Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुकून बारामती ब्लुज वाचलं.
चुकून बारामती ब्लुज वाचलं.
काल मिस परफेक्ट नावाची सिरीज
काल मिस परफेक्ट नावाची सिरीज पाहिली, मूळ तेलगू हिंदीत पाहिली.एकंदर 90ज ची कथा आहे आजची दाखवली असली तरी
सिरीज चा प्रतिसाद चित्रपट धाग्यावर लिहिला.गल्ली चुकली.
बार्बारियन काल पहिला असाच चाळत चाळत. एकदा बघायला चांगला आहे.इट मधला जोकर भूत तसा दिसायला चांगला आहे.एरवी इट मधली भूमिका त्याने केली नसती तर साधा दिसायला चांगला मुलगा वाटला असता.पण आता त्याने काहीही केलं, नुसता हसला किंवा बोलला तरी भीतीदायक वाटतो.
खो गए हम कहां (नेटफ्लिक्स)
खो गए हम कहां (नेटफ्लिक्स)
आवडला.
तिघांची कामं मस्त. सिनेमातून दिलेला संदेश छान आहे. कालसुसंगत. फक्त मध्ये स्क्रिप्ट जरा ड्रॅग झाल्यासारखं वाटलं. सिनेमाची लांबी कमी हवी होती.
अनन्या पांडे अगदी सहजतेने वावरते. काही काही क्लोज-अप्समध्ये तिचे डोळे विचित्र वाटतात, पण ठेवणच तशी असावी.
स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या सीन्समध्ये सि.च.ने लावलेला आवाज आवडला.
नील परेरा झालेला कलाकार म्हणजे 'गन्स अॅन्ड गुलाब्ज'मधला छोटू. छोटूचं पात्र जबरी लिहिलंय. त्याच्या तुलनेत नीलचं पात्र ओके-ओके आहे. पण त्यानं काम तितकंच छान केलंय. कलाकारांच्या ताज्या फळीतलं एक प्रॉमिसिंग नाव.
नवीन युगाचा दि.चा.है. अशा अपेक्षेने मी बघायला सुरुवात केली होती, पण त्या लेव्हलचा नाहीये.
मानव , मी पण बारामती वाचले !
मानव , मी पण बारामती वाचले !! आणि पुढे चाईल्डीश वाचून
आंSS झाले.
मानव तुमची कमेण्ट वाचून ते
मानव तुमची कमेण्ट वाचून ते बारामती नाही हे समजले.
खूप वेळ विचार करत होतो. ब्ल्यू म्हणजे थंड रक्ताचे या अर्थाने आहे कि कसे...
हो, मीही बारामतीच वाचलं होतं
हो, मीही बारामतीच वाचलं होतं कमाल आहे!
मी ही
मी ही
थोडं इंटेंशनल अन् थोडं अन् इंटेंशनल >>> अनइंटेशनल कोठे ते जरूर लिही
स्वीट कारम कॉफी बघत आहे..आधी
स्वीट कारम कॉफी बघत आहे..आधी छान वाटला पण काही गोष्टी जरा ओढून ताणुन वाटत आहेत. जुनी हीरोईन लक्ष्मी आजी, रोजा वाली मधू सून & नात १ तरूण मुलगी अशा तिघी आयुष्यात कधी ही एकटीने काहीही केले नसताना रोड ट्रीप वर निघतात & जीवन नव्याने उलगडतात. थ्रिल, स्वातंत्र्य अनुभवतात. अशी थीम आहे.
ह्यात पुण्यातले १ खूप छान घर दाखवले आहे, अंगण वगैरे असलेले.
@vijaykulkarni +१
@vijaykulkarni +१
upsc बद्दल सहमत
अनेक विद्यार्थी बाकीच्या संधी सोडून खूप upsc चाच अट्टाहास धरतात
फायनली!! अॅनिमल पाहीला.
फायनली!! अॅनिमल पाहीला. हड्डी सारखाच अति हिंसाचाराने भरलेला - अतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअतिअति!!!
ब्रेसिअर च्या वळाचा सीन आक्षेपार्ह वाटला. भाषा ही मधे मधे ओव्हर्ट आहे.
चुप चा रिव्ह्यू कुणी लिहीला
चुप चा रिव्ह्यू कुणी लिहीला आहे का ? माझ्याकडून मिस झाला असेल.
बहुतेक नाहीच माबोवर.
चुप पाहिल्यावर का ते समजले.
इथेही कुणी गुरूदत्त फॅन असू शकेल.
चुप चा रिव्ह्यू कुणी लिहीला
डुप्रका
इथेही कुणी गुरूदत्त फॅन असू
इथेही कुणी गुरूदत्त फॅन असू शकेल.
>>
चुप चा सस्पेन्स अजून चांगला मेन्टेन करता आला असता
थीम चांगली होती, पण बनवताना माती खाल्ली
सलमान चं काम चांगलं आहे
सनी पूजा ला अंगरक्षक अन् चॅम्पियन नंतर स्क्रीन शेअर करताना बघायला छान वाटलं. पास्ट रेफरन्स असते तर मजा आली असती
चुप चा सस्पेन्स अजून चांगला
चुप चा सस्पेन्स अजून चांगला मेन्टेन करता आला असता >>> सस्पेन्स कधीच नव्हता. पहिल्यापासून माहिती असतं खूनी कोण आहे ते.
सस्पेन्स कधीच नव्हता.
सस्पेन्स कधीच नव्हता. पहिल्यापासून माहिती असतं खूनी कोण आहे ते
>>
एक्झॅक्टली माय पॉइंट
सस्पेन्स मेन्टेन केला असता तर इंटरेस्टिंग झाला असता
सामो भापो...
सामो भापो...
मी अॅनिमल बघायला सुरुवात केली होती. पण रिव्ह्यु आधीच वाचल्याने पुर्वग्रहदुषित झाली होती नजर... बन्द्च करून टाकला.
Dunki is on Netflix. Thank
Dunki is on Netflix. Thank God I didn't watch it in theater. कसला बकवास आहे. कुठेच पकड घेत नाही.
ब्लॅक - अमिताभ आणि रानी
ब्लॅक - अमिताभ आणि रानी मुखर्जी - मस्तच!!! रानी चे काम फार आवडले. नेफि
खिलाडी ७८६ - आचरट आणि विनोदी सिनेमा आहे. मला आवडला. मला वाटतं ओटीटी वर नाही.
Dunki - टोटल फसलेला सिनेमा.
Dunki - टोटल फसलेला सिनेमा.
त्यातल्या फक्त दोन गोष्टी आवडल्या : वन-लायनर स्टोरी आणि शेवटी दाखवलेले खरेखुरे स्थलांतरित कोणते धोके पत्करतात त्याचे फोटो.
गेल्या आठवड्यात Mission:
गेल्या आठवड्यात Mission: Impossible – Dead Reckoning Part One बघितला . थेअटर ला जाईन जाईन म्हणता म्हणता बघयचा राहीला होता .
टॉम क्रूझ च्या चेहर्यावर वय जास्तच दिसायला लागलय . पण ही सीरीज नेहमीच आवडते , तसा हाही सिनेमा बघायला मजा आली . थिएटर्मध्ये जास्त छान वाटला असता.
मग प्राईमचा अल्गोरिथम बरोबर चालला त्याने बाकीचे सगळे MI रेकमेण्ड केले . त्यातला दूसरा बघितला . chimera virus वाला . टॉम क्रुझ अशक्य डोळ्यात बदाम दिसतो यात .
त्या हॅन्गओवर मध्ये त्याचे आणखी दोन चित्रपट शुक्रवार-शनिवार मध्ये बघून टाकले . दोन्ही ही मी पहिल्यान्दाच बघितले , आवडले .
vanilla sky - डोक भांजाळून गेलं . कथा कुठे सुरु होते आणि कुठे संपते कळत नाही . मला inception ही कळला नव्हता पण आवडलेला . तसाच हाही बघायला आवडला . कॅमरून डायझ मला नेहमीच फार ईरिटेटीन्ग वाटते . पीनलोपे क्रूझ क्युट वाटते , टॉम क्रुझ बद्दल .. जाउ दे .
rain man : हा सुद्धा खूप आवडला . फार रडवणारा नाही , ऊगाचच भाषण्बाजी नाही , उगाचची संकटं नाहीत . फक्त शेवटी शेवटी डॉक्टर्सच्या मीटीन्गम्ध्ये ते दोघे बाहेर गेल्यावर - चार्ली आणि रे चे संभाषण आहे , तो सीन बघताना भरून आलं . शेवट ही एक्दम योग्य केलाय , उगाचच फिल्मी नाही .
The Green Knight बघितला. नाही
The Green Knight बघितला. नाही आवडला, प्रचंड बोर झाला. शेवट त्यातल्या त्यात बरा होता.
तेरी बातोमे ऐसा उलझा जिया -
तेरी बातोमे ऐसा उलझा जिया - एकदम लाइट, बर्यापैकी टाइमपास आहे! समहाऊ अपेक्षा अजिबात ठेवल्या नव्हत्या पण प्लेझन्टली सरप्राइज्ड.
फायटर - बघू नये असा सिनेमा.
फायटर - बघू नये असा सिनेमा.
मी सहसा पिसे काढण्याकरता म्हणून सिनेमा पहात नाही पण यात पिसांशिवाय दुसरं काहीच नाहीये. पिसाचा झुकता मनोरा पडला असावा आणि पिसंच पिसं विखुरली असावीत अशी परीस्थीती आहे.
टॉप गनची नक्कल करावी असं आधी ठरलं असावं. त्यामुळे विमाने, हृतिक आणि गीटार असलेलं बॅकग्राऊंड म्युझीक घेतलं. इथपर्यंत ठीक होतं, पण स्टंट करताना दिग्दर्शकही विमानात बसला असावा. विमान उलटं झालं आणि त्याच्या मेंदूनेही कोलांटी मारली असावी. पण त्यालाच का दोष द्यावा? सिनेमात ५ मिनीटाचा आशुतोष राणाचा एक सीन सोडल्यास बघावे असे काहीच नाही.
सिनेमाचे तंत्र इतके विकसीत झाले आहे. पण तरीही जवळपास ४० वर्षांपूर्वीचा टॉप गन तांत्रिक बाबतीत (खास करून स्टंट्सच्या बाबतीत) खूपच उजवा आहे. 'अर्ज किया है कमीने' अशा लेव्हलचे संवाद आहेत - कमीन्यापुढे अर्ज का करावं हे तो संवादलेखकच जाणो. लॉजीकच्या नावाने तर बट्ट्याबोळच आहे. सिनेमा लढाईवर आहे की मित्रा-मित्रांच्या पिकनीकवर आहे ते समजणे कठीण आहे.
फारएण्ड, श्रद्धा, अस्मिता अशांनी नक्की बघावा असा सिनेमा आहे
वन-लायनर स्टोरी आणि शेवटी
वन-लायनर स्टोरी आणि शेवटी दाखवलेले खरेखुरे स्थलांतरित कोणते धोके पत्करतात त्याचे फोटो. >>> मी शेवटची १५-२० मि. अजून पाहिलेली नाहीत. त्या कंटेनर नाट्यापर्यंतच पाहिला आहे. पण वन लायनर स्टोरी म्हणजे कशाबद्दल?
पिसाचा झुकता मनोरा पडला असावा
पिसाचा झुकता मनोरा पडला असावा आणि पिसंच पिसं विखुरली असावीत अशी परीस्थीती आहे. >>>
मस्त लिहीलंय.
एका हिंदी सिनेमात चॉपर उलटं उडताना दाखवलं आहे. कुत्र्याला अंघोळ घातल्यावर फिरायला नेलं कि ते कसं जमिनीवर लोळण घेतं. चारी पाय वर आणि पाठ जमिनीला टेकलेली तशा पद्धतीने चॉपर उडत असतं. माझ्यासोबत नेव्हीतला मित्र होता. तो इतक्या जोरात ओरडला "बुलशीट ! .. चॉपर कान्ट डू दॅट "
असला काही सीन आहे का यात ? असेल तर बघेन.
१००० करोड वैगरे फुगवलेले आकडे
१००० करोड वैगरे फुगवलेले आकडे आहेत का? इतक्या प्रचन्ड भिकार सिनेमासाठी कुणी पैसे देत असेल तर धन्यच आहे, शाखा स्वतःच्याच सिनेमात अशरशः पाट्या टाकतो...स्वतःला तरुण दाखवायच म्हणजे आपली अॅक्टिन्ग ही त्याच बाळ लेव्हलची आणायची का? क्लोजप मधे तर खप्पड डोळे खोल गेलेला शाखा अगदीच बघवत नाही....थोराड राज कपुर आणी लिना चन्दावरकर चया सिनेमात राज कपुरही असाच भयानक दिसला होता... इट्स हाय टाइम शाखाने आपल वय झालय हे मान्य कराव आणी बळजबरिनेच तरून दिसायचे हट्ट सोडाव त्याने तो हास्यास्पद दिसतोय....बाकी सिनेमाचा विषय, सादरिकरण्, एक दोन विनोद भयकर बाळबोध त्यामुळे तिथेही सगळा उजेडच!
तापसी बरी आहे पण मुळात विषयच इतका महाबोअर आहे ती काय सादर करेल?
अमके करोड वगैरे म्हणजे
अमके करोड वगैरे म्हणजे तितक्या जास्त थिएटर, परदेश, इकडे तिकडे, ओटीटी वर विकून मिळवलेली टोटल रक्कम असेल तर बरोबर असेल.पण मूळ मोठे कलाकार, शूटिंग खर्च,डिस्ट्रीब्युशन खर्च इतका असतो की त्यांना 'अमके तमके हजार कोटी' रेकॉर्ड धंदा झाल्याशिवाय मूळ भांडवल निघून नफा पण होत नसेल.पैसे जास्त टाकले, जास्त ठिकाणी प्रकाशित, त्या सर्व ठिकाणी (अमेरिका कॅनडा परदेश-इस्लामिक देश)इतर चॉईस नसल्याने जास्त धंदा असं गणित असेल.
ती गणीत तर आहेतच ग पण तरी
ती गणीत तर आहेतच ग पण तरी प्रेशकानी १००० रुपये खर्च करावे अस खरच काहीही नाही.
शाखा तरुण दखवला तेव्हा ३५ चा
शाखा तरुण दखवला तेव्हा ३५ चा असेल तर २५ वर्ष्यांनंतर तो ६०. मग मेक अप करायची काय गरज? आहे तसा दाखवायचा की..
बहुतांश सगळा पी आर आहे. एखादा
बहुतांश सगळा पी आर आहे. एखादा पिक्चर जेव्हा महाप्रचंड हिट गणला जातो तेव्हा आपण, आपल्या ओळखीचे अनेक लोक यांनी तो थिएटर मधे जाऊन पाहिलेला असतो. काहींनी एका पेक्षा जास्त वेळा पाहिलेला असतो. तो खरा हिट. बाकी सगळे नुसते कमर्शियल नंबर्स. ओटीटी राइट्स ई पासून. त्यातही कोणत्या पिक्चरला ओटीटी करता जास्त पैसे मिळाले वगैरे रँकिंग असेलच. पण तो खरा लोकप्रियतेचा बॅरोमीटर नाही.
अॅनिमल मधे रणबीरच्या इण्ट्रोला "सुपरस्टार" हे दिसले तेव्हाच तेलुगू चित्रपटसृष्टीचा प्रभाव दिसला. तेथे ही नावे निर्माते देतात. हिंदीमधे प्रेक्षक ठरवतात साउथ मधे निर्माते पेड पब्लिसिटी भरपूर करतात. तेच आता हिंदीतही त्या स्केलवर सुरू झाले आहे. पी आर मधून प्रचंड हवा निर्माण करणे.
अॅनिमल मी टीव्हीवर सुद्धा कसाबसा पूर्ण पाहिला.
Pages