नमस्कार,
येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.
वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती: रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.
जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.
चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात
अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे
Photo 1:
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत
Photo 2
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.
आज कित्तीतरी दिवसांनी/
आज कित्तीतरी दिवसांनी/ महिन्याने आले माबोवर, आधी आले असते तर तुम्हाला भेटता आले असते
मस्त गटग, मस्त वृतांत
पियू, मला यायला आवडेल तळजाईला
>> पुन्हा असं गटग झालं
>> पुन्हा असं गटग झालं (तळजाईलाच), येत्या एक दोन रविवार मध्ये.. तर
कल्पना चांगली आहे. अधूनमधून गटग करायला हरकत नाही. या भागातल्या प्रत्येक गटग साठी प्रत्येक वेळी वेगळा धागा काढण्यापेक्षा, हाच धागा continue करता येईल. सध्या माझे काही विकांत अनिश्चित आहेत. कदाचित यायला जमेल कदाचित नाही. पण नंतर जमेल.
जो/जी विकांताला उपलब्ध आहे गटग त्यांनी करायचे असल्यास या धाग्यावर दोन तीन दिवस आधी इथे मेसेज केला व त्यास प्रतिसाद आले तर वेळ/ठिकाण ठरवून त्यानुसार सर्वाना भेटता येईल'.
उद्यानाची वेळ पाहता मुंबईतील
उद्यानाची वेळ पाहता मुंबईतील लोकांना पुण्यात कुणाकडे राहूनच ती जागा पाहता येईल. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वेळ ठेवायला हवी.
मंडळी
मंडळी
आज आणि उद्या गोखले इन्स्टिटयूट , बी एम सि सि कॉलेज जवळ , मटा आयोजित कलासंगम हा कार्यक्रम आहे . कार्यक्रम सर्वांसाठी आणि विनामूल्य आहे . त्यामध्ये अनेक वर्क शॉप्स आहेत , आणि इतरही अनेक कार्यक्रम आहेत .
त्याचे वेळापत्रक मटा वर कृपया पहा
मी तिथे जाणार आहे दोन्ही दिवस
जर आपण आलात तर भेट होईल
कार्यक्रम पाहता येईल किंवा स्वतंत्र गप्पाही मारता येतील
वेळ - २ ते ८
त्वरा करा, नोंदणीची अखेरची
त्वरा करा, नोंदणीची अखेरची तारीख उद्याच संपतेय. अधिक माहितीसाठी हा धागा पहा:
https://www.maayboli.com/node/85290
Pages