्नल लाल असताना आपण जर सर्वात पुढे असू तर सिग्नल सुटण्याच्या १०-१५ सेकंद आधी पॅ पॅ करणाऱ्यांचा भयंकर राग येतो.. बऱ्याचदा ८० सेकंद झालेले आहेत तर दहा सेकंद अजून थांबलात तर काय बिघडणार आहे असे भाव मनात येतात.
लिफ्टमध्ये असताना बऱ्याचदा लोकांना एकमेकांशी बोलायचं असतं , आणि ते जाणवतं, पण शिष्टपणापाई ते टाळतात बोलायला. का? मनात आहे तर बोला कि.. मग मी सुरुवात करतो असं लक्षात आल्यावर.
सगळ्यात मोठा पेपि. आपल्याला भूक लागलेली असते,किंवा खायची अतोनात इच्छा असते म्हणून कुठे हॉटेलात जावं, त तिथे नंबरलावायची वेळ... बरं हरकत नाही.. आपण विचारावं किती वेळ लागेल.. समोरच्याने सांगावं १० मिनिटे, आणि अजून २० मिनिट थांबा.. आधीच सांगा कि
गंभीर विषय आहे. वेगळ्या
गंभीर विषय आहे. वेगळ्या धाग्यावर याची चर्चा व्हावी. >>>>> हे कालपासून डोक्यात आहे. आज मी नविन धागा काढते. यावर भरपुर चर्चा व्हायला हवी, ज्या एखाद दुसऱ्या व्यक्तीला मुलींची चूक आहे, तर मग चेहरे दाखवायची लाज का वाटावी, असं वाटतं त्या लोकांचं मतपरिवर्तन व्हायला हवं. कालपासुन मी जिथे जिथे तो व्हिडियो दिसला तिथे सांगते आहे की थांबा, व्हिडियो करणाऱ्याने चूक केली आहे पण आपण ही forward ची साखळी तोडू. तेच जरा मोठ्या platform वर लिहिते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अशा विषयावरील सगळ्या वाचलेल्या कथा कादंबऱ्या, मुव्हीज, वेब सिरीज पाहुन मी मुलींच्या भविष्याबाबत हळवी झाले आहे. एक tight hug देऊन त्यांना सांगायचं आहे की अक्षम्य चुक केलीत, पण शिक्षा फार मोठी मिळाली. (मला माहित नव्हतं मी कोणा अनोळखीसाठी एवढी emotional होईन)
सार्वजनिक ठिकाणी, सज्ञान
सार्वजनिक ठिकाणी, सज्ञान व्यक्तीचा विना परवानगी फोटो/ व्हिडिओ घेणे/ न घेणे यात कायदा अजिबात असू नये. सद्सद्विवेक वापरावा. तो नसेल तर हे वरच्या सारखं होतं याचं भान ठेवावं.
मीराला अनुमोदन. तो व्हिडिओ
मीराला अनुमोदन. तो व्हिडिओ आला तेव्हा तोच विचार मनात आला.इतक्या लहान मुली त्या चुकीचे इतके मोठे कॉन्सिक्वेन्सेस कसे हँडल करतील! त्या मुलींनी सार्वजनिक ठिकाणी नशाबाजी केली ते चूकच पण या माणसाला त्याची शिक्षा त्यांना द्यायचा अधिकार कुणी दिला? दुर्दैवाने आपल्याकडे कॅमेरे अन फोन सगळ्यांकडे असतात पण कुणाच्या प्रायव्हसीचा भंग करण्याचा अधिकार आपल्याला नाही हा अवेअरनेसच नाहीये असे वाटते.
हे दुर्दैवी असलं तरी माझ्या
हे दुर्दैवी असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी फोटो/ व्हिडिओ काढायला कुणाच्याही परवानगीची गरज नसते. फोटो कुणाला विचारुन काढावे, प्रायव्हसी जपावी हे सगळं योग्य आणि बरोबर, बेसिक डिसेंसीत मोडणारं असलं तरी कायद्याने तसे करण्याची काही गरज नाही. जग तुमची प्रायव्हसी जपणार नाही, ती तुमची तुम्हालाच जपायची आहे.
सार्वजनिक ठिकाणी फोटो/
सार्वजनिक ठिकाणी फोटो/ व्हिडिओ काढायला कुणाच्याही परवानगीची गरज नसते. >> +१
जग तुमची प्रायव्हसी जपणार नाही, ती तुमची तुम्हालाच जपायची आहे. >> +१
मुलींऐवजी व्हिडीओत मुलगे असते तर त्यांच्या भविष्याबाबत इथे कुणी इतके हळवे झाले असते का, असा विचार मनात डोकावून गेला.
मुलगे/मुलांचे चारित्र्य
मुलगे/मुलांचे चारित्र्य/बदनामी हे तितकेच महत्वाचे आहे.पण पुरुष मंडळी एकंदर व्हॉल्युम ऑफ कंटेंट ने चेहऱ्यासहित लक्षात राहत नाहीत.बायका मात्र बरोबर लक्षात राहतात(हे वाक्य वरकरणी सेक्सीस्ट आहे, पण यात संख्या आणि त्यामुळे विसरणे/लक्षात राहणे हा महत्वाचा मुद्दा आहे.)
शिवाय उद्या यांच्यासोबत छेडछाड झाली त्या राहतात त्या परिसरात, आणि 'या मुली तसल्याच, व्हिडीओच आहे, यांनीच आम्हाला लाईन दिली' म्हणून तक्रारीकडे दुर्लक्ष होईल का असंही वाटतं.हे सर्व फार फेच्ड आहे, पण अश्या घटना झालेल्या आहेत.
Pages