सहकारनगर, पुणे गटग

Submitted by अतुल. on 30 January, 2024 - 11:19
ठिकाण/पत्ता: 
तळजाई मंदिर.

नमस्कार,

येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.

वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती:
रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.

PXL_20240201_120638638.jpg

जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.

चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात Happy

अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे

Photo 1:

Screenshot_20240204-110232.png
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत

मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

Photo 2
Screenshot_20240204-105253.png
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 3, 2024 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याची संस्कृती घालवणार
असं हे सर्वच शहरांत चाललं आहे. एकाच पद्धतीची घरं, एकाच पद्धतीच्या शाळा, बोलणारी लोकं, हॉटेलांत एकाच प्रकारचे मेन्यू आणि कार्डं. सपाटीकरण .

सपाटीकरण परवडलं. पण ते तुम्ही अशुद्ध बोलता आम्ही शुद्ध बोलतो म्हणुन तुम्ही कम अस्सल माणूस. आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ ते नको. हो़उ देत सर्व युझर इन्टरफेसेस चे सपाटीकरण.

अश्विनी११, आम्ही मात्र योग्य निर्णय घेऊन विणकर सभागृहाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने परत आल्यामुळे विनासायास पटकन बाहेर पडलो..

कोणालाही कळायच्या आत सगळ्यांच्या खादाडीचे बील पशुपत यांनी भरले. >>> पशुपत मूळ गाव कुठले ?
पुढच्या गटगला तुम्ही येत असाल तर कळवा.

SRD, सामो, अस्सल पुण्यात रेस्टॉरंट मध्ये फक्त सकाळी, फक्त दुपारी/सायंकाळी अशा पाट्या असतात. ते पदार्थ ठरलेल्या प्रमाणात करतात, संपले की त्या दिवसा करता संपले. पाटी मेनू कार्डवर न लिहिलेल्या गोष्टी कुणी मागितल्यास "जे लिहिलंय तेच मिळेल, त्याच वेळेत मिळेल" असे बाणेदारपणे उत्तर देण्याची पद्धत आहे.
तेव्हा 'तुम्ही काय म्हणाल ते करून देऊ' असे उत्तर आले हे वाचुनच मला इतक्या लांब, एकीकडे गहिवरून आले, तर दुसरीकडे पुण्याच्या संस्कृतीवर असा घाला होत आहे हे पाहुन हळहळही वाटली.
तुम्ही वेगळे बेअरिंग पकडले असे वाटले म्हणुन हे स्पष्टीकरण.
अवांतरा बद्दल क्षमस्व गटगकरांनो

हो ना, पोहे खाण्यात सर्वजण मग्न असताना पशुपत जी यांनी बिल भरून टाकले.

बायदवे पशुपत माफ करा पण तुमची विपु आता पाहिली (गटग होऊन गेल्यावर!) हल्ली माबो विपु चे ईमेल नोटिफिकेशनच येत नाही. पण असो मी तुम्हाला इमेल केला आहे नंबर.

विमलाबाई गरवारेतल्या मायबोलीकरांचे असंच एक फास्टट्रॅक गटग जमवा की !!

बघू कसं जमते ते
खूप जण उसगावात अर्थात अमेरीकेत असतात आणि बहुतेक सर्वजण पुण्याच्या बाहेरच
अर्थात फास्टट्रॅक नाहीच होणार हिवाळ्यापर्यंत वाट बघावी लागेल.

सर्वांचे बिल देणारा पुणेकर खरंच असतो कि अफवा? >>>

प्रत्यक्ष येऊन खात्री का करत नाही?
येवा पुणे पण आपलेच आसा

अरे सगळ्यांनी या गोष्टीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करून मला कॉम्प्लेक्स घेऊ नका रे! मला खात्री आहे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जणानी हेच केलं असतं !

आणखीन एक गोष्ट! हे सगळेच मान्य करतील, पुणेकर हे अतिशय सहृदय , प्रामाणिक आणि दिलदारच असतात !

उपस्थित असलेल्या प्रत्येक जणानी हेच केलं असतं
>>>>>>

मला तर वाईट वाटले की कोणीतरी नाश्ता स्पॉन्सर केला आणि तो खायला मी तिथे नव्हतो Sad

फुकट मिळालेले खाण्यात एका वेगळीच मजा असते. कितीही पैसे मोजले तरी तो आनंद विकत घेता येत नाही Happy

फोटो छान.

पियूला ओळखलं नाही.
पियू, आपण कोणे एके काळी ठाण्यात एका गटगला भेटलो होतो (ना?)

माबो गटग आणि वृत्तान्तच हल्ली विरळा, त्यात विमलाबाई गरवारे गटग कुठून होणार Happy पण योग आलाच तर मज्जा येईल गप्पा मारायला!
आठवण काढल्याबद्दल धन्यवाद हर्पेन!! Happy

त्यात विमलाबाई गरवारे गटग कुठून होणार Happy पण योग आलाच तर मज्जा येईल गप्पा मारायला!>> मी पण विमला बाई विद्यार्थिनी आहे. १९८० पास आउट. निदान व्हिडीओ कॉल ने तरी हजेरी नक्की लावीन.

हो अमा,
वरती लिहायचे राहीले पण तुला कसे विसरणार
व्हिडीओ कॉल नको तू पुण्यात आलीस की प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

काय हव ते बनवु देउ...क्या बात है! भारिच की...
याउलट हरिहरेश्वरला संध्याकाळी सहा वाजता सात जणांसाठी चहा विचारला टपरीवर तर ती बाई म्हणाली "अरे बापरे, मला दुधाची नवी पिशवी फोडावी लागेल". बाजूच्या दुसऱ्या टपरीवरच्या माणसाने लगेच चहा करून दिला. प्रसादाचा शिरा मावेल एवढ्या कागदी कपांतून दिला आणि एकशे चाळीस रुपये घेतले. त्याच वर्षी माउंट अबूला तीन जणांसाठी चहा मागितल्यावर अर्धा लिटर दुधाची नवी पिशवी फोडून त्याचाच चहा केला व तीन कपांत दिला. पंचेचाळीस रुपये. (अवांतर सुचलं)

काळया जरकिन मधली मी आहे लप्रि.

अवांतर : पुन्हा असं गटग झालं (तळजाईलाच), येत्या एक दोन रविवार मध्ये.. तर कोणा कोणाला यायला आवडेल?

इतक्या लवकर मी नाही येऊ शकणार. एका माहितगाराने सांगितले की बहुतेक रविवारी तळजाईला (आणि पर्वतीला पण ) त्या मॅरेथॉन सारखे काही ना काही उपक्रम असतातच. त्यामुळे तळजाईला गाड्यांची प्रचंड गर्दी ठरलेली आहे.
तर पर्वतीला वर गेल्यावर निवांतपणा अवघड.

रविवार सकाळ आणि ते ठिकाण या गोष्टी बदलण्याचा काही विचार व्हावा असे मला वाटते.

शनिवारी दुपारी चार किंवा पाचला आणि अन्य एखादी बाग किंवा तत्सम जागा, असा काही विचार सर्वांनी मिळून करावा.

कोणत्याही दिवशी अगदी शनिवार रविवारी संध्याकाळी सुद्धा अजिबात गर्दी नसलेलं निवांत , सुंदर निसर्ग असलेलं ठिकाण म्हणजे वाळवेकर नगर मधलं वाळवेकर उद्यान !
( कृपया वाळवेकर लॉन्स शी गल्लीत करू नये)

वाळवेकर उद्यान !
>>>
अगदी माझ्या मनातलेच तुम्ही लिहिलेत !
ते दुपारी चार वाजता उघडते. त्यात दोन पॅगोडा आहेत. बरोबर दुपारच्या वेळेस जर एक दोन जण आधी गेले तर त्यातला एक पॅगोडा आपल्या लोकांसाठी पकडून ठेवता येईल. Happy समोरासमोर मिळून आरामात पंधरा-सोळा जण बसू शकतात.

मग सगळ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण हवे असेल तर हिरवाई ट्रॅक च्या BMCC बाजूच्या शेवटाला जाता येईल. त्याचे एक प्रवेशद्वार अमाया हॉटेल समोरच आहे. हिरवाई मधे आत गप्पा मारत बसायला जागा छान ऐसपैस जागा आहे.. नंतर अमाया आहेच समोर !

हर्पेन किंवा अतुल, कृपया कुणीतरी यासाठी वेगळा धागा काढा ना, म्हणजे तो सगळ्यांकडूनच वाचला जाईल आणि पुढच्या शनिवारी किंवा रविवारी तिथे जमण्याचे ठरवता येईल.

Pages