सहकारनगर, पुणे गटग

Submitted by अतुल. on 30 January, 2024 - 11:19
ठिकाण/पत्ता: 
तळजाई मंदिर.

नमस्कार,

येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.

वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती:
रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.

PXL_20240201_120638638.jpg

जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.

चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात Happy

अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे

Photo 1:

Screenshot_20240204-110232.png
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत

मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

Photo 2
Screenshot_20240204-105253.png
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 3, 2024 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि..
तेजो यांनी सप्रेम भेट दिलेले स्वादिष्ट मुखवास चूर्ण हे कसे विसरता येईल ?

कोथिंबिरीची वडी कोणाची होती ते विसरलो, पण खूप चविष्ट होती !!

आणि बिपीन यांचा केशरी पेढा तर काय एकदम मधुरच ..

च्यामारी तेजो.. अनुल्लेखाने मारले मला Lol

खूप खूप मस्त झाले गटग.
धावपळ करत आजारी लेकाला घेऊन उशीरा पोचले. आणि इट वॉज वर्थ इट !!

अ तुल, हर्पेन आणि दक्षिणा, बिपीन सांगळे यांना ओळखता आले. डॉ. कुमार यांनी सांगितले म्हणून निळे जर्किन, टोपी पाहिले. पण हरपेन यांचे ही निळे जर्किन आहे. स्वेटरवाले डॉक्टर आहेत बहुधा.
नाईकी टी शर्ट function at() { [native code] }अरंगी कि पाशुपत ?

जे ओळखू आले नाहीत त्यांची क्षमा मागतो. त्यांनी स्वतःच खुलासा केल्यास छान.

मस्त आलाय photo..
खाऊ साठी तरी gtg miss करायला नको हे समजले Proud

स्वेटरवाले पशुपत
कुमार१ :
मोरपंखी निळे जर्किन व चश्मावाला
( बिपीन सांगळे यांच्या शेजारी).

अंदाज:
नाईकी- अतरंगी, सगळ्यात उजवीकडे पशुपत.

अरे वाह छान झाला गटग.. आणि खरेच झालाही
फोटोत पुरुष मंडळी पुढे आणि बायका मागे हे फार आवडले.

अरे वाह छान झाले gtg
अतुल, harpen ह्यांना कधी भेटलो नाहीये अजून पण ओळखले.
दक्षिणाला भेटलोय त्यामुळे साहजिकच ओळखतो.
बाकीचे कोण ते आता वाचून लक्षात येईल.

उरलेल्या सगळ्या अश्विनी.
>>> मायबोलीवरील अश्विनींची एकूण संख्या अचूक मोजून दाखवा ही स्पर्धा ठेवलेली आहे Happy

सविस्तर वृत्तांत……

हर्पेन व अतुल यांनी गटग करायचा विषय काढल्यावरच मी ठरवलं होतं की या गटगला नक्की जायचं.

सकाळी सकाळी ६.३०ला घरातून निघालो आणि शंभर दिडशे मीटर गेलो नाही तर हर्पेन दादा पळत पळत क्रॅास झाला. हायला हा ईकडे कुठे म्हणून गाडी थांबवे पर्यंत तो पुढे निघून पण गेला. हा आता रनिंग करून घरी जाऊन गटगला साडेसातला कसा पोचणार का कल्टी देणार हा विचार डोक्यात आला. मग म्हणलं अरे हा माबोचा आयर्न मॅन तिकडे असाच पळत पळत पोचायचा तर विचार करत नसेल ना? त्याला काय अशक्य आहे म्हणा…. त्याच्या फोटोज वरून लक्षात आलेच असेल की तो तसाच पळत पळत तिथे पर्यंत पोचला.

माझी कामं उरकून पार्किंग शोधून मला तळजाईला पोचायला ७.५० झाले. मंदिरात चक्कर मारून आलो तर कोणी दिसले नाही. अतुल यांना कॅाल केला तर त्यांनी ऊचलला नाही.( याबद्दल त्यांचा णिशेध!!!!)

मी पोचलो तो पर्यंत हर्पेन, अतुल, तेजो, २ अश्विनी आलेले होते. माबोकरांच्या दणदणीत आवाजाची सवय असलेल्या मला ही शांतपणे गप्पा मारत बसलेली मंडळी नविनच वाटत होती. मंदिराचा किंवा भल्या पहाटे साडेसात वाजता भेटल्याचा परिणाम असावा.
हर्पेनने सगळ्यांसाठी गिफ्ट आणली होती. तेजोने पण घरी बनवलेला मुखवास सर्वांसाठी आणला होता. तिला “ नुस्ताच मुखवास? जेवण झाल्यावर खायचा असतो ना हा?” असं म्हणल्यावर तिने पर्समधून कोथिंबीरीच्या छान कुरकुरीत वड्यांचा डबा काढून हातात दिला. चहा पिताना मी त्या सगळ्या संपवून टाकल्या. बिपिन यांनी आणलेली मिठाई पण छान होती.

बऱ्याच माबोकरांना पहिल्यांदाच भेटलो. निवांत गप्पा झाल्या. बिपिन यांनी मस्त कवित सादर केली. दक्षिणा यांची अनपेक्षित, योगायोगाने भेट झाली.

छोटेखानी, पटकन ठरलेले व जमलेले गटग मस्त रिफ्रेशिंग झालं. सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला……

आज रविवार, तळजाईवर आज आधीच गर्दी असते त्यात भर म्हणून आज तिथे जवळच्या स्टेडियमवर किड्स मॅरेथॉन हा मोठा इव्हेंट आयोजित केलेला होता त्यामुळे गर्दी जास्तच होती. बाईक पार्क करताना एक सभ्य गृहस्थ बाजूलाच त्यांची गाडी पार्क करत होते. न जाणो गटग माबोकर असतील म्हणून त्यांना मदत केली. पण ते कुणी माबोवर वगैरे नव्हते असे नंतर लक्षात आले. पण तोवर हर्पेन यांनी हे सगळे दुरून पाहिलेले होते. भेटल्यावर त्यांनी मला त्याबद्दल विचारले देखील Lol

असो, तर अशा रीतीने मंदिरात पोहोचलो. पाहतो तर माझ्या आधी अश्विनी११, अश्विनी डोंगरे, तेजो ह्या आल्याचं होत्या. हाय हॅलो होऊन मोजक्या गप्पा होतात तोवर आयर्नमॅन हर्पेन पोहोचले. मग गप्पांना ऊत आला. पाठोपाठ श्री व सौ पशुपत हे दोघे आले व थोड्याच वेळात अतरंगी सुध्दा पोहोचले. मग गप्पा अजून रंगल्या.

यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. आम्ही बसलो तिथे थोड्या वेळात अजून एक अनोळखी तरुण येऊन जणू आमच्यातच सामील व्हावा तसा बसला. आता इथे काही माबोकर प्रथमच भेटत होते त्यामुळे कळेना की हा कोण माबोकर आहे का अजून कोणी? त्याला विचारले तर तो नाही नाही म्हणाला खरा. पण त्याला "आम्ही एकत्रच आहोत, एक ग्रुप आहे आमचा हा" असे सांगूनही साहेब तिथून हलायला तयार नाहीत. तेंव्हा मात्र आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो. अखेर हर्पेन यांनी कोंडी फोडली व त्याला विचारले, "तू काय कुणापासून लपून वगैरे बसायला आला आहेस का मंदिरात?" Lol Lol मग मात्र बिचारा ओशाळला आणि दूर जाऊन बसला. (मला मात्र अजूनही शंका आहे की तो कोणी ड्यूआयडी असावा Proud Light 1 )

आशा रीतीनं सगळे जमले. थोडया वेळात बिपिनसांगळे सुद्धा आले. आता फक्त कुमार सर आणि पियू हे राहिले होते. पैकी कुमार सरांनी सांगितले की किड्स मॅरेथॉनमुळे खूपच ट्रॅफिकमुळे पुढे येताच येत नाही. पियू यांची सुद्धा तीच स्थिती.

कुमार सर आल्यावर ओळख परेड झाली. सरांचे लेख वाचून सर्वाना त्यांची तशी ओळख होतीच. पण लिखाणामागच्या लेखकाला भेटण्याचा आनंद काही औरच होता व सर्वांच्या चेहऱ्यावर तो दिसत होता. आठ दहा जणांचा ग्रुप. सोबतीला तेजो यांनी आणलेला खाऊ आणि हर्पेन यांनी गिफ्ट म्हणून सर्वांसाठी आणलेले मल्टीपर्पज स्कार्फ. गप्पा आणि हास्यविनोद यांचा फड रंगला. सर्वच जण अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे एकमेकांशी बोलत होतो.

बघता बघता वेळ गेला. पुढे सर्वांनी चहा ब्रेकफास्ट घेतला. तोवर चिरंजीवासहित पियू आल्या. मग फोटोसेशन झाले. मग ज्यांना लवकर जायचे त्यांना बाय बाय केल्यावर पुन्हा गप्पा सेशन झाला. सर्वांनीच आपापली दीर्घ ओळख करून दिली. करीयर व लेखन इत्यादी. बिपिन यांचे कविता वाचन झाले.

गप्पा मारत विविध क्षेत्रांतून आलेल्या आपणा सर्वांनी आपापले अनुभव व विचार शेअर केल्याचा अनुभव स्मरणात राहतो. अशी अनौपचारिक गटग अधूनमधून व्हायला हवीत असे सर्वांनीच बोलून दाखविले.

आणि अखेरचा टप्प्यात आश्चर्याचा धक्का द्यायला (आणि घ्यायलाही) दक्षिणा आल्या. त्यांना या गटग ची कल्पना नव्हती. त्या त्यांच्या त्यांच्या प्लॅनिंग नुसार आल्या होत्या. माबोच्या सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक दक्षिणा. त्यांचे तिथे नेमके यावेळी उपस्थित होणे हा विलक्षण योगायोग होता. अर्थातच गप्पांच्या मैफिलीत त्याही सामील झाल्या.

असेच अधूनमधून भेटण्याचे ठरवून दहा वाजता सर्वांनी एकमेकांना टा टा बाय बाय केले आणि या गटग ची सांगता झाली.

ता. क. मुंबईकर तसेच पुणेकर व देश विदेशातल्या सर्वच जुन्या नव्या माबोकरांची गप्पांच्या ओघात आठवण निघाली. उचक्या तर लागल्या असतीलच Proud (विशेषतः रूनमेष ची आठवण. माबो चे गटग आणि रूनमेष ची आठवण निघाली नाही हे होऊच कसे शकेल ना?)

सर्वांचे वृत्तान्त मस्तच !!! सर्व प्रथम गटग चा धागा काढण्यापासून वेळोवेळी अपडेट देऊन गटगचे संयोजन करणाऱ्या अतुल यांचे आभार !!!
सर्व जुने , नवीन, अभ्यासू लिखाण करणारे , वाचनमात्र असणारे , कधी कधी प्रतिसादातून लिहिते होणारे , मायबोलीचे आयर्नमॅन या सर्व लोकांना भेटून आनंद झाला . दक्षिणा यांची भेट मी लवकर गेल्यामुळे झाली नाही .
तेजो यांनी आणलेली कोथिंबीर वडी , मुखवास , बिपिन यांनी आणलेली मिठाई , हर्पेन यांनी दिलेली स्कार्फ भेट आवडली.
असेच मधून गटग आयोजित करून सर्वांना भेटायला आवडेल.

वरच्या एका फोटोत माझा एक हात दिसत नाहीए.

फोटो काढताना अगदी रिफ्लेक्सने हातात बाटली आहे तर ती लपवली. मग नंतर लक्षात आलं की अरे फक्त पाणीच
तर आहे त्यात.

फोटो काढताना नेहमी आधी बाटली लपवायची सवय अजून सुटली नाही….. Lol

gtg छानच झालेलं दिसतंय!
कुमार१ ह्यांना पाच वर्षांपुर्वी, बहुतेक ह्याच तारखेला (चु.भु.द्या.घ्या.) पहिल्यांदा आणि गेल्या वर्षी ह्याच तळजाई परिसरात दुसऱ्यांदा भेटलो असल्याने त्यांना आणि बिपिनरावांना ह्याआधी फोटोत पाहिले असल्याने दोघांना ओळखता आले.

वेळ आणि स्थळ दोन्ही सोयीस्कर नसल्याने इच्छा असुनही आजच्या gtg ला उपस्थीत रहाता आले नाही ह्याची वाटलेली खंत अतरंगी ह्यांच्या प्रतिसादातील "तिने पर्समधून कोथिंबीरीच्या छान कुरकुरीत वड्यांचा डबा काढून हातात दिला." हे वाक्य वाचल्यावर शतपटीने वाढली! फार आवडता पदार्थ खाण्याची संधी हुकली Sad

संजय
पुन्हा कधीही या हो पुण्यात !
देऊ ना तुम्हाला खायला त्या वड्या Happy

खाऊ साठी gtg worth आहे. जायलाच पाहिजे.. Proud

मी लिहिला होता का असा प्रतिसाद? Type केल्यासारखं वाटत आहे.
खाऊ बद्दल वर्णन करून न आलेल्याना जळवू असं ठरलं असेल नक्कीच Lol

अजून एक
या निमित्ताने माबोच्या निव्वळ वाचकांना देखील भेटता आले. त्याचा आनंद वेगळाच असतो.

Pages