नमस्कार,
येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.
वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती: रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.
जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.
चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात
अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे
Photo 1:
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत
Photo 2
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.
इथे अनेक जणांनी मला फोटोत
इथे अनेक जणांनी मला फोटोत ओळखलं असं लिहिलंय... ते वाचून आश्चर्य वाटलं. खास करून फिल्मसुख बांगडू .. हा आयडी आधी नव्हता ना?
तू जुजा माबोकर असून असे
तू जुजा माबोकर असून असे प्रश्न कसे विचारतेस ग?
अर्रर्रर्र ! चांगलीच माती
अर्रर्रर्र ! चांगलीच माती खाल्लेली दिसतेय मी. जरा विस्कटून सांग रिया..
जुजा पण गेलं वाटतं माझं आता.
अवतार असतात माबोवर
अवतार असतात माबोवर
वविच्या वेळेसच सहकारनगर गटगचे
वविच्या वेळेसच सहकारनगर गटगचे सुतोवाच झाले होते.
अनेकदा नुसतेच बोलले जाते आणि दुसरे कोणीतरी पुढाकार घेईल तेव्हा जाऊ असे म्हणत चालढकल होत होत गटग राहून जाते.
ह्यावेळी आपण भेटायचे ठरले होते अशी आठवण केल्या केल्या अतुल यांनी तत्परतेने धागा उघडल्यामुळे हे गटग होऊ शकले.
हल्ली बरेच मायबोलीकर एकमेकांच्या संपर्कात इतर माध्यमातून असतात. त्यांच्या भेटीगाठीही होत असतात पण त्या गाठीभेटी त्या त्या क्लोस्ड ग्रुप पुरत्या मर्यादित राहतात. नवनवीन मायबोलीकरांच्या ओळखी व्हाव्या त्यांना भेटावे असे वाटूनही जे जमत नव्हते ते ह्यावेळी साध्य झाल्यामुळे आनंद वाटतो आहे.
सर्वांचे फोटो वेगवेगळ्या
सर्वांचे फोटो वेगवेगळ्या गटगच्या धाग्यावर पाहिले आहेत.
अतुल यांचा फोटो तर माबोवर अजितदादांपेक्षा जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.
हर्पेन यांना कुठे ना कुठे पळताना प्रत्येकाने पाहिलेले आहे.
इतके सोपे आहे ते.
इथली लोकेशन लिंकने नकाशात
इथली लोकेशन लिंकने नकाशात पाहिलं. पण अजून सिंहगड रस्त्यावरील एन्ट्री प्रतिसादात वाचलं. एकूण किती एन्ट्रीज आहेत? म्हणजे एका बाजूने घुसून दुसरीकडून बाहेर पडेन कधी पुण्यात गेल्यावर. सहकारनगर कडूनही जाता येईल का? दुपारी बंद करतात का? वेळ काय आहे?
मस्त फोटो व वृत्तांत.
मस्त फोटो व वृत्तांत.
एक मुलगी माझ्याशी
एक मुलगी माझ्याशी जन्मोजन्मीची ओळख असल्यागत उठून हातवारे करू लागली.
>> हाहाहाहा. मला आता माझे हातवारे आठवून हसायला येतंय.
मस्त फोटोज आणि वृतांत...
मस्त फोटोज आणि वृतांत...
खादाडी काय काय केली ?
एक मुलगी माझ्याशी
एक मुलगी माझ्याशी जन्मोजन्मीची ओळख असल्यागत उठून हातवारे करू लागली.
>> हाहाहाहा. मला आता माझे हातवारे आठवून हसायला येतंय. >>>>
हा क्षण एपिक सदरात मोडणारा होता.
येणार होते ते सगळे येऊन झाले होते.
लवकर जायचे होते ते गेलेही होते
गप्पा सुरु होत्या
आणि अचानक पियु जे काही करू लागली ते फार भन्नाट होते.
तिच्या तोंडून शब्द्च फुटेनात आणि मस्त बसलेली ही मुलगी एकदम उठून समोर धावत धावत गेली.
माझ्या मनात त्याक्षणी आलेला विचार होता; आत्ता तर ठीक होती ही अचानक काय झाले हिला.
बरं जिच्याकडे ही इतक्या ओढीने धावत गेली ती व्यक्ती मात्र देहबोलीनुसार गोंधळलेली दिसत होती. (कारण आत्ता ककळले)
पण ओळख पटल्यानंतर जे काही आनंदाचे भरते आले की ज्याचे नाव ते
ह्या गटगचा हायपॉईंट होता तो.
मस्त वृत्तांत!
मस्त वृत्तांत!
ऋन्मेषची आठवण निघाली हे ठीक आहे, पण माझीही?
मस्त वृत्तांत व फोटो!
मस्त वृत्तांत व फोटो!
हर्पेन, बॉलिवूड स्टाईल पियू आणि दक्षीची गळा भेट ... एकदम चित्रदर्शी वर्णन!
वावे,
वावे,
तुमच्या अक्ष वृत्तांत लेखाची आठवण काढली होती.
संगळ्याचे वृत्तांत छान आहेत.
संगळ्याचे वृत्तांत छान आहेत. पियू दक्षिणा भेटीचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला हवा होता.
ओह अच्छा, अतरंगी! धन्यवाद.
ओह अच्छा, अतरंगी! धन्यवाद.
आता मला प्रश्न पडला की अश्या
आता मला प्रश्न पडला की अश्या अभ्यासू लेखांची आठवण काढणारी जनता जमलेली तर माझी आठवण कशी निघाली
कोणत्या प्रकारचे लेख लिहू नये
कोणत्या प्रकारचे लेख लिहू नये यासाठी…….
हो ना.. अॅक्चुअली असे
हो ना.. अॅक्चुअली असे व्हायचे माझ्याशी शाळेत असताना. माझे निबंध बाई भर वर्गात वाचून दाखवायच्या.. निबंध कसे नसावेत हे सांगायला... जास्त काही लिहीत नाही आता.. कारण यात नव्या धाग्याचे पोटेंशिअल दिसतेय. पण अजूनही आहेत ते दिवस, राहिल्या नाहीत नुसत्या आठवणी
हेच पोटेंशल यूट्यूबवर वळवले
हेच पोटेंशल यूट्यूबवर वळवले असते तर भरपूर चालला असता चानेल.
सकाळी सकाळी ६.३०ला घरातून
सकाळी सकाळी ६.३०ला घरातून निघालो आणि शंभर दिडशे मीटर गेलो नाही तर हर्पेन दादा पळत पळत क्रॅास झाला. हायला हा ईकडे कुठे म्हणून गाडी थांबवे पर्यंत तो पुढे निघून पण गेला. हा आता रनिंग करून घरी जाऊन गटगला साडेसातला कसा पोचणार का कल्टी देणार हा विचार डोक्यात आला. मग म्हणलं अरे हा माबोचा आयर्न मॅन तिकडे असाच पळत पळत पोचायचा तर विचार करत नसेल ना? त्याला काय अशक्य आहे म्हणा…. त्याच्या फोटोज वरून लक्षात आलेच असेल की तो तसाच पळत पळत तिथे पर्यंत पोचला. >>>
अरे माझा आधीचा प्लॅन होता की सात वाजता टेकडीवरच रन सुरु करायची म्हणजे साडेआठपर्यंत रन संपवून गटगात सामील व्हायचे पण मग वेळ साडेसात केल्यामुळे सकाळी सहा वाजता अंधारात टेकडीपेक्षा रस्त्यावरच धावलेलं बरं.
खरेतर मला दहा मैल म्हणजे सोळा किमी करायचे होते पण उठायला उशीर झाला म्हणून टेकडीवर पोचेतोवर निदान बारा किमी पुर्ण होतील अशा हिशोबाने नेहेमीच्या रस्त्यावर अर्ध्यामधूनच माघारी फिरलो. देवळापाशी ते काही मीटर कमी भरत असल्यामुळे मग पुढे जाऊन परत आलो. (त्याच दरम्यान मी अतुलना दुचाकी लावायला मदत करताना बघीतले पण मधेच थांबवतील म्हणून हाक न मारताच पुढे गेलो.)
तुमच्या गाडीच्या शेजारून तुम्हाला टाटा बाय बाय करत तुम्हाला हरवून पुढे गेले >>
तसे झाले नाही पण काल तळजाई पठारावर असलेल्या किड्स मॅरॅथॉन करता झालेल्या गर्दीमुळे जे ट्रॅफीकजॅम झाले होते त्यामुळे सहज शक्य होते.
सॉलिड मस्त वाटतंय वाचूनच! !
सॉलिड मस्त वाटतंय वाचूनच! ! पियू दक्षिणा भेट खरंच शूट करायला पाहिजे होती. पण जे लिहीलंय त्यावरून इमॅजिन केली.
छान गटग आणि सर्व वृत्तान्तही
छान गटग आणि सर्व वृत्तान्तही
छान गटग आणि वृत्तांत
छान गटग आणि वृत्तांत
मस्त झालं gtg, फोटो भारीच.
मस्त झालं gtg, फोटो भारीच. बऱ्याच पोस्ट्स वाचायच्या आहेत अजून.
मी ही त्या सकाळी पुण्यात होते विथ फॅमिली पण तिथे येणं शक्य नव्हतं, दुसरा prgm ठरला होता. नऱ्हे, धनकवडी भागात होते.
गटगचे वृत्तांत आणि फोटो मस्त.
गटगचे वृत्तांत आणि फोटो मस्त. अशीच भरपूर गटगं घडोत.
लिहायचे राहून गेले होते.
लिहायचे राहून गेले होते.
एकतर धावून आलो होतो आणि कोथिंबीर वडी खाल्ल्यामुळे माझे तर तोंडच खवळले होते त्यामुळे गप्पा आटोपून खादाडीकडे कधी जातोय असे झाले होते. काही मेंबरांना लवकर जायचे असल्याकारणाने कुठ्ल्या रेस्तॉरंटात न जाता तिकडेच वरती जे स्टॉल आहेत तिकडे चहा तरी पिऊ असे म्हणून देवळाच्या आवारातून बाहेर पडलो. चहा प्यायला म्हणून अमृततुल्यच्या तिथे गेलो तर खूप गर्दी होती आणि काही जण म्हणाले खाऊन मगच चहा पिऊया त्यामुळे आणि बसायला रिकाम्या खुर्च्या दिसल्या कारणाने त्याच्या शेजारील स्टॉल वर गेलो. तिथे लगेच लक्ष जाईल असे लिहिलेले पदार्थ चायनीज असल्याने असे बापरे झाले पण तिथेल्या ताईंनी तुम्हाला उपमा शिरा काय हवे ते बनवून देते असे सांगीतले. पण गरमागरम पोहे तयार असल्याने सगळ्यांनीच पोहे खाल्ले आणि मग आला स्पेशल चहा.
तिथून निघताना पियु आली. तळजाई टेकडीवर आत वनविहाराला जायचे घाटत होते पण प्रचंड गर्दी बघता परत देवळाच्या आवारात जायचे ठरले
आणि त्यामुळेच दक्षी भेट झाली.
कोणालाही कळायच्या आत सगळ्यांच्या खादाडीचे बील पशुपत यांनी भरले.
कुमार यांनी अहो थांबा आम्ही पण देतो असे सांगायचा प्रयत्न तोकडा ठरला.
मी मस्तपैकी तुम्ही दोघे ज्येना जे काही ठरवाल ते मान्य असे म्हणून अंग काढून घेतले.
धन्यवाद पशुपत.
रच्याकने पशुपत हे विमलाबाई गरवारेचे विद्यार्थी असल्याचे कळल्यावर मै, फारेण्ड, रार, मित, आदित्य ई. गरवारेकरांची आठवण काढली होती
सेलेब्रिटी ओडीन
सेलेब्रिटी ओडीन
पहिल्यांदा आडेआठ वाजताची वेळ ठरली होती तेव्हा माझ्या डोक्यात आलेले की ओड्याला पण बोलावू म्हणून पण साडेसात ठरल्यावर मी
तसे सुचवायची हिंमतच केली नाही.
इतक्या भल्या पहाटे ओड्याच काय त्याचा बाबा पण उठत नसतो.
खरेतर ओड्या उठत नाही हे आपले म्हणायचे म्हणून खरे म्हणजे त्याचा बाबाच लवकर उठत नाही
तुम्हाला उपमा शिरा काय हवे ते
तुम्हाला उपमा शिरा काय हवे ते बनवून देते असे सांगीतले.>> पुण्याची संस्कृती घालवणार हे लोक एक दिवस.
ब्रेकफास्ट स्पॉन्सर
ब्रेकफास्ट स्पॉन्सर केल्याबद्दल पशुपत यांचे धन्यवाद !! लवकर निघायचं म्हणून निघाले पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर कळले की ट्रॅफिक जॅम तसेच होते . त्यामुळे वाटले उगाच निघालो. अजून गटग मध्येच थांबायला हवे होते . पण दुसरा पर्यायी रस्ता सापडला आणि जॅम मधून सुटका झाली . अजून एका ठिकाणी जायचे होते त्यामुळे लवकर निघावे लागले . पुढच्या वेळी फक्त गटग साठीच वेळ ठेवीन .
Pages